रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य ?

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in काथ्याकूट
28 Jun 2019 - 1:56 pm
गाभा: 

रेन हार्वेस्टिंग किती व्यवहार्य? किती कार्यक्षम?

एखाद्या ठिकाणचे पर्जन्यमान/ पाऊस मिलिमिटर्स अथवा सेंटिमिटर्स यांमध्ये मोजतात. रोजचा पाऊस किती झाला हे मिलिमिटर्समध्ये सांगणे सोयीचे असले तरी एखाद्या भागातला वर्षभरांत एकूण पाऊस किती हे सेंटिमिटर्स मापात सांगितल्यास तुलना करणे सोपे जाते.

उदाहरणार्थ -
ठिकाण - पाऊस - माप
जैसलमेर - २० सेंटिमिटर्स
पुणे - ४० सेंटिमिटर्स
बंगळुरू - ८० सेंटिमिटर्स
चेन्नई - १०० सेंटिमिटर्स
कोलकाता - १५० सेंटिमिटर्स
तिरुवनंथपुरम १६० सेंटिमिटर्स
मुंबई - २०० सेंटिमिटर्स
गोवा - २०० सेंटिमिटर्स
कोची - ३५० सेंटिमिटर्स

((महाबळेश्वर - ८०० सेंटिमिटर्स
मेघालय - १२०० सेंटिमिटर्स))

एक सेंमि पाऊस म्हणजे १२.५ मिलिलिटरस पाणी १२.५ चौ सेंमि (square cms area) क्षेत्रफळावर जमा होते.

एका प्लॉटवर एक छोटे घर
एक फुट बाइ एक फुट जागेवर साधारण नउशेतीस मिलिलिटर्स पाणी गोळा होईल.
घरची गच्ची ५०० चौ फुट असेल तर एक सेंमि पावसाने ४५० लिटर्स पाणी मिळेल. वर्षभराच्या ४० सेंमि पाऊस होणाऱ्या पावसाचे सर्व पाणी गोळा केल्यास १८००० लिटर्स पाणी मिळेल.

वापर
एका कुटुंबात चार जण धरून रोजचा पाण्याचा खप ५०० लिटर्स धरुया. हे १८००० लिटर्स पाणी त्या कुटुंबास ३६ दिवस पुरेल. म्हणजे वर्षभराच्या वापराच्या दहा टक्के पाणी रेन हार्वेस्टिंगने मिळाले. हे एक मध्यम पावसाच्या ठिकाणाचे उदाहरण झाले. जिथे यापेक्षाही कमी पाऊस पडतो तिथेच खरी गरज आहे. पण तेवढा पाऊस पडत नाही. पाण्याच्या कमतरतेमुळे रोजचा वापर २५० लिटर्सही केला जाईल तर तर दोन महिने पुरेल.

साठवण
८ फुट बाइ ८ फुट लांब रुंद आणि ६ फुट खोल टाकी बांधल्यास त्यात ९ ते १० हजार लिटर्स पाणी साठवता येईल. अशा दोन टाक्या लागतील.

प्लॉट जमिनीचा आकार
७५ फुट बाइ ६० फुट प्लॉटमध्ये १०/१०/१०/१५ फुट जागा सोडून २५ बाइ २०फुटी घर (५०० चौ फुट) ही एक आदर्श स्थिती झाली. त्यात कडेला या दोन टाक्या व एक संडासची टाकी बांधावी लागेल.

मोठ्या इमारती , हौझिंग सोसायटीतील गरज

तळ मजला अधिक त्यावर तीन मजले आहेत असे धरल्यास गच्चीवरच्या प्रत्येक पाचशे चौ फुट भागातील गोळा झालेले पाणी खालच्या चार रहिवाशांत वाटायचे आहे. वरच्या उदाहरणातील पाणी अर्थातच एका ब्लॉकला आठ दिवस पुरेल. अधिक मजले असतील तर आणखी वाटप कमी होईल. बाकी त्या टाक्या बांधणार कुठे हा एक प्रश्नच ठरतो. टाक्या बांधण्याचा खर्चही आहेच. केवळ टाक्या बांधणे, पाऊसपाणी साठवणे बंधनकारक केले म्हणून नागरीक ते करतीलच.

गावागावांत जी पाणी अडवा जिरवा/ साठवा मोहिम अमलात आणत आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण ते सर्वच उघड्या जमिनीवरचे पावसाचे पाणी गोळा करून साठवतात. तसे सोसायटीच्या/इमारतीच्या आवारातील गोळा केले जाईल असे नाही वाटत.

तुमचे अंदाज आणि सूचना मांडा.

प्रतिक्रिया

Rajesh188's picture

28 Jun 2019 - 2:53 pm | Rajesh188

सर्वांनी पाणी रेन हार्वेस्टिंग करून पाणी वाचवलं तर खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या सुटेल .
फक्त एक महिन्याला एका कुटुंबाला पाणीपुरवठ्ासाठी किती पाणी लागत ह्याची तुम्हाला जाणीव आहे .
मग ११ महिने करोडो कुटुंबाला पाणी आणि शेती आणि फॅक्टरी ल पाणी लागत ते कसं आणि कुठून पुरवायचे

भंकस बाबा's picture

28 Jun 2019 - 4:09 pm | भंकस बाबा

मुंबईसारख्या शहरात आहे. जिथे गाड्या धुवायला, गार्डनमधे पाणी मारायला, सोसायटया धुवायला अफाट पाणी वापरले जाते जे शुद्ध असते. ह्या पाण्यावर अनेक प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनवलेले असते, शिवाय शहरे आपले पाणी फार लांबवरुन आणतात. ह्यामुळे होईल काय तर पाणीपुरवठा विभागावर ताण पडणार नाही व पाण्याची बचत होईल.

भंकस बाबा's picture

28 Jun 2019 - 4:10 pm | भंकस बाबा

मुंबईसारख्या शहरात आहे. जिथे गाड्या धुवायला, गार्डनमधे पाणी मारायला, सोसायटया धुवायला अफाट पाणी वापरले जाते जे शुद्ध असते. ह्या पाण्यावर अनेक प्रक्रिया करून पिण्यायोग्य बनवलेले असते, शिवाय शहरे आपले पाणी फार लांबवरुन आणतात. ह्यामुळे होईल काय तर पाणीपुरवठा विभागावर ताण पडणार नाही व पाण्याची बचत होईल.

गाड्या धुवायला, गार्डनमधे पाणी मारायला, सोसायटया धुवायला अफाट पाणी वापरले जाते

यासाठी हे पाणी वापरले पाहिजे. ते किती लागते याचा काही अंदाज?

भंकस बाबा's picture

28 Jun 2019 - 10:28 pm | भंकस बाबा

गाड्या धुवायला उच्चभ्रू सोसायटीमधे स्पेशल मानसे ठेवलेली असतात. शिवाय आजकाल मोठ्या शहरात कार स्पाचे वेड फोफावत आहे.
आजकाल हिरवळ लावणे हे एक फैड झाले आहे. मुंबईसारख्या शहरात एकवेळ झाडाना विहिरीचे पाणी वापरतील पण हिरवळीवर स्वच्छ पाणीच लागते.
सोसायटया धुवायला लागणारे पाणी महापालिकेचेच वापरले जाते, टैंकर आणून सोसायटी धूणे हि चैन अगदी मुकेश अंबानी पण करत नसावा

विअर्ड विक्स's picture

28 Jun 2019 - 4:44 pm | विअर्ड विक्स

बोअरवेल चार्जिंग साठी पर्जन्यजल साठवणीचा उपयोग होऊ शकतो. पण शहरी भागात इमारतीचा पाया खचणार नाही ना अशी भीती लोकांत आहे . सिविल इंजिनिअर यावर प्रकाश टाकू शकतील

अभ्या..'s picture

28 Jun 2019 - 5:25 pm | अभ्या..

शहरी भागात इमारतीचा पाया खचणार नाही ना अशी भीती लोकांत आहे

प्रमाणाच्या बाहेर सक्शनने जर पाया खचत नसेल तर तो रिचार्जमुळे खचणार नाही असे माझे तुटपुंज्या कॉमनसेन्सने म्हणणे आहे.
.
शहरात असे बरेच पार्ट असतात की जेथून पावसाचे व अन्य बरे स्वच्छ्होणेबल पाणी वाहत जाते, उदा. रस्ते, त्याच्या कडेच्या बाजू तेथे वाहून जाणारे पाणी प्लानिंगने कंटूरिंग करावे व जिरवावे अन्यथा मोकळी मैदाने, नदीकाठ, ओढे अशा ठिकाणी जिरवावे.
अजून एक थोडासा जहाल मार्ग म्हणजे जर मनपा म्हणत असेल की पुरवतो ते पाणी अगदी परफेक्ट पिणेबल आहे तर सगळ्या हायफाय वॉटरप्युरीफायरवर (युव्हीआरव्हीअ‍ॅक्वागार्ड्लिव्ह्प्युअरकेंटादी) तिप्पट कर लावून तो पैसा पाणी वितरण व्यवस्थेवर खर्च करावा.

