✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

हे असे का असावं?

त
तमराज किल्विष यांनी
Mon, 08/05/2019 - 11:05  ·  लेख
लेख
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं. जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले. बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही. यामुळे मला कल्पना रंजन करत राहण्याची सवय झाली. कोणत्याही देव, संत, खेळाडू, देशभक्त, राजे, ग्रंथ यांचं नाव कानावर पडताच मनात लगेच विचारचक्र सुरू होतं, ते लवकर थांबतच नाही. सिनेमा पाहिला तर किमान आठवडाभर त्याचं विश्लेषण मनात सुरू राहतं. प्रयत्न करूनही विचार थांबत नाहीत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो. खूप प्रयत्न करुन या संवादातील एखादं वाक्य नीट लक्षात घेऊन हे काय आहे हे पाहिले तर संदर्भहीन, असंबद्ध वाक्य असल्याचं ध्यानात येते. मुन्नाभाई एमबीबीएस मधील केमिकल लोच्या सारखा हा प्रकार आहे का असे वाटते. आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते. कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती. प्रश्नोत्तरे विभागात जाता न आल्याने इथे लिहीलं आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
आरोग्य
लेखनप्रकार (Writing Type)
सल्ला

प्रतिक्रिया द्या
32622 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

अरे व्वा. एकशे चाळीस लोकांनी

तमराज किल्विष
Mon, 08/05/2019 - 16:54 नवीन
अरे व्वा. एकशे चाळीस लोकांनी वाचले. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मला पन असेच वतते

हस्तर
Mon, 08/05/2019 - 17:07 नवीन
मला पन असेच वतते मि सादर चित्रपत म्हनुन धागे तक्ले ननतेर अचनक गायब एक अकु कका अमवस पुर्निमा झालि कि येतत
  • Log in or register to post comments

सर्वात महत्त्वाचे म्हणजे

जॉनविक्क
Mon, 08/05/2019 - 17:45 नवीन
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो.
एखादे उदा. देता येईल का ऐकू येणाऱ्या संभाषणाचे ?
  • Log in or register to post comments

धन्यवाद जॉन विक्क जी . हा

तमराज किल्विष
Mon, 08/05/2019 - 17:52 नवीन
धन्यवाद जॉन विक्क जी . हा प्रकार चालूच राहतो. अतिशय सजगतेने पकडायला गेले तरी एखादं वाक्य हाती लागतं. जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते. हे वाक्य काहीही असतं. जसं एखाद्या हॉटेलात चाललेला कोलाहल. बस स्थानक, रेल्वे स्थानकावरील गोंगाट यासारखं.
  • Log in or register to post comments

कानात गोंगाट ऐकू येण्याची अनेक कारणे असतात

जॉनविक्क
Mon, 08/05/2019 - 21:25 नवीन
अतिशय सजगतेने पकडायला जाताना मात्र बरेचदा आपण आपलेच वाक्य/विचार ऐकू येणाऱ्या गोंगाटात लादण्याची शक्यता नाकारता येत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

जी लावला! क्षमस्व!

तमराज किल्विष
Mon, 08/05/2019 - 17:52 नवीन
जी लावला! क्षमस्व!
  • Log in or register to post comments

कान बंद करूनही हा आवाज ऐकू येतो काय ?

जॉनविक्क
Mon, 08/05/2019 - 17:57 नवीन
I
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

नाही.

तमराज किल्विष
Mon, 08/05/2019 - 19:46 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments

एकदा खात्री करा कानात घालायला प्लग मिळतात

जॉनविक्क
Mon, 08/05/2019 - 20:07 नवीन
ते वापरून खात्री करा की आवाज येत नाहीत ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

कान बंद केल्यावर आवाज येत

सुबोध खरे
Mon, 08/05/2019 - 20:19 नवीन
कान बंद केल्यावर आवाज येत नाही असे असेल तर कानाच्या डॉक्टरला दाखवून घ्या आपल्या अन्तर कर्णात (INNER EAR) गडबड झाली तर असे होऊ शकते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

डॉक्टर साहेब मला संभाषणं

तमराज किल्विष
Mon, 08/05/2019 - 20:24 नवीन
डॉक्टर साहेब मला संभाषणं चालली असे भास होतात. शिट्टीसारखे आवाज येत नाहीत. मला तरी हा प्रकार अति जलद विचार करण्यामुळे होत असावा असे वाटते.
  • Log in or register to post comments

हा प्रकार काही सेकंदच आणि अचानक घडतो काय ?

