डॉ. पायल तडवी एक दुखःद घटना

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
29 May 2019 - 6:00 pm
गाभा: 

डॉ. पायल तडवी या तरूण डॉक्टरच्या आत्महत्या (कि संशयास्पद मृत्यू ) चे दुखःद वृत्त माध्यमात चर्चिले जाते आहे. सर्वसाधारणपणे काही क्षेत्रे सोडली तर सर्वसाधारणपणे जातीवरून हिनत्व वागणूक दिल्या जाण्याचा किमान सार्वजनिक जीवनातून बर्‍यापैकी लोप होत आहे असे आपण गृहीत धरून चालतो. किमानपक्षी मुंबईसारख्या जुन्या मेट्रॉपॉलीटन शहरातून उच्च शिक्षीत वरीष्ठ डॉक्टरांबद्दल अशी साशंकता असलेले वृत्त आश्चर्याचा धक्का आणि खरेच तसे झाले असल्यास -प्रथम दर्शनी तरी वृत्ते तशीच येत आहेत- निश्चितच काळजी आणि चिंतेची गोष्ट म्हणावी लागेल.

ज्या टोपीवाला महाविद्यालय (नायर रुग्णालय) येथे डॉ.पायल स्त्री वैद्यकशास्त्रातील पदव्यूत्तर शिक्षण घेत होत्या त्या वेबसाईटवर
https://www.tnmcnair.com/ भेट दिली असता कदाचित वेबसाईट कदाचित अद्ययावत नसल्यामुळे असेल ज्या वरीष्ठ डॉक्टरांवर जातीय छळाचा आरोप केला जातोय त्यांची नावे प्राध्यापक यादीत दिसली नाहीत. मुंबईतील सदर महाविद्यालय जवळपास १०० वर्षे जुने आहे किमान वेबसाईटवर दिसत असलेल्या प्राध्यापकांची आडनावे मुंबईतील बहुसांस्कृतिकतेला साजेशी अनेक जाती धर्मातून दिसताहेत.

अगदी ज्या युनिट हेडकडे प्राध्यापिकांबद्दल तक्रार केली गेली तिचे नाव Y.I. Ching Ling असे दिसते आहे - त्यांनी जाहीरपणे कोणते निवेदन केलेले माझ्या वाचनात तरी आलेले नाही . सहसा वरीष्ठ डॉक्टर्स नौकरीवर एवढेही अवलंबून नसावेत की अशा तक्रारींबाबत कुणाच्या छोट्या दबावाखाली येतील. एखाद्या एमबीबीएस पूर्ण केलेल्या स्त्रीला स्ट्रेस मॅनेजमेंट आणि मानसशास्त्राचे प्राथमिक ज्ञानही नसेल असे समजणे धाडसाचे वाटते

ज्या प्राध्यापिकांबद्दल जातीयता विषयक तक्रार आहे त्यांच्या हाताखालून इतरही आरक्षीत जातीतील डॉक्टर शिकुन गेले असणार आहेत त्यांच्याकडेही या प्राध्यापिकांच्या वर्तनाच्य इतिहासाची सुयोग्य चौकशी करण्यास हरकत नसावी असे वाटते.

सर्वात महत्वाचे आरक्षण असावे किंवा नसावे हा तात्विक वादाचा विषय प्रत्यक्षात काम करताना बाजूला ठेवला पाहीजे आणि पटो अथवा न पटो आरक्षण मिळालेल्या व्यक्तींना सुद्धा समान आणि आदराची वागणूक मिळाली पाहीजे. या घटनेची चौकशी होईल आणि सुयोग्य कारवाई केली जाईल आणि जातीय वीषमतेची वागणूक कुणाला सहन करावी लागणर नाही अशी अपेक्षा करूया.

जाता जाता आनखी एक विषय महाविद्यालयाचे डयरेक्टर कि डिन पद मागचे डायरेक्टर कुणि डॉ.सुपे म्हणून निवृत्त झाल्या नंतर कायम स्वरूपी भरण्याबाबतची कार्यवाही मुंबई महापालिकेकडून सावकाशपणे चालली असावी असे एशियन एज च्या एका वृत्तातून दिसते. त्यात हॉस्पीटलच्या जाती आधारीत कर्मचारी युनियनचा जातीय राजकारणामुळे पद भरण्यात दिरंगाईचा आरोप दिसतो आहे. आणि निवडणूक आचारसंहितेचे कारण प्रशासनाकडून दिले जाताना दिसते आहे. प्रबोधनकार ठाकरे यांची पार्श्वभूमी असलेली शिवसेना वरीष्ठ पदासाठी कट्टर जातीय रंग ठेवेल अशी शक्यता कमी वाटते.. शिवसेना नेतृत्व आणि फडणवीस सरकार सुयोग्य पावले उचलतील अशी अपेक्षा करूया

*** घटना क्रमाची नोंद घेण्याचा प्रयत्न

२२ मे २०१९ ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी नंतरही दोन चार दिवस सर्वांचे लक्ष मुख्यत्वे निवडणूंकांच्या बातम्यां कडे असावे त्यामुळे घटना क्रम नीटसा ध्यानात घेण्यास अवघड जाते. माझेही बातमी कडे लक्ष उशीराच गेले. त्यामुळे घटनाक्रम समजून घेणे योग्य असेल असे वाटून मला बातम्यांमध्ये दिसलेला घटना क्रम काही त्रुटी दिसल्यास खाली प्रतिसादातून नोंदवणे

* मयत डॉक्टर स्त्रीचे नाव पायल तडवी वयः २२ पती डॉ. सलमान तडवी

* शिक्षण एमबीबीएस पूर्ण गायनॉकॉलॉजी पदव्यूत्तर शिक्षण वर्ष दुसरे चालू होते. नायर हॉस्पीटल जॉईनींग १ मे २०१८

*** संदर्भ आणि घटनाक्रम वृत्ते***

* मिड डे १
* मिड डे २

* https://www.asianage.com/metros/mumbai/170519/director-for-medical-educa...
https://indianexpress.com/article/india/mumbai-doctor-suicide-payal-tadv...

*** चौकशी वृत्ते ***
१) महिला आयोग आणि आदिवासींसाठी असलेले अयोग यात लक्ष घालू शकतील महिला आयोगाने रिपोर्ट मागवल्याची बातमी वाचली होती

२) रॅगिंग विषयक संस्था स्तरीय प्रथम स्तरीय चौकशी होऊन द्वितीय स्तरीय चौकशी चालू असावी वृत्त
https://www.hindustantimes.com/mumbai-news/nair-hospital-suicide-case-st...

३) पोलीसांकडून चालू असलेली चौकशी क्राईम ब्रँचकडे वर्ग केलेली वृत्त वाचनात आहे.

४) युनिट हेड डॉ. Y.I. Ching Ling यांच्या बाजू बद्दलचे इंडियन एक्सप्रेस वृत्त

५) विभाग प्रमुखांची स्टेटमेंट्स
***अनुषंगिक ***
* नायर रुग्णालय गायनाकॉलॉजी विभाग प्राध्यापक नाव यादी कितपत अद्ययावत आहे कल्पना नाही. विभाग प्राध्यापक यादीत डॉ. यि चिंगलींग व्यतरीक्त बाकी आडनावे बहुधा मराठीच पण सर्व जातीय सरमिसळ दिसते आहे.

*https://www.tnmcnair.com/home/about.html नायर रुग्णालय वेबसाईट

* वैद्यकीय क्षेत्रातील जातीय वीषमता विषयक दावा करणारा ऑनलाईन वायर वरील लेख दुवा

* In light of Dr Payal Tadvi’s case, Nair Hospital holds discussion on workplace harassment

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

30 May 2019 - 9:53 am | प्रकाश घाटपांडे

ज्या प्राध्यापिकांबद्दल जातीयता विषयक तक्रार आहे त्यांच्या हाताखालून इतरही आरक्षीत जातीतील डॉक्टर शिकुन गेले असणार आहेत त्यांच्याकडेही या प्राध्यापिकांच्या वर्तनाच्य इतिहासाची सुयोग्य चौकशी करण्यास हरकत नसावी असे वाटते.

