नेट banking

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
27 Aug 2018 - 8:04 pm

नेट banking

माझ्याच एका बँकेतून माझ्याच दुसऱ्या बँकेतील अकाउंट मध्ये पैसे पाठवतानाचा हा अनुभव
ज्या बँकेत मी पैसे पाठवणार होतो त्या बँकेच्या माझ्या अकाउंट नंबर ची सुरवात ०० ने होते
beneficiary म्हणून नोंद करताना मी अकाउंट नंबर मधील पहिली ०० लिहिले नाही तरी माझी नोंद benificiary म्हणून झाली
परंतु पैसे पाठवले असता त्या अकाउंटला पैसे जमा झाले नाहीत
तीन चार दिवस हा प्रयोग करून झाल्यावर मी benificiary चे नाव बदलून [ निक name ] माझा अकाउंट नंबर ०० पासून सुरवात करून लिहिला आणि पैसे पाठवणे यशस्वी झाले
कळलेली माहिती अशी कि benificiary म्हणून नोंद होताना अकाउंट नंबर veryfy होत नाही
आणि याचा परिणाम अकाउंट नंबर चुकला असल्यास त्या चुकीच्या अकाउंट ला पैसे जमा होत नाहीत
मला हे समजत नाही कि जर पैसे पाठवताना अकाउंट नंबर veryfy करता येतो तर beneficiry म्हणून नोंद करण्यापूर्वी अकाउंट नंबर verify का करत नाहीत

अर्थव्यवहार

प्रतिक्रिया

करता येत नाही. हा प्रोब्लेम मी पण २ वेळा फेस केलेला आहे.

चौथा कोनाडा's picture

27 Aug 2018 - 9:24 pm | चौथा कोनाडा

मी सेफर साईड म्हणून आता पर्यंत खाते क्र. नुसार आधी ०० टाकले. ओके झाले.
"शुन्याला काहीच किंमत नसते" हे विधान आठवले.

(शून्याला स्वतःची किंमत नसते. शून्यात शून्ये मिळवत गेले तर काहीच आकडा तयार होणार नाही. पण शून्याच्या अलीकडे एक लिहिला की त्याला अर्थ येतो. एकापुढच्या शून्यापुढे अधिक शून्ये मांडत गेले तर त्याचे मोल वाढत जाते - )

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 12:39 am | डॉ सुहास म्हात्रे

१. संगणकीय प्रणालीतील डेटा साठवताना,
(अ) ज्या आकड्यांचा उपयोग गणिती पद्धतीने वापर होत नाही (उदा : बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, इत्यादी)
(आ) ज्या डेटामध्ये कॅरॅक्टर्सची ठराविक संख्या असणे आवश्यक असते (उदा : १०/१२/१५ आकडी अकाऊंट नंबर, आयडी नंबर, इत्यादी)
त्या आकड्यांना "मजकूर उर्फ टेक्स्ट" या प्रकाराने (टाईप) साठवले जाते... "अंकिय उर्फ न्युमरीक" प्रकाराने नाही.

अंकिय (न्युमरीक) प्रकारातल्या डेटा गणितीय पद्धतीने प्रोसेस होताना सुरुवातीच्या (लिडिंग) शून्यांना (०) काही किंमत नसल्याने ते असले किंवा नसले तरी काही फरक पडत नाही, तेव्हा ते आपोआप काढून टाकले जाते. पण, तोच डेटा मजकूर पद्धतीने साठविलेला असला तर त्यातले प्रत्येक लिडिंग शून्य एक स्वतंत्र कॅरॅक्टर असते व त्या प्रत्येक शून्याला इतर कोणत्याही आकड्यासारखी/अक्षरासारखीच किंमत असते अर्थातच तसे शून्य असणे वा नसणे याने फरक पडतो व म्हणूनच, एक किंवा अनेक शून्यांनी सुरु होणारा पण तरीही हव्या तितक्या लांबीचा (उदा, १०/१२/१५ आकडी) अकाऊंट नंबर ठेवणे शक्य होते.