जॉनविक्क
Mon, 08/05/2019 - 20:29 नवीन
विशेषतः आशा आवाजाने झोपमोड होणे वगैरे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

सतत दिवसाही सुरू राहतो. पण

तमराज किल्विष
Mon, 08/05/2019 - 21:06 नवीन
सतत दिवसाही सुरू राहतो. पण इतका लक्षात येत नाही. रात्री शांततेत त्रासदायक वाटतो.
  • Log in or register to post comments

कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू

जॉनविक्क
Mon, 08/05/2019 - 21:21 नवीन
कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू येत नसतील तर काळजीचे कारण वाटत नाही. मात्र तरीही आवाज येत असतील तर टीनिटस, फ़ंगस साठी ENT तज्ञ गाठा जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल. नुसता विचार करून शरीरास लागलेल्या काही चुकीच्या सवयींमुळे जर रक्त वाहिन्यांवर ताण येत नसेल तर असे आवाज ऐकू येणं हा मनोव्यापाराचाच प्रांत असू शकतो. मी माझी निरीक्षणे गांभीर्यानेच देत आहे, विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

जर कान निर्दोष असतील तर मग

सुबोध खरे
Tue, 08/06/2019 - 18:38 नवीन
जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल. हेच लिहिणार होतो परंतु मानसोपचार तज्ञ म्हटले कि लोक लगेच घुमजाव करतात म्हणून अगोदर कानाच्या तज्ज्ञाकडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

विकेट घ्यायला मला आधी खेळाडू

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/10/2019 - 18:57 नवीन
विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत

तमराज किल्विष
Mon, 08/05/2019 - 21:08 नवीन
जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहे का विकेट घेणे चाललं आहे. तिकडे मायबोलीवर एकजण उगाचच मागं लागला या विषयावर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

तमराज किल्विष
Tue, 08/06/2019 - 07:40 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

जास्त कॉन्सन्ट्रेट केले की

सोत्रि
Tue, 08/06/2019 - 09:07 नवीन
जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते.
हे लक्षण चांगले आहे. युट्यूबवर ‘गायडेड मेडीटेशन‘चे व्हिडीयो बघून ध्यान करा किंवा चांगल्या ध्यानकेंद्रात जाऊन ध्यान करणए शिकून घ्या. - (ध्यानयोगी) सोकाजी
  • Log in or register to post comments

धन्यवाद सोत्रि भाऊ.

तमराज किल्विष
Tue, 08/06/2019 - 14:44 नवीन
धन्यवाद सोत्रि भाऊ.
  • Log in or register to post comments

काॅलिंग शक्तिमान व सूर्यांशी

Ujjwal
Tue, 08/06/2019 - 19:13 नवीन
काॅलिंग शक्तिमान व सूर्यांशी
  • Log in or register to post comments

हॅलो बोला.

तमराज किल्विष
Wed, 08/07/2019 - 08:39 नवीन
हॅलो बोला.
  • Log in or register to post comments

गीता मला फार आवडायची. खूप

तमराज किल्विष
Wed, 08/07/2019 - 15:06 नवीन
गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती.
  • Log in or register to post comments

ही गीता कोण ?

जॉनविक्क
Wed, 08/07/2019 - 15:44 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

उज्वल यांना उद्देशून लिहिले

तमराज किल्विष
Wed, 08/07/2019 - 19:11 नवीन
उज्वल यांना उद्देशून लिहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

गीता मला फार आवडायची. खूप

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/10/2019 - 19:07 नवीन
गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती. हे जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहे याच्याशी अजिबात जुळत नाही.* ती दोन विधाने वाचून कोणी, "हा लेख म्हणजे तुम्ही फावल्या वेळेचा उद्योग चालवला आहे", असे म्हटले तर वाईट वाटून घेऊ नका... आणि आजारपणाचे निमित्त काढून गळा तर अजिबात काढू नका. मात्र, वरची दोन्ही वाक्ये गंभीरपणे लिहिली असली तर, वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञाला गाठा. कारण, ती अवस्था, "फ्लाईट ऑफ थॉट्स" असू शकते, जी फार गंभीर गोष्ट आहे. हे मत एका मिपाकराच्याबद्दलच्या (तुमच्याबद्दलच्या) काळजीमुळे गंभीरपणे लिहिलेले आहे. ++++++++++++++++++ * जबानीतले असे निसटते क्षण चोरी पकडायला पोलिस वापरतात, असे म्हणतात. ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