जालिम लोशन's picture

28 Jun 2019 - 6:31 pm | जालिम लोशन

फक्त पिण्यासाठी वापरले तर एक हजार चौ.फुट गच्ची चार माणसाच्या कुटुंबासाठी वर्षभराचा साठा देते ते ही without harmful chlorine. and with fortified minerals. सिमेंट कंपन्यांच्या कचेरीत चौकशीकेलीकी माणुस पाठवुन estimate देतात. Ambuja, ACC वगैरे.

त्यांचं पन्नास/शंभर सेंमि पाऊस आणि हजार स्क्वेअर फुट गच्चीचं पाणी जमण्याचं गणित काय? इथे उदाहरणात ५०० स्क्वेअर फुट गच्ची धरली आहे.

२५ बाइ ४० फुट गच्चीला ( = हजार स्क्वेअर फुट) सर्व बाजूने पाच फुट छप्पर वाढवले तर १७५०-१०००= ७५०ने कलेक्शन एअरिआ वाढतो. ७५ टक्के. शिवाय ४० सेंमि पावसाच्या शहरातून २०० सेंमि भागात गेल्यास आठपट फरक होईल. वापर ५००वरून २५० लिटरस धरल्यास एक वर्षाचे पाणी टाक्या कोणीही बांधल्यातरी देतीलच.

हे पाणी सरसकट पुनर्वापर करण्या योग्य असते का?
माझ्या मते नाही.
हे पाणी टाकीत साठवून परत वापरावे का? आपण कृत्रीम सौंदर्याच्या मागे लागून सोसायट्या सिमेंट paver blocks no पूर्ण झाकून टाकल्या आहेत. एखादा निचरा खड्डा करून त्यात पाणी सोडल्यास ते सर्वांना (आस पास च्या वॉटर टेबल ला वाढवण्यात) मदत करतील.

इथे कोतेपणाने विचार करून चालणार नाही की माझ्या घराला/society la direct फायदा दिसत नाही तर मी का करू?

ठाण्या मध्ये मीटर बसवण्याचे काम जोरात चालू आहे.
Prepaid पद्धत वापरून पाणी पुरवठा करायचा हा विचार त्या पाठीमागे असू शकतो.
त्या नंतर वीज बिला प्रमाणे पाण्याचे महिन्याचे बिल ठरवले जातील .
कमी वापर कमी भाव लिटर la आणि जास्त वापर जास्त दर लिटर ला.
आणि ते काळानुसार योग्य सुद्धा आहे

कंजूस's picture

29 Jun 2019 - 11:50 am | कंजूस

पुनर्वापर -

ज्याचे स्वत:चे घर आहे तो गच्ची स्वच्छ ठेवेल. किंवा पहिल्या आठवड्याचे पाणी बाहेर सोडून नंतरचे टाकीत घेईल.

सोसायटी वाले किती जागरुक राहून काळजी घेतात त्यावर अवलंबून आहे.

गच्ची गळतात म्हणून वर छप्पर घालू लागले आहेत त्याच्या पन्हाळीचे पाणी गोळा करता येईल फिल्टर टाकून. छपरावर तर कुणी जात नाही आणि गल्वनाइज्ड पत्र्यांऐवजी सिमेंटचे असतील तर किंवा त्यात आणखी चांगले पत्रे वापरून स्वच्छ पाणी मिळेल.

राजमाचीला मागच्या महिन्यात एक टाकी दिसली. थोडी ऊंच बांधली आहे आणि वर छपराला उलट उतार दिल्याने पन्हाळीचे बरेच पाईप वाचवले आहेत.

एखादा निचरा खड्डा करून त्यात पाणी सोडल्यास ते सर्वांना (आस पास च्या वॉटर टेबल ला वाढवण्यात) मदत करतील.

- सुखी.

अगदी नेमकं.

भंकस बाबा's picture

29 Jun 2019 - 2:41 pm | भंकस बाबा

बऱ्याचदा बोरिंगसाठी मारलेले खड्डे पाणी न लागल्यामुळे तसेच ठेवले जातात. हेच खड्डे सरकारकडून अनुदान घेऊन पावसाचे पाणी पुनर्भरण करण्यास वापरले तर जमिनीतिल पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल. तसा खर्च पण जास्त नाही आहे, पण लोंकाची मानसिकता अशी असते की मला क़ाय फायदा तर मी खर्च करू. असो हा एक साधा उपाय अजून का अमलात आणत नाही हे समजत नाही. आपल्याकडील कोणी प्रकाश टाकेल काय?

भंकस बाबा's picture

29 Jun 2019 - 2:41 pm | भंकस बाबा

बऱ्याचदा बोरिंगसाठी मारलेले खड्डे पाणी न लागल्यामुळे तसेच ठेवले जातात. हेच खड्डे सरकारकडून अनुदान घेऊन पावसाचे पाणी पुनर्भरण करण्यास वापरले तर जमिनीतिल पाण्याची पातळी उंचावण्यास मदत होईल. तसा खर्च पण जास्त नाही आहे, पण लोंकाची मानसिकता अशी असते की मला क़ाय फायदा तर मी खर्च करू. असो हा एक साधा उपाय अजून का अमलात आणत नाही हे समजत नाही. आपल्याकडील कोणी प्रकाश टाकेल काय?

पहिले पाणी लागलेल्या बोअर वेल विषयी:
प्रत्येक ठिकाणच्या मातीच्या थराची उंची वेगवेगळी असते, त्यामुळे जमिनीत किती फुट खाली कातळ लागेल हे स्थानानुरूप बदलते. भूगर्भातील कातळाला पडलेल्या भेगा हा बोअर वेलला लागणाऱ्या पाण्याचा मुख्य स्त्रोत असतो.
बोअर वेल खणताना/ड्रील करताना किती फुट खाली पाणी लागेल हे त्या ठिकाणच्या भूजलपातळी वर अवलंबून असते. एखाद्या ठिकाणी पावसाळा संपल्यावर म्हणजे ऑक्टोबर -नोव्हेंबर मधे ८ ते १० फुट खोलावर पाणी लागू शकेल तर त्याच ठिकाणी मार्च - मे महिन्यात १०० ते २५० फुट खोल खणल्यावर लागू शकेल. त्यामुळेच खात्रीशीर पाण्याच्या उपलब्धतेसाठी पावसाळ्यापूर्वी भूजलपातळी कमीत कमी असल्याने शक्यतो मे -जून मधे बोअर वेल खणल्या जातात.
एखाद्या ठिकाणी १०० फुट खोलवर (झरा) पाणी लागले तर प्रती दिवशी पाण्याची गरज किती त्यावरून तेवढ्या पाण्याच्या साठवणुकीसाठी आणखी किती खोल खणायचे ह्याचे गणित केले जाते. उदा. दर दिवशी पाण्याची गरज ५०० लिटर्स असेल आणि बोअर चा व्यास ६ इंच असेल तर १०० + १५० = २५० फुट खोल खणली जाते. साधारणपणे ६ इंच व्यास x १ फुट उंची = ३.८ लिटर ह्या हिशोबाने ३.८ x १५० = ५७० लिटर्स.

आता पाणी न लागलेल्या बोअर वेल विषयी:
(झरा) पाणी न लागलेली बोअर वेल हि एखाद्या काचेच्या वा सिरामिकच्या बरणी प्रमाणे असल्याने पाणी जमिनीत जिरवण्यासाठी ती निरुपयोगी ठरते. तिच्या सभोवताली रिचार्ज करण्यासाठी खड्डा खणला तरी तिची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता पूर्ण झाल्यानंतर पावसाचे पडलेले पाणी रिचार्ज खड्डा पूर्ण भरल्यावर जमिनीच्या पृष्ठभागावर साठून तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण होईल. स्वखर्चाने किंवा सरकारी अनुदान घेऊन अगदी फुकटात पडला तरी आपल्या घर, इमारत वा शेतात (अल्प कालावधीसाठी का होईना पण) असा तलाव निर्माण करणे सयुक्तिक ठरणार नाही.

तुमचा प्रश्न पाणी जिरवण्याचा आहे. त्यासाठी बोअरिंगचा खड्डा उपयोगाचा नसतो.
शोषखड्डा खणून ( एखाद्या विहिरीसारखा खणून त्यात माती ऐवजी विटा, धोंडे घालून पोकळ भरतात. वरचा भाग दोन भोके ठेवून बंद करून त्या भोकात पावसाचे पाणी सोडायचे.

भंकस बाबा's picture

29 Jun 2019 - 7:26 pm | भंकस बाबा

अजिबात सहमत नाही , कित्येक वेळा दुरदर्शनवर बोरिंगवेल पुनर्भरणविषयी बघितलेले आहे. पावसाचे पाणी बोरिंगमधे सोडा म्हणून. ते पाणी शोषखड़यामार्फत फिल्टर केले पाहिजे, नाहीतर पाण्यातील कचरा बोरिंगमधे जाऊन बसेल

असलेला पण पाणी न मिळालेला बोअरिंगचा खड्डा - तीसेक सेंमि मोठा पण शंभरेक मिटरस खोल असू शकतो. तो फक्त वापरायचा आहे. त्यात पावसाच्या पाण्याबरोबर गाळ माती न गेल्यास नक्कीच काम करेल. पाणी जिरवत राहील.

जर का मुद्दामहून पाणी जिरवण्याचा खड्डा मारायचा झाल्यास खोल करण्यापेक्षा रुंद करणे योग्य. ते बरेचदा शेती कार्यक्रमातही दाखवतात.

