अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग ५

ज्ञानव's picture
ज्ञानव in अर्थजगत
18 Mar 2019 - 3:00 pm

अर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ० - भाग - १ - भाग - २ - भाग - ३ भाग – ४ माझे लेखन

कलनिर्मिती हि पुढे जाऊन तीन भागात विभागली जाते. मुख्य भाग दिर्घ कालावधीचा (लॉंग टर्म) ट्रेंड, मध्यम कालावधीचा (मिडीयम टर्म) ट्रेंड, अल्प मुदतीचा (शॉर्ट टर्म) ट्रेंड असे त्याचे विभाजन होते. सगळा खेळ इथेच चालत असल्याने नक्की केव्हा खरेदी आणि केव्हा विक्री ह्या प्रश्नाचे उत्तर देखील इथेच मिळू शकते. पण त्यासाठी ट्रेंड सायकल समजून घेणे आणि शेवटच्या श्वासापर्यंत ती आपल्या सवयीत भिनवणे आवश्यक आहे.
ट्रेंड सायकल किंवा साखळी हि नेहमी मुख्य किंवा प्राथमिक (प्रायमरी ट्रेंड जो अप किंवा डाऊन असू शकतो.) ट्रेंडमध्येच गुंतलेली असते. म्हणजे मुख्य ट्रेंडमधूनच नेहमी मध्यम कालावधीच्या ट्रेंडचा उगम होतो, तर कमी कालावधीचा ट्रेंड हा मध्यम कालावधीच्या पोटात दडलेला असतो. ह्या दोन म्हणजे मध्यम आणि कमी कालावधीच्या ट्रेंडमध्येच खरेदी विक्रीचे निर्णय सामान्यतः घेतले जातात. ह्या ट्रेंड सायकलचा उपयोग कसा करायचा हा स्कीलचा भाग असतो. जर उदाहरण द्यायचे झाले (जे देणे अत्यंत सोपे आहे.) तर मध्यम मुदतीचा ट्रेंड चढा असेल आणि कमी कालावधीचा ट्रेंड घटत असेल तर ह्या प्रत्येक घटणाऱ्या भावात खरेदी होऊ शकते. पण जर मध्यम ट्रेंड घटणारा असेल तर आणि कमी कालावधीचा ट्रेंड चढा असेल तर आपल्याला विक्रीची संधी मिळत राहते.
ह्या सगळ्या गदारोळाने भरलेल्या प्रवासात ट्रेंड थकतो आणि विश्रांतीसाठी आधार (सपोर्ट) शोधतो. कधीकधी प्रवासातल्या अडचणी अवरोध (रेझिस्टन्स) तयार करतात. हे अवरोध तात्पुरते असू शकतात किंवा प्रवास पूर्णतः खुंटला जाईल असेही असू शकतात. मग ते अर्थकारणचा वेग मंदावणे, एखाद्या सेक्टरबद्दल पॉलीसी बदलली जाणे, कंपनी व्यवस्थापनातला ढिसाळपणा जगासमोर येणे वगैरे कोणतेही कारण असेल जेणे करून आपला ट्रेंड नामक प्रवासी परत मागे फिरून नवा आधार शोधतो.
हे सगळे सपोर्ट आणि रेझिस्टन्स (आधार आणि अवरोध) का तयार होतात ? कसे तयार होतात? तयार होतात कि केले जातात? वगैरे अनेक प्रश्नाची ज्ञात-अज्ञात उत्तरे शोधण्याचे काम, मार्केट अव्याहत करत असते. मार्केटला सगळे माहित असते असा एक समज आहे. कारण मार्केट म्हणजे नक्की कोण ? तर ती तुमच्या –आमच्यासारखी लोकंच असतात.
तर, कलनिर्मितीचा प्रकार आपण पाहिला पण ती होण्यामागची कारणे काय? मागणी आणि पुरवठा हे कलनिर्मितीची प्रमुख अंग आहेत हे आपण मागच्या लेखात पाहिले आहे. ह्या मागणी पुरवठ्याने तयार होणाऱ्या सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या मैदानात सगळा कमाईचा खेळ चालू असतो. हे मैदान साधारणतः खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे दिसते.
सपोर्ट - रेझिस्टन्स

जेव्हा, एखाद्या विशिष्ट भाव पातळीला, एखाद्या समभागाला मागणी वाढते तेव्हा त्या समभागाचा भाव त्या विशिष्ट भावपातळी खाली जाण्यास तयार नसतो. सामान्यतः त्या भाव पातळीला सपोर्ट म्हणून संबोधले जाते. हि आधार पातळी निर्माण होण्याचे मुख्य कारण तिथे मागणी हि पुरवठ्यापेक्षा जास्त असते. पण ह्याचा अर्थ असा नाही की आधार पातळी कधी मोडतच नाही. जर पुन्हा पुरवठा मागणीपेक्षा कैक पटीने वाढला तर ती आधार पातळी सहज मोडीत निघू शकते.
तसेच एखाद्या विशिष्ट भाव पातळीजवळ, एखाद्या समभागाला पुरवठा वाढू लागतो तेव्हा त्या समभागाचा भाव त्या विशिष्ट भाव पातळीच्या वर जाण्यास तयार नसतो. सामन्यतः त्या भाव पातळीला रेझिस्टन्स असे संबोधले जाते. इथे, पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो. पण ह्याचा अर्थ असा नव्हे कि हा रेझिस्टन्स कधीच मोडीत निघणार नाही. जर मागणीने जोर धरला तर हा रेझिस्टन्स सहजगत्या मोडला जातो.

