सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा चिनी प्रयोग

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
3 Dec 2018 - 2:17 pm

इस्लामिक कट्टरतावादाची समस्येस विवीध देश विवीध पद्धतींनी तोंड देत आहेत. चीनमध्ये दहा च्या आसपास मुस्लिम समुह आहेत त्यापैकी उघ्युर बहुल झिंजीयांग प्रांत मुस्लिम बहुल समजला जातो. समजला जातो हा शब्द प्रयोग यासाठी कि चिनी कम्युनीस्ट क्रांती नंतर मुख्य चिनी हान वंशांचे चीनच्या सर्व प्रभागात मोठ्या प्रमाणावर स्थानांतर करण्यात आले त्यामुळे आता झिंजीयांग प्रांतात देखिल मोठ्या प्रमाणावर हान चायनीज लोकही रहातात. चिनमध्ये सुरवातीपासूनच चीन बाह्य धार्मिक प्रभावांच्या स्थानिकीकरणावर विशेष भर देण्यात आला आहे. जसे की मस्जिदींची वास्तुरचना असो की पोषाख असो स्थानिक सांस्कृतिक मुल्यांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात येतो. ख्रिश्चनांना चीन बाह्य व्हॅटीकन प्रभाव स्विकारता येत नाही, संस्थांची आणि अर्धी धार्मीक पदे स्त्रीयांना असतात इत्यादी.

तरीही बाहेरील देशातील चळवळींच्या प्रभावाने झिंजीयांग सारख्या प्रांतात कट्टरतावाद फोफावण्याची तुरळक उदाहरणे चीन मध्ये घडताना दिसतात. अशी उदाहरणे तुरळक असली तरी चीन कम्युनीस्ट सरकार अशा उदाहरणांना अत्यंत गंभीरपणे घेताना दिसते. या वेळी गेल्या दोन तीन वर्षांपासून असेल चीनने उघ्युर मुस्लिमांच्या सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनासाठी दोन महत्वाचे प्रयत्न केले आहेत . पहिला प्रयोग म्हणजे, सरकारी नातेवाईक तुमच्या (उघ्युरांच्या ) घरी, ज्यात सरकारी कर्मचारी (जे प्रामुख्याने हान वंशीय असतात) चक्क उघ्यूर कुटंबांसोबत जाऊन रहातात पहिल्या वेळी एक आठवडा आणि त्यानंतर दर दोन महिन्यांनी चार ते पाच दिवसांचा मुक्काम असतो. यात सरकारी कर्मचारी जाताना राशन-पाणी भेटी इत्यादी घेऊन जातात, कुटूंबीयांच्या चीन सरकारला स्विकार्य अडचणी समजावून घेऊन त्यात मदत करतात, अगदी घर काम असो वा मुलांची देखभाल असो त्यात सहभागी होतात अगदी एका ताटात जेवतात आणि एका बेड मध्ये झोपतातही, -बारसे ते मयत कुटुंबातील सर्व कार्यक्रमात सहभागी होतात उघ्युरांच्या घरी उघ्युरांचे सण करतातच पण उर्वरीत चीन मधिल सण पाककृति उघ्युरांना त्यांच्या घरी राहून शिकवतात- चीनची मुख्य भाषा मँडरीन , राष्ट्रभाक्ती राष्ट्रभक्तीपर गिते यांचे शिक्षण रेडिओवरुन येणार्‍या शासकीय योजना नेत्यांची भाषणे माहिती समजावून देणे आणि ज्या कुटूंबातील एखाद्या व्यक्तिला व्होकेशनल एज्युकेशनची गरज असेल अथवा कट्टरता असेल किंवा राष्ट्रिय आणि सांसस्कृतिक एकात्मतेत हयगय असेल त्यांना अधिक पुर्नशिक्षणासाठी व्होकेशनल एज्युकेशन कँपमध्ये दाखल केले जाते. आणि हे सर्व कंपलसरी असते.