उदा :
अंकिय डेटा ०००१२३४५६ = साठवलेला डेटा १२३४५६, तर
मजकूर डेटा ०००१२३४५६ = साठवलेला डेटा ०००१२३४५६

अकाऊंट नंबरचा गणितीय पद्धतीने वापर करण्याची गरज नसते, पण त्याची ठराविक लांबी त्याला ओळखण्यासाठीची मूलभूत आवश्यकता असते, त्यामुळे तो अंकिय (न्युमरिक) नाही तर मजकूर (टेक्स्ट) पद्धतीने साठवलेला असतो.

२. गणिती पद्धतीने वापर होत नाही असा डेटा मजकूर पद्धतीने साठवण्यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे अंकिय डेटा साठवायला हार्ड डिस्कवर मजकूर डेटापेक्षा जास्त जागा लागते. प्रत्येक एमबीला लक्षणीय किंमत मोजावी लागत असे अश्या या शतकाच्या पहिल्या दशकाच्या काळापर्यंत तरी महागडी डिस्कस्पेस वाचविण्यासाठी ही युक्ती अपरिहार्य होती. आज आपण डिस्कस्पेस गिगॅ/टेरॅ/पेटॅ/इत्यादी बाईट्सच्या खूपच स्वस्त झालेल्या महाएककांमध्ये मोजत असलो तरीसुद्धा, आताच्या कंपन्यांच्या डेटाचे आकारमान इतके प्रचंड झाले आहे (आणि ते सतत वाढतच रहात आहे) की, डेटा साठविण्याच्या प्रक्रियेत, "कमीत कमी जागेत जास्तीत जास्त डेटा साठवून आर्थिक बचत साधणे", हे तत्व नजिकच्या काळात कालबाह्य होईल, असे दिसत नाही.

***************

अर्थातच... बेनेफिशियरी बनवताना, अकाऊंट नंबरच्या सुरुवातीच्या (लिडिंग) शून्यांना पकडले नाही, ही समस्या आहेच.

ते का झाले असावे असा विचार करताना, "वेगेवेगळ्या बँकांचे वेगवेगळ्या लांबीचे अकाऊंट नंबर असणे", हे त्याचे एक कारण असू शकते असा अंदाज मनात आला. थोडेसे संशोधन केले आणि तो अंदाज खरा ठरला...

* सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका : सर्वसाधारणपणे, १६ कॅरॅक्टर्स (५ बँक कोडचे + ११ अकाऊंट नंबरचे), एसबीआयच्या ऑनलाईन अकाऊंटमध्ये १७ कॅरॅक्टर्स (६ लिडिंग शून्ये बँक कोडची + ११ अकाऊंट नंबरचे कॅरॅक्टर्स).
* अक्सिस बँक : १५ कॅरॅक्टर्स
* आयसिआयसिआय बँक : १२ कॅरॅक्टर्स
* एचडीएफसी : १४ कॅरॅक्टर्स

अकाऊंट नंबरसाठी बँकांना ६ पासून ते जास्तीत्त जास्त ३० कॅरॅक्टर्सपर्यंत कोणताही आकडा वापण्याची मुभा आहे ! तेव्हा, इतर बँकांचे अजून वेगवेगळे आकडे असू शकतात.

(अ) असे विविध लांबीचे अकाऊंट नंबर असताना आणि
(आ) प्रत्येक बँकेला तिच्या अकाऊंट नंबरची लांबी ठरवण्याची व बदलण्याची मुभा असताना,
कोणत्याही बँकेने आपल्या स्वतःच्या संगणक प्रणालीत, इतर प्रत्येक बँकेच्या अकाऊंट नंबरमधील चूक पकडण्यासाठी (व्हॅलिडेशन करण्यासाठी) व्यवस्था करण्याची अपेक्षा धरणे, अव्यवहार्य आहे... अर्थातच, अकाऊंट नंबरसाठी बँकेला ग्राहकाने पुरवलेल्या अकाऊंट नंबरवर विश्वास ठेवणे अपरिहार्य आहे.

