आणि ....डॉ. काशिनाथ घाणेकर

प्राजु's picture
प्राजु in काथ्याकूट
14 Nov 2018 - 10:58 pm
गाभा: 

चित्रपट की चरित्रपट की एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव की एक नशा जी सुबोध भावे नावाच्या प्याल्यामधून प्रेक्षकांना पाजली जाते कधीही न उतरण्यासाठी!!

माझ्या पिढीने प्रत्यक्षात घाणेकरांची नाटके पाहिली नाहीत, घाणेकर जेवढे पाहिले ते 'हा खेळ सावल्यांचा' , 'मराठा तितुका..'सारख्या चित्रपटातून किंवा ए माँ तेरी सुरत से अलग ...,या गाण्यातून पाहिलेले घाणेकर कधी आणि... लावावे इतके मोठे असतील हे आई वडिलांकडून त्यांच्या बद्दल ऐकल्यावरही तितकं पटलं नव्हतं! पण आज डॉ. काशीनाथ घाणेकर ...म्हणजेच मराठी रंगभूमी चा सुवर्णकाळ म्हणावं इतकं भव्यदिव्य काहीतरी आहे हे केवळ सुबोधमुळे समजले.
त्यातले प्रसंग, नाटकात दाखवलेले प्रसंग हे जेव्हा माझ्या आईने याची देही याची डोळा पाहिलेले आहेत अगदी, जेव्हा घाणेकर दारूच्या आहारी गेल्यामुळे मंचावर नाटकातल्या संवादांची सरमिसळ करू लागले आणि प्रेक्षकांनी नाट्यगृहात दंगा घातला ...हा प्रसंग सुद्धा याची माझ्या आईने याची देही याची डोळा अनुभवला आहे, हे समजल्यावर तिचा प्रचंड हेवा वाटला नसता तर नवलच!! सुबोध उभे केलेले घाणेकर मनात खोल खोल जातात. ज्या मराठी नाट्यकर्मी साठी लोक वेडे झाले होते,त्याच्या एन्ट्री ला शिट्ट्या , टाळ्या वाजवत होते, ज्यानं खरंखुरं स्टारडम अनुभवलं...अशा एका नाट्यक्षेत्रातल्या दिपस्तंभाला प्रेक्षकांसमोर उभं करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच...सुबोध ने ते फक्त पेललंच नाही तर कडाकड मोडलं सुद्धा!! घाणेकरांचा बेदरकारपणा, लहरीपणा, प्रचंड इगो आणि ताकदीचा अभिनय सुबोध ने पूर्ण जीव ओतून दाखवला आहे..
प्रसाद ओक चे प्रभाकर पणशीकर, आनंद इंगळे चे वसंत कानिटकर, सोनाली कुलकर्णी ची सुलोचना दिदी, मोहन जोशीं चे भालजी, वैदेही ची कांचन, स्वप्नील राजशेखर चे मोहन वाघ, सुमित राघवन चे डॉ.लागू ...सगळेच सगळेच उत्तम!! पटकथा प्रचंड आखीव ,रेखीव ,बांधीव आणि घोटीव!
भारंभार गाणी नाहीत, फुटकळ प्रसंग नाहीत, दिग्दर्शनावरची पकड कुठेही सुटलेली नाही, सिनेमा कुठेही रेंगाळत नाही.. सगळ्या जमेच्याच बाजू !!
सुबोध ने आधी रंगवलेले बायो पीक, बालगंधर्व, लो. टिळक, या व्यक्तीरेखा खऱ्या जरी असल्या तरी आता त्यांना प्रत्यक्ष पाहणारे कोणी जिवंत असेल याची शक्यता अगदीच कमी आहे..पण घाणेकरांना पाहिलेली एक मोठी पिढी आहे त्यामुळे त्या पिढी समोर घाणेकर उभे करणे हे किती कठीण असू शकतं हे केवळ तो लेखक, दिग्दर्शक आणि नट साग जाणे..! सुबोध तुझ पे जान कुर्बान!!
डॉ. घाणेकरांनी कॉलेज तरुणांना मराठी नाटकांसाठी नाट्यगृहात यायला भाग पाडलं आणि थिएटर मध्ये सुबोध ने!! एक नाट्यसृष्टीत होऊन गेलेला माईल स्टोन तर एक इन मेकिंग!!
चित्रपट tv वर येण्याची वाट नका बघू, या भव्यदिव्य घाणेकरांना , भव्य पडद्यावरच अनुभवा एक भव्य कलाकाराच्या अभिनयातून!!

