सूचना

वारंवार सूचना देऊनही काही सदस्य वैयक्तिक आणि खालच्या पातळीवरील प्रतिसाद देत आहेत. असे आढळल्यास विना सूचना कडक कारवाई करण्यात येईल.

मुलाखत- मनोज जोशी

Primary tabs

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in लेखमाला
7 Sep 2019 - 6:05 am


मुलाखत- मनोज जोशी'मनोज जोशी' या अभिनयसंपन्न कलाकाराचे केवळ नाव घेतले, तरी त्यांनी अभिनित केलेल्या अनेक व्यक्तिरेखा डोळ्यासमोर उभ्या राहतात. अश्विनी भावे यांच्यासह केलेली 'राऊ' ही त्यांची पहिली मराठी मालिका. मात्र त्याअगोदर ते मराठी आणि गुजराथी नाट्यसृष्टीमध्ये बरीच वर्षे काम करत होते. त्यांच्या उमेदीच्या काळात 'चाणक्य' नाटकात त्यांनी चाणक्याची भूमिका करण्यास सुरुवात केली आणि त्या भूमिकेचे सोने केले. चाणक्य आणि मनोज जोशी हे समीकरण आजही अतूट ठरले आहे.

मनोज जोशी एक अष्टपैलू कलाकार तर आहेतच; मात्र त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे ते मराठी, गुजराथी आणि हिंदी भाषा अगदी सहज बोलतात. त्यामुळे या तिन्ही भाषांमधील नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रात ते लीलया संचार करतात. भूमिका कोणत्याही पठडीतली असू दे, मनोज जोशी त्या भूमिकेला योग्य न्याय देतात.

उदाहरणच द्यायचे झाले, तर भूलभुलैया हा चित्रपट खरे तर केवळ अक्षयकुमार आणि विद्या बालन या दोघांचा. मात्र तत्त्वनिष्ठ आणि जुन्या विचारांना मानणाऱ्या काकांची भूमिका मनोजजींनी अत्यंत सच्चेपणे आणि लक्षात राहील अशी साकारली आहे. तसाच 'फिर हेराफेरी'मधील कचरासेठ! ही भूमिकाही लक्षात राहणाऱ्या भूमिकांपैकी एक.

अशा अत्यंत गुणी, मनमोकळ्या स्वभावाच्या मनोजजींची, श्रीगणेश लेखमालेसाठी ज्योति अळवणी ह्यांनी घेतलेली मुलाखत, फक्त तुम्हां मिपाकरांसाठी!

श्रीगणेश लेखमाला २०१९

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

7 Sep 2019 - 8:41 am | दुर्गविहारी

छान ! मी मनोज जोशींची राउ बघीतली असल्याने पुढे बराच काळ ईतर भुमिकात त्यांना स्विकारणे होत नव्हते. बाजीराव म्हणूनच ते मनात ठसले होते.
अर्थात पुढे त्यांनी उत्तम भूमिका केल्या. मला आवडते ती "हंगामा" या चित्रपटातील पोलीस ईन्स्पेक्टरची भुमिका.

यशोधरा's picture

7 Sep 2019 - 9:08 am | यशोधरा

मनोज जोशी सुरेख बोलले आहेत!
आवडलीच मुलाखत.

मित्रहो's picture

7 Sep 2019 - 9:12 am | मित्रहो

वर दुर्गविहारी यांनी म्हटल्यारप्रमाणे मलाही त्यांची हंगामा चित्रपटातील इन्सपेक्टरची भूमिका खूप आवडते.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Sep 2019 - 9:53 am | ज्ञानोबाचे पैजार

मनोज जोशी म्हणजे "राउ" हे समिकरण डोक्यात फीट झाले आहे. पण त्यांच्या इतरही भुमिका आवडतात.

शुटिंग करायला दुसर्‍या कोणाची तरी मदत घेउन मोबाईल कॅमेरा आडवा ठेउन मुलाखत शुट केली असती तर बरे झाले असते, आता पडद्याच्या दोन्ही बाजू काळ्या पट्ट्या व त्या मधे बंदिस्त झालेले मनोज जोशी दिसत आहेत.