बेनेफिशिअरी बनवताना...
(अ) बँकेचा IFSC कोड विचारून त्यावरून करून बँकेचे नाव व ब्रँच दाखविले जातात, जे प्रमाणित (स्टँडर्डाईज्ड) असल्याने संगणकिय प्रणालिला पडताळणे शक्य असते,
(आ) त्यानंतर बेनेफिशिअरीचा अकाऊंट नंबर दोनदा (प्रथम टंकलेला नंबर लपवून दुसरा) टंकणे आवश्यक असते,
यापुढे जास्त काही करणे शक्य नसल्याने अकाऊंट नंबरच्या अचूकतेची जबाबदारी ग्राहकावर टाकली जाते. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 12:42 am | डॉ सुहास म्हात्रे

हुश्श्य ! पैशाचे व्यवहार करण्यापलिकडे बँकेशी अंतर्गत संबंध नसल्याने, हे संशोधन करण्यात जरा जास्तच मजा आली. आता यात बँकिंग क्षेत्रातल्या जाणकाराने भर टाकली किंवा चुका दाखवून दिल्यास ज्ञानात भर पडल्याने आनंदच होईल !

बाजीप्रभू's picture

28 Aug 2018 - 6:08 am | बाजीप्रभू

नवी माहिती मिळाली.

गणिती पद्धतीने वापर होत नाही असा डेटा मजकूर पद्धतीने साठवण्यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे अंकिय डेटा साठवायला हार्ड डिस्कवर मजकूर डेटापेक्षा जास्त जागा लागते. प्रत्येक एमबीला लक्षणीय किंमत मोजावी लागत असे अश्या या शतकाच्या पहिल्या दशकाच्या काळापर्यंत तरी महागडी डिस्कस्पेस वाचविण्यासाठी ही युक्ती अपरिहार्य होती. आज आपण डिस्कस्पेस गिगॅ/टेरॅ/पेटॅ/इत्यादी बाईट्सच्या खूपच स्वस्त झालेल्या महाएककांमध्ये मोजत असलो तरीसुद्धा, आताच्या कंपन्यांच्या डेटाचे आकारमान इतके प्रचंड झाले आहे (आणि ते सतत वाढतच रहात आहे) की, डेटा साठविण्याच्या प्रक्रियेत, "कमीत कमी जागेत जास्तीत जास्त डेटा साठवून आर्थिक बचत साधणे", हे तत्व नजिकच्या काळात कालबाह्य होईल, असे दिसत नाही.

हे काही झेपले नाही बुवा.

प्रत्यक्षात न्यूमेरिक डेटा कमी जागा खातो, 256 लिहिण्यासाठी 3 बाईट लागतात, पण न्यूमेरिक साठी एकाच बाईट लागते.
मग हा डेटा अक्षरी का साठवतात?
त्याची 2 कारणे असू शकतात
1. डेटा चा साईझ फिक्स असला की इंडेक्स करणे सोपे असते
2. खाते क्रमांक हा साधारणपणे 2 किंवा अनेक वेगवेगळे क्रमांक जोडून बनवलेला असतो, जसे की कंट्री कोड, शाखा कोड आणि खाते क्रमांक, अश्या स्थितीत जर ही शून्य गायब झाली तर मोठा गहजब होऊ शकतो

आणि मोठे नाही, पण अजून एक कारण, शब्दावर + वापरले की शब्द जोडले जातात, अंकावर + वापरले की बेरीज होते

सतिश म्हेत्रे's picture

28 Aug 2018 - 11:33 am | सतिश म्हेत्रे

1 बाईट ची रेंज - 256 ते 255 आहे.

मराठी_माणूस's picture

28 Aug 2018 - 10:40 am | मराठी_माणूस

अंकिय डेटा साठवायला हार्ड डिस्कवर मजकूर डेटापेक्षा जास्त जागा लागते

हे कसे ?