नक्कीच हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. सरकारी नोकरीत आरक्षित मित्रमंडळीत तुम्ही काय बाबा सरकारचे जावई असे चेष्टामस्करीत म्हटले जाते.पण ते मैत्रीच्या बंधात हलकेच घेतले जाते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2019 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतत जातीवर टोमने मारत राहिल्यामुळे तिने हे दुर्दैवी पाऊल उचलल्याचे बातम्यांवरुन दिसते. महाविद्यालयातील सीनियर्सनी ज्यूनियर्सचा छळ करणे अजुनही कायदा असूनही चालूच दिसते. हे दुर्दैवी आहे, तिच्या मृत्युला जवाबदार असणा-यावर कायदेशीर कार्यवाही होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणजे लोकांचा कायद्यावरील विश्वास वाढून अशा वृत्तीला आळा बसेल असे वाटते.

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

30 May 2019 - 1:05 pm | माहितगार

सर मी २०१४ च्या गांधी जयंतीच्या मुहुर्तावर "आईचा समभाव, वडीलांची तटस्थता न्याय्य निष्पक्षता यांच्या वरील पक्षपाताच्या टिकेचे आव्हान" अशा लांबलचक शीर्षकाचा लेख मिपावर लिहिला होता. आणि त्यात Truth and reconciliation commission या संकल्पनेची ओळख करून दिली होती.

सध्या उपलब्ध कायदा आणि न्यायिक प्रणालीतून स्वतःला शिक्षेतून घडवण्यासाठी/ वाचवण्यासाठी वस्तुस्थितीचा आपलाप, खोट्या साक्षी, साक्षीदार फोडणे माध्यमांचा असमतोल गलबला यातून वस्तुस्थिती कुठेतरी हरवून जातात. कायदा कागदावर रहातो मनातील द्वेष पुसले जात नाहीत मानवी आणि सामाजिक मने एकमेकाजवळ येऊ शकत नाहीत.

कन्फेशन आणि आत्मक्लेषास महत्व येईल अशा कमी पण वेगवान शिक्षा देतानाच दुभंगलेली मने जुळवून आणणार्‍या प्रणालीची गरज कुठेतरी जाणवते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 May 2019 - 1:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या उपलब्ध कायदा आणि न्यायिक प्रणालीतून स्वतःला शिक्षेतून घडवण्यासाठी/ वाचवण्यासाठी वस्तुस्थितीचा आपलाप, खोट्या साक्षी, साक्षीदार फोडणे माध्यमांचा असमतोल गलबला यातून वस्तुस्थिती कुठेतरी हरवून जातात. कायदा कागदावर रहातो मनातील द्वेष पुसले जात नाहीत मानवी आणि सामाजिक मने एकमेकाजवळ येऊ शकत नाहीत.

१०० % मान्य...!!

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

30 May 2019 - 1:21 pm | माहितगार

पायल तडवी बेसिकली आदीवासी जमातीतून येतात. भारतात आदीवासींचे इतर आधीकार उपलब्ध होण्याच्या समस्या असू शकतील पण सरसकट जातीय कारणावरून छळासाठी आदीवासी जमातींना लक्ष्य केले जात असण्याची शक्यता तुलनेने कमी असावयास हवी असे वाटते. (चुभूदेघे)

पण वर घाटपांडेंनी म्हटल्या प्रमाणे आरक्षणाचा लाभ घेण्यावरून टोमणेगिरी होण्याची शक्यता असू शकते, आणि कोणतीही व्यक्ती आणि समुहलक्ष्य टोमणे गिरी निश्चितच निषेधार्हच मानली पाहीजे.

इंटरस्टेट स्टुडेंट एक्सचेंज वाढवून त्यांअतर्गत ज्यांना छळ होतोय असे लक्षात येते भासते त्यांना दुसरी विद्यापीठे निवडू देण्याचा ऑप्शन असावा असे वाटते.

शिवाय बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी (अगदी पदव्युत्तर पर्यंत सुद्धा) स्थानिक पालक अशी संकल्पना अत्यंत गरजेची वाटते. ज्यांच्याकडे विद्यार्थी अधिक मोकळेपणाने बोलू शकतील.

महाविद्यालयातील इतर प्राध्यापिकांशी (आणि त्यात विवीध जाती धरम समावेश दिसतो आहे) पायल तडवींचा संवाद असता मन मोकळे केले असते तर त्यांच्याकडुन काही ना काही मदत निस्चित उपलब्ध झाली असती. महाविद्यालय आणि रुग्णालय मिळून एक जातीय न्याय मागणारी कामगार संघटनापण कार्यरत दिसते. पायल तडवींना त्यांच्या नेतृत्वाशी संवाद साधणे शक्य नव्हते का वगैरे बांबीवरही या निमिताने प्रकाशपडावा असे वाटते

सुबोध खरे's picture

30 May 2019 - 11:02 am | सुबोध खरे

वस्तुस्थिती माहिती नसताना आपल्या चष्म्यातून पाहून एखाद्या गोष्टीवर आपण भारतीय लोक निकाल देऊन मोकळे होतो हे फार वेळेस दिसून येते.

चौथा कोनाडा's picture

30 May 2019 - 1:14 pm | चौथा कोनाडा

+१

खरंय !

माहितगार's picture

30 May 2019 - 1:27 pm | माहितगार

मला तरी वाटते की मी चर्चा लेख लिहिताना पुरेशी काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

जातीयता कमी होत आहे हेही लक्षात घेतले आहे पण जातीय दुरतेची वीषवल्ली अंशतःतरी कुठे ना कुठे आधून मधून दिसून येते. आणि अशा घटनांच्या वेळी नोंद घेऊन चर्चा न करणे चुका झाल्या असल्यास सुधारणा न करणे आपल्याच भारतीय समता आणि एकतेच्या प्रक्रीयेस हानीकारक असावे म्हणून सम्यक चर्चाम्ची नितांत गरज आहे असे वाटते.

जालिम लोशन's picture

30 May 2019 - 2:12 pm | जालिम लोशन

वस्तुस्थिती.

चिर्कुट's picture

31 May 2019 - 6:58 am | चिर्कुट

वस्तुस्थिती काय आहे?

हि घटना वरवर पाहता आरक्षणावर बेतलेली असू शकते.
आज समाजात बर्‍याच अंशी अन-आरक्षित लोकांचा आरक्षणावर रोष असलेला आढळून येतो. त्यातूनच कदाचित हे रॅगींग घडले असावे.
पण जोपर्यंत संविधानाने आरक्षणाचा अधिकार लोकांना दिलेला आहे तोपर्यंत तरी इतरांनी आरक्षणाचा द्वेष करायला नको आणि विरोध करायचाच असेल तर इतर संविधानीक मार्गाचा त्यासाठी वापर व्हावा ही अपेक्षा.

जातीचे चे लेबल लगेच लावू नका .
आपल्या मीडिया ची खोड सर्वांना माहीत आहे ( फक्त सनसनाटी बातम्या देणे(
पोलिस तपास पूर्ण झाल्यावर नक्की काय घडलं ते माहीत पडेल .
तोपर्यंत निःपक्ष चोकशी,राजकीय पक्ष आणि गट ह्यांना सार्वजनिक टीपणी करायला न्यायालयाने पूर्ण बंदी घातली पाहिजे

श्वेता२४'s picture

30 May 2019 - 2:14 pm | श्वेता२४

पण काही अनुत्तरीत प्रश्न असे आहेत -
1) की तीला इतका टोकाचा त्रास होत अशेल तर तो तिने नक्कीच पालक/नवरा व मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर केला असणार त्यामुळे साक्षीदाऱ्यांच्या जबाबाबवरुन हे जर रॅगिंग असेल तर ते सिद्ध करण्यास अडचण नसावी.
2) इतकं टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने सुसाईड नोट किंवा तत्सम व्हिडिओ/ऑडिओ टाकायला काहीच हरकत नव्हती. कारण कोणीही आपल्याला त्रास देणाऱ्यास शासन व्हावे असे जरुर वाटेल. पण कोठतरी वाचलेय की घटनास्थळावरुन तसे काहीही सापडले नाहीय.
3) पायल तडवीच्या नवऱ्याने जवळच फ्लॅट घेतला होता पण ती त्याच्यासोबत न राहता वतिगृहात राहत होती. जर तिला इतका त्रास होत होता तर मानसिक आधाराकरीता कोणीही जवळच्या व्यक्तिसोबत राहिल. पण इथे तसे झालेले नाही, जे निश्चितच संशयास्पद आहे. सदर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. ते सत्य शोधून काढतीलच. पायल तडवीला न्याय मिळो हिच इच्छा.