आता सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मिकरणाच्या या प्रयोगावर टिका करणारे नतद्रष्ट पाश्चात्य माध्यमे आणि एनजीओ नित्याप्रमाणे फुटकळ टिका करुन आहेत. अगदी इस्लामिक देशांनी याबाबत काळजी व्यक्त केली तरी सर्वसाधारणपणे सौम्यपणेच दिसते म्हणजे, काळजी थोडी कुर्बूर व्यक्त केली तरी इस्लामिक देश आणि बाकीचे जग चीनचा कट्टरतावादाच्या विरोधातील सोशल इंजिनीअरींग स्विकारताना दिसते आहे. अगदी पाकीस्तानातील सरकारी प्रतिनिधींचे चिनी सरकारची भूमिका योग्य असल्याचे लेख पण पाकीस्तानी माध्यमात येऊन गेलेले दिसतात.

आपल्याकडे सांस्कृतिक देवाण घेवाणीची नुसतीच चर्चा होते. चीन मनावर घेतो करुन दाखवतो आणि आंतरराष्ट्रीय समुदाय अचंबित होऊन पहात असतो.

आता असा प्रयोग भारतात करण्याच्या विचाराने भारतीय मुस्लिमांच्या आधी हिंदूंनाच कापरे भरेल हे वे सा न ल. त्यामुळे अगदी असा प्रयोग जसाच्या तसा भारतात शक्य नसला तरी याचे काही सौम्य भारतीय स्वरुप असू शकेल का असा विचार येतो कारण मूळ प्रोग्राम कम्युनीस्टांचा असल्यामुळे भारतातील डाव्यांचा विरोध होणार नाही, इस्लामिक देशांनी विशेष आक्षेप घेतलेले नसल्यामुळे मुस्लिमांचाही विशेष आक्षेप असण्याचे कारण असणार नाही. मानवाधिकारांची काळजी घेतली म्हणजे पाश्चात्य देशातील एन जी ओंनाच अशाप्रोग्रामसाठी आर्थिक मदतीचे कंपल्शन केले की झाले त्यांचेही समर्थन मिळू शकेल.

एकुण कायतर राष्ट्रीय एकात्मतेचा अग्रह असावा तर चिनी लोकां सारखा , ' एकच चीन' बाकी काही नाही ह्या एकाच ध्येयाने प्रेरीत चीन ने मोठीच आर्थीक प्रगतीही आतापर्यंत करुन दाखवलेली आहे हे वे.सा.न. ल.
संदर्भ

संस्कृतीसमाजभूगोलशिक्षण

प्रतिक्रिया

जिजाऊंचे गुरु शेख बाबा होते,
जेजुरीच्या खंडेरायाचे पूजन काही मुस्लिम मलंगबाबा म्हणून करतात,
जन्माने मुस्लिम असल्याचा दावा केले गेलेले साईबाबा अनेक हिंदूंच्या आरतीचे मालक आहे ...

अशी अनेक उदाहरणे देणाऱ्या प्रतिक्रिया येतील आता तुमच्या लेखावर ...

mrcoolguynice's picture

3 Dec 2018 - 2:44 pm | mrcoolguynice

a

mrcoolguynice's picture

3 Dec 2018 - 2:51 pm | mrcoolguynice

चीन मला फार आवडत नाही.
त्यामुळे

ज्याप्रमाणे (सुवर्णमंदिराला जमीन देणाऱ्या) अकबरानंतर , सत्तेत (जिझिया लादणारा) औरंगझेब आला...
त्याच प्रमाणे "सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलनाचा प्रयोग" करणाऱ्या सध्याच्या चिनी राजवटी नंतर

औरंगझेबी राजवट चीन मध्ये यावी (आणि ह्याप्पीली एव्हर आफ्टर) स्थिती न यावी...

"सांस्कृतिक एकात्मिकरण आणि कट्टरता निर्मुलन" वैगरे मला चीनमधील
सिक्युलर / फेक्युलर विचारजंताचा काहीतरी डाव दिसतोय.
चीनमधील बहुसंख्य हानवंशीयांनी सरकारी डावपेचांना बळी पडू नये अशी अपेक्षा.

