दोन कविता

राधेय's picture
राधेय in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am

body {
background-image: url("https://i.postimg.cc/mZ0mm9NL/diwali-fireworks.png");
}

/* जनरल */

h1, h2, h3, h4 {font-family:'Laila',serif}
p {font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size:16px; text-align:justify;}
h5 {font-size:15px!important; text-decoration:underline;}

.shirshak {
background-image: url("https://i.postimg.cc/YqkfF6BT/Orange-Gradient-Background.png");
padding:16px;
margin-top: -54px;
height:80px;
}

.glow {
font-size: 40px;
text-shadow: 1px 1px 0 #444;
font-family: 'amita',cursive;
color: #fff;
padding:16px;
line-height: normal !important;
margin-top: -27px;
}

.majkur {padding:10px;}
.majkur a:link {color:#cc0000;}

#slide-nav .navbar-toggle { display: none !important;}

.input-group {
display: none !important;
}
.navbar-nav { display: none !important;}

.page-header { padding-top:16px !important;}

.col-sm-9 {
background-image: url("https://i.postimg.cc/kMS0JTBP/main-bg.png");
}
.chitra {
background-color: white;
padding:10px;
border: 1px solid #ccc;
}

मिपा दिवाळी अंक  २०१९
अनुक्रमणिका

दोन कविता

कवितेत माझ्या तू नव्याने जन्म घेते...

मैफिलीची जेव्हा कधी सुरुवात होते.
प्रेमातल्या क्षणांची तुझ्या मज याद येते.
आहे बांधले शब्दात मी कितीदा तुला.
तरी कवितेत माझ्या तू नव्याने जन्म घेते.
मैफिल असते प्रेमात खचलेल्या मनांची.
असते खरी श्रद्धांजली ती आसवांची.
विरहात कधी जेव्हा कुणी सरणात जळते.
तेव्हा कवितेत माझ्या तू नव्याने जन्म घेते.
सांगतो जेव्हा कुणी त्याची कहाणी
भरल्या मैफिलीच्या दाटते डोळ्यात पाणी.
मात अशी जेव्हा कुणा प्रेमात मिळते.
तेव्हा कवितेत माझ्या तू नव्याने जन्म घेते
मैफिल असते प्रेमात जळल्या काळजांची.
असते तिथे स्पर्धा फसलेल्या क्षणांची.
जे ऐकून माझे हाल मैफिल स्तब्ध होते.
तेव्हा कवितेत माझ्या तू नव्याने जन्म घेते.
हसतात जेव्हा मैफिलीतील लोक मजला
जाणतो मी त्यात असतो शोक दडला.
बोटे मोडताना जेव्हा कुणी तुझे नाव घेते,
तेव्हा कवितेत माझ्या तू नव्याने जन्म घेते.

**********

प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.

नियतीशी मी अजून थोडा लढेन म्हणतो.
प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.
किती खेळलीस खेळ तू माझ्या आयुष्याशी.
तरी जागलो मीच दिल्या माझ्या शब्दाशी.
आठवून द्यावी तुला तुझी मी वचने म्हणतो.
प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.
किती उन्हाळे तुझ्याविना मज जाळून गेले.
अश्रू माझे वाट पाहुनी वाळून गेले.
डोळ्यात पुन्हा प्रेम लाजरे भरेन म्हणतो.
प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.
नशिबाचे माझ्या भोग भोगुनी झाले आहे.
विष तुझ्या प्रेमाचे चाखून झाले आहे.
ह्या हृदयावरचे घाव पुन्हा कुरवाळीन म्हणतो.
प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.
झुरलो तरीही वाट पहाणे सरले नाही.
मनात माझ्या कुणीच नंतर भरले नाही.
विश्वास आंधळा पुन्हा तुजवरी ठेवीन म्हणतो.
प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.
ठाऊक आहे उशीर थोडा झाला आहे.
पश्चिमेकडे सूर्य कधीच कलला आहे.
मावळताना रंग केशरी उधळीन म्हणतो.
प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.
नियतीशी मी अजून थोडा लढेन म्हणतो.
प्रेमात तुझ्या मी पुन्हा नव्याने पडेन म्हणतो.

20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

26 Oct 2019 - 2:05 pm | यशोधरा

साध्या, सहज, ओघवत्या शब्दांतल्या कविता.

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 5:40 pm | श्वेता२४

.

पद्मावति's picture

10 Nov 2019 - 1:23 am | पद्मावति

सहज सुंदर. दोन्ही रचना आवडल्या.

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 2:00 pm | अलकनंदा

साध्या, प्रामाणिक रचना.