श्वेता२४'s picture

30 May 2019 - 2:15 pm | श्वेता२४

पण काही अनुत्तरीत प्रश्न असे आहेत -
1) की तीला इतका टोकाचा त्रास होत अशेल तर तो तिने नक्कीच पालक/नवरा व मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर केला असणार त्यामुळे साक्षीदाऱ्यांच्या जबाबाबवरुन हे जर रॅगिंग असेल तर ते सिद्ध करण्यास अडचण नसावी.
2) इतकं टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी तिने सुसाईड नोट किंवा तत्सम व्हिडिओ/ऑडिओ टाकायला काहीच हरकत नव्हती. कारण कोणीही आपल्याला त्रास देणाऱ्यास शासन व्हावे असे जरुर वाटेल. पण कोठतरी वाचलेय की घटनास्थळावरुन तसे काहीही सापडले नाहीय.
3) पायल तडवीच्या नवऱ्याने जवळच फ्लॅट घेतला होता पण ती तिथे त्याच्यासोबत न राहता वसतिगृहात राहत होती. जर तिला इतका त्रास होत होता तर मानसिक आधाराकरीता कोणीही जवळच्या व्यक्तिसोबत राहिल. पण इथे तसे झालेले नाही, जे निश्चितच संशयास्पद आहे. सदर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. ते सत्य शोधून काढतीलच. पायल तडवीला न्याय मिळो हिच इच्छा.

जातीचे चे लेबल लगेच लावू नका .
आपल्या मीडिया ची खोड सर्वांना माहीत आहे ( फक्त सनसनाटी बातम्या देणे(
पोलिस तपास पूर्ण झाल्यावर नक्की काय घडलं ते माहीत पडेल .
तोपर्यंत निःपक्ष चोकशी झाली,पाहिजे हीच मागणी असावी .
चोकशी पूर्ण होईपर्यंत राजकीय पक्ष आणि गट ह्यांना सार्वजनिक टीपणी करायला न्यायालयाने पूर्ण बंदी घातली पाहिजे

धर्मराजमुटके's picture

30 May 2019 - 9:03 pm | धर्मराजमुटके

प्रकरणातल्या सगळ्यांचीच जात आणि राज्य माहित असल्याशिवाय या प्रकरणावर काही बोलणे उचित ठरेल असे वाटत नाही.

प्रकरणातील मृत आणि आरोपी असलेल्यांची आडनावे आणि त्यांच्या मुळ राज्याबद्दल माझे अंदाज खालील प्रमाणे :

प्रकरणातील मृत डॉ. तडवी म्हणजे बहुधा आदिवासी / भिल्ल समाजातील व्यक्ती. ह्या जातीच्या व्यक्ती महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मला वाटते की मध्य प्रदेशात पण असतात.

खंडेलवाल ( जात : वैश्य किंवा जैन / मुळ राज्य : म.प्र किंवा राजस्थान) ,
आहुजा ( जात : पंजाबी किंवा सिंधी /मुळ राज्य : पंजाब /दिल्ली),
मेहर ( जात : विणकर / मुळ राज्य : ओडीसा किंवा छत्तीसगड)

या सर्वांना एकमेकाच्या जाती वर्चस्वाची जाणिव असण्यासाठी त्यांच्यामधे काहीतरी गोष्ट कॉमन असायला पाहिजे. पण इथे कोणताही कॉमन फॅक्टर दिसत नाही. अर्थात सगळे मिळून मृत व्यक्तीस वारंवार "आदिवासी" म्हणून संबोधित असतील किंवा अपमानित करत असतील तर मात्र गोष्ट वेगळी. मला वाटते की ही केवळ रॅगींग ची केस देखील असू शकेल.

अर्थात ही सगळी अनुमाने आहेत आणि ती चुकीची देखील असू शकतात.

मात्र अशा प्रकारची दु:खे कोणाच्या वाट्यास येऊ नयेत हीच प्रामाणिक इच्छा ! सगळ्यांना आदराची वागणूक मिळाली पाहीजे.

नाखु's picture

31 May 2019 - 9:11 am | नाखु

अन्यायाविरुद्ध जातपात विरहित,पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आवाज उठवला पाहिजे पण,कोपर्डी घटनेचे भांडवल करताना घोषणाही होती"जिजाऊंच्या लेकींकडे वाकड्या नजरेने पहाल तर याद राखा'
आता अन्याय झालाय यापेक्षा तो कुणावर झालाय त्याप्रमाणेच माध्यमे आणि मिपाकर व्यकत होतात.पुरोगामित्व मुखवटा सांभाळताना अश्या प्रसगी मौन धारण करण्याचा मार्ग मोकळा असतोच.

जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी गैरवाजवी नाही.

सुबोध खरे's picture

31 May 2019 - 10:28 am | सुबोध खरे

जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी गैरवाजवी नाही.
+१००
त्या तीन डॉक्टरांचे काय म्हणणे आहे हे कोणाला तरी माहिती आहे का?

किंवा डॉ चिंग लिंग यी या विभागप्रमुख काय म्हणत आहेत ते माहिती आहे का?

वंचित बहुजन आघाडी आणि इतर यशस्वी कलाकारांनी यात उडी घेतल्यामुळे त्यातून ती दुर्दैवी मुलगी अनुसूचित जमातीची आणि त्यातून मुसलमान असल्याने याला राजकीय सप्त रंग प्राप्त झाले आहेत.

(त्यात एकही वरिष्ठ डॉक्टर ब्राम्हण/ मराठा नसल्याने या प्रकरणाला अजून नीट रंग चढत नाहीये)

धुरळा खाली बसे पर्यंत वाट पहा.

जातीच्या जाणिवा पुसट न होता अधिक गडद होत आहेत. जुणी जात व्यवस्था उच्च निचतेची होती पण आता त्यात वैरभावाची भर पडली आहे. कुणा एकाची गरीब/मध्यमवर्गीय अवस्था, त्यात थोड्या फार गुणांनी संधी नाकारली जाते. तीच संधी कोण तरी तुलनेत कमी गुण घेतलेला घेऊन जातो, कुणाला लाखांची शैक्षणिक फी आकारली जाते कोण मोफत शिक्षण घेतो. कुणाला कमी गुण असले तरी प्रवेशद्वार मिळेल याची खात्री आहे म्हणून आपल्या जातीला लागेल एवढाच अभ्यास करायचा अशी परिक्षा व मापन पद्धती ला गृहीत धरण्यातली माजोर वृत्ती. तर कोणाच्यात तु आरक्षण वारा आहे म्हणून आधीच त्याला मिसळून न घेता शत्रू पक्षात पकडने, वारंवार तु तुझी लायकी नसताना इथं आला आहे हे दाखवने. हे सारं पहिल्या पेक्षा जास्त चालु आहे. वाढतं आहे. सदर प्रकरणात जातीय त्रास दिलेला नसावा व सत्य विपरीत निघावे अशी मनापासून इच्छा आहे.

सुबोध खरे's picture

1 Jun 2019 - 8:29 pm | सुबोध खरे

सत्य विपरीत निघावे अशी मनापासून इच्छा आहे.

सत्य फारच विपरीत आहे.

एकीकडे मागासवर्गीय नवरदेव घोड्यावर बसला म्हणून घोड्याला मारून टाकण्याची घटना हि घडते आहे.

त्याच बरोबर मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयात मागासवर्गीय प्राध्यापक खुल्या वर्गातील मुलांना शल्यक्रिया शिकवण्याच्या ऐवजी शल्यक्रिया गृहात प्रवेशही नाकारतात आणि तुमचे काम फक्त शल्यक्रिया गृहाचा दरवाजा उघडणे एवढेच आहे असे सर्वांसमोर सांगतात. अशा अनेक घटना घडल्या तरी खुल्या वर्गातील मुले तोंड उघडत नाहीत कारण प्राध्यापक सर्वांच्यासमोर सांगतात तुम्हाला ऍट्रॉसिटी लावून तुमचे करियर बरबाद करून टाकीन.

