चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in काथ्याकूट
1 Oct 2018 - 12:05 pm
गाभा: 

Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action

कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्‍या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्‍या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे.

गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.

कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.

प्रतिक्रिया

सोपे नाही म्हणताय आणि मग कसे काय एवढे करोडपती झाले??

सुबोध खरे's picture

23 Oct 2018 - 10:56 am | सुबोध खरे

शिंपल आहे.

एक तर उत्पन्न दाखवत नव्हते आणि कर भरत नव्हते (ज्याची शक्यता जास्त आहे)

किंवा

उत्पन्न खरोखरच वाढलंय ( म्हणजे अच्छे दिन आ गये).

बेंबट्या ,आपल्या लोकांना ढुंगणावर हंटरच हवा हे खरे

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2018 - 10:51 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

गैरसोईच्या मूळ मुद्द्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करायची असली की होतं असं कधी कधी ! =)) =)) =))

काही हरकत नाही. तुमचा गोलपोस्ट बदलून मांडलेला नवीन मुद्दा अनेक नवीन प्रश्न उभे करतो आहे, हे लक्षात असेलच ?

आजच्या घडीला एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब आहे.*

१. भारतात दरवर्षी, दरकरदात्यामागे, एक कोटी रूपये रक्कम एकदम किरकोळ बाब बनली आहे, असे तुम्ही म्हणताय. वाह, वाह, वाह, हे अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण होत नाही का? मोदी मिपा वाचत असते आणि त्यांनी तुमचा प्रतिसाद वाचला असता, तर त्यांनी तुम्हाला जरूर मनापासून धन्यवाद दिले असते !

२. मग ती किरकोळ* असलेली रक्कम 'ते ६०% लोक' आधी का जाहीर करत नसावेत ? आणि आत्ताच जाहीर करावी अशी उपरती त्यांना का बरं झाली असावी??? जर ते उगाचच, एकाएकी सज्जन झाले व कर भरू लागले तर, ते अच्छे दिन आल्याचे ठळक लक्षण नाही का?

३. केवळ, 'पाच-दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी देशात आत्महत्या होत आहेत' असा मोठा गदारोळ असताना, दरवर्षीचे कोटी किंवा जास्त रुपये उत्पन्न "एकदम किरकोळ बाब" कशी काय ठरते बुवा? "की, किरकोळ रकमेचा आकडा, आपल्या सोईच्या मुद्द्याप्रमाणे हवा तसा वर-खाली होतो?

४. बाकीचं जाऊ द्या, त्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे सुद्धा खूsssप गैरसोईचे आहे... त्यापेक्षा, ते खोडणारा कोणताही पुरावा न देता "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे" असे म्हणणे कित्ती कित्ती सोप्पं, नाही का?!

=========================
अवांतर :

* : "वीस वीस लाख रुपये घेऊन भारतभर फिरणार्‍यांना एक कोटी काही फार मोठी रक्कम नाही" अशी कुजबूज ऐकू आली... पण, "हँ, हँ, हे सगळं पटत नाही / अविश्वासू आहे / खोटं आहे," असे म्हणत, मी नाही दिले लक्ष तिकडे! :)

करोडपतींनी रिटर्न्स भरण्याचा आणि नोटबंदीचा संबंध कसा जोडला आहे ते आधी सांगा. (जसा ट्रकचा आणि माझ्या विधानाचा जोडला तसा)
....
बाकी तुमचं रिटर्न्सच लाॅजीक खूपच तकलादू आहे. मला टंकाळा असल्याकारणाने उत्तरे नाही द्यायची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Nov 2018 - 9:13 am | डॉ सुहास म्हात्रे

:)

अत्युत्तम ! मलाही झोपेचे सोंग घेणार्‍यांना उठविण्यात अजिबात रस नाही ! ;)

विशुमित's picture

7 Nov 2018 - 9:33 am | विशुमित

शुभ दिपावली...!!

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Oct 2018 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

I-T dept launches major drive against Indians with illegal foreign assets; thousands under scanner

संशय असलेल्या अनेक महत्वाच्या आणि/किंवा अतीश्रीमंत व्यक्तींची परदेशात असलेली बँक खाती आणि इतर स्थावर व जंगम मालमत्तेबद्दल आयकर विभागाने विचारणा सुरू केली आहे. त्यांच्याकडे ती संपत्ती कशी आली याबद्दल व तिच्या वैधतेबद्दल माहिती देण्यासाठी आयकर विभागाने नोटीसेस जारी केल्या आहेत. भारतिय कायद्याप्रमाणे सर्वसाधारण निवासी भारतियांना, काही खास नियमांप्रमाणे मिळालेल्या सरकारी परवानगीशिवाय, परदेशात संपत्ती ठेवण्यास परवानगी नाही.

भूतकालात सरकारने कधीही विचारातही न घेतलेल्या या मोहिमेचे फलित काय निघेल याबद्दल खूपच उत्सुकता आहे.

डँबिस००७'s picture

22 Oct 2018 - 9:57 pm | डँबिस००७

ईतक्या अडचणीचे प्रश्न कसे काय विचारता तुम्ही ?
आता एक्सपर्ट विष्लेषण करायला कोणी येणार नाही !!
फारतर झुमरीतल्लय्यातील नगर पालिकेत कोणी दुय्यम क्लर्कने चिरिमीरी घेतली ह्या संशयावरुन सरळ मा पं प्रधान यांना धारेवर धरणारे लोक आता तोंड उघडणार नाहीत !!

साहेब सरकारी बाबूंचे टार्गेट वाढलेत. आहात कुठे??

आसं सरकारी बाबूंची टार्गेटं वाढ्वून लोकान्ला शिद्द्या लायनित आणायला जमत आसंल तर ह्ये लई अदुगर करायला हवं व्हतं नाय का? त्येच्यातबी काटाच दिसतुया का?

का बाबू लोकान्ला घाबरून लोकं नस्लेलं पैकं दाकवून त्येच्यावरचा ट्याक्स भरायला लागली आसं म्हन्ताव? =)) =)) =))

तोतरे बोलणं सोडलं तर बरं होईल. काही टोटल लागेना

बाकी समद्या न्येत्यांच्या आनी जन्तेच्या, बोल्लेल्या आनी न बोल्लेल्या गोश्टी फटाफट समजनार्‍या तुमाला ह्येची टोटल लागना व्हय ??? ही ही ही. आसूद्या, आसूद्या !