स्वलिखित's picture

30 Aug 2018 - 10:51 am | स्वलिखित

त्ये इन्क्रिपशन मुळ आसन हो ,त्याला 0 बी सोडता येत न्हाई अन स्पेस बी सोडता येत न्हाई म्हून सुरवातीला असलेला काय अन शेवटी असलेलं काय काहीच सोडता येत न्हाई
आपला योक नंबर 16 -16 राउंड मधी इन्क्रिप्ट होतो कधी कधी
समजा 0101 ह्यो आकडा 16 राउंड नंतर qwerty असं पण होऊ शकत अन 101 हे asdfgh असं होऊ शकत .मग qwerty अन asdfgh कसं मॅच होणारे अन हे तिसरीकड मॅच झाल्यावर मिटलच कि, सगळीच मथुरा पाण्यात असं कुठं असतंय व्हय
डेटा कि डोटा ला किती जागा लागती त्ये बायणारी बगिल्यावर
कळन . नीट मला बी म्हैत नई पण पटलं त बघा ब्वॉ

डॉ सुहास म्हात्रे's picture

31 Aug 2018 - 12:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

काय बी डोस्क्यात गेलं न्हाय ! =))

सिक्युरिटीसाठी एनक्रिप्शन केलं जातं ते पूर्ण टेक्स्टचं जसंच्या तसं एकत्रित करावं लागतं. त्यामुळे अंक सुरुवातीचे शून्य न घेता आणि घेऊन या दोन प्रकारांत कूटलिपीत परिवर्तन झाल्यावर परत रिव्हर्स न करण्याइतका फरक पडेल असं त्याचं म्हणणं. तेव्हा या कारणापोटी टेक्स्ट फॉरमॅट ठेवला जातो, असं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Sep 2018 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

असं होय ! :) धन्यवाद.

वरचा प्रतिसादही कूटलिपीतच असल्याने समजायला कठीण पडला. ;) =))

तुषार काळभोर's picture

28 Aug 2018 - 7:58 am | तुषार काळभोर

यात माझा गलथानपणा, निष्काळजीपणा होता.

तर, झालं असं...
२०१३ च्या दिवाळीच्या काही दिवस आधी पूर्वीच्या कंपनीचे फुल अँड फायनल चे पैसे वैयक्तिक एसबीआय खात्यात जमा झाले होते. दिवाळीच्या सुट्टीआधी नवीन कंपनीने नवीन पगार खाते असलेल्या सिटीबँकेत दिवाळी बोनस जमा केला.
मी एसबीआय मध्ये माझंच सिटी खातं ऍड केलं. आयएफएससी कोड बरोबर टाकला. नाव टाकलं आणि सात आठ अंकी खाते क्रमांक टाकताना मध्ये एक क्रमांक चुकला. याचं कारण होतं, मी तो खातेक्रमांक नोटपॅड/एक्सेल मध्ये लिहून ठेवला होता आणि तिथे पाहून तो एसबीआय मध्ये टाईप केला.
खातं ऍड झालं. मी पैसे पाठवले. ५७,००० रुपये. (त्यावेळी पगार पस्तीस हजाराच्या आसपास होता.) साधारण काही सेकंदात एसएमएस आला, फक्त एसबीआयचा. सिटीचा आलाच नाही. दोन तीन मिनिटांनी सिटीचं लॉगिन करून पाहिलं. तिथं पैसे पोचले नव्हते.
पण मी निवांत होतो. एक दोन तास लागू शकतात, हे माहिती होतं. तरीही उगाच टाईमपास म्हणून सिटीचं खाते उघडायचं किट घेतलं आणि वाचत बसलो. त्यात लिहिलं होतं की खाते क्रमांक डेबिट कार्डच्या मागे लिहिलेला असतो.
बघितला.
आणि डोळे फिरले.
काही तरी चुकीचं वाटलं.
एसबीआय मध्ये बेनिफिशियरी नंबर पाहिला तर तो ******३९ असा दिसला. तेवढ्यात आठवलं, आपण नोटपॅड मध्ये पण ठेवलाय. तो बघितला तर परत डोळे फिरले.
एका सेकंदात अंगाला घाम सुटला.

मग विचार केला, एसबीआय पैसे पाठवताना 'पैलवान-खाते क्र १२३४५६७८९' ला पैसे पाठवेल आणि ते मॅच ना झाल्याने सिटीबँक नाकारेल.
हुश्श!!
एका मित्राला फोन केला.
तो म्हणाला, विसर!
एसबीआय पैसे पाठवताना 'आयएफएससी१२३४५-खाते क्र १२३४५६७८९' ला पैसे पाठवते. नाव नाही. सिटीबँक नाव न बघता त्या आयएफएससी च्या त्या खात्यात पैसे जमा करेल.
मला ताप आला होता तोपर्यंत.
हे सगळं १० मिनिटात झालं. अजून घरात कुणाला माहिती नव्हतं.
दिवाळीच्या आदल्या दिवशी ५७,००० 'हरवले'!!!