यातून शिक्षण राहिले बाजूला, जाती जातींमध्ये प्रचंड आकस निर्माण होत आहे.

अभ्या..'s picture

1 Jun 2019 - 8:32 pm | अभ्या..

अवघड आहे

खूप छान .

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jun 2019 - 10:39 am | प्रकाश घाटपांडे

यातून शिक्षण राहिले बाजूला, जाती जातींमध्ये प्रचंड आकस निर्माण होत आहे. >>> खर आहे दोन्ही टोकाची उदाहरणे सापडतात.

बबन ताम्बे's picture

2 Jun 2019 - 1:39 pm | बबन ताम्बे

त्यात सोशल मीडियाच्या जमान्यात जातीय अभिनिवेश खूपच टोकदार झालेला आहे.
त्यात भर घालणारे जात /समाजांचे राजकीय पुढारी.
आम्ही विचारांनी चाललेली माणसं म्हणायचं आणि जाती जातीत तेढ निर्माण करायची. बाकी विधायक कार्याची बोंब

त्यातल्या त्यात एक समाधानाची बाब म्हणजे शिकलेली बरीच तरुण शहरी पिढी जात पात मानत नाही.

या प्रकरणाला जातीय रंग तर आहेच, पण वरतून धार्मिक रंग पण आहे.

आणि मराठी अमराठी असाही रंग ऑप्शनल आहे. तिन्ही नावे अमराठी (मूळमहाराष्ट्राबाहेरची) असल्याची समजूत प्रथमदर्शनी होते (लोकांनी करुन घेतली असावी). प्रत्यक्षात तसं नसू शकेल.

कार्यालय असू ध्या किंवा कॉलेज,आणि अगदी लष्कर,पोलिस सुधा .
असे वर्चस्व गाजवण्याची आणि राजकारण करून एकमेकाला कमी लेखण्याची वृत्ती सर्व ठिकाणी असते .
मग टोमणे मारणे ,स्वतः कसे हुशार आहे आणि बाकी मूर्ख आहेत असे दर्शवण्याचा प्रयत्न सर्व ठिकाणी .
त्या साठी स्वतः मानसिक दृष्ट सक्षम असायला हवे .
आणि कुरघोडीच्या राजकारणात सुद्धा स्किल डेव्हलमेंट आपण स्वतः करायला पाहिजे .

माहितगार,

धाग्याबद्दल आभार. पायलने लेखी तक्रार केली नव्हती : https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/there-wa...

तसंच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची भेट घेतलेली नव्हती. त्यामुळे ही खरोखरच कनिष्ठपीडेची ( = रॅगिंग ) अथवा जातीवाचक त्रासाची घटना आहे का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

मटा या वर्तमानपत्राने प्रक्षोभक मथळे देऊन आगीत तेल ओतणं चालू ठेवलंय. या बातमीचा मथळा आहे : 'आम्ही फक्त तिच्याकडून काम करून घ्यायचो'

प्रत्यक्षात मजकूरात मात्र 'आम्ही फक्त आमचे काम केले आणि तिच्याकडून काम करून घेतले' असं लिहिलंय. शिवाय तीन संशयित डॉक्टर फरार झाल्याचं लिहिलंय. या तिघींना फरार म्हणून घोषित करणारे मटावाले कोण लागून गेलेत ? फक्त न्यायालय फरार घोषित करू शकतं. मटा सरळसरळ स्वाभियोग ( = मीडिया ट्रायल ) चालवतो आहे.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

8 Jun 2019 - 6:36 pm | माहितगार

केस अद्यापतरी गुंतागुंतीची वाटते आहे. घटना क्रम अद्याप सुस्पष्ट नाही. बरेच प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत.

नेहमी 'जातीवाचक' या शब्दाने डोळ्या समोर जी प्रतिमा येते त्या पेक्षा वेगळे असावे, वर पहिल्या प्रतिसादात घाटपांडेंनी जी शक्यता व्यक्त केली तसे एखादी गोष्ट जमली नाही की मारली आरक्षण कोट्याबद्दल कॉमेंट असे काही घडल्याची शक्यता असू शकेल असे वाटते.

जतीवाचकता हा मुद्दा क्षणभर बाजूस ठेवला तरी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात रॅगिंगची पद्धत नॉर्मलाईज्ड असल्याबद्दल बर्‍याच डॉक्टर मंडळी तथ्य म्हणून स्विकारताहेत असे दिसते. साधारणतः वैद्यकीय व्यवसायात कामाचा ताण असणे गृहीत धरले जात असल्यामुळे रॅगिंग या स्वरुपाकडे कदाचित दुर्लक्षही होत असेल .

पायलच्या बाबतीत ती हॉस्टेलवर पोहोचली तेव्हापासूनच गोष्टी बिनसण्यास सुरवात झालेली होती अशी शक्यता दिसते. बिनसलेल्या व्यक्तींना समोरा समोर आणून मतभेद मिटवण्यास सांगण्याच्या भूमिकेत वरीष्ठ युनिट हेड कमी पडल्या असे प्रथमदर्शनी वाटते. आपापसात बिनसलेल्या व्यक्तींना समोरासमोरबसून मतभेद मिटवण्यास सांगण्याची गरज असते याची एकतर युनिट हेड ना कल्पना नसेल किंवा रॅगिंग करणार्‍या वरीष्ठ विद्यार्थीनीनी युनिट हेड आणि हेड ऑफ द डिपार्टमेंटना खूपच विश्वास संपादन केला असेल.

पायलने वरीष्ठ विद्यार्थीनींच्या करीअरला त्रास नको म्हणून लेखी टाळून केवळ तोंडीच तक्रार दिली असेल तर तो तिच्या मनाचा मोठेपणा समजायचा.

तिला वाढीव काम सांगणे हे समजता येऊ शकते. पण बाळंतपण आणि स्त्री शल्यक्रीया करण्याची संधी हटकून न देणे हे समजण्या पलिकडे आहे. तिला एखादी गोष्ट समजा शल्य क्रीया जमतच नाही तर त्याची लेखी नोंद करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांची होती. आणि तसे नसेल तर तिला समान संधी मिळावयास हवी होती.

इथे सध्याच्या विश्लेषणात आणखी एक बाब लक्षात घेतली जात नाहीए की तीचे रमजानचे उपवास चालू असतील तर शारिरीक आणि मानसिक ताण अधिक वाढलेला असेल जे तिच्या आणि इतरांच्याही लक्षात आले नसेल. एकुणच वैद्यकीय व्याव्सायिकांनाही मानसिक तणाव व्यवस्थापनार्थ मदतीची गरज असू शकते अर्थात मैत्रितील थट्टा आणि विशेष परीचयात नसलेल्या व्यक्तिस हिणवणे यातील फरक समजून घेणे गरजेचे असावे. व्यकिस हिणवणे खासकरून सार्वजनिक ठिकाणी हिणवणे जमेल तेवढे टाळले जावयास हवे आणि सदर वरिष्ठ विद्यार्थिनींनी सर्वासमक्ष अपमानित करण्याच्या बाबी बहुधा काही चौकशीतून पुढे येत आहेत असे दिसते आणि ऋग्णालय व्यवस्थापनाचे सार्वजनिक गोंधळावर नियंत्रण नव्हते असे वृत्तांवरून प्रथम दर्शनीतरी वाटते आहे.

सुबोध खरे's picture

8 Jun 2019 - 7:59 pm | सुबोध खरे

जेथे दिवसाचे १६ तास काम करून काम संपत नाही तेथे एक डॉक्टर न सांगता एक महिना रजेवर गेल्यावर काय होईल?

वॉर्डातील काम संपले नसताना डॉक्टर गायब होत असेल आणि फोनच उचलत नसेल तर लगेच वरच्या वरिष्ठ माणसाने काय करावे?

