Skip to main content

[शशक' १९] - मारुतीला घाम फुटतो

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
नित्यनेमाप्रमाणे उमाजीशेठ दर्शनाला देवळात घुसला. हनुमानाच्या मुर्तीकडे त्याने डोळे विस्फारुन पाहीले. मुर्तीचा चेहरा काळवंडलेला. गालावरुन थेंब ओघळत होते. ”मारुतराया, का घाम फुटला तुला? नको कोपू रे गावावर.” तो ढसढसा रडायला लागला. गावात वार्‍यासारखी बातमी पसरली. सगळे गावकरी देवळासमोर जमले. लोक कुजबुजू लागले. “अनाचार माजलाय. त्या येडीला कॉणीतरी पोटुशी ठिवलंय.” “गुरवाची म्हतारी सुनंला लय तरास देतीय.” “कार्ट्यांनी वानरांना दगडी मारल्या असतील.” सरपंचांनी हात जोडले.”बजरंगराया, आंवदा हनुमानजयंती दणक्यात करतो”. तेव्ह्ढयात गुरवाने गण्याला कान धरून देवळात आणले आणि खडसावले “गण्या, सकाळीसकाळी काय केलं सांग.वाह्यात कार्टं!” गण्या काकुळतीने म्हणाला.“म्या पणतीतलं तेल देवाला वाह्यलं.माहा इंग्रजीचा पेपर हाये आज.” उमाजीशेठ कांडावून पळाला .

वाचने 18815
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

=))

कथा मस्त आहे, पण शब्दसंख्या अधिक आहे.

आवडली. एक निरीक्षण / मत: शेवटच्या ओळीची गरज नव्हती. 'माहा इंग्रजीचा पेपर हाये आज..' इथंच संपली होती कथा.

In reply to by चिगो

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

In reply to by चिगो

सरपंचाला घाम फुटला (खर्च)

वाह, फ़र्मास ! मस्त ट्वीस्ट दिलाय शेवटी. शशक आवडली.

In reply to by चौथा कोनाडा

मतदान पद्धत: सदस्यांनी प्रतिसादात +१ असं लिहिलेलं एक मत धरलं जाईल. +१०, +१११, +७८६, +१००^१०० हे सर्व १ मत धरलं जाईल.

+१ नंबर ! (कथा आवडली हे सांगायच्या नादात मत च द्यायचं राहून गेलं होतं ! ... असो )

+१

आवडली पैजारबुवा,

+१

+१

आवडली!

+१

+१

कुठेतरी वाचलीय. अगदी पहिल्या देन तीन आळीतच आठवलं. बहुदा मिरासदारांची की शंकर पाटलांची कुणाचीतरी. नक्की आठवत नाही. त्यामुळे वाचताना नावीन्य वाटलं नाही.

मिरासदारांची कथा आहे. गुरवाने मारुतीचा शेंदूर सुटावा म्हणून पाणी ओतलेले असते. लोक त्याला मारुतीचा घाम समजतात आणि पैसे वगैरे ठेवतात

लेखकाच्या विनंतीनुसार खालील प्रतिसाद देत आहोत. ------------------- माझ्या कथेत आणि मिरासदारांच्या कथेत साम्य असेल तर तो निव्वळ योगायोग आहे. माझ्या वाचनात द.मा.मिरासदारांची ती कथा आली नाही. मी वर्णन केलेला प्रसंग माझ्या लहानपणी गावात प्रत्यक्ष घडलेला आहे. त्यावेळी पसरलेली घबराट आणि अफवा हे शंभर शब्दांच्या कथेत मी कसेबसे मांडू शकलो आहे. बाकी खेडेगावातले भोळे तसेच इर्साल नमुने बघता या कथेत अजून बरीच भर घलता येईल. ते इंग्रजीचा पेपर असणे वगैरे हे कथेला ट्विस्ट द्यायला मी काल्पनिक लिहिले आहे, पण बाकी प्रसंग खरा आहे. --------

1

+१

+१

मस्तच!

आवडली