आत्ता ! रस्तावरचा फाईन जमा करायचा टार्गेट आनी आयकर जमा करायचा टार्गेट हेच्यातला फरक आसतो का नाय? बाबू मागं लागला म्हनून कोन आपला पैसा वाढवुन दावील आनी त्येच्यावर टॅक्स भरंल? कायच्या काय?

बाब्बौ, इतर लोकं ह्ये समदं वाचत्यात, त्येन्ला बी डोक्सं आसतंय, आनी त्ये बी वाचून लिवनार्‍याचा बरावाईट इचार करत्यात, ह्ये तरी समजून लिवा, कसं?

First Made-in-India engine-less train gets on track for trial run

The first train set conceptualised, designed and manufactured completely in India, which looks like a bullet train, will be released for trial in a week’s time. A train set is a rake which is self-propelled and does not need a locomotive, said Sudhanshu Mani, general manager of Integral Coach
Factory (ICF) which has designed and manufactured the train set, known as Train-18, at a cost of Rs 100 crore. A second rake would be ready by March, with costs expected to reduce as more rakes are manufactured.
Built for a quick intra-day travel on Shatabdi Express routes like Delhi-Bhopal, Chennai-Bengaluru and Mumbai-Ahmedabad, the sixteen-coach train has the latest amenities and can cut down on travel time by 10-15%. The train has better acceleration than conventional trains as it has 50% more power and is equipped with a smart braking system consisting of regenerative and electro-pneumatic braking imported from Hungary.

स्वातंत्र्यानंतर भारतात स्वतःची हाय स्पीड रेल्वे बनवायला ७ दशक लागली. दरम्यान जगातल्या पहील्या काही रेल्वे चालवण्याचा मान हा ब्रिटीश ईंडीयाला जातो. ब्रिटीशांनी भारतात ९४,००० किमीच रेल्वे जाळ बनवलेल होत. मात्र ब्रिटीश गेल्यावर मात्र सत्तेत असलेल्या सरकारला त्या रेल्वेच्या पसार्यात फक्त १०,००० किमी रेल्वेची भर टाकता आली. गेल्या चार - पाच वर्षांत रेल्वेच जाळ अजुन २५,००० किमी ने वाढलेल आहे.

श्री मा मोदीजीच्या मेक ईन ईंडिया खाली आता हाय स्पीड रेल्वेही भारतात बनुन तयार झालेली आहे. १८ महीन्यात डिझाईन ते फिनिश किमान स्पीड २२० किमी/ तास सध्या चाचणीचा स्पीड १६० किमी/ तास.

गामा पैलवान's picture

23 Oct 2018 - 6:56 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो.

१.

आपल्याच घरातील कन्या, माता, भगिनीं, भार्यांचे स्वातंत्र्य आणि आधिकार (अ)सुरक्षीत करण्यासाठी भांडवलशाही, समाजवाद ते परधर्मीय कॉन्स्पिरसी थेअरीज कशासाठी ?

घर आपलं आहे. घरातल्या कन्या, माता, भगिनीं, भार्यांही आपल्या आहेत. अगदी तस्सेच अय्यप्पाही आपलेच आहेत. आपल्याच स्वामींनी घालून दिलेले नियम आपणंच पाळायचे असतात.

२.

अन्यायाने मनातील श्रद्धा आणि भक्ती विरुन जाण्याची शक्यता असते . हिंदूधर्मीय संकुचित कर्मठ अंधश्रद्धा आणि अन्यायच नास्तिकतेला आणि परधर्म शरणतेला पाठबळ पुरवत आल्याचा काही शतकांचातरी इतिहास असावा.

हे जरतरयुक्त विधान आहे. त्यामुळे ठोस पुरावा असल्याशिवाय मी हे विधान स्वीकारू शकंत नाही.

३.

१) भक्तीस काहीच अधिकार नसतील हिंदूंच्या भक्तीत जसे सर्वांचे सर्व हस्तक्षेप वैध ठरतील , त्यात न्याय आणि राज्यसंस्थेची हस्तक्षेपही वैध ठरतात.

यथोचित बंधनं पाळूनंच भक्ती करायचा अधिकार मिळतो. उद्या साधू नग्न असतात म्हणून कोणीही कुठल्याही मंदिरात नागव्याने प्रवेश करायचा अधिकार गाजवू पाहील तर त्यास / तीस मंदिरप्रवेश नाकारण्यात येईल.

४.

२) तुमची मुर्तीपुजा ते अनेक देवता वाद नाकारुन तुमच्या भक्तीत अब्राहमीक धर्म ते मुस्लीम राज्यकर्ते यांनी केलेले हस्तक्षेप ज्यात मुर्ती / मंदिर भंजन ते जिझीया कर लावणे याचाही समावेश व्हावा हे भक्तांच्या भक्तीला काहीच आधिकार उरले नाही तर वैध ठरते.

भक्तांच्या अंगात जिझिया कर झुगारण्याची वा मूर्तीभंजन थांबवण्याची शक्ती नसू शकते. पण म्हणून कुठलाही हस्तक्षेप वैध होत नाही.

५.

हिंदू धर्मात भक्ताचा ईश्वरावर आधिकार फार मोठा आहे. ईश्वराच्या घरी आलेल्या भक्ताला ईश्वराला अतिथी म्हणूनच स्वागत करावे लागते, भक्त ईश्वरालाही शाप देऊ शकतात.

वय वर्षे १० ते ५० वाल्या बायकांसाठी खुशाल अतिथीगृहे बांधावीत. त्यांचं गाभाऱ्यात काम नाही.

६.

अख्खी भगवद गीता आधिकारांसाठी संघर्ष करण्यास सांगते.

साफ चूक. गीतेतून कर्तव्य करायची प्रेरणा मिळते.

७.

आयप्पाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अतिथी स्त्रीस परत पाठवणे हिंदूसंस्कृती च्या आतिथ्य संस्कारानुसार अनुचित असावे.

वय वर्षे १० ते ५० वाल्या बायकांसाठी खुशाल अतिथीगृहे बांधावीत.

८.

हिंदू धर्मात मुर्ती दैविक व्यक्ती म्हणून जोडली आहे. दैविक व्यक्ती असलेल्या मुर्तीवर श्रद्धा निर्माण करुन दिली जाते आणि अगदी तिला जेव्हा गरज आहे तेव्हा मुर्तीपासून दूर ठेऊन केवळ नामस्मरण कर म्हणून आधिकार नाकारला जातो ?

