वाचनसंस्कृतीतून घडतेय पुढची पिढी

Primary tabs

vcdatrange's picture
vcdatrange in काथ्याकूट
6 Aug 2018 - 4:50 pm
गाभा: 

आपल्यापैकी अनेकांचं बालपण हे आई-वडील, आजी-आजोबा किंवा शिक्षक अशा मंडळींनी सांगितलेल्या कथा-कहाण्यांनी समृद्ध झालय! गोष्टींतून लहानग्यांना होत जाणारी भाषेची ओळख, पुढे स्वत:च पुस्तक वाचून समृद्ध होणारी त्यांची भाषा आणि इतर आनुषंगिक कौशल्ये असं सर्व एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे सुपूर्द होत असे. पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मुलांना गोष्टी सांगायला वेळ नाहीए. तर ग्रामीण आदिवासी भागात तशी जाणीवच फारशी नाही. खेड़ेगावात वाचनाचे स्त्रोत खुप कमी आहेत !!!
भाषा, वाचनसंस्कृती आणि मुलांचा सर्वागीण विकास या उद्दिष्टाने मोखाडा जि. पालघर येथील निवडक पाच शाळांमध्ये “बाल वाचनालय” उपक्रम सुरु केला आहे. सिमेन्स पुरस्कृत आशा प्रकल्पाद्वारे आदिवासी क्षेत्रात ही वाचनालये उभारली जात आहे. प्रत्येक वाचनालायात आनंद घैसास‚ बाल फोंडके‚ अच्युत गोडबोले‚ अरविंद गुप्ता अश्या लोकप्रिय लेखकांची २५० हून अधिक पुस्तके तसेच बालभारती किशोर व तत्सम नियतकालिके उपलब्ध केली आहेत. जगभरातील वाचनालयांनी प्रसारित केलेलं घोषवाक्य ‘एव्हरी चाइल्ड रेडी टू रीड’ हे या उपक्रमाच्या मुळाशी आहे. शाळामध्ये उभारल्या जाणार्या या वाचनालयात मुलांना सुरक्षित, निवांत जागी सहज हाताळता येतील अशी पुस्तकं इथं प्राधान्यानं ठेवली जातात. वाचनालयातील भिंती उत्तम चित्रांनी रंगवून आणि क्रिएटिव्ह फर्निचर तिथे ठेवून वातावरण प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून या वाचनालयाची देखरेख ठेवली जाणार आहे. वाचनालयाची रचना पुस्तकांची देवाणघेवाण सामुहिक वाचन नोंदवही तसेच फलनिष्पती याबाबत सखोल नियोजन केलेले आहे. तरंग वाचनालय मुलांना सहज आणि कधीही हाताळता येतील या पद्धतीने वाचनालयातील पुस्तकांची रचना केली गेलीय.
समाजमाध्यमे‚ शिक्षणतज्ञ‚ विविध प्रकाशन संस्था यांचे सोबत सखोल चर्चा करून या वाचनालयातील पुस्तकांची निवड करण्यात आलीय. संपर्कातील अनेक परीचीत व्यक्ती ‚ महिला मंडळे‚ भजनी मंडळे यांनी याकामी सहकार्य केलय. मनोविकास प्रकाशनाचे श्री आशिष पाटकर यांनी या प्रकल्पात विशेष रस दाखवलाय. येत्या वर्षभरात या वाचानालयाना यातील काही लेखक प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांसोबत पुस्तक वाचन आणि विविध उपक्रम घेणार आहेत.
““बाल वाचनालय” चे औपचारिक उद्घाटन दि. १३ ऑगस्ट २०१८ रोजी जि. प. शाळा कारेगाव ता. मोखाडा जि. पालघर येथे सकाळी ११ वाजता आयोजित केले आहे. लेखक वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते. रानभाज्या महोत्सवाकरीता पुढच्या महिन्यात जेव्हा या भागात याल तेव्हा या ““बाल वाचनालयांना” नक्की भेट द्या .
,

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

7 Aug 2018 - 6:34 am | सुधीर कांदळकर

आता वाचनाच्या आकर्षणाची नाही वेडाची जागा मोबाईल फोनवरच्या खेळांनी घेतली आहे. आम्ही लहानपणी पुडी बांधलेला कागद वाचायचेही सोडत नव्हतो हे आठवले. कालाय तस्मै नमः.

स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा. लेखाबद्दल धन्यवाद.

कुमार१'s picture

7 Aug 2018 - 10:09 am | कुमार१

हार्दिक शुभेच्छा !

चित्रगुप्त's picture

8 Aug 2018 - 3:09 am | चित्रगुप्त

स्तुत्य उपक्रम.
..........वाचनालयातील भिंती उत्तम चित्रांनी रंगवून आणि क्रिएटिव्ह फर्निचर तिथे ठेवून वातावरण प्रफुल्लित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे..... या चित्रांचे आणि फर्निचरचे फोटो काढून अवश्य इथे टाका. क्रिएटिव्ह फर्निचर कसे आहे आणि चित्रे कशी/कोणती आहेत, हे बघण्याची उत्सुकता आहे.

दुर्गविहारी's picture

11 Aug 2018 - 1:24 pm | दुर्गविहारी

छान उपक्रम. आज या ग्रासरूट लेव्हलच्या कामाचीच गरज आहे. आपल्याला शुभेच्छा.

ज्योति अळवणी's picture

3 Sep 2018 - 7:34 pm | ज्योति अळवणी

स्तुत्य उपक्रम. All the best!