मुंबई ठाण्याचे ( किनारपट्टीचा भाग) बोलायचे झाल्यास जमिनीखाली दहा फुटांवर पाणी लागू शकते. खोल खड्डे नाहीच.

रेनवॉटर हार्वेस्टिंग करा असं नगरपालिका नगरातल्या नागरिकांना, सोसायटीतील रहिवाशांना सांगत आहेत. त्या निमित्ताने त्या भागात किती पाऊस पडतो आणि किती जागेत किती पाणी जमा होऊ शकते ते प्रथम थोडक्यात मांडलं आहे.
ते साठवण्यासाठी किती जागा लागेल व रहिवाशांना किती दिवस पुरेल याचाही विचार केला आहे.

सर्वात शेवटी म्हणजे कोणत्याही वस्तूचा येणारा खर्च आणि परतावा पटला नाही तर निष्फळ खटाटोप होतो. त्याची थोडीफार कल्पना आली अगोदर तर निर्णय घेण्यास सोपे जाते.

आता दरवर्षी उशिरा सुरू होणारा पावसाळा, कमी किंवा विनाभरोसा पाऊस, शहरांत वाढत्या वस्तीमुळे ( टॉवरस) कमी पडत जाणारा तलावांंतला पाणीसाठा निरनिराळ्या उपायांचा विचार करण्यास भाग पाडत आहे.

कुठे या रेनवॉटर हार्वेस्टिंगची चर्चा होत असेल तर लेखातल्या काही मुद्यांचा उपयोग व्हावा अशी इच्छा आहे. मिपाकर यामध्ये भर घालतीलच, सुचनाही करतील याची खात्री आहे.

**********
रेनवॉटर हार्वेस्टिंगचा विचार करताना या टप्प्यांनी विचार करा -
१) आपल्या घराच्या शहरात किती सेंमि पाऊस पडतो?
२) पाणी जमा ठरण्यासाठी किती चौरस फुट गच्ची / जागा आहे?
३) क्रमांक एक आणि दोनचा वापर करून जास्तीतजास्त किती पाणी गोळा होईल ते वरच्या गणिताने कळेल. [ शंभर चौ फुट जागेत एक सेंमि पावसाला साधारणपणे ९३ लिटर्स पाणी मिळते. ]
४) तेवढे पाणी साठवण्यासाठी किती फुटी टाकी लागेल ते पाहणे. [ १ फुट लांब, १ फुट रुंद आणि १ फुट खोल टाकीत २८ लिटर्स पाणी राहातं. टाकी जेवढी खोल तेवढी अधिक मजबूत बांधावी लागते. ] टाकीच्या मापाची जागा इमारतीच्या आवारात कुठे आहे ते ठरवणे.
५) साठवलेले पाणी किती लोकांना/ब्लॉक्सना किती दिवस कशासाठी पुरणार आणि टाक्या बांधायचा येणारा खर्च हे याचा विचारही महत्त्वाचा आहे.
६) नगरपालिकेने "रेनवॉटर हार्वेस्टिंग" हे प्रत्येक नवीन सोसायटी/घरास अत्यावश्यक केले तर करावेच लागेल. तरीही क्रमांक ५ च्या मुद्दयातून या ची कार्यक्षमता /व्यवहारीता अगोदरच माहीत होणार आहे. भ्रमनिरास होणार नाही.

भंकस बाबा's picture

29 Jun 2019 - 7:30 pm | भंकस बाबा

आपल्याकडे जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते. आपल्याकडील जाणकार अजून प्रकाश टाकतीलच

वापरानुसार पाणीपट्टी भरणाऱ्या शहरी/निमशहरी भागांमध्ये अशा पद्धतीचे रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवहार्य आणि कार्यक्षम नाही!
नगरे व महानगरांमधील वाढत जाणारी लोकसंख्या आणि तिच्या मागणीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यावर येणाऱ्या मर्यादा ह्यांमधील दरी कमी करण्यासाठी (मर्यादित उपलब्धता पण बेसुमार वापरामुळे वारंवार करावी लागणारी पाणीकपात टाळण्यासाठी) नगरपालिका/महानगर पालिकांनी केलेला हा एक उपाय आहे.
निमशहरी /शहरी भागात काही प्रमाणात पाण्याची मागणी कमी करण्यास हा उपाय उपयुक्त असला तरी एकंदरीत प्रकल्पाच्या बांधणीसाठी येणारा खर्च (छप्पर,पन्हाळी,भूमिगत कॉंक्रीटच्या वा प्लास्टिकच्या टाक्या, त्यांची देखभाल) आणि यील्ड ह्यांचा विचार करता ते व्यवहार्य नाही. तसेच मागणी प्रमाणे पुरवठा करण्यासाठी (साठवणुकीतील मर्यादा, गळती, आणि उपसा करण्यासाठी पंपावरील पर्यायाने विजेवरील अवलंबित्व ह्यामुळे) कार्यक्षमहि नाही.

पण उत्पादन/ उत्पन्नासाठी पाण्यावर अवलंबून असणारी शेती आणि शेती पुरक व्यवसायांसाठी मात्र शेततळे, लागवडीखाली नसलेल्या जागेवर उदा: गायी,म्हशी, शेळ्यांचे गोठे, प्रक्रिया गृहे, गोदामे इ. खाली बांधलेल्या भूमिगत टाक्यांद्वारे केलेले रेन वॉटर हार्वेस्टिंग नक्कीच व्यवहार्य आणि कार्यक्षम ठरते.

Rajesh188's picture

29 Jun 2019 - 8:18 pm | Rajesh188

पाणी वाचिण्यासाठी किंवा साठवण्यासाठी जे प्रयत्न केले जातात त्याचा मूळ उध्येश आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर ती हाताळण्यासाठी एक पूर्व तयारी हा आहे.
सोसायटी आर्थिक दृष्ट्या कमजोर असेल तर सरकारी योगदान दिले जावे .
पण रेन हार्वेस्टिंग व्यवहारिक आहे का ह्याच उत्तर पैसा हे माध्यम वापरून होवू शकत नाही .
भीषण स्थिती मध्ये पैसे देवून सुद्धा पाणी मिळणार नाही .
सर्वात मोठं उदाहरण २० रु.
पये ltr नी १ ltr बिसलेरी पाणी व्यवहारिक आहे का?
मुळात त्या बिसलेरी पाण्याचा दर्जा महानगर पालिकेच्या पाण्यापेक्षा खूप खालचा असतो .
तेव्हा बिसलेरी महाग आहे असे कोणालाच वाटतं नाही

जॉनविक्क's picture

29 Jun 2019 - 8:52 pm | जॉनविक्क

मुळात त्या बिसलेरी पाण्याचा दर्जा महानगर पालिकेच्या पाण्यापेक्षा खूप खालचा असतो .
तेव्हा बिसलेरी महाग आहे असे कोणालाच वाटतं नाही

अफाट निरीक्षण.

Rajesh188's picture

29 Jun 2019 - 8:56 pm | Rajesh188

खरे आहे तुम्ही स्वतः पाणी चेक करा आणि पाण्या विषयी जे माहिती गार आहे त्यांचा सल्ला घ्या

जी सोसायटी रेन हार्वेस्टिंग करेल त्याचा फायदा तिलाच मिळेल .
इथे जो खर्च होणार आहे तो स्वतःच्या गरजेसाठी .
पाणी तुम्ही साठवा आणि ते पाणी बाकी लोकांना ध्या असी जबरदस्ती नाही .
होवू नाही पण असे झाले पावूस अगस्त मध्ये चालू झाला .पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार असमर्थ झाले .
एका कुटुंबाला ५०० ltr पाणी लागत बिसलेरी २० रुपये ltr आहे (त्या वेळी १००रुपये असेल)
म्हणजे दिवसाला १०००० लागतील .
महिन्याला तीन लाख रुपये खर्च करण्याची ताकद १ percent लोकांकडे सुद्धा नाही

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2019 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापर (रेन वॉटर हारवेस्टिंग) आणि गृहनिर्माण संस्थांतील कचरा व्यवस्थापन, यासारखे महत्वाचे विषय केवळ कायदे करून गृहनिर्माण संस्थांच्या डोक्यावर थापण्याने खालीलपैकी एक किंवा अनेक गोष्टी होत आहेत...

१. राजकिय नेत्यांनी आपली जबाबदारी जनतेच्या माथी मारून स्वतःची कातडी बचावण्याचे धोरण स्विकारले आहे. या दोन्ही विषयांत, आराखडा बनवणे आणि तो अंमलात आणणे यापैकी कोणतेही शास्त्रिय कौशल्य आणि/किंवा अनुभव सामान्य नागरिकांना असणे शक्य नाही. अर्थातच, काही सन्माननिय अपवाद वगळता, ते प्रकल्प पूर्णपणे फसून बंद झालेले आहेत किंवा रडतखडत कसेबसे चालू आहेत... दोन्ही बाबतीत ना नागरिकांची सोय, ना योग्य खर्च-व्यय गुणोत्तर... म्हणजेच, अश्या बहुसंख्य प्रकल्पांत, जनतेच्या पैशांचा अपव्यय आणि जनतेची गैरसोय, हे दोन परिणाम सोडता इतर काही फायदा मिळत आहे असे दिसत नाही.