मी नुसताच पडून राहिलो.
दहा मिनिटांनी एसएमएस वाजला.
एसबीआयचा होता.
तुमचं Transaction फेल झालं म्हणून.

तुषार काळभोर's picture

28 Aug 2018 - 8:02 am | तुषार काळभोर

मी टाकलेल्या पुणे सिटीच्या आयएफएससी मध्ये त्या क्रमांकाचं खातंच नव्हतं!
म्हणून मी वाचलो.
केवळ आणि केवळ नशीब जोरावर होतं म्हणून.

तेव्हापासून बेनिफिशियरी ऍड केल्यावर पैसे पाठवायच्या आधी १० रुपये पाठवून खात्री करून घेतो.
कोणी पैसे पाठवणार असेल तरी तेच. आधी दहा रुपये पाठवायला सांगतो.
दहा रुपये पोचल्याचं कन्फर्म झाल्यावर मग बाकीचं!

अकाउंट नेम (नाव) अगदी तंतोतंत मॅच झाल्याशिवाय ट्रान्सफर होणार नाही. काळजी नसावी. अगदी स्पेलिंग आणि स्पेसेससुद्धा मॅच व्हाव्या लागतात.

तुम्ही उपरोक्त व्यवहार केलात तेव्हाचं कसं होतं त्यावर भाष्य करत नाही पण आता अनेक वर्षांपासून नाव जुळावंच लागतं.

व्यक्तिगत अथवा कंपनी काही का असेना. Xyz tours Pvt. Ltd. असेल तर Pvt टिंब Ltd टिंब हेही जुळलं पाहिजे. Private limited असंही चालणार नाही.

टवाळ कार्टा's picture

28 Aug 2018 - 12:54 pm | टवाळ कार्टा

बहुतेक नाही

बेनेफिशरी मधल्या नावाला काही अर्थ नाही. नाक कसेही टाका. काही फरक पडत नाही.

बेने. ॲड करतांनांच सोर्स आणि डेस्टिनेशन कॉपी पेस्ट करुन कन्फर्म करा. एकदम सोपे.

रच्याकने तुमच्या अकाउंटचे डिटेल्स द्या. क्रेडिट कार्डचे डिटेल्स द्या. व्हिसीसी कोड द्या. मोबाइल नंबर द्या. तुमचा प्रश्न सोडवतो.

:-)
:-)

योगी९००'s picture

28 Aug 2018 - 11:14 am | योगी९००

मी सुद्दा असेच करतो. कोठलाही नवा अकांऊंट अ‍ॅड केला की छोटी अमाउंट टाकून कन्फर्म करतो. जर कोणा अननोन व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील तर ऑड अमांऊंट पाठवतो (१४३, २५८ अशी) आणि त्यालाच विचारतो की किती पैसे जमा झाले ते सांग. त्याने ते कन्फर्म केले की बाकी अमाउंट पाठवतो....!!

अभ्या..'s picture

28 Aug 2018 - 3:32 pm | अभ्या..

जर कोणा अननोन व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील तर ऑड अमांऊंट पाठवतो (१४३, २५८ अशी)

योगी मला ७६५४३२४८७९५४३ रुपये पाठव ना प्लीज. ;)

टवाळ कार्टा's picture

28 Aug 2018 - 4:27 pm | टवाळ कार्टा

+11111

कंजूस's picture

28 Aug 2018 - 8:57 am | कंजूस

माहिती कामाची आहे.

---

माझं एक नेट बँकिंग( स्टेट बँक ओफ इंडिया) मोबाइल रिचार्ज वोडाफोनला झालं नाही. नेहमी सक्सेस होतं.
वोडाफोनला पासबुक एन्ट्रीज दाखवल्या. त्यांनी सांगितलं इथे "ट्रान्सफरड टु वोडाफोन" नसून "ट्रान्सफरड टु ओक्सिजन सर्विसेस इंडिया" असं आहे. त्यामुळे कम्प्लेन्ट घेणार नाही.

