Skip to main content

चालू घडामोडी : ऑक्टोबर २०१८

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 01/10/2018 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
Companies pay up Rs 1.1 lakh crore for fear of insolvency action कर्ज देणे व वसूल करणे यांच्या प्रशासनासंबंधीचे (इन्सॉल्व्हन्सी व बँकरप्सी) नवीन कायदे (उदा : Insolvency and Bankruptcy Code किंवा IBC) आणल्यामुळे पूर्वी चालढकल करत बुडित कर्जांच्या दिशेने वाटचाल करणार्‍या कर्जदारांवर वचक निर्माण झाल्याचे दिसत आहे. याचा परिणाम म्हणून, याअगोदर कर्ज फेडण्याबाबत चालढकल करणार्‍या कर्जदारांनी, आतापर्यंत सुमारे रु१.१ लाख कोटीचा भरणा बँकात केला आहे. गेल्या आठवड्यात सरकारने, या वित्तवर्षांत, नाठाळ कर्जदारांकडून रु१.८ लाख कोटी वसूल करण्याचे लक्ष ठेवल्याचे जाहीर केले आहे.  कायद्याचे बळ व प्रशासकिय पाठींब्याचे (Insolvency and Bankruptcy Board of India किंवा IBBI; National Company Law Tribunal किंवा NCLT; इत्यादी) बळ व बारीक देखरेख आस्तित्वात आल्यामुळे, भविष्यात बँका आपले कर्ज वसूल करण्यात कसूर करण्याची आणि/किंवा कर्जदारांनी चलाखी करून कर्ज बुडवण्याची शक्यता फार कमी झाली आहे.

वाचने 90676
प्रतिक्रिया 213

प्रतिक्रिया

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बातमीबद्दल धन्यवाद डॉक्टर सुहास म्हात्रे! हे स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठाम पाऊल आहे. गणनचिप ( = मायक्रोप्रोसेसर) तंत्रज्ञान जरी अद्ययावत नसलं तरी काही बिघडंत नाही. कारण की गणनचिप हा मंडलातला (=सर्किट) सर्वात वेगवान घटक असतो. त्यामुळे मंडलवेग हा अवांतर घटकांवर अवलंबून असतो. एकंदर उरक वाढवण्यासाठी अवांतर उपकरणांचा वेग वाढवणे आवश्यक असते. त्यादृष्टीनेही संशोधन करायला भरपूर वाव आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

भारतात स्वतःच्या मोटर कार्स पण बनत न्हवत्या... त्यामुळे अशीच जर वाटचाल चालू राहिली तरी येत्या १५-२० वर्षात मायक्रो प्रोसेसर आधारीत बर्‍याच गोष्टी भारतात पण बनू शकतील. स्मार्ट मोबाइल पण मायक्रो प्रोसेसर आधारीत असतो का? (अज्ञानी) मुवि

In reply to by मुक्त विहारि

A microprocessor is a computer processor that incorporates the functions of a central processing unit on a single integrated circuit (IC), or at most a few integrated circuits. The microprocessor is a multipurpose, clock driven, register based, digital integrated circuit that accepts binary data as input, processes it according to instructions stored in its memory, and provides results as output. Microprocessors contain both combinational logic and sequential digital logic. Microprocessors operate on numbers and symbols represented in the binary number system. थोडक्यात, microprocessor म्हणजे कोणत्याही संगणक व संगणकावर आधारीत (मोबाईल, काँप्युटराईझ्ड सिस्टिम्स, इ) वस्तूचा मेंदू (हार्डवेअर) असलेले integrated circuit असते... त्या वस्तूत इन्स्टॉल केलेल्या प्रणालीमधील (सॉफ्टवेअर) आज्ञा व तर्कांचा वापर करून, तो त्याला पुरवल्या गेलेली माहितीवर (इनपुट) कार्य करतो व उत्तरे (आउटपुट) तयार करतो. इतर हार्डवेअर व सॉफ्टवेअर ती उत्तरे (आउटपुट) वापरून, स्क्रीनवर चित्र/अक्षरे दाखवणे; आवाज, चलतचित्र, हालचाल, इ स्वरूपात (उदा: गाणे, व्हिडिओ, रिंगटोन, व्हायब्रेशन, इ) प्रस्तूती करणे; निर्माण केलेला संदेश पुढे पाठवणे; इत्यादी अनेक कृती करू शकतात. हातावरचे डिजिटल घड्याळ, मोबाईल, (मांडीवरचा/टेबलावरचा) संगणक, चारचाकी, रेल्वे, विमान ते अंतराळयानापर्यंत आणि उद्योगधंद्यांतील अनेक मशिन्समध्ये आवश्यक असणारी करोडो प्रकारची कामे करायला microprocessorचा उपयोग केला जातो... किंबहुना, आजच्या घडीला microprocessorचा उपयोग असलेल्या वस्तूंच्या यादीपेक्षा, त्याचा उपयोग नसलेल्या वस्तूंची यादी करणे जास्त सोपे आहे ! गेल्या काही दशकांतली microprocessorच्या विकासाची झेप इतकी मोठी आहे की आज, संगणकशास्त्राच्या क्षमतेची सीमा 'microprocessor (किंवा एकंदरीत सर्वच हार्डवेअर) ची ताकद' नसून 'मानवी विचारशक्तीची ताकद' हीच आहे ! (Today, not 'power of microprocessor' but 'extent of human imagination' is the limit of computing.)