ज्यांनी निवासी डॉक्टरांचे आयुष्य निदान एक दिवस पहिले आहे त्यांना कल्पना येईल.

बाकीच्यांच्या दृष्टीने हा एक चांगला चहाबरोबर चघळायचा विषय आहे.

या प्रकरणाची दुसरी बाजू समोर का येत नाहीये याचा विचार केला का?

तसे करणे हि राजकीय आत्महत्या होईल ( विशेषतः पुढच्या ४ महिन्यात निवडणूका आहेत) एवढेच बोलून मी खाली बसतो.

माहितगार's picture

8 Jun 2019 - 8:52 pm | माहितगार

स्वतःला क्लिअर करण्याची जबाबदारी आरोपींना टाळता येणे कठीण वाटते. त्यांनी घटनाक्रम आणि सर्व संभाषणे जेवढी आठवतील तेवढी प्रामाणिक आणि परदर्शतेने समोर ठेवली पाहिजेत.

जो पर्यंत घटनाक्रम व्यवस्थित लिहून मांडला जात नाही तो पर्यंत तरी माझ्या व्यक्तिगत मते बेनिफीट ऑफ डाऊट डॉ. पायलच्या बाजूने जातो आहे असे म्हणेन. कारण संभाषणे आणि घटनाक्रम सांगण्यासाठी डॉ. पायल वापस येऊ शकत नाही. जे आहेत त्यांच्या कडून पारदर्शकता अभिप्रेत असावी.

जालिम लोशन's picture

8 Jun 2019 - 9:20 pm | जालिम लोशन

ह्या शिर्षका खालील बातम्यापुर्वी यायच्या त्यात सत्य भलतेच असायचे जे वर्तमानपत्रात छापुन आलेल्या ओळिंच्या जवळपासही जाणारेनसायचे ह्या केस मधेही तसेच दिसते आहे. सायकाॅलोजीचा अभ्यास असणार्‍यांना हे कळेल. किंवा अगाथा ख्रिस्ति वाचणार्‍यांना कळेल.

माहितगार's picture

9 Jun 2019 - 7:18 am | माहितगार

लोकसत्ताच्या या वृत्तार २२ मे चा घटनाक्रमाची अंशतः तरी माहिती आल्याचे दिसते आहे. यात नेमक्या संभाषणांच्या माहितीचा अभाव आहे.

या वृत्तानुसार डॉ. पायल तडवींना रुममेट्स होत्या एवढे कळते आहे. पण त्यांच्या कडूनच्या बाकी माहितीचा अभाव आहे.

आणखी मिड - डे चे एक वृत्त आहे त्यात बाकी बॅचमेट्सच्या नावांची माहिती आहे.

Out of these, five were from the gynaecology department — Dr Snehal Shinde, Dr Bhagyashree S. Yevle, Dr Sangram J Gadekar and Dr Pradeep D Lokhande, who were Dr Tadvi's batch mates, and Dr Anurupa Nayak, who is a junior.

याच मिड डे वृत्तातील एक पॅरेग्राफ

While Dr Payal Tadvi was being harassed by her seniors, she barely had any friends to lean on in the gynaecology department, according to her batch mates. Because of this, she used to mingle more with resident doctors from the departments of anaesthesia and surgery, who were well aware of the treatment being meted out to her.

वृत्तार डॉ पायल तडवींचे इतर बॅचमेट्सशी इंटर मिंगलींग कमी होण्याचे एक कारण शिफ्ट ड्युटीचे असे दिले आहे, पण पूर्ण वर्षभरात मिसळू शकत नाहीत ?

डॉ. पायल तडवीला त्या तिघी शिंवाय दुसर्‍या कुणि सिनियर विद्यार्थिनी नव्हत्या का ? जर त्या तिघीच होत्या तर गयनाकॉलॉजी विभागातील पायलच्या इतर बॅचमेट्सनाही रॅगींग जातीवरून हिणवण्या सहीत अथवा शिवाय समोर जावयास लागले असेल. या संबंधीत प्रश्नांची उत्तरे अद्याप दिसत नाहीत .

हॉस्टेल रेक्टर बद्दलही अद्याप वृत्तांकनातून उल्लेख आढळलेले नाहीत.

माहितगार's picture

9 Jun 2019 - 7:51 am | माहितगार

खालील सोशल मिडिया वृत्तांकन साध्या वेबसाईटवरून आले आहे त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे शक्य नाही.

'....डॉक्टर ने पायलसे पूछा था कि तुम आरक्षण से आई हो न”।

क्या सिर्फ इतना पूछ लेने से यह जातिगत टिप्पणी बन गयी ? क्या उन्होंने कुछ गलत पूछा ? क्या डॉ पायल आरक्षण का लाभ नहीं लेकर आई थी ? जब लाभ लिया तो इसमें लज्जा कैसी ? ऐसे कई सवाल लगातार लोग फेसबुक व ट्विटर के माध्यम से दाग़ रहे हैं |

तुम आरक्षण से आई हो न ? हा प्रश्न कोणत्या परिस्थितीत विचारला त्यावर प्रश्न विचारण्याचा उद्देश्य ठरेल. पण सहसा प्रशासकीय कारणाने प्रशासकीय विभागा शिवाय इतरांना इतर वेळी सहसा हा प्रश्न विचारण्याचे फारसे कारण रहाते असे वाटत नाही. त्यामुळे टाळता येण्या जोगा प्रश्न विचारणे श्रेयस्कर नसावे असे वाटते.

याची समज माझ्यामधे तरी नाही.

माहितगार's picture

10 Jun 2019 - 9:53 am | माहितगार

कालच्या लोक्सत्ता बातमीतून २२ मेच्या घटनाक्रमाचा काही भागाचा उलगडा झाला तरी तो पूर्ण नाही असे वाटत होते, आजच्या लोक्सत्ता वृत्तात जरा आणखी घटना क्रमाकडे संकेत मिळताहेत पण ते ही पुरेसे नाही असेच प्रथम दर्शनीतरी वाटते.

कालच्या आणि आजच्या उपरोक्त लोक्सत्ता वृत्तांवरून जो अंदाज येतोय त्यानुसार

१) २२ मे २०१९ दुपारी चारच्या सुमारास शस्त्रक्रिया विभागाजवळील रिकव्हरी रूममध्ये आरोपी डॉक्टर डॉ. पायल यांच्यावर जोरात ओरडताना रुग्णालय कर्मचारी, सहकारी डॉक्टरांनी ऐकले.

२) त्यानंतर पायल रडत रिकव्हरी रूममधून बाहेर पडून वसतिगृहातील आपल्या खोलीत आल्या. तेथून त्यांनी आपल्या आईला दूरध्वनी केला. (लोक्सत्ता ९ जून)

३) संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास आरोपी डॉक्टरांपैकी दोघींनी पायल यांच्या सहकारी डॉ. स्नेहल शिंदे यांना दूरध्वनी करून डॉ. पायल दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. तडवींच्या खोलीबाहेर जमा झालेल्या रुग्णालय कर्मचारी, विद्यार्थी डॉक्टरांनी दार तोडून आत प्रवेश केला तेव्हा पायल गळफास घेतलेल्या अवस्थेत होत्या. (लोक्सत्ता ९ जून)

४) डॉ. पायल यांनी आत्महत्या केल्याचे संध्याकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आले. (लोकसत्ता ९ जून)

५) ती मृतावस्थेत सापडल्यानंतर त्या ठिकाणी आरोपी असलेल्या दोन डॉक्टर उपस्थित होत्या. त्यांनीच तिला खाली उतरविले. (तातडीने उपचारासाठी म्हणून त्यांनी हे केले असल्याचा दावा केला ) (लोक्सत्ता १० जून)

६) त्यानंतर पाऊण तासाने आरोपींपैकी दोन महिला डॉक्टर घाईघाईने डॉ. तडवींच्या खोलीत गेल्याचे आणि १५ ते २० मिनिटांनी बाहेर पडल्याचे सीसीटीव्ही चित्रणातून उघड झाले आहे. त्या मागच्या कारणांचा तपास गुन्हे शाखेचे अधिकारी करत आहेत (लोक्सत्ता ९ जून)

प्रशासनातील वरीष्ठांना आणि पोलीसांना घटनेची माहिती देण्यात वेळ झाला (लोक्सत्ता १० जून) हे खरोखरही व्यक्तिस वाचवण्यास प्राधान्य दिल्यामुळे झाले असू शकते.