२. हे प्रकल्प जनतेच्या माथी मारण्याचे अनेक राजकिय फायदे असे आहेत...
...२.अ) प्रकल्प करण्याचा कायदा केल्याने आपण काहीतरी केले याचे श्रेय राजकारण्यांना मिळते.
...२.आ) प्रकल्प अयशस्वी होण्याचा दोष जनतेच्याच डोक्यावर बसतो, राजकारणी बिनबोभाट सुटतात.
...२.इ) पर्यावरणाबद्दल सक्रिय/उत्साही नागरिकांच्या डोक्यावर काम आणि/किंवा अपयश टाकल्याने त्यांचा त्रास कमी होतो.
...२.ई) अश्या छोट्या छोट्या प्रकल्पांचे बजेट कमी असल्याने, त्यांत राजकारण्यांना मुळातच रस नसतो. हे प्रकल्प जनता स्वतः करत असल्याने इतक्या कमी पैशांच्या व इतर झालेल्या/न झालेल्या शक्य गैरव्यवहारांच्यासंबंधी ठपका आपोआप टाळला जातो.
इ, इ, इ.

३. असा दूरगामी महत्वाचे प्रकल्प सरकारने तज्ज्ञांच्या सहकार्याने, विचारपूर्वक, एक मोठी मोहीम आखून बनवणे आणि नंतर लोकप्रतिनिधींनी+प्रशासनाने व जेथे तो अंमलात आणायचा आहे तेथील लोकांना सहभागी करून संयुक्तपणे अंमलात आणणे आवश्यक आहे. त्यांच्या आराखड्यात, योग्य व्यक्तींमध्ये, योग्य तेवढे कौशल्य निर्माण करणे आणि सरकारने त्यांना योग्य ती सल्लागार व आर्थिक प्रकारची मदत पुरवून प्रोत्साहन देणे; यासाठी स्पष्ट व सहजसाध्य तरतूदी कायद्यात करणे जरूरीचे आहे. अन्यथा, प्रत्येकजण आपल्या बकुब व आवडीप्रमाणे, जमेल तसा प्रकल्प राबवेल, आणि मग त्यामध्ये यशापेक्षा अपयशाचीच जास्त खात्री असेल.

या प्रकल्पाचे महत्व गृहनिर्माण संस्थांमध्ये केल्या जाण्यार्‍या सौरऊर्जा प्रकल्पांइतकेच मोठे आहे, हे सांगायलाच हवे काय? "पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापर (रेन वॉटर हारवेस्टिंग)" यासाठी केले जाणारे स्थानिक छोटे छोटे प्रकल्पसुद्धा तितकेच दूरगामी आणि लोककल्याणकारी महत्वाचे आहेत... केवळ कायदा करून त्यांची जबाबदारी जनतेच्या माथ्यावर थापणे योग्य होणार नाही. दुर्दैवाने, सद्या हा प्रकल्प, वरच्या ३र्‍या क्रमांकाच्या मुद्द्याच्या बाबतीत, अनाथावस्थेत व म्हणूनच अनावस्थेत आहे. :(

कंजूस's picture

29 Jun 2019 - 9:19 pm | कंजूस

क्र १ आणि २अ विशेष.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2019 - 9:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

अजून काही खूप महत्वाचे...

"पावसाच्या पाण्याची साठवण व पुनर्वापर (रेन वॉटर हारवेस्टिंग)" या मोहिमेतील गृहनिर्माण संस्थांच्या छोट्या प्रकल्पातही सरकारचा सहभाग हवाच. कारण, या प्रकल्पांमुळे, प्रत्येक गृहनिर्माण संस्थेच्या वैयक्तिक उद्येशांबरोबरच, "सर्वसाधारण स्थानिक भूगर्भातील जलपातळी" वाढवण्याचा उद्येशही समाविष्ट करणे शक्य होईल. हा मुद्दा, या प्रकल्पांना गाव/शहराच्या जनतेच्या सामाईक उपयोगाचे आणि दूरगामी फायद्याचे बनवेल... अर्थातच, सरकारची भूमिका स्पष्ट होऊन, यशापयाची जबाबदारी सरकार व जनता यांच्यामध्ये, योग्य प्रकारे विभागली जाईल. असे केल्यास, प्रकल्पांच्या यशाची खात्रीसुद्धा वाढते, असा जगभराचा अनुभव आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2019 - 12:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपली ही चर्चा चालू आहे आणि योगायोगाने, नुकतेच सरकारनेही पाणी संरक्षण (water conservation) व पाणी पुनर्वापर (water reuse) याबाबतीत मोहीमा हाती घेतल्याचे व त्यामध्ये जनसहकारासाठी आवाहन केल्याच्या, बातम्या माध्यमांत येत आहेत...

PM Modi calls for Swachh-like water conservation mission

In cities, recycle, reuse to be Jal Shakti Abhiyan’s mantra

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Jul 2019 - 1:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

खाजगी कंपन्यासुद्धा रेन वॉटर हारवेस्टिंगसाठी काही प्रकल्प घेऊन येत आहेत. त्यापैकी, अंबुजा सिमेंटचा एक प्रकल्प खालील चलतचित्रात पहायला मिळेल...

यासंबंधीची अजून काही चलतचित्रे...

चष्मेबद्दूर's picture

6 Jul 2019 - 10:27 am | चष्मेबद्दूर

या अशाच कारभारामुळे ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्याच्या प्रक्रियेला खीळ बसते. मनपा ला खत निर्मितीत कसलाही इंटरेस्ट नाही आणि नागरिकांना वेठीला धरण्याचे प्रकार मात्र करण्यात आघाडीवर.

बिसलेरी न म्हणता 'बॉटलमधले मिनरल पाणी' म्हणुया.

------
समजा सहा लाख रु खर्च करून बांधलेल्या टाक्यातले साठवलेले पाणी सोसायटीत आठ दिवसही पुरले नाही तर किती आरडा ओरड होईल ते लक्षात घ्या.

पण उत्पादन/ उत्पन्नासाठी पाण्यावर अवलंबून असणारी शेती आणि शेती पुरक व्यवसायांसाठी मात्र शेततळे,~~~~~"

- हे यशस्वी झालेले दिसते कारण जागेची उपलब्धता, कमी खर्च, पूर्णपणे त्या पाण्यावर अवलंबून राहता येण्याची शाश्वती.

कंजूस's picture

29 Jun 2019 - 9:22 pm | कंजूस

जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते.

- भंकस बाबा.

- नेमकेच.

जॉनविक्क's picture

29 Jun 2019 - 9:36 pm | जॉनविक्क

जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते.

गटारे तुंबत असावीत, ज्यामुळे त्यांचे प्रयोजनच धोक्यात येईल.

डॉ सुहास म्हात्रे's picture

29 Jun 2019 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

जी गटारे बांधली जातात त्यांनाच बांधताना जागोजागी शोषखड्डे का ठेवत नाही , म्हणजे वरुन पूर्ण सिमेंटचे बांधकाम असते तर खाली तीनचार मीटर खड्डा करून पाणी जिरवता येऊ शकते.

धोका !!!

हे आरोग्यदृष्ट्या अत्यंत धोक्याचे आहे. भारतात (अ) पावसाचे पाणी, (आ) घरातले संडासासकट सर्व सांडपाणी, इ वाहून नेण्यास वेगवेगळ्या व्यवस्था नाहीत. असे मिश्र पाणी जमीनीत जिरवल्यास जमीनीतील सर्वच जल दूषीत होईल... अर्थातच, यामुळे, 'सांसर्गिक रोगांच्या साथींना' आणि 'पाण्यांत विषारी रसायनांचा स्तर वाढल्यामुळे होणार्‍या रोगांना', आमंत्रण दिल्यासारखे होईल.

भारतात, बहुतेक/बर्‍याच ठिकाणी अश्या मिश्र पाण्याचे शुद्धीकरण न करता, ते जवळच्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले जाते. हे सुद्धा गैरच आहे व त्यानेही भूमीतील जलसाठ्यांचे काही प्रमाणात प्रदूषण होतेच आहे. यासंबंधीचे दुष्परिणाम आपण सतत माध्यमांत ऐकत असतोच. उदा : नुकतेच पुण्याशेजारच्या नदीत हजारोंच्या संखेने मरून तरंगणारे मासे.

गटारांना शोषखड्डे बनवण्यामुळे, गाव/शहरभर प्रदूषित पाणी भूजलसाठ्यात मिसळून, त्या प्रदूषणाला आपण स्वतःहून घरापर्यंत येण्यासाठी मार्ग मिळवून दिल्यासारखे होईल.