कॅमेर्‍याची पोझिशन फिक्स असल्याने त्यांच्या हलचालिंवरही बरीच बंधने आली आहेत. प्रश्ण विचारणारी व्यक्ती दिसत नसल्यानेही मुलखत पहाताना रसभंग होतो आहे.

पैजारबुवा,

ज्योति अळवणी's picture

7 Sep 2019 - 3:59 pm | ज्योति अळवणी

खर आहे. पण त्यांची वेळ मिळत नव्हती. ही मुलाखत त्यांनी दिली आणि 15 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर ते गेले. त्यामुळे प्रोफेशनल कॅमेरा वगैरे जमू शकले नाही.पुढे जर कोणती मुलाखत घ्यायचे ठरले तर ते लक्षात ठेवेन.

त्याशिवाय मला कॅमेराची सवय नसल्याने मुलाखत घेताना कॉन्शस होऊन चुका होतील या भितीने कॅमेराच्या मागे राहिले. मात्र पुढच्या वेळी आपल्या सूचना लक्षात ठेवेन

जॉनविक्क's picture

7 Sep 2019 - 9:57 pm | जॉनविक्क

अन इंटरोगेशन जास्त वाटते.

असो, मुलाखत आवडली त्यांच्या अभिनयपध्दतिचा मी पंखा आहेच.

बबन ताम्बे's picture

7 Sep 2019 - 11:26 am | बबन ताम्बे

मनोज जोशी वेगवेगळ्या भूमिका सुंदर साकारतातच, पण मला त्यांची नारबाची वाडी या चित्रपटातील खोताची दुहेरी भूमिका खूप आवडते. आधीचा स्रीलंपट म्हातारा खोत आणि त्यांनतर त्याचा लोभी, कंजूस वकील मुलगा अतिशय सुंदर वठवलाय.

सुधीर कांदळकर's picture

7 Sep 2019 - 11:51 am | सुधीर कांदळकर

सुरू असल्याने स्ट्रीमिन्ग होत नाही असे दिसते. कुतूहल आहे.

वाह मस्तंच. मनोज जोशी म्हंटलं कि पहिल्याप्रथम राऊच डोळ्यासमोर येतात. अनेक मालिका आणि चित्रपट त्यांनी केले. एक महल हो सपनों का मधला रिच फ्लाम्बोयंट अभय नानावटी असो का हम परदेसी हो गये मधला नयिकेचा प्रेमळ काका. प्रत्येक भूमिकेमधे मनोजजी समरसून काम करतात. मराठी, हिंदी आणि गुजराती या तिन्ही भाषांवरचे त्यांचे प्रभुत्व थक्क करणारे आहे.
ज्योति तुझे खास कौतुक आणि मन:पूर्वक आभार या मुलाखतीसाठी. मनोजजींच्या व्यग्र वेळापत्रकामधून तू हि मुलाखत मिळवायला धावपळ केलीस आणि हि मुलाखत आमच्यासाठी आणलीस त्यासाठी __/\__

यशोधरा's picture

7 Sep 2019 - 1:58 pm | यशोधरा

अगदीच बाडीस!

ज्योति अळवणी's picture

7 Sep 2019 - 4:01 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद पद्मावती

मिपा आता माझ्या आयुष्याचा अविभाज्य भासग झालं आहे. त्यामुळे माझ्या संकेतस्थळा साठी जे अहकय आहे ते सगळं करीन

ज्योति अळवणी's picture

7 Sep 2019 - 4:04 pm | ज्योति अळवणी

मी फक्त नावपूर्तीच. खरी मेहेनत यशोधराजी आणि ससाची. सगळं एडिटिंग त्यांनीच केलंय

धन्यवाद

मी नाही ज्योती, नीलकांतने केले आहे. :)
मी आणि इतर टीम प्रश्न सुचवण्याची मदत केली फक्त.

तू खूप मेहनत केलीस, मनोज जोशींची वेळ घेणे, फॉलो अप करणे, जाऊन मुलाखत घेणे.. ग्रेट जॉब!!