हे कथन अतिशय रोचक आहे. कारण की शेवटी जो प्रश्न केलाय त्याचं उत्तर आधीच्या विधानात आहे. मूर्तीचे म्हणून स्वत:चे नियम आहेत. नेमक्या याच कारणासाठी तिचं पावित्र्य व शुचिता काटेकोरपणे पाळावी लागते. म्हणून तरुण स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश नाही.

९.

(या न्यायाने वीर्य उत्सर्जीत होणार्‍या वयातील सर्व पुरुषांनाही मुर्तीपुजेपासून सक्तीने दूर का ठेऊ नये ?)

माझ्या माहितीप्रमाणे या व्रतासाठी पुरुषांनी ४० दिवस लैंगिक संबंध टाळायचा असतो. तसंही पाहता पाळी आपोआप येते, तर वीर्य मुद्दामून काढावे लागते.

१०.

वैज्ञनिक दृष्ट्या पहाता पाळी सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे ती अपवित्र कशी असू शकेल ?

वैज्ञनिक दृष्ट्या पहाता मलमूत्रविसर्जन सजीव सृष्टीच्या चैतन्यपूर्ण सृजनातील सुदृढतेसाठीची महत्वाची प्रक्रीया आहे. तरीही ती अपवित्र आहे.

११.

अगदी होय, त्या हिंदू धर्मशास्त्राचे अध्ययन केले आहे ज्यात कोणत्याही विवाहीत गृहस्थाची ईश्वरचरणी उपासना -अगदी ब्रह्मदेवाची सुद्धा - अर्धांगिनी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही.

अशा प्रसंगी तुम्ही अंचनकोविल येथे जावे हे उत्तम. या ठिकाणी स्वामी अय्यप्पा गृहस्थी पुरुष आहेत. तिथे बायकांना गाभाऱ्यात थेट मूर्तीपर्यंत प्रवेश आहे.

१२.

त्यामुळे आयप्पा मंदिरात सध्या होणारी अर्धांगिनी सोबत नसतानाची गृहस्थांची उपासना अर्धवट रहाते त्यामुळे अन्याय केवळ स्त्रीयांवरच नाही सर्व गृहस्थ पुरुष भक्तांवरही होतो आहे. त्यांची उपासना प्रयत्न करुनही अर्धवट ठेवली जात असल्याने त्या भक्तांवर तो अन्याय आणि अन्यायच आहे.

आजिबात नाही. उलट शबरीमालात स्त्रियांना गाभाऱ्यात प्रवेश दिल्यास स्वामी अय्यप्पांना संन्याशी म्हणून पुजणाऱ्या भक्तांवर अन्याय होतो. तो तसा होता कामा नये.

१३.

ज्या नियमांचा आधारच ईश्वरीय सजीवांना विषमतेची वागणूक असू शकेल असे काही नियम कुठे असतील तर त्या नियमांचे स्वतःचेच पावित्र्य संपलेले असते .

हे पार दिशाभूलजनक विधान आहे. सृष्टी विषमतेवर चालते. समानता ही एक अफूची गोळी आहे. समानतेच्या नावाखाली मृगजळाच्या मागे धावणे चालू आहे.

१४.

हिंदू धर्म अवतार आणि अगदी ईश्वरासही अनिर्बंध स्वातंत्र्यही देताना दिसत नाही.

मग तुम्हाला तरी चालू प्रथा मोडायचं स्वातंत्र्य कशास हवंय? या प्रथेमुळे कोणाचाही जीव जात नाहीये. की कुणाचंही आयुष्य बरबाद होत नाहीये. मग तुम्हाला ती मोडायचीये कशाला?

१५.

अवताराने ज्या स्त्रीयांच्या मनात ईच्छा निर्माण करुन बोलावून घेतले त्या स्त्रीयांना दर्शना पासूनवंचित करणारे ईतर कोण ?

प्रस्तुत प्रसंगी कुण्या स्त्रीस दर्शनाची इच्छा झाली नसून न्यायालयाने हस्तक्षेप करून निकाल दिला आहे.

१६.

जेव्हा अवतार न्यायाधीश , पोलीसी, सरकारी अवतार धारण करुन दर्शन घेऊ ईच्छित स्त्रीयांना दर्शनाची मोकळीक देईल तेव्हा हिंदू धर्मातील उदात्ततेस ग्रहण झालेले व्हिलनीश भोंदू खोटे भक्त -आता पर्यंत सुधारणा वादासमोर बर्‍याच गोष्टीत विरघळलेत - एक दिवस याही बाबतीत विरघळून जातील .

तोवर चालू प्रथांची मोडतोड न करता अवताराची वाट पहाणे श्रेयस्कर.

आपला नम्र,
-गामा पैलवान

विशुमित's picture

24 Oct 2018 - 12:37 am | विशुमित

उलटच घडतय. यांच्याच खात्यात पैसे भरायला सांगत आहेत.
मिपावर बरीच देणगी गोळा होईल नाही?
007 नी भरली पण असेल कदाचीत.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/pm-narendra-modi-urges-people-...

मुक्त विहारि's picture

25 Oct 2018 - 1:05 am | मुक्त विहारि

कारण, अ‍ॅप द्वारे भरलेल्या देणागीचा स्त्रोत तर नकीच लागू शकतो, असे वाटते.

देणगी जर व्हाईट मनी असेल तर द्यायला काही हरकत नसावी.मग ती मंदिरात असो किंवा एखाद्या ट्रस्टला...

विशुमित's picture

25 Oct 2018 - 1:14 am | विशुमित

माझा रोख वेगळा होता. ती बहुचर्चित रक्कम कोण कोणाच्या खात्यात जमा करायचे होते हा विषय होता. Nothing serious.
....
साहेब असे बोललेच नव्हते या चर्चेत मला रस नाही. कृपया ती टाळवी.

मुक्त विहारि's picture

25 Oct 2018 - 1:30 am | मुक्त विहारि

तो काही मला समजला नाही...

पण, भाजपा जर अ‍ॅप द्वारे पैसे देणगी मागत असेल तर, कुणी-किती=कधी देणगी दिली आहे? हे आयकर खाते नक्कीच शोधू शकत असेल, असा माझा होरा आहे.

हर एक के खाते मै 15 लाख आ सकते है/ डालेंगे वगैरे वगैरे..
...
( मी याबाबत शाशंक आहे. उपरोधिक प्रतिसाद होता)

असा अट्टाहास धरु नये आणि अपेक्षा पण करू नये...

कुठल्याही लोकशाहीत किंवा राजेशाहीत, असेच चालते.