भंकस बाबा's picture

30 Jun 2019 - 10:17 am | भंकस बाबा

इथे मी जे गटार बोलत आहे ते पक्के बांधलेले असावे व रहिवासी भागात असावे. पुण्यासारख्या शहरात बोरिंगचे पाणी फार कमी प्रमाणात पिण्यासाठी वापरले जात असावे हा माझा तर्क. इथे जऱ ही कल्पना राबवली तर भूजलपातळी वर येऊन पिण्याव्यतिरिक्त पाण्याची गरज कमी होऊन धरणातील पाणीसाठयावर कमी दबाव येईल . मी उघड़यावर वाहणाऱ्या नाल्याची गोष्ट करत नाही आहे.
आता हिच गोष्ट मुंबईत करून फायदा नाही कारण मुंबई समुद्रसपाटीवर वसलेले शहर आहे. इथे 15 ते 20 फुटावर पाणी लागते. पण मुंबईकर असे कर्मदरिद्री आहेत की त्यांना हा फुकट पर्याय नको असतो. महापालिकेवर मोर्चे काढायला मात्र हे आघाडिवर असतात.
तुम्ही म्हणता सरकार जबाबदारी झटकते, पण सरकार कुठे कुठे पूरे पडेल? चार माळ्याच्या झोपडपट्याना राजकीय दबावाखाली पाणी पुरवावे लागते. आम्ही शेकुलर( हा शब्द मी शिवी म्हणूनच वापरतो) असल्यामुळे मुंबईतील सर्व अनधिकृत मशिदिना पाणी पुरवणे ही सरकारची जबाबदारी असते. मी रहात असलेल्या मालवणी मालाड भागात शंभरच्या वर अनधिकृत वा अधिकृत मशिदि आहेत. सर्वाना भरपूर पाणी आहे. हा विषय धर्मिकतेकड़े वळवायचा नाही आहे पण विचार करा मशिदिकडे येणारी पाइपलाइन तिच्या आसपासच्या भागाला जो अनधिकृतच फैलावला असतो त्याला पण समृद्ध करतो, आणि मशिदिकडून पुढच्या भागाला कमी दाबाने पाणी जाते. करोडो रुपये जऱ मशीद बाँधण्यासाठी खर्च करू शकतात तर दोनतीन लाखात बसणारी विहिर वा बोरिंग का बांधू शकत नाही?

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2019 - 6:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

भंकस बाबा साहेब.

इथे मी जे गटार बोलत आहे ते पक्के बांधलेले असावे व रहिवासी भागात असावे.

गटार कोठेही बांधलेले असले तरी त्यातले पाणी जमीनीत मुरल्यावर ते सर्व भूजलात मिसळून त्याला दुषित करेल, नाही का ? शिवाय पाणी जमिनीत मुरेल असे गटार वरून पक्के असले तरी भूजलात मुरणार्‍या पाण्याबाबत त्याने काही फरक पडत नाही.

तेव्हा, मुख्य प्रश्न आपण कोणत्या प्रकारचे पाणी जमीनीत जमीनीत मुरवायचे आहे, हा आहे. जेथे, दुषित (मलमुत्र किंवा इतर रोग निर्माण करू शकणरे पदार्थ मिसळलेले) आणि इतर प्रकारचे पाणी यांची व्यवस्था वेगळी आहे, तेथे (अ) दुषीत नसलेले आणि (आ) प्रक्रिया करून (ट्रिटेड) निर्धोक पाणी, या दोन्हीही प्रकारचे पाणी जमिनीत मुरवायला हरकत नाही.

जेथे अशी व्यवस्था नाही (जे भारतात बहुतेक भागात आहे) तेथे "मिश्र" पाणी जमिनीत मुरविल्यास सर्व पाणी दुषित होऊन धोकादायक बनते.

केवळ दुषित पाण्याच्या पिण्यानेच आजार होतात असे नाही तर, त्याच्या प्रक्रिया न केलेल्या (विशेषतः मलमुत्र किंवा रसायनांमुळे) दुषित पाण्याच्या वापरानेही (उदा : बागेसाठी वापर, इ) आजार अथवा इतर प्रकारचे धोके उदभवू शकतात... हे सुद्धा या बाबतीत ध्यानात घ्यायला हवे.

बाकी, मंदीर-मशिद बांधण्यासाठीचा खर्च वगैरे मुद्दे फार वेगळे आहेत आणि त्याबाबत तत्वतः सहमती आहे.

Rajesh188's picture

29 Jun 2019 - 10:24 pm | Rajesh188

शेतकरी असू ध्या नाही तर शहरी नागरिक ठराविक टक्के जमीन ही जलसर्धनासाठी ठेवलीच पाहिजे .
बेफिकीर पना मोठे संकट निर्माण करेल.
शासनाचा सहभाग असलाच पाहिजे तो सुद्धा सुलभ रित्या .
आर्थिक मदत सरकारनी करावी .
योजनेला संरक्षण शासनाने द्यावे .
नियोजन शासनाने करावे .
जे नियम तोडतील त्यांना पाणी किती जीवनावश्यक असले तरी ते तोडण्याचा अधिकार शासनाला असलाच पाहिजे .
भारतात जबरदस्ती केल्या शिवाय कोणतीच योजना राबवता येईल असे वाटत नाही

Rajesh188's picture

29 Jun 2019 - 11:07 pm | Rajesh188

राज्य पातळीवर सरकारनी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक यंत्रणा निर्माण करावी .
तिला पूर्ण अधिकार असावेत पण मनमानी करू नये म्हणून कठोर नियम आसवेत .
जी संस्था असेल त्या संस्थे तील कर्मचाऱ्यांना चुकीच्या कामासाठी न्यायालयाचे कमीत कमी संरक्षण असेल .
चूक करणारे आणि त्यांना मदत करणारे कठोर शिक्षेला पात्र असतील .
ह्या संस्थेच्या अधिकारात पाणी नियोजन ,पाण्याचे योग्य वाटप आणि जलसंवर्धन हे विषय असतील .
वर्षाला जेवढे पाणी वापरणार त्याच्या नुसार किती पाणी जमा करायचे किंवा जमिनीत मुरवायचे ह्या विषयी नियम हवेत .
आणि त्याचा अभ्यास करून त्या योजना सरकारी खर्चाने सक्तीने राबवणे हे ह्या संस्थेचे काम असेल

गच्चीवरच्या छपरावरचे पाणी गोळा करून बंद टाकीत साठवल्यास चांगल्या पाण्याची खात्री राहील पण तशी साठवण जागा सोसायटी/बंगल्यात तळ मजल्यावर अगोदरच करावी लागेल. सध्या पार्किंगने त्याचा ताबा घेतला आहे. १० बाइ १० ची एक खोली टाकी म्हणून केल्यास एका कारचे पार्किंग जाईल आणि त्याबदल्यात २८००० लिटर्स चांगले पाणी हार्वेस्ट होईल. ही सोय इमारत बांधतानाच केली असल्यास स्वस्तात होईलच आणि पुढेमागे नगरपालिकेने आवश्यक केल्यास सभासदांना चिंता राहणार नाही.
टाकीस पंप न लावता नळ ठेवून ते पाणी गाड्या धुण्यासाठी किंवा शहराचा पाणी पुरवठा बंद झाल्यास वापरता येईल.

मला एक समजत नाही, घरं किंवा सोसायट्या हार्वेस्टिंग करून असे कितीसे पाणी मिळणार आहे ?
आणि हे पाणी भूजल पुरेसे रिचार्ज करू शकेल का ?
घरे आणि सोसायटीच्या छतावरील पाण्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी शहरे आणि गावे यांच्या आजूबाजूला पावसाळ्यात पडून धोधो वाहून जाते. ते बांध, तलाव, कंटूरिंग , जंगले जोपासणे इ. द्वारा अडवले तर भूजल पातळीत कमालीची वाढ होईल आणि ती टिकूनही राहील.
https://www.youtube.com/watch?v=8z_q3hNemxE

भंकस बाबा's picture

30 Jun 2019 - 5:32 pm | भंकस बाबा

रेनवॉटर हार्वेस्टिंगबद्दल बरीच चर्चा झाली.
आपल्याकडे साठवलेल्या पाण्याचे जे बाष्पिभवन होते त्याबद्दल काहीही चर्चा होताना दिसत नाही. एका यूट्यूब वीडियोत बघितले होते की प्लास्टीकचे चेंडू करून त्याचा थर पाणीसाठयावर दिल्यास बाष्पिभवनाचा वेग मंदावतो. पण हा उपाय एका मध्यपूर्व देशात बघितला होता. आपल्याकडे प्लास्टिक वापरणे किती आर्थिकदृष्टया सोईचे असेल?
शिवाय चोरीची भिती ती वेगळी!

भंकस बाबा's picture

30 Jun 2019 - 5:32 pm | भंकस बाबा

रेनवॉटर हार्वेस्टिंगबद्दल बरीच चर्चा झाली.
आपल्याकडे साठवलेल्या पाण्याचे जे बाष्पिभवन होते त्याबद्दल काहीही चर्चा होताना दिसत नाही. एका यूट्यूब वीडियोत बघितले होते की प्लास्टीकचे चेंडू करून त्याचा थर पाणीसाठयावर दिल्यास बाष्पिभवनाचा वेग मंदावतो. पण हा उपाय एका मध्यपूर्व देशात बघितला होता. आपल्याकडे प्लास्टिक वापरणे किती आर्थिकदृष्टया सोईचे असेल?
शिवाय चोरीची भिती ती वेगळी!

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Jun 2019 - 9:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

पाण्याच्या पुनर्वापराबद्दल ज्यांना खूपच कळकळ आहे ते त्याबाबत स्वतः काही ना काही प्रयोग करत असतात, इतर काही जण चर्चा करत असतात, बाकीचे 'हे माझे काम नाही' असे समजून सरळ दुर्लक्ष करतात.