- प्राजक्ता पटवर्धन
काशिनाथ

लाल्या

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

14 Nov 2018 - 11:44 pm | ज्योति अळवणी

अगदी खरं. एक वेगळा अनुभव आहे हा सिनेमा म्हणजे. मी केवळ आठवीत असताना नाथ हा माझा वाचलं होतं कांचन घाणेकरांनी लिहिलेलं. त्यावेळी भुरळ पडली होती त्यांच्या व्यक्तिमत्वाची. सुबोध भावेने ते व्यक्तिमत्व सही सही परत उभं केलंय. नक्की बघावा असा चित्रपट

श्रीरंग's picture

14 Nov 2018 - 11:48 pm | श्रीरंग

सुबोध अफलातूनच आहे. अत्यंत नैसर्गिक आणि अभ्यासपूर्ण अभिनय. बालगंधर्व किंवा लोकमान्यांसारखं भव्य व्यक्तिमत्व असो, किंवा तकलादू कथानक असलेली निर्बुद्ध मालिका.. हाती घेतलेली प्रत्येक भूमिका तितक्याच प्रामाणिकपणे, मनापासून करतो हे जाणवतं.

मूकवाचक's picture

15 Nov 2018 - 9:00 am | मूकवाचक

+१

इतर भूमिकातला काशिनाथ त्याच्या लाऊड अभिनयामुळे आवडला नव्हता. पण ती मोठ्या नाट्यगृहातली गरज असावी. त्याचे नखरे आवडले नव्हते. तरीही हा चित्रपट आवडला. सुबोध भावेचे वर्णन लेखिकेने यथायोग्य केले आहे. दुसरी आकर्षक बाजू म्हणजे संगीत. मोजून दोन गाणी. दोन्ही मेलडीअस. ताज्या दमाच्या दातेचा नवा आकर्षक आवाज ओळखला नव्हता. खरेच थिएटरमध्येच जाऊन पहावा असा चित्रपट.

धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Nov 2018 - 11:31 am | डॉ सुहास म्हात्रे

चित्रपट पाहिला आणि खूप आवडलाही. मराठी रंगभूमीवरचे एक वादळ परत अनुभवले !

विविध लेख, धागे, परीक्षणे आणि प्रतिसाद यांतून :

-कलंदर, बेफिकीर व्यक्तिमत्त्व
-व्यसनी, बेदरकार
-भुरळ पाडणारे
-स्त्रियांना अत्यंत आकर्षक वाटणारे (म्हणजे दिसायला देखणे असं असणार. निळे डोळे इत्यादि वर्णन)
-अनेक जणींशी वैवाहिक / बाह्य संबंध असणे
-शौकीन, माज असलेले
-आत्मकेंद्रित, स्वतःपुरता विचार करणारे, स्वतःलाच फक्त महत्व देणारे, इतरांची पर्वा नाही
-स्वतःच्या नाटकाच्या प्रयोगाला काही सीट रिकाम्या असल्या तरी स्वतःच्या नावे तिकिटे घेऊन हाऊसफुल्ल बोर्ड लावणारे (कणेकरांचा लेख)
-दिलदार व्यक्तिमत्त्व

यापैकी प्रत्यक्षात फक्त फोटो पाहणं शक्य असल्याने आंजावर फोटो पाहिले, पुस्तकाच्या कव्हरवरही फोटो आहे. दिसायला वाईट असं नव्हे, गोरेघारे व्यक्तिमत्त्व वाटले. पण ते सुपरहिरो मानले जात हे ऐकून देखणेपणाच्या कल्पना व्यक्तीगणिक बदलतात याची तीव्र जाणीव फोटो बघून झाली. पुन्हा स्त्रियांची नजर हा भाग अगदीच अगम्य आहे. त्यामुळे त्यांना काय देखणे आणि भुरळ पडण्यासारखे, मोह होण्यासारखे वाटत असे हे त्याच जाणोत.

आनन्दा's picture

15 Nov 2018 - 12:01 pm | आनन्दा

मला काशिनाथ घाणेकर या व्यक्तीबद्दल तसे काहीच माहीत नाही.. तसाही लहानपणापासून चित्रपटांशी फारसा संबंध नसल्यामुळे माहीत असायचे करण देखील नाही.

तुमची पोस्ट बघून मुद्दाम नेटवर जाऊन फोटो बघितला, तेव्हा लक्ष्यात आले की हा माणूस त्या जमान्याचा शाहरुख होता..
ख खो दे जा. पण मुली बायका फिदा असणे साहजिक आहे.. जस्ट लाईक शाहरुख.. यु नो? ☺️☺️

तुषार काळभोर's picture

15 Nov 2018 - 1:16 pm | तुषार काळभोर

मला वैयक्तिक रमेश देव आणि रविंद्र महाजनी हे मराठीतले सर्वात देखणे अभिनेते वाटतात.