मिपाची ऑफिशियल मुलाखतकार झाली आहेस! :))

ज्योति अळवणी's picture

7 Sep 2019 - 9:50 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद यशोधराजी

असं म्हणूया की मिपा टीमची मेहेनत आहे. सगळे एकत्र काम करतोय म्हणून तर जमतंय न हे सगळं

टर्मीनेटर's picture

7 Sep 2019 - 4:14 pm | टर्मीनेटर

एक नंबर!
मनोज जोशींच्या हंगामा, भूलभुलैया, फिर हेराफेरी, दे दनादन, खट्टा मिठा आणि हलचल ह्या चित्रपटांतील भूमिका चांगल्याच लक्षात आहेत.
टी.व्ही. सिरियल्स बघत नसल्याने त्यातल्या त्यांच्या भूमिकांविषयी काहीच कल्पना नव्हती, ती माहिती या धाग्यात मिळाली.
छान झाली आहे मुलाखत, धन्यवाद!

प्रचेतस's picture

7 Sep 2019 - 7:51 pm | प्रचेतस

मुलाखत उत्तमच झाली आहे.
मिपावर ह्या निमित्ताने मोठमोठे कलाकार येत आहेत हे मिपाचं भाग्यच.
ज्योती अळवणींचे खूप आभार ह्या मुलाखतीसाठी.

नाखु's picture

8 Sep 2019 - 4:25 pm | नाखु

कलाकार आणि तितकीच सुंदर आढावा घेतला जाणारी बोलतं करणारी मुलाखत.
आपल्यामध्ये एक उत्तम मुलाखतकार दडलेला आहे.ज्याची मुलाखत घ्यायची त्याबद्दलची नेमकी माहिती आणि वाटचालीत असलेले टप्पे आपण कुशलतेने विचारले आहेत.

वाचकांची पत्रेवाला नाखु

सोत्रि's picture

8 Sep 2019 - 4:48 pm | सोत्रि

ह्या मुलाखतीबद्दल अतिशय धन्यवाद!

माझ्या आवडत्या कॅरॅक्टर ॲक्टर्सपैकी एक आहेत मनोज जोशी. ‘नारबाची वाडी‘ त्यांनी गाजवली होती.

- (मनोज जोशींचा पंखा) सोकाजी

वाह मस्तंच. मुलाखत उत्तमच झाली आहे. ह्या मुलाखतीबद्दल अतिशय धन्यवाद!

मनोज जोशी म्हणल की सरफरोश मधला dailouge आठवतो..."मुम्बइ मै ACP राठोड के सामने हाजरी. वरना हमे दिख गया तो उडा देन्गे.."
https://www.youtube.com/watch?v=QD09hnb_CXY

सिरुसेरि's picture

12 Sep 2019 - 10:28 pm | सिरुसेरि

+१ . राउ नंतर बरेच दिवस मनोज जोशी ठळकपणे कुठल्या मालिकेमधे / चित्रपटामधे दिसले नाहीत . त्यानंतर खुप वर्षांनी त्यांची धडाकेबाज एंट्री झाली ती सरफरोश मधे एसीपी अजय राठोडचा सहकारी म्हणुन . बाला ठाकुरच्या गुंडाला घरात घुसुन पकडणारा , त्याच्या कॉलरला धरुन धावत्या जीपबरोबर फरफटत नेणारा आणी अजय राठोड्कडे हजेरी लावण्याचा दम देउन त्याला फेकुन देणारा डॅशींग मनोज जोशी चांगलाच लक्षात राहिला .

अवांतर - सरफरोश मधे बाला ठाकुरची एंट्री झाल्यावर जाणकार प्रेक्षक एकमेकांशी " हा तर रंगीलामधला पक्या " असे कुजबुजतात .

पद्मावति's picture

13 Sep 2019 - 12:47 am | पद्मावति

सरफरोश मधे बाला ठाकुरची एंट्री झाल्यावर जाणकार प्रेक्षक एकमेकांशी " हा तर रंगीलामधला पक्या " असे कुजबुजतात .

रंगीला मधे पक्याचे काम करणारे राजेश जोशी हे मनोज जोशींचे धाकटे बंधू होते. दुर्दैवाने 'होते' असे म्हणतेय कारण राजेश जोशींचे १९९८ मधे निधन झाले. दोघा भावांच्या चेहऱ्याच्या साधर्म्यामुळे लोकांचा गोंधळ झाला असावा.