( हे खरे आहे असे मानले तर डॉ.पायलने त्या तिघींविरुद्ध लेखी तक्रार न देऊन माणूसकी दाखवली आणि त्या डॉक्टरांनी होता होईतो तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करून माणूसकी शिल्लक ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न का होईना केला मग एक जीव निसटला कसा ? डॉ. पायलने तिच्या तक्रारीबाबत वेळीच अधिक खंबीर राहून लावून धरावयास हवे होते. कदाचित अधिक वरीष्ठ लेव्हलला जाण्याचे धैर्य दाखवावयास हवे होते स्वतःचे आयुष्य अशा पद्धतीने डावावर लागण्या पेक्षा अधिक धैर्य , खंबीरता आणि प्रसंगवधानतेची गरज होती. दुसर्‍या बाजूला डॉ. पायल समजा कुठे चुकत असेल तर त्या तिघींनीही संयमाचा परिचय द्यावयास हवा होता. खास करून व्यक्तिगत स्तरावर जमत नाहीए हे एकदा माहित झाल्या नंतर आपापसातल्या तक्रारी आपापसात धूसफुसण्यापेक्षा अधीक वरीष्ठ लेव्हल ला नेऊन सोडवून घ्यावयास हव्या होत्या .)

आता यात एक शक्यता अशी शिल्लक रहाते की एखाद्या रुग्णाबाबत चौघींपैकी कुणाकडून खूप नाही पण बर्‍यापैकी गंभीर गफलत झाली ज्यामुळे वरीष्ठांकडे न जाता त्या चौघी आपापसात धूसफुसत होत्या का आणि त्याचा ताण या चौघींनी एकमेकांना दिला असेल का ? अशा प्रकारचे ताण आल्यास इतर वैद्यक क्षेत्रातील मंडळी कोणते योग्य मार्ग चोखाळतात याचे या विद्यार्थिनींना मार्गदर्शन कमी पडले असेल का याही बाबीकडे काळाच्या ओघात पाहिले जावयास हवे असे वाटते.

शेवटी उपरोक्त दोन लोकसत्ता वृत्ते वाचून मनात प्रश्न पडला चुकल्या वेळा नेमक्या कशाच्या, माणुसकीच्या की धैर्य आणि खंबीरतेच्या?

माहितगार's picture

24 Jun 2019 - 3:31 pm | माहितगार

पहाता, पहाता केसला एक महिना उलटला आहे. टाईम्स ऑफ ईंडियाच्या १७ जून (?) च्या या वृत्तात आणखी जरासा घटना क्रम दिसतोय.

२२ मे २०१९ ४:५१ पीएम साधारणतः १२१ सेकंदांचे (अदमासे २ मिनीट) डॉ. पायलचे डॉ. हे. आ. सोबत संभाषण संदर्भ मुंबई मिरर आणि टाईम्स ऑह ईंडिया -

* कॉल कुणी कुणाला केला याचे डिटेल्स यात नाहीत.
* त्या तिघींपैकी कुणी त्यानंतर डॉ. पायल ला मीस्ड कॉल दिला किंवा नाही याचे डिटेल्स उपरोक्त वृत्तात तरी दिसत नाहीत.

ऊपरोक्त वृत्तांनुसार डॉ. पायलची खोली ८ व्या वगैरे उंच मजल्यावरची असावी असे दिसते. - म्हणजे खोलीच्या दरवाजा शिवाय इतर मार्गाने इतर स्त्री डॉक्टरांनातरी प्रवेश सहज साध्य नसावा आणि डॉ. पायलला जर दरवाजा तोडून बर्‍याच जणांनी मिळून काढले असेल आणि सिसीटीव्हीचे दरवाजा कव्हर होतो म्हटल्यावर किमानपक्षी खूनाची शक्यता विरळ होऊन आत्महत्येचीच शक्यता अधिक जाणवते.

डॉ. पायलला कोणीच फोनचे प्रयत्न न करता -मिस्ड कॉल न जाता - सरळ दरवाजा तोडला (?) असेल अशी शक्यताही कमी वाटते. किंवा सरळ डॉ. पायलचा फोनच त्यावेळी बंद अवस्थेत असेल तरीही मिस्ड कॉल जाणार नाही पण ज्यांनी मिस्ड कॉलचे प्रयत्न केले त्यांच्या फोनवर डिटेल यावयास हवे आणि पोलीसांनी या दिशेने काही चौकशी केली असल्यास समजण्यास तुर्तास प्रत्यवाय नाही. अ‍ॅनालिटीकल पार्टवर पोलीस तपास अद्यापही अंशतः ढिसाळपणा असण्याची प्रथमदर्शनी शक्यता वाटते. मिस्ड कॉलचा अ‍ॅनालिसीस आरोपींसमोर मांडल्याशिवाय योग्य अंदाज येण्याचा मार्ग कठीण असेल अशी शक्यता वाटते.

कालच्या ४ जुलै बातम्यांनुसार आरोपीतांच्या अडचणीत बर्‍यापैकी भर पडण्याची शक्यता दिसते. टाईम्स ऑफ इंडिया मुंबई मिरर आणि एबीपी माझा वृत्तानुसार पायल तडवीच्या फोनवर डिलीट केल्या गेलेल्या तीनपानी सुसाईड नोटचे छायाचित्र रिट्रीव्ह करण्यात फॉरेंन्सिक लॅबला यश मिळाल्याची माहिती सुनावणी दरम्यान पोलीसांनी न्यायालयास दिली असता न्यायालयाने ह्स्ताक्षर तज्ञ वगैरेंकडून पडताळणी करून घेण्याचे आदेश दिले असे दिसते.

अर्थात संबंधीत काही प्रश्न शिल्लक रहात असावेत संबंधीत लेखनाची तारीख आणि वगळले गेल्यची तारीख पण केस मध्ये महत्वाची असावी. सुसाईड नोट ओरीजनल स्वरूपात न मिळाल्यामुळे ती त्या आरोपीतांनी नष्ट केली की ती जुनी नोट होती आणि स्वतः डॉ.पायलनेच नष्ट केली याचे नेमके उत्तर पोलीसांना न्यायालयासमोर सादर करावे लागेल. आणि रिट्रीव्ह केलेली नोट न्यायालयासमोर सिद्ध करण्यात पोलीसांना किती यश येते ते पहावे लागेल. समजा पायल तडवींची नोट जुनी असल्याचे निष्पन्न झाले तरीही आरोपीतांच्या पुढील अडचणीत भर पडताना दिसते. आरोपींनी सुसाईड नोट मिळवून नष्ट केली असे म्हणताना डॉ पायल फोन मधला मूळ फोटो कुणी नष्ट केला , डॉ. पायलच्या फोनला पासवर्ड नव्हता का ? असा प्रश्न निर्माण होतो त्याचे उत्तर पोलीसांना काय मिळेल त्यावर पुरावा नष्ट केल्याचा आरोप उभा राहु शकतो का हे अवलंबून असू शकेल.

त्यातच मुंबई मिरर वृत्तांनुसार दॉ. पायलला १२१ सेकंदांचा शेवटचा कॉल डॉ. हे. आ . कडून आल्याचे दिसते. त्यांनी तो रुग्णाबद्दल सामान्य चर्चेचा फोन असल्याचे पोलीसांना सांगितले.

एकुण भक्कम पुरावा हातात नाही पण रॅगिंगबद्दल परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आणि विटनेसस्च्या आधारावर पोलीसांना खटला उभा करावा लागेल अशी शक्यता तुर्तास दिसते.

नाखु's picture

6 Jul 2019 - 8:50 am | नाखु

यातील निसटत्या बाजूंवर न घसरु देता प्रकाश टाकावा ही विनंती

वाचकांची पत्रेवाला नाखु

लोकसत्तेत सुसाईड नोट (आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी) शोधण्यासाठी संशयीतांची पोलीस कोठडी मागण्याचा क्राईम ब्रँच अजून एक प्रयत्न करणार असल्याचे वृत्त आहे.