त्यापैकी पहिल्या प्रकाराचे एक उदाहरण... Noida: A green household that reuses to reduce waste

पर्यावरण रक्षण .
पाणी स्तोत्र वाढवणे .
पाण्याचा योग्य वापर ही सर्व समाजाची जबाबदारी आहे .
शहरात आणीबाणीच्या वेळी १ महिना तरी पुरेल एवढं पाणीसाठा लोकांकडे असावा त्यांच्याच safty साठी कधी वेळ आली तर पाण्या वाचून जीव जावू नये म्हणून .
जो ग्रामीण भाग आहे तिथे मोठी जबाबदारी आहे जनावरे ,शेती,आणि स्वतः माणूस ह्यांची पाण्याची गरज भागवण्यासठी प्रयत्न करायचे आहेत .
त्या साठी वृक्ष लागवड (झाडं chya सावली मुळे तापमान नियंत्रण होते आणि मुळे पाणी मुरव ने आणि धूप थांबवणे हे काम करतात)
आणि हे तुमचे जीवन आणि जीव वाचविणार आहे
अजुन तरी पैसे देवून जीव परत येत नाही

रमेश आठवले's picture

1 Jul 2019 - 7:20 am | रमेश आठवले

मी या विषयावरील सर्व माहिती देणारे एक पुस्तक लिहिले आहे.
https://www.amazon.com/Harvesting-Sustainable-Supply-Environment-Develop...

आहे त्या इमारतीत नवीन टाक्या कुठे बसवायच्या? हा प्रश्न असणार त्यावर काही सुचलेले
- इमारतीला बाहेरून भिंतीला चिकटून सपाट आकाराच्या ( आणि एकावर एक) तसेच "ब्लॅडर" प्रकारच्या सपाट टाक्या ?
- नाहीतरी जमिनीत टाकी केली तरी परत पंपाने ते पाणी वर न्यावे लागेल मग गच्चीतच का नाही अजून टाक्या बसवायच्या ? अर्थात हे इमारतीला धोकादायक नसेल तर
- सार्वजनिक : खर्चाचे पण शक्य , आहे त्या मोकळ्यमैदानात खणून टाकी आणि परत वरून जमीन आहे तशी करणे! हि कल्पना सिंगापुर सारखया ठिकाणी आहे पाण्याचा निचरा होण्यासाठी , नवीन नाही ) https://www.straitstimes.com/singapore/bidadari-to-house-singapores-firs...

विचार करा पुण्यात स प महाविद्यालय, नव इंग्लिश शाळा , भावे शाळा, नेहरू स्टेडियम इत्यादी

ऋतुराज चित्रे's picture

1 Jul 2019 - 7:40 pm | ऋतुराज चित्रे

छतावरील पावसाचे पाणी टाकीत साचवले तरी ते पिण्यायोग्य नसते. त्यात कोणतेही मिनरल नसल्याने पाण्याचा TDS कमीच असणार . मुंबई सारख्या शहरात प्रदूषणामुळे पावसाचे पाणी अॅसिडिक होते जे शरीराला अपायकारक असते.

रमेश आठवले's picture

1 Jul 2019 - 9:18 pm | रमेश आठवले

छतावर पडणारा पहिला दुसरा पाऊस हा टाकित न सोडता तो वाहून जाऊ देतात.त्यामुळे छतावरील पक्षी विष्टा, कचरा व या पावसातील आमल्पणा, हे टाकीत साठवलेल्या पाण्यात येत नाहीत. तसेच टाकीतले पाण्यात सूर्य किरणांचा प्रवेश शक्यतो टाळावा कारण पाण्यात वनस्पति उगवण्यासाठी किरणे आवश्य असतात.
मिसळपाव सदस्यांना इतर काही प्रश्न असल्यास त्यांनी मला खरडवहीत किंवा या चर्चेत विचारले तर मी उत्तर द्यायचा प्रयत्न करीन.

ऋतुराज चित्रे's picture

1 Jul 2019 - 10:45 pm | ऋतुराज चित्रे

५ पेक्षा कमी TDS असलेले पावसाचे पाणी पिण्यायोग्य कसे करता येईल?

भंकस बाबा's picture

1 Jul 2019 - 11:10 pm | भंकस बाबा

पावसाचे साठवलेले पाणी पिण्यायोग्य बनवण्याचा अट्टाहास का बरे?
इतर उपयोगासाठी आपण पावसाचे पाणी खुशाल वापरु शकतो.

रमेश आठवले's picture

2 Jul 2019 - 7:39 am | रमेश आठवले

चौरस आहार असल्यावर पावसाच्या पाण्यात क्षार नसले तरी काही बिघडत नाही. ते शुद्ध असते हे महत्वाचे आहे.

ऋतुराज चित्रे's picture

1 Jul 2019 - 11:19 pm | ऋतुराज चित्रे

पावसाच्या साठवलेल्या पाण्याचे प्रमाण बघता ते इतर कामासाठी किती दिवस वापरता येईल?

पावसाच्या पाण्याचा tds ५ पेक्षा कमी आहे?
स्वतः चेक केला आहे का .कोणते पाणी पिण्यासाठी योग्य असते ते जरा tds सहित सविस्तर सांगावे .
ज्यांनी पावसाचे पाणी पिण्यास योग्य नसतं असे मत व्यक्त केले आहे त्यांनी

ऋतुराज चित्रे's picture

2 Jul 2019 - 12:50 am | ऋतुराज चित्रे

हो पावसाच्या पाण्याचा TDS आणि pH मी अनेकवेळा चेक केला आहे. TDS नेहमीच ५ पेक्षा कमी आढळला, आणि pH ५-७ आढळला.

पिण्यासाठी योग्य असते ते जरा tds सहित सविस्तर सांगावे .

पिण्याच्या पाण्याचा TDS ५० पेक्षा कमी नसावा.

भरपूर पाणी असताना ५०० ltr पाणी सुधा ४ माणसाच्या कुटुंबाला १ दिवस सुधा पुरणार नाही .
आणि पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली की तेच ५०० ltr पाणी ४ माणसाच्या कुटुंबाला १० दिवस पुरेल .

ऋतुराज चित्रे's picture

2 Jul 2019 - 12:55 am | ऋतुराज चित्रे

आणि पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली की तेच ५०० ltr पाणी ४ माणसाच्या कुटुंबाला १० दिवस पुरेल .
पिण्याकरता किती दिवस वापरता येईल?

पावसाचे पाणी हे बाकी सर्व उपलब्ध पाण्यापेक्षा शुद्ध असतं .
ह्या पाण्यामध्ये हवेतील धुळी चे कनच फक्त विरघळलेले असतात .
तेच पाणी जेव्हा जमिनीवरून वाहत तेव्हा त्यात जमिनीवर असणारे असंख्य घटक विरघळतात .
त्यात बरेच घटक हे शरीराला हानिकारक असतात .
आणि पाणी अशुद्ध होते.
Tds हे काही पाणी योग्य
किंवा आरोग्यदायक आहे हे मोजण्याच एकक नाही .
Tds मुळे फक्त पाण्यात किती क्षार आहेत ते माहीत पडत पण ते क्षार शरीरास घातक आहेत की फायदेशीर हे tds वरून ठरवता येत नाही .
आणि दुसरी गोष्ट tds कमी असेल तर जास्त नुकसान होत नाही शरीराला आवशक्य असणारे क्षार आणि मिनरल स अन्ना मधून सुधा मिळतात .
त्यामुळे कमी tds चा बावू करायची काही गरज नाही

नितिन थत्ते's picture

2 Jul 2019 - 8:51 am | नितिन थत्ते

आमच्या सोसायटीत एका इमारतीत एका मजल्यावर ५५० चौ फुटाचे आठ फ्लॅट आहेत. अशा पाच इमारती आहेत. आमच्या गच्चीचं एकूण क्षेत्रफळ ५५०*८*५= २२००० चौ फू आहे. ठाण्यात सरासरी १०० इंच (८ फूट ) पाऊस पडतो. म्हणजे गच्चीवर पडणारे पाणी १,७६,००० घनफूट असते किंवा जवळजवळ ५० लाख लीटर.

इतके पाणी साठवून ठेवणे अशक्य आहे. तेव्हा ते जमिनीत जिरवणे हाच मार्ग राहतो.

पिण्यासाठी साठी वापरले जाणारे सर्व पाणी हे पावसा पासूनच मिळते .
मग पावसाचे पाणी हे पिण्यासाठी योग्य नाही असा लोकांचं गैरसमज का?
पावसाचे पाणी हे पृथ्वी वरील सर्व पाण्या पेक्षा शुद्ध असते.
पाण्याच्या साखळी मध्ये पावसाचे पाणी हे सर्वात वरच्या स्थानावर असते.
सूर्या मुळे पाण्याचे बाष्पीभवन होवून पावसाचे पाणी मिळत(rainwater is pure distilled water evapourted from the sun)
नळाचे पाणी
Pipe- पाणी शुध्दीकरण प्लांट - तलाव - दऱ्याखोऱ्यंत वाहणारे पाणी आणि सर्वात वरती साखळी मध्ये पावसाचे पाणी .
शुद्ध पाण्याची acidity ५-६ pH असते
जवळ जवळ सर्व पावसाच्या पाण्याचा ph ५-६ च असतो .
पावूस सुरू झाल्या नंतर (सुरवातीचा) २० मिनिट हवेतील प्रदूषित घटक पाण्यात मिसळतात ते पाणी सोडून द्यायचे.
आपण रोज हे ज्यूस ,कोल्ड ड्रिंक्स,पितो त्याचा ph २-३ असतो .ते चालत आणि ६ ph असलेले शुद्ध पावसाचे पाणी हानिकारक असे समजून त्या पाण्याला अपायकारक समजतो .