सरकारच्या हातात मीडिया असतो सगळा, जवळ जवळ सगळीच मीडिया दरबारी आहेत. (चीनमधल्या मीडिया बाबत विधान केलेले आहे हे )
भारतीय कूटनीती तज्ज्ञांनी सामान्य जनतेस याची जाणीव करून देऊन, चीन मध्ये फूट पाडावी, (भारतासाठी पथ्यावर ).
बहुसंख्य हान वंशीयांना जाणीव करून द्यावी की त्यांची महान संस्कृती धोक्यात आहे, आक्रमणकरी इस्लाम चे हे जे लांगुलचालन करण्याचा
घाट घातला जातोय , तो बहुसंख्य हान वंशीयासाठी धोकादायक ठरू शकतो.
हान वंशीयांनी जास्तीतजास्त अपत्ये होऊ द्यावी. सर्व उघूर आयडेन्टिटी चे नामांतर करून हान सांस्कृतिक नाम ठेवावे.
जमल्यास एखाद्या हान नेत्याचा जगातील सर्वात मोठा पुतळा उभारावा.
सर्वाना पोर्क / वराह सेवन व पालन सक्तीचे करावे. जो वराह सेवनाला विरोध करेल त्याला देशद्रोही ठरवून भर चौकात जाळून टाकावे.
कुठल्याही परिस्थितीत एक देश एक संस्कृती ची पॉलिसी राबवावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Dec 2018 - 6:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यामुळे अगदी असा प्रयोग जसाच्या तसा भारतात शक्य नसला तरी याचे काही सौम्य भारतीय स्वरुप असू शकेल का असा विचार येतो कारण मूळ प्रोग्राम कम्युनीस्टांचा असल्यामुळे भारतातील डाव्यांचा विरोध होणार नाही, इस्लामिक देशांनी विशेष आक्षेप घेतलेले नसल्यामुळे मुस्लिमांचाही विशेष आक्षेप असण्याचे कारण असणार नाही.
दया, कुछ तो गडबड है. पाव के नीचे जमीन क्यो नही दिख रही? (कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी)

मानवाधिकारांची काळजी घेतली म्हणजे पाश्चात्य देशातील एन जी ओंनाच अशाप्रोग्रामसाठी आर्थिक मदतीचे कंपल्शन केले की झाले त्यांचेही समर्थन मिळू शकेल.
१. यात पाश्च्यात्य देशातील बहुसंख्य एनजीओंना, (अ) सोईस्कर नसलेल्या मानवाधिकाराचे फार काही कौतूक आहे आणि/किंवा (आ) त्यांचे अंतर्गत (गुप्त) हितसंबंध नसतात, असा सूर दिसत आहे.
२. आर्थिक मदतीच्या कंपल्शनच्या सूचना करताना हिटलरशाही/हुकुमशाही/इमर्जन्सी/इ च्या आरोळ्या ऐकू आल्या नाहीत ?!
(कपाळावर हात मारणारी स्मायली कल्पावी)
३. मुख्य म्हणजे... लेखात लिहिलेल्या चीनमधल्या कृती, मानवाधिकारांची काळजी... अगदी किमान काळजीही... घेऊन करता येतील काय?!
(कपाळावर हात मारणारी स्मायलीपेक्षा जास्त काही जालीम कल्पावे)

एकुण कायतर राष्ट्रीय एकात्मतेचा अग्रह असावा तर चिनी लोकां सारखा , ' एकच चीन' बाकी काही नाही ह्या एकाच ध्येयाने प्रेरीत चीन ने मोठीच आर्थीक प्रगतीही आतापर्यंत करुन दाखवलेली आहे हे वे.सा.न. ल.
चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे.
(कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे)

जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते.

असो.