मी स्टेट बँक वेबसाइट उघडून तिकडून टॅापप करायचो. वोडाफोनवाले म्हणाले की माइवोडाफोन अॅप चालू करून तिथून नेट बँकिंगला डिरेक्ट झाल्यावर पाठवा. म्हणजे थर्डपार्टी येणार नाही.

आता स्टेट बँक कस्टमर केअरला इमेल केलाय, कॅाल सेंटरला तक्रार फोनही केला. बघू काय होतय.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

रिचार्ज, बील पेमेंट, इत्यादी नेहमी ज्या कंपनीला पैसे द्यायचे आहेत त्या कंपनीच्या अ‍ॅपवरून/संस्थळावरून केल्यास अशी समस्या येत नाही. शिवाय, तेथे आपला बँक अकाऊंट/डेबीट कार्ड/क्रेडिट कार्ड प्रीफर्ड ट्रान्झॅक्शन मोड ठेवला तर त्यांची माहिती परत परत भरावी लागत नाही.

अशी ट्रान्झॅक्शन्स नेहमीच आपल्या मोबाईलवर येणार्‍या ओटिपीची सोय वापरून करावी (बहुदा तसे करावे लागतेच म्हणा) म्हणजे समस्या येण्याची शक्यता अगदी कमी असेल.

कंजूस's picture

28 Aug 2018 - 8:01 pm | कंजूस

>>रिचार्ज, बील पेमेंट, इत्यादी नेहमी ज्या कंपनीला पैसे द्यायचे आहेत त्या कंपनीच्या अ‍ॅपवरून/संस्थळावरून केल्यास अशी समस्या येत नाही.>>
हेच करणार पुढे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 8:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही पद्धत मी दोनेक वर्षे विनासमस्या वापरत आहे.

असं पेमेंट केल्यावर कंपनीच्या लोगोसकट रिसिट दिसते ती मात्र जपून ठेवावी. मी प्रत्येक कंपनीचा एक फोल्डर बनवून त्यात त्या रिसिट्स ठेवतो. एखाद्या वेळेस कंपनीने हिशेबात गडबड केली की त्या ऑनलाईन रिसिट दाखवल्यावर पटकन दुरुस्ती करून मिळते.

उदा : MAHADISCOM चे बील मी नेहमी त्यांच्याच संस्थळावर भरतो. मागच्या महिन्याचे बील वेळेवर भरूनही या महिन्यात ते भरले नाही या कारणाने दोन महिन्यांचे बील आले. मागच्या महिन्याची रिसिट मोबाईलवर घेऊन कार्यालयात गेलो. ती पाहून, "या महिन्यापासून पुण्याची बिलेसुद्धा मुंबईतल्या मध्यवर्ती ऑफिसमधून देणे सुरु झाले आहे, त्या बदलात असे झाले असेल." हे कारण देऊन त्वरीत बील कमी करून मिळाले व "पुढच्या महिन्यात सर्व अ‍ॅडजस्ट होऊन बरोबर बील येणे सुरू होईल" असे आश्वासनसुद्धा ! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 1:27 pm | डॉ सुहास म्हात्रे

३. गणिती पद्धतीने वापर होत नाही असा डेटा मजकूर पद्धतीने साठवण्यामागे अजून एक कारण आहे : भविष्यात आकडे + अक्षरे असा नंबर करायची गरज पडली तर अंकिय डेटामध्ये तसे करता येत नाही. त्यासाठी मजकूर प्रकारचा डेटा आवश्यक आहे. उदा : गाड्यांचे रजिस्ट्रेशन क्रमांक.

लई भारी's picture

28 Aug 2018 - 4:20 pm | लई भारी

चांगली चर्चा चालू आहे. मी पण सुरुवातीला छोटी रक्कम पाठवूनच नंतरचा व्यवहार करतो.

एकदा माझ्या खात्यात रक्कम भरताना एकाने शेवटचा आकडा चुकवला होता. नंतर त्याला लक्षात आल्यावर तोच म्हणाला 'फिकर नॉट'! त्याच म्हणणं असं होत कि अकाउंट नंबर सलग नसतात. त्यामुळे शेवटचा आकडा एकाने कमी जास्त झाला तर ट्रँजॅक्शन फेल होईल. निश्चित माहिती नाही मला.