पैसा लवकर कुणीच सोडत नाही...मग ती "गरिबी हटाव" ही घोषणा असू दे किंवा "हर एक के खाते में १५ लाख"... अशा घोषणा ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या...

अहो, ह्यांना धड "एक रुपयात झुणका भाकर" ही योजना पण ५ वर्षे राबवता आली नाही.... हे कुठले १५ लाख देतात?

नगरीनिरंजन's picture

24 Oct 2018 - 10:25 am | नगरीनिरंजन

सीबीआयमध्ये मोदींचा माणूस व नॉर्मल प्रोसेसने आलेला माणूस ह्यांच्यात झगडा होऊन सीबीआयची प्रतिष्ठा धुळीस मिळाली.
त्याबद्दल इथे चकार शब्दही नाही.
लोकशाहीत लोकांनी सरकारचे टीकाकार असले पाहिजे ह्या गैरसमजुतीतून मी मोदीसरकार विरोधात काही प्रतिसाद लिहीले.
इथल्या ब्रह्मवृंदाला लोकशाही व त्यातल्या आरबीआय, सुप्रिम कोर्ट व इतर सरकारी संस्थांबद्दल देणेघेणे नसल्याचे कळते आहे.
मोदीसरकार विरोधात गैरसमजातून प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल जाहीर क्षमा मागतो. जेव्हा मोदींच्या हातात सगळ्या संस्था व सत्ता जाईल तेव्हा कृपया मला लींच करु नये ही विनंती.
इथून पुढे मोदीसरकार विरोधात चकार शब्दही काढणार नाही.
क्षमस्व.
हर हर मोदी!

माहितगार's picture

24 Oct 2018 - 2:42 pm | माहितगार

या प्रतिसादापुरते आपण मिपाचे सत्ताधीश

....लोकशाहीत लोकांनी सरकारचे टीकाकार असले पाहिजे....

आपण मत देऊन निवडून दिलेल्यावर पुढच्या सेकंदाला टिका चालू करता का ? आपण आपले मत डायरेक्ट मोदींन तर दिले असणार नाही कोणा तरी खासदाराला दिले असणार. आपण आजतागायत मत दिलेल्या खासदारावर मिपावर अथवा मिपा बाह्य टिकेबद्दल एक धागा लेख टाकावा. किंवा अलरेडी टाकून झाला असल्यास दुवा द्यावा हि नम्र विनंती.

विरोधी पक्षांनी सरकारवर टिका करणे त्यांचे काम आहे. लोकशाहीत सरकार निवडून देणार्‍या जनतेने दुसर्‍या क्षणापासून सरकारचा विरोध करावा हि अपेक्षा अचंबित करणारी आहे. लोकशाहीत नागरीकांनी सुजाण असावे हे ऐकले होते प्रत्येक नागरिकाने प्रत्येक वेळी फक्त विरोधक असावे हे ऐकले नव्हते. निवडून गेलेल्यांना विरोधासाठी विरोध करायचा असेल आणि त्यांना राजशकट चालवूच द्यायचा नसेल तर विरोधी पक्षालाच देश चालवायला देण्याची व्यवस्था राज्यघटनेत करावी, निवडून गेलेल्यांच्या हातात सत्ता कशासाठी द्यायची.

बाकी सध्याच्या उपराष्ट्रपतींचे वाक्य तसे प्रॅक्टीकल असावे विरोधकांना 'से' असावा पण 'वे 'सत्ताधारी पक्षाकडेच असावा. विरोधासाठी
विरोध करणार्‍यांनी उपराष्ट्रपतींच्या या वाक्याचा विरोध अवश्य करावा.

....इथल्या ब्रह्मवृंदाला .....

आपण उपरोक्त प्रतिसादापुरते मिपाचे सत्ताधीश झाला म्हणजे मिपा काय ब्रह्मवृंदाला आंदण देणार? एवढा वर्णवाद ? तळ्यात फक्त हंसानीच रहावे आणि बगळ्यांनी राहूच नये असे काही आहे का ?

बाकी चालू द्या

विशुमित's picture

24 Oct 2018 - 8:30 pm | विशुमित

जुमले के उपर जुमले. 2019 तक ही झुमले!

https://www.loksatta.com/maharashtra-news/shivsmarak-is-election-jumala-...

सुबोध खरे's picture

24 Oct 2018 - 8:48 pm | सुबोध खरे

या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही असं सांगताना तांडेल यांनी या स्मारकाच्या संकल्पनेवरच आक्षेप घेतला आहे
याना पश्चिम नौदल कमांडचा ध्वजाधिकारी (FLAG OFFICER COMMANDER-IN-CHIEF) करून टाकावे असा PIL मुंबई उच्च न्यायालयात दाखल करता येईल.

विशुमित's picture

25 Oct 2018 - 1:25 am | विशुमित

जरूर करा PIL! आले तुमच्या प्रयत्नांना यश तर आले. तांडेलांची लाईफ बनेल.
पण तेवढं तांडेल यांच म्हणणे खोडून काढाल की जे आधी जिथे जलपूजन केले होते ती तीच जागा होती.

सुबोध खरे's picture

25 Oct 2018 - 9:15 am | सुबोध खरे

आपली समज "एवढी" कमी आहे यावर माझा विश्वास नाही.
बाकी चालू द्या

विशुमित's picture

25 Oct 2018 - 1:37 pm | विशुमित

नाही माहित उत्तर तर नाही म्हणा. नाही म्हणालात तरी चालेल . सांगायचे नसेल तरी चालेल पण उगाच गोल गोल कशाला फिरवता हे मात्र समजत नाही.

सुबोध खरे's picture

25 Oct 2018 - 7:14 pm | सुबोध खरे

कोण कुठला तांडेल
आणि
कोण कुठला जुमला

अहमदशाह अब्दालीची शेंडी बाजीरावाला चिकटवायची?

नव्हतं माहिती तर गप्प बसायचं ना. कशाला PIL च्या शेंड्या लावायच्या??
बरोबर की नाही?

सुबोध खरे's picture

26 Oct 2018 - 10:16 am | सुबोध खरे

या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही

हे वाक्य बोलणाऱ्या एका मच्छीमाराची भलामण करताय?

आपण शेती करतो म्हणून आपण डॉ. स्वामिनाथन यांच्या लायकीचे झालो समजणाऱ्या शेतकऱ्यासारखीच हि स्थिती आहे आणि तुम्ही त्यांची तळी उचलताय?

भाजप द्वेष इतका खालच्या थराला जावा?

बढिया है!