गीता मला फार आवडायची. खूप

जॉनविक्क
Sat, 08/10/2019 - 19:28 नवीन
गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती. असे मी केंव्हा म्हटले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादांची हायरार्की पाहिली

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/11/2019 - 12:03 नवीन
प्रतिसादांची हायरार्की पाहिली तर माझा प्रतिसाद धागा लेखकाला (तमराज किल्विष) आहे असे दिसेल. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

होय

जॉनविक्क
Sun, 08/11/2019 - 12:12 नवीन
माझीच प्रतिसाद समजून घेण्यात चूक झाली. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

क्षमा मागण्याची अजिबात गरज

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/11/2019 - 13:03 नवीन
क्षमा मागण्याची अजिबात गरज नाही. प्रतिसादांच्या हायरार्कीच्या प्रणालीमुळे असा गैरसमज होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

:-)) कृपया शेवटचा प्रतिसाद

तमराज किल्विष
Sat, 08/10/2019 - 20:00 नवीन
:-)) कृपया शेवटचा प्रतिसाद पहावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही हे गांभीर्याने लिहित

प्रकाश घाटपांडे
Wed, 08/07/2019 - 15:16 नवीन
तुम्ही हे गांभीर्याने लिहित असाल तर मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेणे हे उत्तम. हल्ली तर तरुण पोर देखील मूड मॅनेजमेंटसाठी सायकियाट्रिस्ट कडे जातात.
  • Log in or register to post comments

शक्तिमान सिरियल मधली गीता.

तमराज किल्विष
Wed, 08/07/2019 - 19:10 नवीन
शक्तिमान सिरियल मधली गीता. प्रकाश जी सायकियाट्रिटकडे जावे की सायकॉलॉजीस्ट कडे जावे. एकदा सायकियाट्रीटच्या गोळ्या घेतल्या आहेत. फार भयंकर दुष्टचक्रात अडकल्यासारखे झाले होते. सतत गुंगी व शरीरक्रिया इतकी संथ झाली की बस. गोळ्या बंद केल्या तर वेड लागल्यासारखे होत होते. कसेतरी बाहेर पडलो.
  • Log in or register to post comments

मेडिकेशन व थेरपि असे

प्रकाश घाटपांडे
Wed, 08/07/2019 - 19:17 नवीन
मेडिकेशन व थेरपि असे ढोबळ्मानाने दोन पन्थ आहेत ते प्राधान्यक्रमानुसार ,थेरपि वाले अग्रक्रमाने थेरपि ला मह्त्व देतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

एकदा गोळ्या घेतल्या आहेत ? काय बोलता ?

जॉनविक्क
Wed, 08/07/2019 - 20:04 नवीन
मग हे काय होते ? आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते. कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

त्यांना त्यांच्या भरोशावर

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/11/2019 - 12:05 नवीन
त्यांना त्यांच्या भरोशावर सोडा... ते इतरांच्या मनाची शक्ती ड्रेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

:)) हा हा हा

जॉनविक्क
Sun, 08/11/2019 - 12:15 नवीन
इतरांना ड्रेन करण्यात ते फार ट्रेन वाटतात खरे :) पण... मन मानत नाही हो ;(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

:)

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 08/11/2019 - 13:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

जॉन भाऊ मला मागे अचानक

तमराज किल्विष
गुरुवार, 08/08/2019 - 08:48 नवीन
जॉन भाऊ मला मागे अचानक कोणत्याही कारणाशिवाय डिप्रेशन आलं होतं तेव्हा ती ट्रिटमेंट घेतली होती. ती घेऊन पंधरा सोळा वर्षे झाली आहेत. आताचा प्रॉब्लेम वेगळा आहे.
  • Log in or register to post comments