पोलीस कोठडीचा उपयोग तपासाच्या प्राथमिक स्थितीत संशयीतांवर प्रश्न विचारून मानसिक दबाव टाकून माहिती काढण्यासाठी होऊ शकतो. या दृष्टीने केस क्राईम ब्रँचकडे वर्ग केल्यावर प्रश्न विचारणार्‍या ऑफीसरला पोलीस कोठडीची संधी लगोलग न्यायालयाने द्यावयास हवी होती - संशयीतांना वेगवेगळ्या कोठडीत ठेऊन एका सोबत झालेल्या प्रश्नोत्तराचा थांग दुसर्‍या संशयीतास न लागू देता त्यांच्या उत्तरातील तफावतीचा फायदा घेऊन त्यांची चातुर्यपूर्ण कोंडी करून त्यांना बोलते करणे हे पोलीस कोठडीतून अपेक्षीत असावे.

या केसमध्ये न्यायालयीन बाजू निसटती झाली की कायदाच निसटता आहे याची कल्पना नाही, कनिष्ठ न्यायालय अनुमती देत नसेल तर कदाचित उच्च न्यायालयात जाऊन क्राईम ब्रँचने पोलीस कोठडीसाठी लगोलग प्रयत्न करावयास हवा होता.

पोलीस कोठडीस एकदा का उशीर होऊन गेल्यानंतर संशयीतांना पोलीसांचे प्रश्न काय असणार आहेत आणि काय उत्तरे द्यायची हे रटवून झाल्यानंतर पोलीस कोठडीचा एक उपचार या पलिकडे कितपत उपयोग होऊ शकेल याची दाट शंका वाटते.

याच विषयास अनुसरून दुसरी एक बाब अशी की मध्ये इतका कालावधी गेल्या नंतर संशयीतांनी सुसाईड नोट कुठे लपवून ठेवली आहे का हे संशयाचे पिल्लू एवढ्या उशिराने सोडण्यात काय पॉईंट आहे ? घटनेनंतर अटक होईपर्यंत संशयीतांची रहवासाची जी काही स्थाने असतील त्यांची पोलीसांनी तेव्हाची तेव्हाच झडती घ्यावयास हवी की नाही. उगाच नसत्या संशयास वाव ठेवण्यात ना त्या संशयीतांना फायदा ना ज्यांची केस आहे त्यांनाही न्याय मिळाल्याचे समाधान.

संशयीतांच्या रहवास स्थानाच्या झडत्या, फोनचा फोरेन्सिक लॅब रिपोर्ट पोलीस कोठडी हे सर्व अटकेनंतर तीन ते चार आठवड्यात न अटपण्यासारखे काय होते??

गुन्हे अन्वेषण कौशल्य काळासोबत विकसीत होऊन काळासोबत काही वेग घेणार नसेल तर केवळ या एका केसचा प्रश्न नाही सर्वसामान्यपणेच दिरंगाई, ढिसाळता, गलथानपणा की चातुर्याचा अभाव हे चित्र बदलत नसेल तर कायदा सुव्यवस्थेचे चित्र आणि कायदा आणि सुव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास यात सुधारणा कशी होणार?

सुबोध खरे's picture

6 Jul 2019 - 8:33 pm | सुबोध खरे

१) हि केस मुस्लिम समाजातील अनुसूचित जमातीची मुलगी विरुद्ध खुल्या प्रवर्गातील तीन मुली ( शोषित विरुद्ध शोषक) या मधील साठमारी आहे
२) काही महिन्यात महाराष्ट्रात निवडणूका आहेत
३) निवडणूक होईपर्यंत त्या तिन्ही मुलींना जमीन मिळणे निदान खालच्या न्यायालयात तरी शक्य नाही (मिळालाच तर उच्च न्यायालयात)
४) अंती सत्याचा जय होतो (जय होईपर्यँत सत्याचा अंत होऊ नये एवढीच अपेक्षा)
४) जिज्ञासूंनी गाळलेल्या जागा भराव्यात. (READ BETWEEN THE LINES)

५) माझ्या व्यक्तिगत मतानुसार जागा गळत नाहीत ह्याची खात्री करून घेण्यात तपास यंत्रणेकडून अगदीच हलगर्जीपणा नव्हे अण अंशिक हयगय होत असण्याची शक्यता वाटते. - ह्या हयगयकडे मी राजकिय दृश्ट्या नव्हे भारतीयांची सर्व साधारण मरगळ म्हणून बघतो.

४) तत्वतः अंती सत्याचा जय व्हावा हा आशावाद सकारात्मक पणे जोपासला पाहीजे - तसे होतेच असे नाही पण जग विश्वासावर चालते.

३) जामिन मिळण्याची व्यवस्थेचा यायालयीन यंत्रणेशी संबंध आहे- निवडणूकांशी सरळ संबंध असू शकेल असे वाटत नाही. राजकीय पक्षांचा निवडणूकीत सरळ भांडवल करता यावे एवढा संबंध नाही. केस मध्ये राजकीय हस्तक्षेपाचा आरोप न होण्या एवढीच काळजी सरकारी पक्षास घेण्याची जरूरी असावी.

जामिनाच्या पुढे ढकलण्याच्या बाबतीत गुन्हेगारांकडून साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकेल आणि पुरावे नष्ट केले जाऊ शकतील ही कारणे सर्वसाधारणपणे पुढे केली जातात तिच याही केस मध्ये केली जाताना पाहून जरासे आश्चर्य वाटते. त्या तिघी रॅगिंगंसाठी संशयीत असल्यातरी ,१) अट्टल सराईत गुन्हेगार या सदरातही मोडत नाहीत २) आत्महत्या केस आहे एक सुसाईड नोट सोडल्या शिवाय नष्ट करण्यासारखे पुरावे असण्याची शक्यता कमी असणार आहे ३) साक्षीदारांना फितवण्याचे काम काही असेलच तर त्या साठी त्या कोठडीत असल्या काय नसल्या काय त्या स्वतः नव्हे त्यांचे वकील किंवा कुटूंबीय प्रयत्न करतील

पोलीसांना संशयीतांच्या अटके नंतर ३-४ आठवड्यात तपास संपवून जामीन मिळू देता आला असता. जर गुन्हेगार सराईत नसतील तर त्यांना जामिन नाकारण्यात फारसा पॉईंट नसतो. केवळ पब्लिकच्या भावनेसाठी किं पोलीस तपासात कमी पडतात म्हणून आरोप सिद्ध होण्यापुर्वीच मोठा काळ कोठडीत कंठावा लागणे योग्य आहे का याचा पब्लिकने आणि न्याय व्यवस्थेने ही विचार केला पाहीजे.

२) निवडणूकांशी खूपसा सरळ संबंध पडेल असे वाटत तर नाही

१) अगदीच शोषित विरुद्ध शोषक म्हणण्यापेक्षा वर एका प्रतिसादात घाटपांडे म्हणतात तसे एखाद्या बाबतीत कमतरता आढळली की आरक्षणावरून एखादा डायलॉग मारला आपला -पण त्यालाच डॉ.पायल ने मनाला लावून घेतले अशी शक्यता तुर्तास अधिक वाटते. मोबाईल मधून मिळवता आलेली कथित सुसाईड नोटची उलट तपासणी होईल तेव्हा नेमकी वस्तुस्थिती कळेल

अगदी सुरवातीपासूनच डॉ.पायल ना त्या सिनीयर मुलींची अरेरावी झेपली नसावी. तिच्या कॉलेज अ‍ॅडमिशनच्या वेळीही रमजानचा महिना होता का आणि ती रमजान रोज्यांचे कडक पालन करत होती का कल्पना नाही. पण रमजान रोजे कडक स्वरुपात केले तर कॉग्नेटीव्ह क्षमता अंशतः बाधीत होण्याने टिकेचे शिकार होणे आणि उपवासाने टिका न झेलता येता नैराश्य येणे असे काही झाले असल्याची शक्यताही विचारात घेतली जावयास हवी असे वाटते.