ट्रम्प's picture

16 Nov 2018 - 8:08 am | ट्रम्प

ते दोघे बऱ्यापैकी सोज्वळ आहेत व होते .
म्हणजे घाणेकरा प्रमाणे हे स्रिया बाबत बदनाम नाहीत .

श्रीरंग's picture

16 Nov 2018 - 11:03 am | श्रीरंग

रमेश देव तर नावाजले जातात, त्यांच्या स्वच्छ चारित्र्य, आणि आचरणासाठी.

आमचे एक दूरचे नातेवाईक फिल्मी पत्रकार होते त्यांच्या मते सर्वच नट नट्या यांची सदा सर्वकाळ लफडी चालू असत.

यात श्री सुधीर फडके, रमेश देव, सूर्यकांत इ मंडळी होती.

एकंदर फिल्मी पत्रकार या प्रकाराबद्द्ल माझे मत फारसे चांगले नाही.

mrcoolguynice's picture

16 Nov 2018 - 12:41 pm | mrcoolguynice

रविंद्र महाजनी १+

ट्रम्प's picture

16 Nov 2018 - 8:16 am | ट्रम्प

छान प्रतिसाद !!!!
सुबोध ने खूप कष्ट घेतले घाणेकरनां पडद्यावर जिवंत करताना हे क्षणोक्षणी जाणवते .
पण अशा बेफिकीर , बाहेरख्याली आणि व्यसनी माणसाभोवती स्रियां चे कोंडाळे कसे काय जमते बुवा ते सुद्धा 7 च्या आत घरातील काळात ?

कालच आमच्या वडिलांशी या बद्दल बोलणे झाले. डॉ काशिनाथ घाणेकर हे वडिलांचे चिपळूण येथे शेजारी होते. ते माझ्या वडिलांच्या २-३ वर्षे पुढे असावेत. (वडिलांचे वय ८३)
वडिलांनी त्यांच्या शाळेतील ( युनायटेड इंग्लिश स्कुल चिपळूण आणि गोगटे कॉलेज रत्नागिरी) आणि कॉलेजमधील काही आठवणी सांगितल्या.
त्यात एक आठवण म्हणजे डॉ घाणेकर तेथे येणाऱ्या वडारी लोकांची गाढवे पकडून त्यांना सुम्भ( नारळाच्या काथ्याचा दोर) बांधून त्यांवर स्वार होऊन बहिरीच्या देवळात घेऊन जात असत. वडारी लोक मागे आले कि गाढवे सोडून ते पलायन करत.अतिशय हूड होते.

डॉ घाणेकर हे अत्यंत देखणे होते हे मात्र वडिलांनी आवर्जून सांगितले शिवाय त्यांची सगळी नाटके त्यांनी पहिली होती (काही नाटकांना मी गेल्याचे मी दुसऱ्या प्रतिसादात लिहिले आहे). त्या नाटकांचे तरुण लोकांवर जबरदस्त गारुड होते आणि त्या काळात त्यांची नाटके खरोखरच हाऊसफुल्ल जात असत.माणूस अतिशय हुशार, कलंदर, उत्कृष्ट नट होता मात्र चेन स्मोकर, भरपूर दारू पिणे आणि बाहेरख्यालीपणा यामुळे ते फुकट गेले असे वडिलांनी सांगितले.

डॉक्टर लागू हे धीरगंभीर आणि अतिशय मेहनती आणि कसलेले नट होते. (डॉ लागुंबद्दल आमच्या वडिलांचे अतिशय चांगले मत आहे.)
पण डॉक्टर घाणेकर आणि डॉ लागू यांची तुलना करता येणार नाही असे त्यांचे मत.
त्यानि अजून सिनेमा पाहिलेला नाही. सिनेमा पाहिल्यावर परत त्यांचे मत विचारून येथे लिहीन.

सतिश गावडे's picture

15 Nov 2018 - 10:58 pm | सतिश गावडे

चित्रपट अजून पाहीला नाही मात्र टयुट्यूबवरील टीजर पाहून एक प्रश्न मनात येतोय: डॉ. घाणेकर खरंच ईतके मोठे नट होते का की हा चित्रपट बनवताना त्यांचे ग्लोरिफिकेशन केलंय चित्रपट चालावा म्हणून?

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Nov 2018 - 11:44 am | डॉ सुहास म्हात्रे

१९५० ते ७० ची दशके गाजवणार्‍या या उत्तम रंगकर्मीने त्याच्या व्यसनांमुळे स्वतःचे आयुष्य आणि कला दोन्हीही उधळून टाकले. कदाचित, त्याच्या उद्धट स्वभावामुळे त्याची स्तुती करणार्‍या मित्र-पाठीराख्यांचा गोतावळा जमला नाही. या कारणाने त्याची कारकिर्द मानाने-अभिमानाने सांगणारे फारसे कोणी उरले नाही. अजून एक कारण म्हणजे घाणेकरांच्या मृत्युच्या आसपास डॉ श्रीराम लागू या उत्तुंग कलाकाराचा झालेला उदय... ज्यामुळे (व विशेषतः डॉ लागू घाणेकरांचा काही काळ प्रतिस्पर्धी असल्यामुळे) घाणेकरांचे नाव नजरेआड होणे सोपे झाले. त्याकाळी, युट्युबसारखी साधने उपलब्ध नसल्यामुळे त्यांचे बरेचसे काम आता केवल लिखित आणि चर्चित प्रकारातच आहे.

सतिश गावडे's picture

16 Nov 2018 - 4:15 pm | सतिश गावडे

बरीच नवीन माहिती मिळाली डॉ. घाणेकरांबद्दल.

मूकवाचक's picture

16 Nov 2018 - 12:06 pm | मूकवाचक

चित्रपटात डॉ. घाणेकरांची खंबीरपणे पाठराखण करणार्‍या पणशीकरांचे एक वाक्य आहे - डॉ. घाणेकरांना वगळले तर मराठी रंगभूमी फक्त आदरणीय होउन जाईल, लोकप्रिय किंवा उत्तुंग नाही अशा धर्तीचे. चित्रपट पाहिला आणि घाणेकरांना प्रत्यक्ष अनुभवलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर असे वाटते की यात बरेच तथ्य असावे.

क्रिकेट मधे जसा ताड़खेबंद कोहली लागतों, तसाच
आदरणीय कुलहेड धोनी / द्रविड़ लागतों

यिन अँड़ यान ... यु सी

शरीराचे सर्व स्नायु ताणुन, अशी एंट्री घ्यायची...
आणि स्पॉटकड़े अस पाहुन, डोळें असे गरगरगरगरगरगर फिरवले....की लोक टाळ्या वाजवतात हों....

डॉ लागु यांच्या भूमिकेतिल सुमित राघवने या द्वंद्वात
सुपड़ा साफ़ केलाय प्रतिस्पर्ध्याचा .....

चित्रपटात
जेव्हा घानेकारांचे पात्र , लागु यांच्या पात्रावर, पार्टीत खुर्चिवर उभे राहून, वास्तववादी अभिनयावरुन टॉटं
मारते, तेव्हा लागु यांचा एक चहाता लाग़लीच लागुंपुढयात ख़ुर्ची ठेवतो, पण लागु (सुमित राघवनने)
अर्ध्या सेकंदाच्या आय एक्सप्रेशन मधुन त्याला नकार देताना केलेला अभिनय पाहुन , सुमितच्या अंगी असलेल्या अभिनयाक़सब प्रेक्षकांचि दाद घेउन जाते.

त्या एक्सप्रेशन मधे फ़क्त नकार नाहिए तर आपण समोरच्याच्या खालच्या लेवेल्वर उतरनार नसल्याचीं गरज व सायुक्तिता नाहिए हे प्रेक्षकांना दर्शाविलेले आहे.

काये की सगळेंच इतिहास वाचत बसले तो घडवंणार कोण ?

मृत्युन्जय's picture

18 Nov 2018 - 8:26 pm | मृत्युन्जय

अगदी अगदी. आणि त्याचे ते सूचक हास्य. छोट्या भूमिकेत पण चित्रपट खाउन टाकला आहे त्याने. सुबोध भावेच्या भूमिकेची लांबी आणि त्यानेदेखील भूमिकेत जीव ओतलेला असल्याने तो तोडीस तोड राहतो. पण सुमीत राघवनने फारच उच्च्च दर्जाचा अभिनय केला आहे.

तुषार काळभोर's picture

19 Nov 2018 - 7:48 am | तुषार काळभोर

मागच्या आठवड्यात ठग्सला मुंबईत हजार स्क्रीन तर आणि... ला पावणे दोनशे स्क्रीन मिळाल्या होत्या.

आता ठग्स दीडशे स्क्रीनवर आहे आणि घाणेकर तीनशे स्क्रीनवर चालू आहे.

हे मुंबईत आहे!