अस्वीकरण : वरच्या कारणांमुळे, या विषयावर पुढे अधिक चर्चा करण्याचे / न करण्याचे सर्व हक्क, स्वाधिन ठेवलेले आहेत. :)

ठिक आहे आमचे वाचन कमी तर कमी , आपल्याकडून माहिती येऊ द्यात

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Dec 2018 - 12:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

माहितगारसाहेब, "जे न देखे रवी, ते देखे कवी" असे एक वचन आहे. त्यामुळे, हा लेख म्हणजे एक कविता असती तर, त्याच्यातील कल्पनाविलासाच्या उत्तुंग भरार्‍यांची जरूर तारीफ केली असती. पण, तसे नसल्याने व (अर्थातच) त्याचा तार्कीक व व्यावहारीक प्रतिवाद करण्याइतकी प्रतिभा व कल्पनाशक्ती (सुदैवाने) माझ्याकडे नसल्याने, माफी असावी. :)

माहितगार's picture

4 Dec 2018 - 6:07 pm | माहितगार

हा धागा लेख चीनी प्रयोगाची अल्प माहिती जराशा टंग इन चीक स्टाईल नी देतोय. लेखात चीनी प्रयोगातील अतीरेक आणि चीनी प्रयोगावरील टिका टाळली आहे.

मी स्वतःच्या वादाची किंवा दृष्टीकोणाची कोणतीही मांडणी लेखात केलेली नाही, काही विधाने जी आली आहेत ती जराशी टंग इन चीक स्वरुपाची आहेत त्यामुळे जी काही बाजू घ्यायची किंवा प्रतिवाद करावयाचा आहे तो चीनी प्रयोगा बद्दल असणे अपेक्षीत आहे.

चीनमध्ये हे सर्व कसे केले जाते याबद्दल जुजुबी वाचनही केले नाही हे स्पष्ट होते आहे. आणि भारतात राष्ट्रियत्व, देशभक्ती आणि भारतियत्व हे शब्द उच्चारताच किती हेटाळणी सुरू होते इकडे दुर्लक्ष झाले आहे.
(कोणतीही स्मायली कल्पण्याचे मुश्किलीने टाळावे)

जगावेगळ्या टोकाच्या अपेक्षा ठेवताना, विषयाच्या 'इतिहास व सद्यस्थितीचा' अभ्यास किंवा किमान वाचन तरी असावे, अशी अपेक्षा अवास्तव होणार नाही. या लेखांतल्या विषयावर छापील आणि आंतरजालिय माध्यमांत अक्षरशः असंख्य विश्वासू दुवे मिळतील... त्यातले किमान काही वाचले असते तर लेखातील अनेक मुद्दे / मागण्यांचे स्वरूप जरातरी गंभीर झाले असते, असे वाटते.

मागच्या एका धाग्यातल्या प्रतिसादात आणि उपरोल्लेक्खीत प्रतिसादांशात आपण अनावश्यक व्यक्तिगत होत नाही आहात ना अशी शंका वाटली. मुख्य म्हणजे आपण इथे एकमेकांची परिक्षा घेण्यासाठी नाही आहोत असे वाटते. लेख टंग इन चीक करण्यासाठी आणि नंतरच्या चर्चेत माहिती येऊ शकेल अशा दृष्टीने टाळले आहे. आपल्याला जी माहिती आणि दृष्टीकोण महत्वाचे वाटतात ते आपण शेअर करण्यास हरकत नसावी असे वाटते.

माहितगार's picture

4 Dec 2018 - 6:23 pm | माहितगार

इराक मधील याझिदींवरील अत्याचारांबद्दलचा लेखही मी खूपच संयत लिहिला आहे. एवढ्या गंभीर स्वरुपाच्या अत्याचारांना मी एवढे संयत का लिहिले असे माझेच मला वाटते, त्याच्या एकुण स्वरुपाचे गांभीर्य स्पष्ट करणारा अजून एखादा लेख लिहिला पाहिजे असे हल्ली वाटते.

माहितगार's picture

4 Dec 2018 - 6:25 pm | माहितगार

(मी याझिदींवरील अत्याचारांबद्दल संयत लेखन केले म्हणजे माझे त्या विषयावरील वाचन कमी आहे असे नसावे)