आत्महत्येच्या आदल्या दिवशी टिकेचे कारण झालेले डॉ पायलचे रात्रीचे जेवण कदाचित रोजाचा उपवास सोडण्यासाठीचे असेल आणि ही बाब लक्षात न येताच त्या तिघींकडुन डॉ. पायलवर टिकेचा भडीमार झाला असेल. त्या शिवाय कदाचित तिला अपेक्षे प्रमाणे शिकता न आल्यास विद्यार्थ्यांनी सिट वाया घालू नये म्हणून ज्या सरकारी दंडांची तरतूद असते त्याचा तिच्या मनावर ताण आला असेल का ? इत्यादी प्रश्नही अद्याप अनुत्तरीत आहेत असे वाटते.

इतर प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा उद्देश्य रॅगिंग आणि अरेरावीचे आरोप वॉटर डाऊन करण्याचा नाही पण विवीध कंगोर्‍यांचा या निमीत्ताने विचार विमर्श व्हावा अशी आहे.

सुबोध खरे's picture

8 Jul 2019 - 10:13 am | सुबोध खरे

कायद्याचे मूलभूत तत्व आहे कि जामीन हा सामान्यतः दिला गेला पाहिजे अपवाद म्हणून नाही.

जर या तिन्ही मुलींना पोलीस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली गेली (कायदा समजणाऱ्याना याचा अर्थ समजेलच) तर ती तीन महिने लांबवण्याचे सबळ कारण तरी असायला हवे.

मोबाईलमधून डिलीट केलेल्या गोष्टी सापडण्याची तीन महिने लागतात का?

या तिन्ही मुली मुंबईच्या बाहेरच्या आहेत. मग पोलीस तपासानंतर त्यांना जामीन देऊन तीन महिने मुंबईत येण्यास मज्जाव करता आला असता कि नाही?

जामीन देण्यास विरोध करण्याचे मुख्य कारण म्हणजे आरोपी तपासात अडथळा आणू नये किंवा पुरावा नष्ट करू नये हे आहे.

तिन्ही आरोपी निर्ढावलेले गुन्हेगार नाहीत किंवा त्यांच्या वर खून किंवा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नसून आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप आहे.

जाता जाता -- संजय दत्त यांच्याकडे ए के ५६ च्या दोन स्वयंचलित बंदुका (ज्याला लायसन्स मिळूच शकत नाही) सापडल्या (लष्करात असल्यामुळे या बंदुका कुणाला आणि कशा मिळू शकतात हे इतरांपेक्षा मी जास्त चांगल्या तर्हेने समजू शकतो असा माझा (गैर) समज आहे).

या रायफली आणि पिस्तुलं सापडुनही त्यांच्यावरचा मोक्का कायदा काढण्यात आला आणि मग त्यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शिक्षा झाल्यावरही त्यांना तीन वेळा पॅरोल वर सुटी मिळाली होती. तेंव्हा राज्य कुणाचे आहे ते समजून घ्या.

लोकशाहीत सर्व जण समान असतात पण काही लोक जास्त समान असतात.

बाकी चालू द्या.

सुबोध खरे's picture

8 Jul 2019 - 10:15 am | सुबोध खरे

“a fundamental postulate of criminal jurisprudence is the presumption of innocence” and thus courts should take certain relevant factors into account before sending an accused behind bars.

https://www.news18.com/news/india/make-bail-a-rule-and-jail-an-exception...

माहितगार's picture

8 Jul 2019 - 12:47 pm | माहितगार

जामीन दिला जाण्याबाबत सहमत आहे. अन्वेषण कौशल्यातील अपयश झाकणे तसेच एकदा आरोप झालाय तेव्हा जनभावना राखण्यासाठी आणि कारवाईचा देखावा म्हणूनही अटक कालावधी वाढवण्याचे प्रयत्न दिसतात.

जामीन मिळण्याचा गैर फायदा क्केस दडपण्यासाठी कसलेले गुन्हेगार आणि अगदी काहीवेळा राजकारणी आणि व्यावसायिक घेताना दिसतात तेव्हा कदाचित तपास पूर्ण होऊन कोर्टात साक्षी सादर केल्या जाई पर्यंत अटकेची कदाचित गरज असूही शकेल

पण * व्य.म. सध्या चर्चित केसमध्ये जामीन दिला जाण्यासाठी हरकत नाही

*व्य.म. - व्यक्तिगत मतानुसार

Rajesh188's picture

6 Jul 2019 - 10:15 pm | Rajesh188

तुमचे मत एकदम योग्य आहे .
भारतीय न्यायालये कायद्या नी चालत असती तर देशातील अर्धे गुन्हे घडलेच नसते

पकडलेल्या व्यक्ती गुन्हेगार प्रवृत्तीच्या असत्या तर त्या लगेच कधीच पोलिस न chya हाती लागल्या नसत्या .गुन्हा ज्यांना करायचा असतो त्यांना तो लपवायच कसा हे चांगले माहीत असते .
सॉफ्ट टार्गेट म्हणून सुद्धा ही लोक पकडली असतील

नाखु's picture

6 Jul 2019 - 11:28 pm | नाखु

निसटत्या बाजूं खुपच आहेत हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे, खैरलांजी नंतरच्या एका प्रकरणात नंतर घरगुती वादातून हत्याकांड घडले होते पण ते उघड होईपर्यंत,माध्यमांनी आणि जालपंडीतांनी त्याला उच्च वर्गातील सवर्ण आणि दलितांवर अत्याचार हेच अगदी निकाल जाहीर करुन मोकळे झाले होते.
सत्य प्रत्येक वेळी दृष्य असते तसेच असते असं नाही

पांढरपेशा मध्यमवर्गीय मिपाकर नाखु

माहितगार's picture

26 Jul 2019 - 5:17 pm | माहितगार

विवीध बातम्यांनुसार क्राईम ब्रँचने जवळपास १२०० पानांचे आरोपपत्र दाखल केल्याचे वृत्त आहे. या वृत्तातून जी माहिती पुढे येताना दिसते त्यात

१) आत्महत्यापुर्व चिठ्ठी / सुसाईड नोटचे जी छायाचित्रप्रती डॉ.पायल मोबाईलच्या फोन मधून रिकव्हर करता आल्या त्याची वेळ सायं ५.०४ अशी असावी हस्ताक्षर तज्ञांनी हस्ताक्षर जुळत असल्याचा अहवाल दिला असे दिसते.

२) आत्महत्यापुर्व चिठ्ठी / सुसाईड नोट बहुधा इंग्रजी भाषेतून असावी ज्याचे अंशिक डीटेल वृत्तपत्रातून आलेले आहेत त्यानुसार डॉ. पायलने तिच्या छळासाठी त्या तीन वरीष्ठ विद्यार्थीनींना जबाबदार धरले आहे . - पूर्ण पत्राची छायाचित्रे एका वृत्त वेबसाईटवर दिसली - खात्रीशीर दुवा मिळाल्यास दुवा देता येईल.

३) डॉ. पायलच्या फोन मधून छायाचित्र वगळण्याचा प्रयत्न झाला असेल तर तिच्या फोनला पासवर्ड नव्हता का ? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत दिसतो.

३) डॉ. पायलची रूममेट स्नेहल शिंदे यांच्या जवाबाबद्दलची अधिक माहितीही माध्यमातून उपलब्ध होताना दिसते आहे. ज्यात तिने शाब्दिक छळाचे स्वरूप स्पष्ट केले आहे. तसेच तिचे आणि डॉ पायलचे शेवटचे बोलणे केव्हा झाले याची माहिती आहे.

३० जुलैला आरोपींच्या जामिनाची सुनावणी आहे. कायदा आणि न्यायालयाची अपेक्षा आहेतर सुनावणीच्या व्हिडीओ रेकॉर्डींगसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात शासन हकनाक दिरंगाई का करते आहे. समजा हि केस नसेल तरीही व्हिडीओ कॉन्फरम्सींग व्हिडीओ रेकॉर्डींग या सुविधा मुंबई न्यायालयात आता पर्यंत उपलब्ध असावयास हव्या होत्या हे वेगळे सांगण्याची काय गरज पडावी.

३० जुलै पर्यंत केसची अधिक माहिती स्पष्ट होईल अशी आशा करता येईल असे वाटते.