[शशक' १९] - मारुतीला घाम फुटतो

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
4 Feb 2019 - 3:22 pm

नित्यनेमाप्रमाणे उमाजीशेठ दर्शनाला देवळात घुसला. हनुमानाच्या मुर्तीकडे त्याने डोळे विस्फारुन पाहीले. मुर्तीचा चेहरा काळवंडलेला. गालावरुन थेंब ओघळत होते.
”मारुतराया, का घाम फुटला तुला? नको कोपू रे गावावर.” तो ढसढसा रडायला लागला.
गावात वार्‍यासारखी बातमी पसरली. सगळे गावकरी देवळासमोर जमले. लोक कुजबुजू लागले.
“अनाचार माजलाय. त्या येडीला कॉणीतरी पोटुशी ठिवलंय.”
“गुरवाची म्हतारी सुनंला लय तरास देतीय.”
“कार्ट्यांनी वानरांना दगडी मारल्या असतील.”
सरपंचांनी हात जोडले.”बजरंगराया, आंवदा हनुमानजयंती दणक्यात करतो”.
तेव्ह्ढयात गुरवाने गण्याला कान धरून देवळात आणले आणि खडसावले “गण्या, सकाळीसकाळी काय केलं सांग.वाह्यात कार्टं!”
गण्या काकुळतीने म्हणाला.“म्या पणतीतलं तेल देवाला वाह्यलं.माहा इंग्रजीचा पेपर हाये आज.”
उमाजीशेठ कांडावून पळाला .

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

4 Feb 2019 - 3:40 pm | यशोधरा

=))

यशोधरा's picture

4 Feb 2019 - 3:42 pm | यशोधरा

कथा मस्त आहे, पण शब्दसंख्या अधिक आहे.

चिगो's picture

4 Feb 2019 - 4:29 pm | चिगो

आवडली.
एक निरीक्षण / मत: शेवटच्या ओळीची गरज नव्हती. 'माहा इंग्रजीचा पेपर हाये आज..' इथंच संपली होती कथा.

जव्हेरगंज's picture

4 Feb 2019 - 10:40 pm | जव्हेरगंज

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

चिगो's picture

5 Feb 2019 - 3:20 pm | चिगो

अरे हो.. हे राहीलंच होतं.
+१..

चौथा कोनाडा's picture

7 Feb 2019 - 12:48 pm | चौथा कोनाडा

बरोबर.

प्रशांत's picture

7 Feb 2019 - 2:09 pm | प्रशांत

सरपंचाला घाम फुटला (खर्च)

एमी's picture

4 Feb 2019 - 5:15 pm | एमी

लॉल :D :D आवडली.
+१

सिद्धार्थ ४'s picture

4 Feb 2019 - 7:14 pm | सिद्धार्थ ४

+१

चौथा कोनाडा's picture

4 Feb 2019 - 9:11 pm | चौथा कोनाडा

वाह, फ़र्मास ! मस्त ट्वीस्ट दिलाय शेवटी.

शशक आवडली.

जव्हेरगंज's picture

4 Feb 2019 - 10:40 pm | जव्हेरगंज

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

चौथा कोनाडा's picture

5 Feb 2019 - 8:37 am | चौथा कोनाडा

+१ नंबर !

(कथा आवडली हे सांगायच्या नादात मत च द्यायचं राहून गेलं होतं ! ... असो )

शित्रेउमेश's picture

5 Feb 2019 - 9:03 am | शित्रेउमेश

+१

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Feb 2019 - 9:27 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली
पैजारबुवा,

राजाभाउ's picture

5 Feb 2019 - 9:45 am | राजाभाउ

+१

ज्योति अळवणी's picture

5 Feb 2019 - 6:56 pm | ज्योति अळवणी

+१

टर्मीनेटर's picture

6 Feb 2019 - 1:32 pm | टर्मीनेटर

आवडली!

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 Feb 2019 - 2:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१

संजय पाटिल's picture

7 Feb 2019 - 10:24 am | संजय पाटिल

+१

श्वेता२४'s picture

8 Feb 2019 - 11:07 am | श्वेता२४

कुठेतरी वाचलीय. अगदी पहिल्या देन तीन आळीतच आठवलं. बहुदा मिरासदारांची की शंकर पाटलांची कुणाचीतरी. नक्की आठवत नाही. त्यामुळे वाचताना नावीन्य वाटलं नाही.

विजुभाऊ's picture

8 Feb 2019 - 3:30 pm | विजुभाऊ

मिरासदारांची कथा आहे.
गुरवाने मारुतीचा शेंदूर सुटावा म्हणून पाणी ओतलेले असते.
लोक त्याला मारुतीचा घाम समजतात आणि पैसे वगैरे ठेवतात

साहित्य संपादक's picture

11 Feb 2019 - 7:37 pm | साहित्य संपादक

लेखकाच्या विनंतीनुसार खालील प्रतिसाद देत आहोत.
-------------------

माझ्या कथेत आणि मिरासदारांच्या कथेत साम्य असेल तर तो निव्वळ योगायोग आहे. माझ्या वाचनात द.मा.मिरासदारांची ती कथा आली नाही.
मी वर्णन केलेला प्रसंग माझ्या लहानपणी गावात प्रत्यक्ष घडलेला आहे. त्यावेळी पसरलेली घबराट आणि अफवा हे शंभर शब्दांच्या कथेत मी कसेबसे मांडू शकलो आहे. बाकी खेडेगावातले भोळे तसेच इर्साल नमुने बघता या कथेत अजून बरीच भर घलता येईल. ते इंग्रजीचा पेपर असणे वगैरे हे कथेला ट्विस्ट द्यायला मी काल्पनिक लिहिले आहे, पण बाकी प्रसंग खरा आहे.
--------

भीमराव's picture

16 Feb 2019 - 2:56 pm | भीमराव

1

प्राची अश्विनी's picture

18 Feb 2019 - 9:21 am | प्राची अश्विनी

+१

राजाभाउ's picture

18 Feb 2019 - 10:37 am | राजाभाउ

+१

रुपी's picture

21 Feb 2019 - 4:11 am | रुपी

+१

दादा कोंडके's picture

21 Feb 2019 - 1:08 pm | दादा कोंडके

मस्तच!

एकविरा's picture

21 Feb 2019 - 2:46 pm | एकविरा

आवडली

हस्तर's picture

6 Jun 2019 - 12:28 pm | हस्तर

http://www.lokmat.com/national/sweating-ganesh-idol-bihars-gaya-temple/

उकाड्याने बाप्पाही झाले हैराण; मूर्तीलाही फुटला घाम