जर नाव अगदी तंतोतंत पडताळत असतील तर चांगलं आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 10:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

मी पण सुरुवातीला छोटी रक्कम पाठवूनच नंतरचा व्यवहार करतो.

+१००. मी पण नेहमी असेच करतो व पुढच्या व्यक्तीकडून खातरजमा झाल्यावरच उरलेली रक्कम पुढे पाठवतो. अशी खात्री केल्याने पुढे होऊ शकणारा मोठा अनर्थ टळतो.

जावई's picture

28 Aug 2018 - 6:32 pm | जावई

सकाळी पे फोन ॲपवरुन वीज बील भरणा केला.रक्कम डेबीट झाली खात्यातून.परंतू महावितरणाच्या संस्थळावर जाऊन बघितलं तर अजून जमा नाही.काय करावं समजत नाही?

पे फोन ॲपचं माहित नाही पण paytm वर खाली लिहून येतं पेमेंट झाल्यावर कि संबंधित वीज कंपनीच्या सिस्टीम मध्ये अपडेट होण्यासाठी 48 तास लागतात म्हणून.

डॉ सुहास म्हात्रे's picture

28 Aug 2018 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथे आणि इथे दिलेली पद्धत वापरून पहा.

खटपट्या's picture

28 Aug 2018 - 8:50 pm | खटपट्या

वर सुहास सरांनी सांगितल्याप्रमाणे बिले भरा. वीजेचे बील, एमएसईबी साइट वरून, टेलीफोनचे बील एमटीएनएल च्या साइटवरुन, मोबाइलचे बील त्यांच्या साइटवरुन भरा. मी हे गेली १० वर्ष करतोय. दहा वर्षाच्या पावत्या माझ्याकडे अजून आहेत. कधीही गडबड झाली नाही.
प्रॉपर्टी टॅक्सही त्या त्या महापालिकेच्या साइटवरून भरा

जावई's picture

28 Aug 2018 - 6:36 pm | जावई

कुणाला याबाबत माहीती असेल तर सांगा..प्लीज.

तुषार काळभोर's picture

28 Aug 2018 - 9:06 pm | तुषार काळभोर

मी १ वर्षांपासून पेटीएम वरून लाईट बिल भरतो. आधी थेट महावितरणच्या साईट वर भरायचो, पण कार्ड पेमेंटला ते दीड दोन टक्के चार्ज लावतात. १२००-१५०० बिलावर २०-३० रु विनाकारण जास्त जायचे. म्हणून पेटीएमवर भरायला सुरुवात केली.
अजून कधी महावितरणच्या साईटवर क्रॉसव्हेरिफिकेशन नाही केलं, पण काही प्रॉब्लेम पण नाही झालेला.
पेटीएम चं समर्थन/सुचवणी/Recommendation नाहीये, पण पे फोन चं पण असंच असेल.

काळजी घ्यायची, काळजी करायची नाही.

मी पे फोन , पेटीम वापरात नाही .सगळ्यात उत्तम पेझ्याप आहे , बाकीचे सगळी ऍप आता दोन वर्षापासून असतील पण एच डी एफ सी चे पेझ्याप ला खूप वर्ष झालेत . बिनचूक ट्रान्स्फर , उत्तम सुरक्षितता आणि महत्वाचे म्हणजे पूर्वी केलेले सगळे व्यवहार मेमरीत असतात त्यामुळे मोबाईल नं , वीजबिल ग्राहक क्रं , डिश टीव्ही सेट टॉप नं वैगेरे वारंवार फीड करण्याची गरज पडत नाही . कधी कधी 5 ते 10 % कॅशबॅक चा एक्सट्रा बोनस .