सुबोध खरे's picture

26 Oct 2018 - 10:38 am | सुबोध खरे

शिवस्मारकाची वस्तुस्थिती मी त्यावर काढ्लेल्या धाग्यात मांडलेली होती. या स्मारकाला पाठिंबा मी दिलेला नव्हता किंवा केवळ श्री मोदींचा समर्थक म्हणून मी अशा स्मारकांना पाठिंबा देणार नाही. खाली माझा प्रतिसाद दिलेला आहे.

https://www.misalpav.com/node/38323

बोका शेट
हा प्रकल्प अगोदरच्या सरकारने मंजूर केला आहे त्याबद्दल त्यांनी "काहीच केले नाही". आपण म्हणता तसे या सरकारला हा प्रकल्प पूर्ण करणे हि राजकीय अपरिहार्यता आहे. हा प्रकल्प "करणार नाही" हे म्हणणे कुणालाच राजकीय दृष्ट्या शक्य नाही.पण त्यातून आताच्या सरकारला त्याचा राजकीय फायदा होणार आहे याचा हा पोटशूळ आहे.
प्रकल्पाला विरोध करणे हि राजकीय आत्महत्या आहे हे सर्वाना माहिती आहे त्यामुळे तो मुद्दा बाद ठरतो
उद्या प्रकल्प झाल्याने जनमत या सरकारच्या बाजूने झाले तर तेलही गेलं तूप हि गेलं हि स्थिती होते आहे म्हणून काँग्रेस किंवा राष्ट्रवादी लोक याच्या खर्चाचा मुद्दा उगाळत आहेत. मूळ प्रकल्पाचा खर्च अवाढव्यच होता( महागाई गृहीत धरली तर खर्च तेंव्हा होता तितकाच खर्चिक होता/आहे).
अस्मितेचा प्रश्न आला कि बाकी सर्व मुद्दे मागे पडतात.
बाकी सुश्री मायावती यांनी ४०००० कोटी रूपये स्वतःच्या हत्तीच्या आणि डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यावर खर्च केले
http://www.rediff.com/news/slide-show/slide-show-1-mayawati-s-parks-elep...
त्यावर मिपा वर चर्चा किंवा घमासान झाल्याचे आठवत नाही. कदाचित तसे करणे म्हणजे प्रतिगामी ठरण्याची भीती असावी.

विशुमित's picture

26 Oct 2018 - 7:37 pm | विशुमित

कश्मिर मधे ऑपरेशन करायला जायचं असेल तर गाईड म्हणून स्थानिक पोर्टर पोरांना ब्रिगेडियर लेवलचे अधिकारी बरोबर नेतात.
कशामुळे?
....
अजून एक उदाहरण देतो.
भालकूराम नावाच्या मेंढपाळाने कालका-शिमला रेल्वे लाईन टाकण्यात ब्रिटिश इंजिनियरस ना मोलाचे मार्गदर्शन केलं होते.
https://blogs.timesofindia.indiatimes.com/thediaryofacontrarian/the-forg...
....
सामान्य माणसाला निच समजणे ही खूप हीन विचारसरणी आहे. जमलं त्यातून बाहेर पडा. प्रेमाचा सल्ला.
.....

शरद जोशींनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीना केराची टोपली दाखवली होती. त्यांच्या कौतुक सोहळ्याचा अजून तरी शेतकर्याना अपेक्षित फायदा मिळाला नाही.
....
बाकी भाजपप्रेम इतकं उतू जावे असे काही त्यांचे विषेश कर्तुत्व नाही.

सुबोध खरे's picture

26 Oct 2018 - 9:04 pm | सुबोध खरे

अपवादाने च नियम सिद्ध होतात

मार्मिक गोडसे's picture

26 Oct 2018 - 8:24 pm | मार्मिक गोडसे

आपण शेती करतो म्हणून आपण डॉ. स्वामिनाथन यांच्या लायकीचे झालो समजणाऱ्या शेतकऱ्यासारखीच हि स्थिती आहे आणि तुम्ही त्यांची तळी उचलताय?
जमल्यास खालील पुस्तक वाचा, गैरसमज दूर होण्यास मदत होईल.

https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/5456605441957111386

त्यांच्या दृष्टीने फक्त एकच मसिहा आहे सर्वब्रह्मांडनायक !
बाकी सगळे किडेमुंग्या. असो.
जास्त नको बोलायला नाहीतर कर्नल गोळी (बंदुकीची नाही बरं) मारायचे. (डाॅ हा.घ्या)

मार्मिक गोडसे's picture

27 Oct 2018 - 9:07 am | मार्मिक गोडसे

एके ठिकाणी नदीकाठी कोळ्याची मुले कमरेभर पाण्यात उभे राहून पाण्यातील बिळात हात घालून जिवंत वाम पकडत होते. त्यांना मी विचारले, बिळात वाम आहे हे कसे कळते तुम्हाला? वाम असलेल्या बिळातील पाणी थोडे कोमट असते असे त्यांनी सांगितले.
काही लोकं प्रत्यक्ष अनुभवातून शिकत असतात, तर काही पुस्तकातून. पुस्तकातून शिकलेले अशा अडाणी परंतू अनुभवी लोकांचा तिरस्कार करत असतात, त्यांना स्वतःच्या शिक्षणाचा गर्व असतो, अशांना पोकळ बांबूचे फटके मारावे लागतात.

सुबोध खरे's picture

27 Oct 2018 - 9:54 am | सुबोध खरे

कोणीही श्री मोदींच्या/ भाजपच्या विरोधात बोलले कि त्याचे समर्थन करण्याचा किती द्वेषांधपणा.
हे महाशय काय म्हणत आहेत
या समुद्राची आमच्याएवढी कुणाला माहिती असू शकत नाही
अशी दर्पोक्ती करणाऱ्या अहंमन्य माणसाचे समर्थन करण्याचा किती अट्टाहास
शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करणाऱ्या अनेक संस्था भारतात कार्यरत आहेत. येथील अनेक लोकांनी भारतीय सागरी भागाचे संशोधन करण्यात आयुष्य वेचलेले आहे
उदाहरणादाखल खालील दुवे तपासून घ्या( जर डोळे उघडे ठेवण्याची इच्छा असेल तर)
https://en.wikipedia.org/wiki/National_Institute_of_Oceanography,_India
https://en.wikipedia.org/wiki/National_Institute_of_Hydrology
http://www.indiannavy.gov.in/nih/hi
http://nfdb.gov.in/index.htm