१) पावसाचे पाणी शुद्धच असते. गच्चीचा वापर नसेल तरी पहिलं सोडून द्यायचं.
२) टिडिएस म्हणजे विरघळलेले क्षार - क्याल्शम,आयन चे सल्फेटस,क्लोराईड,कारबोनेट्स. नसलले तर उत्तमच.
३) व्यवहार्य म्हणजे - खर्च केलेल्या पैशांत (एकदाच टाकी,पंपाचा खर्च येईल तो) साठलेले पाणी महिनाभर तरी पुरले पाहिजे.
४) आगामी काळात बिल्डरांनी सोसायटीच्या आवारात स्विमिंग पुलाऐवजी टाक्याच बांधल्या (आणि त्यावर मुलांची बाग) तर उपयुक्त.
टाकीवरच्या बागा मुंबईत हँगिग गार्डन, बप्टिस्टा गार्डन डॉकयार्ड स्टेशनजवळ आहेत.

Rajesh188's picture

2 Jul 2019 - 1:45 pm | Rajesh188

गाडी मध्ये ज्या airbag असतात त्याची किंमत कार विकणाऱ्या कंपन्या ३० ते ६० हजार पर्यंत लावत असतील .
अपघात होईल तेव्हाच त्या airbag cha उपयोग तोपर्यंत airbag cha कसलाच उपयोग नसतो .
पण जेव्हा अपघात होतो तेव्हा त्या airbag chi किंमत लाखो रुपये असते(अशी किमत होवूच शकत नाही जीवाची किंमत अजुन ठरली नाही) तसेच रेन हार्वेस्टिंग च आहे जोपर्यंत पाणी मुबलक उपलब्ध आहे ती पर्यंत खर्च वाया गेला असं वाटतं .
पण टंचाई मध्ये त्याच पाण्याची किंमत लाखो रुपये असते

ज्यांना शक्य आहे त्यांनी करायला हवेच.

रघुनाथ.केरकर's picture

4 Jul 2019 - 5:00 pm | रघुनाथ.केरकर

pit

1

q

w

r

a

d

f

g

z

गतवर्षी फेब्रुवारीच्या महिन्यात आमच्या बदलापूर स्थित १७६ फ्लॅट असलेल्या सोसायटी मध्ये वापराच्या पाण्याची फार बिकट परिस्तिथी होती. सोसायटी च्या आवारात ३ कूपनलिका होत्या, त्यातली एक फार पूर्वी कोरडी पडली होती, व बाकीच्या दोन १० ते १५ मिनिटांच्या अंतराने कोरड्या होत होत्या,एक कूपनलिका साधारण ५०० फुटापेक्षा खोल होती व दुसरी ७०० च्या आसपास. शेवटी सर्वानी मिळून ठरवले कि रेन वॉटर हार्वेस्टिंग करायचे.

प्लॅनिंग प्रमाणे दोन्ही कूपनलिकांच्या भोवती ६ बाय ६ फूट रुंद आणि १५ फूट खोल खड्डा खोदून त्यात ४ फूट व्यासाच्या एक फूट उंची च्या १५ काँक्रेट रिंग सोडल्या. याला रिचार्ज वेल म्हणतात. रिंग च्या बाहेर च्या बाजूने फिल्टरेशन मीडिया म्हणून कोळसा आणि पेबल्स टाकले. रिंग च्या आतल्या बाजूस ३ फूट नुसते पेबल्स टाकले.

कूपनलिका २ च्या शेजारी २ बाय २ रुंद आणि ६ फूट खोल असे दोन पिट बनवले पिट १ मध्ये पेबल्स आणि कोळसा ३ फुटापर्यंत टाकला व पिट २ मध्ये सिलिका आणि जाडी रेती ४ फूट टाकली. दोन्ही पिट वरून एक फुटावर एका ६ इंच व्यासाच्या पीव्हीसी पाईप ने जोडले पाईप च्या मुखाशी नायलॉन जाळी लावली. पिट २ मधून एक ६ इंच पाईप रिचार्ज वेल च्या बाहेर सोडला . जेणेकरून नाळी वाटे वाहून आलेले पाणी पिट क्र.१ मधून फिल्टर होऊन पिट क्र. २ मध्ये जाईल व तिथे फिल्टर होऊन रिचार्ज वेल च्या बाहेर टाकलेल्या फिल्टरेशन मीडिया वर पडेल व दोन रिंग च्या मधल्या बारीक फटींमधून रिचार्ज वेल मध्ये पडेल व कूपनलिकेच्या मुळाशी पाझरेल.

कूपनलिका १ च्या बाबतीत थोड्याफार फरकाने असेच केले परंतु पिट न बनवता टेरेस चे पाणी डायरेक्ट एक २००० लिटर च्या सिंटेक्स टाकी मध्ये आणले व तेथून ते एका बंदिस्त नाळी वाटे कूपनलिका एक च्या रिचार्ज वेल मध्ये सोडले.

पावसाच्या आधी टेरेस ची सफाई करून घेतली व सोसायटी आवारातले सर्व गटार (जे फक्त पावसाचे पाणी वाहून नेतात) टँकर च्या पाण्याने साफ करून घेतले. त्यात पडलेली माती वर इतर कचरा काढून टाकला. हे सर्व काम साधारण १५ दिवस चालले.

पावसाळयात नियमितपणे सिंटेक्स टाकी आणि पिट ची पाहणी होत होती.

आश्चर्य म्हणजे या वर्षी जून २०१९ पर्यंत दोन्ही रिचार्ज वेल मध्ये ५ ते ६ फूट पाणी होते. पूर्ण वर्ष भर दोन्ही कूपनलिकांना भरपूर पाणी होते.
याच्याच जोडीला आम्ही सोसायटी मध्ये १० झाडे लावली त्यात गुलमोहर निम आणि चाफ्याचा समावेश होता. ४ फुटाची झाडे आता १५ फुटाच्या वर गेलीयत.

भूजलावर आपल्या सर्वांचा अधिकार आहेच पण त्याचे संवर्धन करणे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग खरंच व्यवहार्य आहे. प्रकल्प पाहायचा असेल तर संपर्क करावा

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2019 - 6:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्तुत्य उपक्रम !

भूजलावर आपल्या सर्वांचा अधिकार आहेच पण त्याचे संवर्धन करणे देखील प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

+१०००

माझ्या सोसायटीने जमिनीत जिरवलेले पाणी फक्त माझ्याच सोसायटीला मिळाले पाहिजे. तसे होत नाही म्हणून जमिनीत पाण्याचे पुनर्भरण करण्यात अर्थ नाही, असे म्हणणे योग्य नाही. जेव्हा एखाद्या विभागातील सर्वजण आपापल्या सोसायटीत असे उपक्रम करत असतात, तेव्हा त्या सर्व विभागातील भूजलाची पातळी वर येते आणी सर्वांनाच त्याचा फायदा होतो. त्यात विचाराची सीमा केवळ, "माझा फायदा काय", इथपर्यंतच मर्यादीत करू नये.

भूजलस्तर वाढविण्यासारख्या सगळ्या उपक्रम-प्रकल्पांकडे, "सार्वजनिक फायदा (कॉमन गुड)", असेच पाहिले पाहिजे आणि "एकमेका करू सहाय्य" अशी भावना मनात धरून कारवाई केली पाहिजे.

******

जरा पुढे जाऊन असे म्हणता येईल की, जरी केवळ स्वार्थी विचार करायचा झाला तर... विभागातल्या सगळ्या / बहुसंख्य सोसायट्यांनी स्वार्थी विचार करून भूजलसंवर्धन प्रकल्प करण्याचे टाळले तर, त्या विभागातल्या भूजलाचा स्तर खूप खाली जाऊन पाण्याची चणचण/अभाव निर्माण होऊन...

अ) त्या विभागातील सगळ्यांनाच त्रासदायक परिस्थिती निर्माण होईल आणि

आ) त्या विभागातील सगळ्याच सोसायट्यांतील सदनिकांची किंमत कमी होईल.

इतर काही नाही तरी, केवळ वरचा स्वार्थी विचार करून तरी प्रत्येकाने हा उपक्रम करायला हवा, नाही का? :)

यशोधरा's picture

6 Jul 2019 - 10:30 am | यशोधरा

भारी.

आदर्श उदाहरण. फोटोंसह मिसळपाव साइटवर दिल्याने इतर कुणालाही माहिती कायमची उपलब्ध राहणार.

@ रघुनाथ.केरकर तुमच्या सोसायटीने समंजसपणे केलेल्या आयोजनाचे फारच कौतुक वाटले.
तुम्ही ही सर्व माहिती या लेखात प्रतिसाद म्हणून दिलीत परंतू हा एक स्वतंत्र लेख होऊन सर्वांचे लक्ष वेधण्यास नक्कीच मदत होईल.

गुगलवर कुणी शोध घेतला तर तर ही माहिती समोर येईल असे ट्याग ( Tags) दिले पाहिजेत.