नमस्कार,

राघव
Fri, 08/09/2019 - 15:17 नवीन
नमस्कार, तुम्ही हे सर्व फार गांभीर्यानं लिहिलं आहे आणि हा प्रॉब्लेम अजूनही तुम्हांस त्रास देतोय असं गृहित धरतो. हा प्रॉब्लेम मला होऊन गेला आहे. आणि मला तरी निदान कोणा डॉक्टरकडे जायची गरज पडली नाही. त्या अनुषंगानं काही प्रश्न खाली लिहिलेत. त्यांची उत्तरं इथे दिली नाहीत तरी चालेल, पण तुमच्या जवळ असू द्यात. जर कान बरोबर असेल आणि प्रॉब्लेम अजूनही असेल तर, या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होईल. - तुम्ही शांत अशी साधारण ६-७ तास सलग झोप शेवटची कधी घेतली होतीत? - सलग झोप लागत नसल्यास रात्रीत कितीवेळा तुम्हाला जाग येते? कारण काय? - ऑफिस कामाव्यतिरीक्त, खूप डोकं लावावं लागेल अथवा विचार करावं लागेल अशा किती बाबींमधे तुमचा [ कृतीशील्/सुप्त ] सहभाग आहे? त्यात तुमचा दिवसाचा किती वेळ जातो? - आपण जो विचार करतो तो दुसर्‍याला सांगतांना तुमच्या कधी असं लक्षात आलंय का, की समोरच्याला ते खूप हळू आकलन होतंय? - १ ते ५ च्या पट्टीवर, भावनिक दृष्ट्या कणखरतेबद्दल तुम्ही स्वतःला कुठे बघाल? - एखादी गोष्ट सलग खूप तास बिना ब्रेक घेता तुम्ही केली आहे काय? खासकरून जेथे खूप विचार करावा लागेल अशी? असेल तर किती वेळा? - एखादी जुनी आणि तुम्हाला न आवडणारी आठवण, तुम्ही घोळवत ठेवलीये का? असल्यास अगदी हसत हसत कुणाला सांगून पाहिली आहे का? तसे करून बघाल का? - तुम्ही डोकेदुखी, अंगदुखी किंवा तत्सम पीडेवर गोळ्या घेताय का? असल्यास महिन्यातून कितीवेळा? वैचारिक अतिरेकाच्या एका क्षणी असा अनुभव येतो, हा निदान माझा तरी अनुभव आहे. जर तुम्हाला आपण वैचारिक अतिरेक करत असल्याचे जाणवले तर खालील उपाय मदत करतील. - सकाळी उठल्यावर, कुत्रा/मांजर जेवढे स्ट्रेच करतात व जेवढावेळ करतात, तेवढा तरी व्यायाम करावा. - जर मैदानी खेळ खेळायला आवडत असेल तर जसे जमेल तसे, थोडे का होईना, जरूर खेळावे. - ज्या गोष्टीत, मी आत्ता स्वतः काहीही करू शकत नाही, त्यांना मी आत्ता तरी सोडतोय असं मनाला नीट समजवावं. या गोष्टीला थोडा वेळ लागतो, पण एखाद्या लहान अन् द्वाड मुलाला आपण कसं जवळ घेऊन नीट सांगायचा प्रयत्न करू.. तसं हे मनाला समजवावं लागतं. असे एकेक विषय नीट समजावून हातावेगळे करावेत. विचारांचा अतिरेक यामुळे नक्की कमी होतो. - शक्यतो घरच्यांच्या सोबत बसून, सगळ्यांनी मिळून एकत्र जेवावं. - रात्री झोपण्याच्या आधी शांत, संथ पण आनंदमधुर असं संगीत ऐकावं [दु:खी नको]. जमल्यास गुणगुणावं. टीपः हे सर्व मी माझ्या अनुभवावरून लिहिलेलं आहे. सगळ्यांनाच ते तसंच लागू पडेल असं नाही. पण मदत होईल असं वाटतं. जर नाही झाली तर सोडून द्यावं. राघव
  • Log in or register to post comments

खूप धन्यवाद राघवजी. मला झोप

तमराज किल्विष
Sat, 08/10/2019 - 07:45 नवीन
खूप धन्यवाद राघवजी. मला झोप कधीकधी दहा ते बारा तास लागते, तर कधी रात्रभर जागा राहतो. मला माझ्या हातून घडलेल्या चूका ज्या समोरच्यांच्या लक्षातही राहिल्या नाहीत, किंवा त्यांनी ते सोडून दिले आहे अशा क्षुल्लक देखील चुकांची खूप बोचणी लागते, मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे. पण मला जी संभाषणं ऐकू येतात त्याचा नि याचा संबंध नसावा असे वाटते. मी कोणतेही औषध घेत नाही. वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे घेतच नाही.
  • Log in or register to post comments