EGIS India हि कंपनी शिवस्मारक प्रकल्पाची योजना तयार करत आहे त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल कि नाही.ज्यांच्या आंतरराष्ट्रीय मूळ कंपनीची प्रतिष्ठा इतकी सहज धुळीस मिळवतील काय? लार्सन अँड टुब्रो हि कंपनी ज्यांनी हे कंत्राट घेतले आहे ते विना अभ्यास समुद्रात भराव घालतील काय?
बोट उलटून एक दुर्दैवी अपघात काय झाला लगेच जुमला? केवळ द्वेषापायी एका मच्छीमर कृती समितीच्या माणसाची दर्पोक्ती आणि अहंगंडाचे( आमच्या इतकी माहिती कुणालाच असणे शक्य नाही) समर्थन
इतकी द्वेष बुद्धी?
असो आपली द्वेषबुद्धी आपल्यालाच लखलाभ होवो.
यावर अधिक वितंडवाद घालण्याची माझी अजिबात इच्छा नाही.
भद्रम ते भवतु!

मार्मिक गोडसे's picture

27 Oct 2018 - 10:18 am | मार्मिक गोडसे

इथे मोदी द्वेष कुठून आणला तुम्ही? तुम्ही तुलना करताना दिलेली उदाहरणे बघा, कष्टकऱ्यांचा द्वेष किती करायचा ह्याला काही मर्यादा?

सुबोध खरे's picture

27 Oct 2018 - 10:29 am | सुबोध खरे

गोडसे बुवा
तुम्हाला मी प्रतिसाद देण्याचे कधीच थांबवले आहे.
कशाला मध्ये मध्ये तोंड घालताय?

मार्मिक गोडसे's picture

27 Oct 2018 - 11:03 am | मार्मिक गोडसे

लक्षात ठेवा. मी काय करायचं ह्यात लुडबुड करू नका.

सुबोध खरे's picture

27 Oct 2018 - 11:30 am | सुबोध खरे

मी तुम्हाला प्रतिसाद दिलाच नव्हता. तुम्हीच उगाच यात तोंड घालताय.

तुम्ही स्वतंत्र धागा काढा कि. तो तुमचा प्रश्न आहे.

मला त्यात गुंतवू नका. --/\--

डँबिस००७'s picture

24 Oct 2018 - 10:21 pm | डँबिस००७

2019 तक ही झुमले!

सही आहे, २०१९ निवडणुकी पर्यत झुमले ! त्या नंतर परत पाच वर्षांसाठी खोल खोल गर्तेत !

विशुमित's picture

25 Oct 2018 - 1:26 am | विशुमित

पाच नाही पन्नास म्हणा हो!

डँबिस००७'s picture

24 Oct 2018 - 10:54 pm | डँबिस००७

" जुमले " " जुमले " ओरडा ओरड याच्या दरम्यान

स्टॅचु ऑफ युनिटी अश्या सार्थ नावाने स रदार पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा भारत देशात तयार झालाय व त्याच उद्द्घाटन येत्या ३१ ऑक्टोबरला होत आहे.

गेल्या ७० वर्षांत स्वतंत्र भारतात जगाच्या पाठीवर छाप पाडेल अस स्ट्रक्चर उभ झालेल नाहीय. ७ आश्चर्या पैकी ताज महाल सोडुन
त्यानंतर भारतात असा प्रयत्नच झालेला नाही.

सदा न कदा पैश्याची रड, म्हणे तेच पैसे गरीबांच्या कल्याणा करता वापरता आले असते वैगेरे वैगेरे !
ह्या अगोदर तर असा कोणताही प्र कल्प उभा केलेला नाही ना मग ७० वर्षांत का गरीबाच कल्याण केल नाही ?

म्हणजे आता लय पैसा गोळा झाला आहे असे म्हणायचं आहे का तुम्हाला??
(संपादित)

गामा पैलवान's picture

27 Oct 2018 - 12:40 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

आमच्या इतकी माहिती कुणालाच असणे शक्य नाही

माला वाटतं की या वाक्याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. प्रस्तुत प्रसंगात एकाचा जीव गेला आहे. तसंच श्री. दामोदर तांडेल यांनी स्वत:हून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा नक्कीच गंभीर मामला आहे.

तांडेलांचं वक्तव्य शासनाच्या अधिकृत संस्थांविरुद्ध नाही. नियम धाब्यावर बसविणाऱ्यांना उद्देशून आहे. विधानाचा वाव त्यापेक्षा जास्त विस्तारित नसावा.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

27 Oct 2018 - 1:03 pm | सुबोध खरे

गा पै साहेब
एखाद्याचा अपघातात जीव गेला तर ती गंभीर गोष्ट नक्कीच आहे.त्याची चौकशी महाराष्ट्र शासन करीत आहेच. त्यात तिसऱ्या माणसाने पोलिसात तक्रार करण्याचे कारण (LOCUS STANDI) काय? अपघाताचे कारण काढून आपली पोळी भाजून घेणे हि गोष्ट अतिशय हीन आहे.

तेथे असणाऱ्या मच्छीमार बांधवांचा या प्रकल्पाला विरोध आहे हि गोष्ट सर्वाना माहिती आहे. त्यांच्या मासेमारी या व्यवसायावर गदा येते या त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेलच.त्यासाठी त्यांनी शासन दरबारी अर्ज करावा नाही तर न्यायालयात न्याय मागावा. पण दिवंगत व्यक्तीच्या मृत्यूवर आपली पोळी भाजून घेणे सर्वथा चूक आहे. (अपघाताचे भांडवल करणे हा राजकारणाचा भाग आहे.)

आणि आम्हीच सर्वज्ञ आहोत या म्हणण्याला अहंकाराचा वास आहे.

प्रकल्प तेथे नक्की करण्याच्या अगोदर त्याची व्यवहार्यता(FEASIBILITY STUDY) इ सर्व गोष्टी झालेल्या असतातच. त्यासाठी समुद्र तळाचा आणि तेथल्या सर्व ऋतूमधील पाण्याच्या प्रवाहांचा अभ्यास केलेलाच असतो. त्यासाठी केवढे मोठे सर्वेक्षण होत असते. त्याशिवाय असे प्रकल्प हाती घेतले जात नाहीत आणि सरकारने( राजकारणाचा भाग) म्हणून केले तरी खाजगी कंपन्या त्यात हात घालणार नाही.

नौदलात असल्याने अशा तर्हेच्या प्रकल्पात केवढ्या मोठ्या प्रमाणात अभ्यास केला जातो याची मी बऱ्यापैकी माहिती मिळवली होती.

समुद्रात प्रकल्प उभारतात तेंव्हा तेथे किती गाळ जमा होतो. गेल्या १०० वर्षात झालेली वादळे यांची साद्यन्त माहिती गोळा केली जाते. त्या जागेवरील समुद्राच्या तापमानातील बदल समुद्राची क्षारता( SALINITY) CORROSIVITY इ गोष्टी सुद्धा तपासून पाहायला लागतात. अन्यथा समुद्रात टाकलेल्या कॉंक्रिटमधील लोखंड लवकर गंजून त्या वास्तूला मोठा धोका होऊ शकतो. एवढ्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्याशिवाय कोणती सरकारी/ खाजगी कंपनी त्यात हात घालेल?

आमच्या इतके ज्ञान कुणालाच नाही म्हणणाऱ्या आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या माणसांच्या अहंकाराबद्दल मला आणखी काहीच म्हणायचे नाही.

गामा पैलवान's picture

27 Oct 2018 - 6:02 pm | गामा पैलवान

खरे डॉक्टर,

माहितीबद्दल धन्यवाद. मात्र तांडेलांचं वक्तव्य शासनाच्या अधिकृत संस्थांच्या विरोधात नाहीये किंवा नसावं.

तांडेल यांनी विनायक मेटेंच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अधिक माहिती : https://divyamarathi.bhaskar.com/news/complaint-against-mla-vinayak-mete...

दामोदर तांडेलांकडे तुम्ही म्हणता ती लोकस स्टँडी नाही. म्हणून त्यांनी पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे.

वरील घटनेचा स्मराकाच्या औचित्याशी कसलाही संबंध नाही. तो पार वेगळा मुद्दा आहे. शासनाने तांडेल यांचं म्हणणं ऐकलं असेल अशी आशा आहे. नसल्यास शासन, मच्छिमार व स्मारकाच्या उर्वरित पक्षकारांनी (=स्टेकहोल्डर्स) एकत्र येऊन विचारविमर्श करावा.

माझ्या मते समुद्राच्या माहितीबाबतचं श्री. तांडेल यांचं वक्तव्य अहंकारी म्हणून झटकून टाकू नये. ते दुर्घटनेशी संबंधित असल्याचं गृहीत धरून पुढील कारवाई व्हावी.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध खरे's picture

27 Oct 2018 - 6:19 pm | सुबोध खरे

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दोन दिवसापूर्वीच दिले आहेत. त्याबद्दलचे सत्य बाहेर येईलच.
https://www.mumbailive.com/en/politics/cm-devendra-fadnavis-orders-enqui...

हा खूप महत्वाचा निर्णय आहे

शुक्रवारी २६ ऑक्टोबरला श्रीलंकेत राष्ट्रपती सिरीसेना यांनी पंतप्रधान राणिल विक्रमसिंघे यांची हकालपट्टी करून माजी राष्ट्रपती राजपक्षे यांची नियुक्ती केली आहे.
विशेष म्हणजे सिरीसेना यांनी २००५ मध्ये राजपक्षे यांना हरवून राष्ट्रपतीपद मिळवले होते व ते दोघ एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात.
२००५ मध्येच श्रीलंकन घटनेमध्ये दुरुस्ती करण्यात येऊन राष्ट्रपतींचे पंतप्रधानांना पदच्युत करण्याचे अधिकार काढले गेले होते.
त्यामुळे आताचा सिरीसेना यांचा हा निर्णय घटनाबाह्य असल्याचं म्हटलं जातंय.

टीप १ :
१) सिरीसेना - सध्याचे राष्ट्रपती
२) विक्रमसिंघे - परवापर्यंतचे पंतप्रधान
३) राजपक्षे - (२००५ पर्यंत राष्ट्रपती होते.) सिरीसेना यांनी काल नियुक्त केलेले पंतप्रधान

टीप २ :
या तिघांनीही मागील काही महिन्यात भारतात येऊन विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या.

टीप ३ :
मागच्या आठवड्यात कॅबिनेट बैठकीत सिरीसेना व विक्रमसिंघे यांच्यात श्रीलंकेचे एक बंदर भारताला भाड्याने वापरायला देण्यावरून वाद झाला होता.

टीप ४ :
राजपक्षे हे चीन समर्थक व भारत विरोधी समजले जातात. त्यामुळे आपल्यादॄष्टीने या घटनेचा सिग्निफिकन्स काय ते बघावं लागेल.

तुषार काळभोर's picture

29 Oct 2018 - 11:00 pm | तुषार काळभोर

श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक

श्रीलंकेत राजकीय संकट अधिकाधिक गडद होत चालले आहे. श्रीलंकेचे पदच्च्युत पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांचे विश्वासू समर्थक आणि पेट्रोलियममंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली आहे. रविवारीच रणतुंगा यांच्या सुरक्षारक्षकाने राजपक्षे यांच्या समर्थकांवर गोळीबार केला होता. ज्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. दोन जण जखमी झाले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Oct 2018 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

India jumps 23 spots, now ranks 77 in Ease of Doing Business

जागतिक बँकेने (वर्ल्ड बँक) प्रसिद्ध केलेल्या "व्यापार करण्यासाठीची सहजता (Ease of Doing Business)" यादीत भारताचा क्रमांक गेल्या वर्षीच्या १०० वरून २३ने कमी होत आता ७७ वर आला आहे. गेल्या वर्षीही भारताचा क्रमाक त्यापूर्वीच्या १३० वरून कमी होत १०० झाला होता. दोन वर्षांत क्रमांकाच्या ५३पायर्‍या पार करणे हा एक विक्रम समजला जात आहे !

(टाईम्स ऑफ इंडिया संस्थळावरून साभार)

डँबिस००७'s picture

31 Oct 2018 - 9:06 pm | डँबिस००७

India jumps 23 spots, now ranks 77 in Ease of Doing Business

मा श्री मोदीजीं व सरकारचे अभिनंदन !!

डँबिस००७'s picture

31 Oct 2018 - 9:42 pm | डँबिस००७

कर्नाटक सरकारला कोर्टाची सणसणीत चपराक !!