सुबोध खरे's picture

28 Aug 2018 - 8:24 pm | सुबोध खरे

पेटीएमचा माझा अनुभव अतिशय चांगला आहे. निश्चलनीकरण झाल्याच्या आठवड्यातच मी त्याचे ऍप डाऊन लोड केले आणि लगेच काही दिवसात KYC पण करून घेतले. त्यानंतर मला दर महिन्याला बऱयापैकी रक्कम रुग्णांकडून मिळते आहे. त्यातूनच मी माझ्या कुटुंबातील सर्वांचे मोबाईल बिल, घरचे /दवाखान्याचे विजेचे बिल, एम टी एन एल ची बिल आणि महानगर गॅसचे बिल गेली दोन वर्षे सुरळीतपणे भरत आलो आहे. एकदाही त्यात गडबड झालेली नाही.
त्यात असलेल्या पैशा व्यतिरिक्त दुसरे पैसे त्यातून जाण्याची शक्यता नाही त्यामुळे मानसिक शांती पण उत्तम आहे.

सहमत. माझा देखील पेटीएमचा अनुभव चांगलाच आहे. निश्चलनीकरण झाल्यानंतर खरतर ते पेमेंटस स्वीकारण्यासाठी इंस्टॉल केले होते पण हळूहळू त्याचा वापर सर्व बिले भरण्यासाठी करतोय. अजूनतरी काही गडबड झाली नाहीये.

ट्रेड मार्क's picture

28 Aug 2018 - 10:15 pm | ट्रेड मार्क

खाते क्रमांक, ISFC कोड वगैरे टाकून खाते आपल्या बँकेत नोंद करून मग पैसे पाठवायची पद्धत आता जुनी झालीये. नवीन पद्धतीत नुसत्या फोन नंबर किंवा ई-मेल ऍड्रेस वरून पैसे पाठवता येतात. भारतात हे चालू झालंय का माहित नाही, पण नसेल तर होईल. याचा अर्थ असा नव्हे की ही पद्धत बादच झालीये किंवा होईल.

बाकी म्हात्रे सरांनी सांगितलेले बरोबर आहे. खाते क्रंमाकात जर आधी शून्य असतील तरी त्या शून्यांसकट संपूर्ण क्रमांक टाकणे आवश्यक आहे. तसेच काही मिपाकरांनी सांगितल्याप्रमाणे आधी छोट्या रकमेची ट्रान्सफर करून ती यशस्वी झाल्यावर मगच मोठ्या रकमेची ट्रान्सफर करणे सुरक्षित आहे. दुर्दैवाने जर आपण टाकलेल्या चुकीच्या नंबरचे खाते बँकेत असेल तर पैसे त्या खात्यात जमा होतील. मग ते पैसे परत मिळणे न मिळणे हे त्या खातेदारावर अवलंबून असेल.

यात तुम्ही बँकेला दोषी धरू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे खाते ऍड करण्यापासून ते पैसे ट्रान्सफर करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हीच केल्या आहेत. भविष्यात तुम्ही जर फोन नं किंवा ई-मेल ऍड्रेस वरून पैसे ट्रान्सफर केलेत तरी त्यातील चुकीला सुद्धा तुम्हीच जबाबदार असाल.

कुमार१'s picture

29 Aug 2018 - 8:49 am | कुमार१

उपयुक्त चर्चा, धन्यवाद

मंदार कात्रे's picture

29 Aug 2018 - 9:37 am | मंदार कात्रे

पेटीएम मी तीनचार वर्षापासून वापरतो . दोन वर्षापूर्वी केवायसी केले.अतिशय उत्तम आहे . मध्यन्तरी त्यानी युआय मध्ये अगम्य चेंजेस केलेले तेव्हा मोबीक्विक वापरले . पेटीएम मध्ये अजिबात पैसे न ठेवता युपीआय ने पेमेन्ट केले ,तरीही कॅशबॅक देतात . पेटीएम् ने बॅन्क टू बॅन्क मनीट्रान्स्फर देखील लगेच होते .

जूनमध्ये दोन एनईएफटी एकाच वेळी केल्या होत्या तेव्हा एका अकाउण्ट चे नाव चुकीचे पडले म्हणजे पहिले नाव चुकीचे पण आडनाव बरोबर होते व अकाउण्ट नम्बर बरोबर होता . मग व्हाट्सप वरुन त्या माणसाला तसे लिहून पाठवले व त्याने ते बान्केत दाखवल्यावर ८ दिवसानी पैसे तिकडे जमा झाले.