ठीक आहे. तसंच काहिसं असेल असं

राघव
Sat, 08/10/2019 - 10:25 नवीन
ठीक आहे. तसंच काहिसं असेल असं वाटलं होतं. स्वतःच्या लहान लहान चुकांकडे त्रयस्थपणे बघून त्यांना हसण्यावारी नेणे.. अशा बहुतांश चुका आपल्या जवळच्या व्यक्तींच्या पुढे मांडून त्यावर स्वतःच विनोद करणे.. यामुळे मनावरचा ताण कमी होतो, त्या चुकांची आठवण कमी त्रासदायक होते हा स्वानुभव आहे. अर्थात् सगळ्याच गोष्टींबद्दल असं आपण करू शकत नाही, हे मान्य. असो. -- वर नमूद केलेले प्रयोग आपणांस वाटलेत तर जरूर करून पहावेत. बाकी चांगल्या मानसोपचारतज्ञाकडे जाण्याचा श्रेयस्कर मार्ग आहेच, जो कधीही उत्तम. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

धन्यवाद सर

तमराज किल्विष
Sat, 08/10/2019 - 10:54 नवीन
धन्यवाद सर
  • Log in or register to post comments

मनात त्या चुका मनाविरुद्ध

जॉनविक्क
Sat, 08/10/2019 - 11:31 नवीन
मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे
तुम्ही प्रचंड तणवग्रस्त आहात. म्हणून निगेटिव इमोशन जास्त तीव्र अनुभवाला येत आहेत. आधी फक्त आवाजाचा त्रास होता असे वाटले, पण आता आपली परिस्थिती कठिण भासत आहे. आपण त्वरित समूपदेशन आणि औषधे दोन्ही घेणे श्रेयस्कर.
  • Log in or register to post comments

जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन

तमराज किल्विष
Sat, 08/10/2019 - 16:35 नवीन
जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन माझा स्वभाव अतिसंवेदनशील आहे. कुणाला दुखावलं तर नाही ना ही भावना फक्त छळते.
  • Log in or register to post comments

हा तणावाचाच भाग आहे

जॉनविक्क
Sat, 08/10/2019 - 17:32 नवीन
असा तणाव फार लहानपणा पासून असेल तर संवेदनशील स्वभाव अशी आपण समजूत करून घेतो. गिल्ट फिलिंग सुद्धा त्याचाच भाग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

अशी स्वतःच्या आजाराबद्दल

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 08/10/2019 - 19:14 नवीन
अशी स्वतःच्या आजाराबद्दल निदान स्वतःच करणे नंतर फार महागात पडू शकते. ते टाळावे. त्रास जास्त झाला की त्याबाबतीतल्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. https://www.misalpav.com/comment/1042463#comment-1042463
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

इथे प्रतिसादांची सरमिसळ होते

तमराज किल्विष
Sat, 08/10/2019 - 19:56 नवीन
इथे प्रतिसादांची सरमिसळ होते आणि त्यामुळे गैरसमज होतो. माझ्या दुसऱ्या लेखावरही असेच झाले. माझ्या तमराज किल्विष या आयडीला उद्देशून उज्वल यांनी शक्तिमान, सुर्यांशी या शक्तिमान सिरियल मधली पात्रांची आठवण करून दिली. तेव्हा मी त्यांना मला गीता ( सिरियल मधली) फार आवडायची असा गंमतीशीर प्रतिसाद दिला. इकडे प्रतिसाद शेवटी जात नाही. मध्येच जातो. व मलाही क्रोम मध्ये नवीन प्रतिसाद कोणते आहेत हे लवकर लक्षात येवू नाही राहीले. ब्राऊजरचा प्रॉब्लेम असावा.
  • Log in or register to post comments

आपण त्वरित

जॉनविक्क
Sun, 08/11/2019 - 08:08 नवीन
मिपा सन्यास घ्यावा असा एक त्वरित उपायहि सूचवतो कारण मिपाकरांच्या वैचारिक चर्चा वाचून तुमचा त्रास 200% वाढू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तमराज किल्विष

समजा उलट झाले तर?

तमराज किल्विष
Sun, 08/11/2019 - 09:15 नवीन
समजा उलट झाले तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा