चित्रपट की चरित्रपट की एक मंत्रमुग्ध करणारा अनुभव की एक नशा जी सुबोध भावे नावाच्या प्याल्यामधून प्रेक्षकांना पाजली जाते कधीही न उतरण्यासाठी!!
माझ्या पिढीने प्रत्यक्षात घाणेकरांची नाटके पाहिली नाहीत, घाणेकर जेवढे पाहिले ते 'हा खेळ सावल्यांचा' , 'मराठा तितुका..'सारख्या चित्रपटातून किंवा ए माँ तेरी सुरत से अलग ...,या गाण्यातून पाहिलेले घाणेकर कधी आणि... लावावे इतके मोठे असतील हे आई वडिलांकडून त्यांच्या बद्दल ऐकल्यावरही तितकं पटलं नव्हतं! पण आज डॉ. काशीनाथ घाणेकर ...म्हणजेच मराठी रंगभूमी चा सुवर्णकाळ म्हणावं इतकं भव्यदिव्य काहीतरी आहे हे केवळ सुबोधमुळे समजले.
त्यातले प्रसंग, नाटकात दाखवलेले प्रसंग हे जेव्हा माझ्या आईने याची देही याची डोळा पाहिलेले आहेत अगदी, जेव्हा घाणेकर दारूच्या आहारी गेल्यामुळे मंचावर नाटकातल्या संवादांची सरमिसळ करू लागले आणि प्रेक्षकांनी नाट्यगृहात दंगा घातला ...हा प्रसंग सुद्धा याची माझ्या आईने याची देही याची डोळा अनुभवला आहे, हे समजल्यावर तिचा प्रचंड हेवा वाटला नसता तर नवलच!! सुबोध उभे केलेले घाणेकर मनात खोल खोल जातात. ज्या मराठी नाट्यकर्मी साठी लोक वेडे झाले होते,त्याच्या एन्ट्री ला शिट्ट्या , टाळ्या वाजवत होते, ज्यानं खरंखुरं स्टारडम अनुभवलं...अशा एका नाट्यक्षेत्रातल्या दिपस्तंभाला प्रेक्षकांसमोर उभं करणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच...सुबोध ने ते फक्त पेललंच नाही तर कडाकड मोडलं सुद्धा!! घाणेकरांचा बेदरकारपणा, लहरीपणा, प्रचंड इगो आणि ताकदीचा अभिनय सुबोध ने पूर्ण जीव ओतून दाखवला आहे..
प्रसाद ओक चे प्रभाकर पणशीकर, आनंद इंगळे चे वसंत कानिटकर, सोनाली कुलकर्णी ची सुलोचना दिदी, मोहन जोशीं चे भालजी, वैदेही ची कांचन, स्वप्नील राजशेखर चे मोहन वाघ, सुमित राघवन चे डॉ.लागू ...सगळेच सगळेच उत्तम!! पटकथा प्रचंड आखीव ,रेखीव ,बांधीव आणि घोटीव!
भारंभार गाणी नाहीत, फुटकळ प्रसंग नाहीत, दिग्दर्शनावरची पकड कुठेही सुटलेली नाही, सिनेमा कुठेही रेंगाळत नाही.. सगळ्या जमेच्याच बाजू !!
सुबोध ने आधी रंगवलेले बायो पीक, बालगंधर्व, लो. टिळक, या व्यक्तीरेखा खऱ्या जरी असल्या तरी आता त्यांना प्रत्यक्ष पाहणारे कोणी जिवंत असेल याची शक्यता अगदीच कमी आहे..पण घाणेकरांना पाहिलेली एक मोठी पिढी आहे त्यामुळे त्या पिढी समोर घाणेकर उभे करणे हे किती कठीण असू शकतं हे केवळ तो लेखक, दिग्दर्शक आणि नट साग जाणे..! सुबोध तुझ पे जान कुर्बान!!
डॉ. घाणेकरांनी कॉलेज तरुणांना मराठी नाटकांसाठी नाट्यगृहात यायला भाग पाडलं आणि थिएटर मध्ये सुबोध ने!! एक नाट्यसृष्टीत होऊन गेलेला माईल स्टोन तर एक इन मेकिंग!!
चित्रपट tv वर येण्याची वाट नका बघू, या भव्यदिव्य घाणेकरांना , भव्य पडद्यावरच अनुभवा एक भव्य कलाकाराच्या अभिनयातून!!
- प्राजक्ता पटवर्धन

वर्गीकरण
वाचने
9652
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी खरं. एक वेगळा अनुभव आहे
सुबोध अफलातूनच आहे. अत्यंत
+१
In reply to सुबोध अफलातूनच आहे. अत्यंत by श्रीरंग
टीनेज मध्ये असतांना लाल्या पाहिला होता. ...........
चित्रपट पाहिला आणि खूप
विविध लेख, धागे, परीक्षणे आणि
मला काशिनाथ घाणेकर या
In reply to विविध लेख, धागे, परीक्षणे आणि by गवि
लोभस आकर्षक व्यक्तिमत्त्व
In reply to मला काशिनाथ घाणेकर या by आनन्दा
ते दोघे बऱ्यापैकी सोज्वळ
In reply to लोभस आकर्षक व्यक्तिमत्त्व by तुषार काळभोर
रमेश देव तर नावाजले जातात,
In reply to ते दोघे बऱ्यापैकी सोज्वळ by ट्रम्प
आमचे एक दूरचे नातेवाईक फिल्मी
In reply to रमेश देव तर नावाजले जातात, by श्रीरंग
रविंद्र महाजनी १+
In reply to लोभस आकर्षक व्यक्तिमत्त्व by तुषार काळभोर
छान प्रतिसाद !!!!
In reply to विविध लेख, धागे, परीक्षणे आणि by गवि
कालच आमच्या वडिलांशी या बद्दल
In reply to विविध लेख, धागे, परीक्षणे आणि by गवि
चित्रपट अजून पाहीला नाही
१९५० ते ७० ची दशके गाजवणार्
In reply to चित्रपट अजून पाहीला नाही by सतिश गावडे
धन्यवाद काका
In reply to १९५० ते ७० ची दशके गाजवणार् by डॉ सुहास म्हात्रे
घाणेकर आणि रंगभूमी
In reply to चित्रपट अजून पाहीला नाही by सतिश गावडे
क्रिकेट मधे जसा ताड़खेबंद
In reply to घाणेकर आणि रंगभूमी by मूकवाचक
शरीराचे सर्व स्नायु ताणुन,
In reply to क्रिकेट मधे जसा ताड़खेबंद by mrcoolguynice
काये की सगळेंच इतिहास वाचत
In reply to शरीराचे सर्व स्नायु ताणुन, by mrcoolguynice
अगदी अगदी. आणि त्याचे ते सूचक
In reply to शरीराचे सर्व स्नायु ताणुन, by mrcoolguynice
अभिमानास्पद