तर, हा मागणी आणि पुरवठा हे ट्रेंडच्या हालचालीत कधी चैतन्य निर्माण करून ट्रेंडला नव्या जोमाने रेझिस्टन्स तोडून चौखूर उधळण्यासाठी मदत करतात, तर कधी पुरवठ्याचा बेफाट मारा करून ट्रेंडला थकून भागून सपोर्ट शोधायला भाग पाडत असतात. ह्या सगळ्या सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या खेळात जे आपली पोळी भाजून घेतात त्या जमातीला ट्रेडर म्हणून ओळखले जाते. टेक्निकल अॅनालिसिसच्या आधारे हि पोळी भाजली जाते.
टेक्निकल अनालिसिसमध्ये चार्टस, टेक्निकल ईंडीकेटर्सचा वापर मुख्यत्वे करून केला जातो. पण टेक्निकल अनालिसिस हा तेव्हढ्या पुरताच मर्यादित नाही. त्याचा आवाका आणि त्याचे आपल्यासाठी आकलन काठीण्य हे अथांग आहे. त्यामुळे कुणी आपल्याला अवजड, अनभिज्ञ शब्दात एखाद्या समभागाच्या टेक्निकल अनालिसिसच्या परिभाषेत काही सागंतो आहे म्हणजे तो त्यात मुरलेला आहे हा आपला अंदाज चुकण्याचे चान्सेस पण भरपूर असू शकतात. कारण, प्रत्येकजण आपल्या अनुभवाला आणि अभ्यासाला धरून असतो. तो कधीच चुकीचा नसतो पण त्याच्यापुरता. थोडक्यात, सुगरण आईने कितीही शिकवले, टिप्स दिल्या, पाककृती करवून घेतल्या तरी ती तिच्या हातातली चव पोटच्या मुलीच्या किंवा मुलाच्या हातात ट्रान्स्फर नाही करू शकत. तद्वत, दुसऱ्याचा अॅनालिसिस, अनुभव त्याने कितीही पोटतिडकीने सांगितले तरी मार्केटमधला प्रॉफीट किंवा पैसा आपल्या तिजोरीत (खिसा पाकीट हे फारच तोकडे विचार झाले नाही का ?) नाही धाडू शकत. आपण मुख्यत्वे चार्टस, टेक्निकल इंडिकेटर्सचा वापर कसा करावा हे पहाणर आहोत.

(चित्र आंतरजालावरून साभार)

प्रतिक्रिया

कलंत्री's picture

18 Mar 2019 - 3:19 pm | कलंत्री

चपखल उदाहरणे आहेत.. सामान्य माणसाला ही या संकल्पना स्पष्ट होईल असे वाटते आहे

अनिंद्य's picture

18 Mar 2019 - 4:01 pm | अनिंद्य

उत्तम.
तुम्ही प्रत्येक भागावर खूप मेहनत घेऊन लिहिता आहात.

शाम भागवत's picture

18 Mar 2019 - 4:55 pm | शाम भागवत

अबोध भाग सुबोध व्हायला लागला.
:)

उगा काहितरीच's picture

19 Mar 2019 - 12:25 pm | उगा काहितरीच

धन्यवाद !

सोत्रि's picture

19 Mar 2019 - 4:32 pm | सोत्रि

स्टेप बाय स्टेप, माहितीचा सपोर्ट घेऊन
अज्ञानाचा रेजिस्टन्स मोडीत निघतोय!

- (ट्रेडर) सोकाजी

ज्ञानव's picture

19 Mar 2019 - 6:16 pm | ज्ञानव

जमेल तसा प्रयत्न करतो आहे.

गोंधळी's picture

19 Mar 2019 - 7:51 pm | गोंधळी

आपण मुख्यत्वे चार्टस, टेक्निकल इंडिकेटर्सचा वापर कसा करावा हे पहाणर आहोत.

पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

ज्ञानव's picture

21 Mar 2019 - 8:08 am | ज्ञानव

लवकरच कॅन्डलस्टीक्स चार्टस आणि ईतर ईंडीकेटर्सवर लिहूयात.

आदेश007's picture

21 Mar 2019 - 3:14 pm | आदेश007

ज्ञानव सर,

अतिशय सोप्या शब्दात अश्या कठीण विषयावर लिहीताय. आपला अनुभव लेखमालेतून दिसतोच आहे. अजून खूप वाचायला आवडेल.

धन्यवाद.

ज्ञानव's picture

21 Mar 2019 - 7:04 pm | ज्ञानव

धन्यवाद, आदेश००७

उपाशी बोका's picture

21 Mar 2019 - 8:29 am | उपाशी बोका

@ज्ञानव
आधी तर तुम्ही म्हणत होता की टेक्निकल अनालिसिस हा प्रकार सामान्य गुंतवणूक दराने लांब ठेवायला हवा हे माझे स्पष्ट मत आहे.
तुमचे मतपरिवर्तन कसे काय झाले?

ज्ञानव's picture

21 Mar 2019 - 10:02 am | ज्ञानव

अजिबात झालेले नाही. माझं वैयक्तिक मत आज देखील तेच आहे.

अहो मग पुढील भागासाठी अजून किती काळ वाट पहायची ?

चष्मेबद्दूर's picture

5 Jul 2019 - 4:45 pm | चष्मेबद्दूर

पण पुढे काहीच चर्चा का नाही?