आमच्या सोसायटीत एक विहीर आहे. त्याचे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी योग्य होईल या क्षमतेचे आहे. आमच्या गच्चीत पडलेले पाणी आम्ही या विहिरीत सोडत आलो आहोत.

हे पाणी आम्ही बाथरूम संडास मध्ये फ्लश साठी वापरतो. एका घरातील चार माणसे दिवसात पाच वेळेस लघवी आणि एकदा शौचास जातात हे गृहीत धरले तर रोज साधारण एका घरात ४५० लिटर पाणी नुसतेच वाया जाते. सोसायटीत ५६ फ्लॅट आहेत तेंव्हा रोजचे २५००० लिटर पाणी नुसतेच सांडपाणी म्हणून वापरले जात असे.

१९७२ सालच्या दुष्काळापासून या विहिरीचे पाणी आम्ही फ्लश साठी वापरत आलो आहोत यामुळे एकतर महापालिकेने शुद्ध केलेले पाणी सांडपाणी म्हणून वापरणे थांबले. शिवाय एवढे पाणी कमी वापरल्यामुळे महापालिकेची पाणीपट्टी तेवढीच वाचते.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा मुंबईत सर्वत्र काँक्रीटने जमीन आच्छदित केल्यामुळे पावसाचे पाणी थेट गटारात उतरते. पूर्वी हेच पाणी अगोदर जमिनीत धरून ठेवले जात असे त्यामुळे पाऊस जोरात पडला तर लगेचच पाणी तुंबणे असे होत नसे.

आता प्रत्येक सोसायटीमध्ये मोकळी जमीन जाऊन नुसते काँक्रीट आले आणि गटारे ताबडतोब तुंबतात.

या दोन्ही कारणास्तव मुंबई सारख्या शहरात प्रत्येक पुनर्विकासासाठी पावसाचे पाणी साठवणे सक्तीचे केले आहे.

या पाण्याचा वापर पिण्यासाठी करणे अजिबात आवश्यक नाही. परंतु याची टाकी वेगळी असे तर अत्यावश्यक परिस्थिती हे पाणी उकळून नक्कीच पिण्यासाठी वापरता येते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jul 2019 - 9:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या सोसायटीत एक विहीर आहे. त्याचे पाणी फिल्टर करून पिण्यासाठी योग्य होईल या क्षमतेचे आहे. आमच्या गच्चीत पडलेले पाणी आम्ही या विहिरीत सोडत आलो आहोत.
हे पाणी आम्ही बाथरूम संडास मध्ये फ्लश साठी वापरतो. एका घरातील चार माणसे दिवसात पाच वेळेस लघवी आणि एकदा शौचास जातात हे गृहीत धरले तर रोज साधारण एका घरात ४५० लिटर पाणी नुसतेच वाया जाते. सोसायटीत ५६ फ्लॅट आहेत तेंव्हा रोजचे २५००० लिटर पाणी नुसतेच सांडपाणी म्हणून वापरले जात असे.

+१००

महानगर पालिकेने शुद्धीकरण केलेले 'तुलनेने किमती पाणी' वाचवण्याचा हा पर्याय जास्त व्यवहार्य, कमी खर्चाचा, प्रकल्प म्हणून सोपा आणि आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण निर्धोक आहे.

पुनर्विकास नसला तरी ज्यांना जागा आणि पैशांनी शक्य आहे त्यांनी सुरुवात करायला हवीच. सक्तीपेक्षा समजुतदारपणा दाखवायला हवा.

खटासि खट's picture

11 Jul 2019 - 8:17 pm | खटासि खट

भारी मांडला आहे विषय असा वेगळा विचार केल्याबद्दल आभार. मी पण पुण्याचे सरासरी पर्जन्यमान पाहीले.

खालील लिंक वर पुण्यात एकूण किती पाऊस पडतो याची सरासरी आकडेवारी दिलेली आहे.
http://www.pune.climatemps.com/precipitation.php

महिन्याला सरासरी ६१.८ मिमी पाऊस पडतो असे यात म्हटले आहे. वर्षाला ७४१ मिमी. म्हणजे २९.२ ईंच. थोडक्यात अडीच फुटांच्या आसपास. आपण दोन फूट धरूयात.
५०० स्क्वेअर फूट गच्ची असेल तर वर्षभरात १००० घनफूट इतके पाणी जमा होईल. म्हणजेच २८३१६ लिटर्स.

एका बंगल्याचं जर आपण बोलत असू तर अलिकडे पुण्याच्या भवतालच्या परिसरार सर्रास टँकरने पाणीपुरवठा चालू आहे. याचे मोठे अर्थकारण देखील आहे. इथे ४००० लिटर्सचे टँकर्स चालतात. एका बंगल्याला दिवसाला साधारण ५०० लिटर इतके पाणी लागते. आपण जास्त गृहीत धरूयात. १००० लिटर्स धरू. याचा अर्थ ४ दिवसाला या कुटुंबाला ८०० रू खर्च येतो. तर त्यांचे एकूण सात टँकर्स वाचतील. म्हणजे रूपये ५६०० फक्त. जर दुमजली घर असेल आणि दोन कुटुंबे असतील तर निम्मे पैसेपचास्पच्।

एखाद्या ११ मजली इमारतीमधे ५०० स्क्वे फूटाचे फ्लॅट्स एका विंगमधे असतील तर टॉपच्या फ्लॅटवर जेव्हढा एरिया आहे तो खालच्या फ्लॅटमधे विभागला जाईल. ( एकूण जेव्हढी टेरेस असेल त्या त्या खाली तेव्हढेच फ्लॅट्स सुद्धा असतील).

म्हणजे आता हे ५६०० रूपये ११ कुटुंबात विभागले जातील. किंवा सात टँकर्स ११ कुटुंबात विभागले जात आहेत.

अगदी ११ टँकर्स वाचले असे म्हटले तरी एका कुटुंबाने एक टँकर म्हणजेच प्रति फ्लॅट ८०० रूपये वाचवले असे म्हणता येईल. शासनाच्या दराने ४०० रूपये.

खटासि खट's picture

11 Jul 2019 - 8:42 pm | खटासि खट

आता दुस-या बाजूने विचार करूयात.
आमच्या सोसायटीत एका इमारतीचे ८००० स्क्वे फूट क्षेत्र आहे. अशा दहा इमारती. म्हणजे ८०००० चौफूट. गुणिले २ फूट पाऊस.
१६०००० घनफूट.
= ४,५३,००० लिटर्स इतके पाणी आमच्या सोसायटीत जमा होऊ शकते. अशा किमान दहा मोठ्या सोसायट्या जवळपासच आहेत. यांचेच पाणी जवळपास ४५ लाख लिटर्स इतके होईल.
आमच्या गल्लीचा विचार करायचा तर दुतर्फा अंदाजे विचार केल्यास ते १ कोटी लिटर्स. आमच्या भागातल्या मुख्य रस्त्याला अशा किती गल्ल्या आहेत याची कल्पना नाही. आमचा गल्ली क्र ८० आहे. म्हणजे ८० कोटी लिटर्स.
पूर्ण शहराचे किती ?

कल्पना नाही.

एव्हढे पाणी वाचले तर धरणावर कमी ताण येईल. पाणी वर्षभर पुरेल किंवा वाचलेले पाणी खाली सोडता येईल.

पाणी वाचवणे/अडवणे या साठी प्रयत्नं करतांना लोकांना प्रश्नं पडतात कारण हे का? कितीसं पाणी वाचणार्/वाढणार आहे ? ह्या गोष्टी मनांमधे असतात.

पण सोनं वाचवायला सांगीतले तर कोणी प्रश्न विचारीत नाही का? कारण एक ग्राम सोनं वाचवलं तरी रु.३००० मिळतात/वाचतात.

जर पाण्ञाची किंमतही अशीच झाली तर आपोआप लोक स्वता पाणी वाचवण्याचे /साठवण्याचे मार्ग शोधुन काढतील.

पाणी हे जीवन आहे त्याविना जगु शकत नाही तरी ते अत्यंत स्वस्त आहे . ईतर अनेक गोष्टी ज्यांच्या विना आरामांत जगु शकतो त्या पाण्ञाहुन महाग आहेत आणि गंमत म्हणते त्यातल्या कित्येक बनवण्यासाठी पाणी वापरले जाते.

पाणी फुकट / नाममात्र किमतीत सरकारने जनतेला उपलब्ध करुन दिले पाहिजे हा समजच घातक आहे. त्यामुळे पाण्याच्या व्यवस्थापनामधे ढिसाळ्पणा आणि भ्रष्टाचार आला . जेवढा पैसा/श्रम पाणी उपलब्ध/शोधणे/ साठी लागतो तवढा लोकांकडुन मिळत नाही. म्हणुन ईतर कामे ज्यांतुन पैसा मिळतो त्यांना प्राथमिकता दिली जाते. काही वर्षांत जेंव्हा पाण्यासाठीमारामारी/युद्धे सुरु होतील तेंव्हा आपोआप पाण्ञाची बचत / रक्षण केले जाईल.

सामायिक वाटप, खप, मालकी ही तीन कारणे यामुळे दुर्लक्ष केलं जातं.

मुक्त विहारि's picture

20 Jul 2019 - 11:17 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....