लाखो हिंदुची कत्तल करणार्या क्रुरकर्मा टिपु सुलतानाची जयंती दर वर्षी साजरी करण्याच काम कर्नाटक सरकार गेली काही वर्षे करत आहे ! कर्नाटकात ल्या जनतेचाच पैसा वापरुन जनतेच्या जुन्या जखमेवर मिठ चोळण्याच अमानुष काम कॉंग्रेस सरकार करत आहे , त्यावर कर्नाटक मधली जनता कोर्टात गेली ! कोर्टाने सरकारला त्यांची बाजु मांडण्यासाठी बोलावल पण सरकारने त्यावर पुर्ण दुर्लक्ष केल म्हणुन कोर्टाने सणसणीत चपराक कर्नाटक सरकारला मारलेली आहे !!

पुर्ण भारतभर हिंदु समाजाच्या जखमेवर मिठ चोळण्याच काम ईमानेएतबारे कॉँंग्रेस करत आलेली आहे !!
श्री राम जन्म भुमि सारख्या प्रकरणात सरकारने सत्याची बाजु घेतली नाही त्यामुळे आता हिंदु समाजाने आपल्या दोन लाखाच्या वर उध्वस्त केलेल्या मंदिरांचा हक्क परत घ्यावा !

आता हिंदु समाजाने जाग झाल पाहीजे व अश्या पक्षाच तोंड फोडल पाहिजे !

..... मीठ चोळण्याच काम ईमानेएतबारे कॉँंग्रेस करत आलेली आहे !!

+ १

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Nov 2018 - 5:56 pm | डॉ सुहास म्हात्रे

शक्ती अवतरला !

IIT-Madras creates ‘Shakti’, India’s first microprocessor

आयआयटी (मद्रास) ने भारताचा पहिला मायक्रोप्रोसेसर बनवला आहे. या मायक्रोप्रोसेसरमध्ये जरी अत्याधुनिक तंत्रज्ञान (cutting edge of technology) वापरलेले नसले (शक्तीचे १८०nm तंत्रज्ञान विरुद्ध अमेरिकेचे 20nm तंत्रज्ञान) तरीही, त्याचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू होऊ शकल्यास तो भारतिय तंत्रज्ञानातील एक महत्वाची पायरी ठरेल, हे मात्र नक्की. त्याच्यामुळे, केवळ मायक्रोप्रोसेसरच्या आयातीची गरज कमी होईल असेच नाही, तर सायबर अ‍ॅटॅक्सवर ताबा ठेवणे सोपे होईल. "शक्ती" असे नामकरण केलेल्या या मायक्रोप्रोसेसरचा दळणवळ व संरक्षण communication and defense sectors) या क्षेत्रांत खास उपयोग होईल असे म्हटले जाते.

आयआयटी (मद्रास) ची कौतुकास्पद कामगिरी.

गामा पैलवान's picture

3 Nov 2018 - 1:39 pm | गामा पैलवान

बातमीबद्दल धन्यवाद डॉक्टर सुहास म्हात्रे!

हे स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठाम पाऊल आहे. गणनचिप ( = मायक्रोप्रोसेसर) तंत्रज्ञान जरी अद्ययावत नसलं तरी काही बिघडंत नाही. कारण की गणनचिप हा मंडलातला (=सर्किट) सर्वात वेगवान घटक असतो. त्यामुळे मंडलवेग हा अवांतर घटकांवर अवलंबून असतो. एकंदर उरक वाढवण्यासाठी अवांतर उपकरणांचा वेग वाढवणे आवश्यक असते. त्यादृष्टीनेही संशोधन करायला भरपूर वाव आहे.

आ.न.,
-गा.पै.

मुक्त विहारि's picture

5 Nov 2018 - 1:07 am | मुक्त विहारि

भारतात स्वतःच्या मोटर कार्स पण बनत न्हवत्या...

त्यामुळे अशीच जर वाटचाल चालू राहिली तरी येत्या १५-२० वर्षात मायक्रो प्रोसेसर आधारीत बर्‍याच गोष्टी भारतात पण बनू शकतील.

स्मार्ट मोबाइल पण मायक्रो प्रोसेसर आधारीत असतो का?

(अज्ञानी) मुवि

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 Nov 2018 - 9:24 am | डॉ सुहास म्हात्रे

A microprocessor is a computer processor that incorporates the functions of a central processing unit on a single integrated circuit (IC), or at most a few integrated circuits. The microprocessor is a multipurpose, clock driven, register based, digital integrated circuit that accepts binary data as input, processes it according to instructions stored in its memory, and provides results as output. Microprocessors contain both combinational logic and sequential digital logic. Microprocessors operate on numbers and symbols represented in the binary number system.

थोडक्यात, microprocessor म्हणजे कोणत्याही संगणक व संगणकावर आधारीत (मोबाईल, काँप्युटराईझ्ड सिस्टिम्स, इ) वस्तूचा मेंदू (हार्डवेअर) असलेले integrated circuit असते... त्या वस्तूत इन्स्टॉल केलेल्या प्रणालीमधील (सॉफ्टवेअर) आज्ञा व तर्कांचा वापर करून, तो त्याला पुरवल्या गेलेली माहितीवर (इनपुट) कार्य करतो व उत्तरे (आउटपुट) तयार करतो.

इतर हार्डवेअर व सॉफ्टवेअर ती उत्तरे (आउटपुट) वापरून, स्क्रीनवर चित्र/अक्षरे दाखवणे; आवाज, चलतचित्र, हालचाल, इ स्वरूपात (उदा: गाणे, व्हिडिओ, रिंगटोन, व्हायब्रेशन, इ) प्रस्तूती करणे; निर्माण केलेला संदेश पुढे पाठवणे; इत्यादी अनेक कृती करू शकतात. हातावरचे डिजिटल घड्याळ, मोबाईल, (मांडीवरचा/टेबलावरचा) संगणक, चारचाकी, रेल्वे, विमान ते अंतराळयानापर्यंत आणि उद्योगधंद्यांतील अनेक मशिन्समध्ये आवश्यक असणारी करोडो प्रकारची कामे करायला microprocessorचा उपयोग केला जातो... किंबहुना, आजच्या घडीला microprocessorचा उपयोग असलेल्या वस्तूंच्या यादीपेक्षा, त्याचा उपयोग नसलेल्या वस्तूंची यादी करणे जास्त सोपे आहे !

गेल्या काही दशकांतली microprocessorच्या विकासाची झेप इतकी मोठी आहे की आज, संगणकशास्त्राच्या क्षमतेची सीमा 'microprocessor (किंवा एकंदरीत सर्वच हार्डवेअर) ची ताकद' नसून 'मानवी विचारशक्तीची ताकद' हीच आहे ! (Today, not 'power of microprocessor' but 'extent of human imagination' is the limit of computing.)