ऑडासिटी कट, पेस्ट, फेड, एक्स्पोर्ट इ. [ऑडिओ-व्हिडीओ एडिटिंग / दृक-श्राव्य संपादन] [भाग २]

चहाबिस्कीट's picture
चहाबिस्कीट in तंत्रजगत
18 Jun 2018 - 3:10 pm

या लेखाची पीडीएफ लिंक इथे आहे

भाग १ https://www.misalpav.com/node/42802
भाग २ https://www.misalpav.com/node/42838

नमस्कार,

पहिल्या भागाची लिंक. मागच्या भागात आपण पाहिलं की आपला आवाज रेकॉर्ड कसा करायचा आणि रेकॉर्डिंग ऑडासिटी मध्ये कशी बघायची.

एखादे वाक्य समजायला अवघड जात असेल तर कृपया प्रतिसादात सांगा, म्हणजे आम्हाला सुधारणा करता येतील.

आजच्या भागात आपण खालील गोष्टी पाहणार आहोत. आपण फक्त ऑडासिटी वापरणार आहोत.

१. वेगवेगळ्या टूलबारची तोंडओळख
२. एका वेळेस दोन ऑडिओ ट्रॅक कसे हाताळायचे ( झूम इन - झूम आउट, कट - पेस्ट इ.)
३. आवाज मोठा करणे (अँप्लिफाय)
४. फेड इन - फेड आउट इफेक्ट
५. अन डू - एकेक करून बदललेला ऑडिओ पूर्ववत करणे
६. एडिट टूलबार वापरणे
७. फाईल एक्स्पोर्ट करणे

आम्ही असे गृहीत धरत आहोत की तुम्हाला माऊसची बटणे कशी वापरायची (लेफ्ट - राईट क्लिक), माउसचे चाक (Mouse wheel) कसे वापरायचे, स्क्रीनवर एखाद्या ठिकाणी क्लीक करून एखादा भाग (Region) कसा सलेक्ट करायचा, माउस चा वापर करून स्क्रीनवरची एखादी गोष्ट कशी ओढायची ( = Drag ड्रॅग करणे ), या गोष्टी माहित आहेत. (माहिती नसतील तर प्रतिसादात मदत मागा)

भागाला सुरूवात करण्यापूर्वी ऑडासिटी हे सॉफ्टवेअर का वापरावे यासंबंधी एक स्पष्टीकरण.

  • इतिहास: अठरा वर्षांपूर्वी (मे, २०००) हे सॉफ्टवेअर पहिल्यांदा उपलब्ध झाले. हे सॉफ्टवेअर फ्री आणि ओपन सोर्स असून इतक्या वर्षांत बऱ्याच जणांचा हे सॉफ्टवेअर लिहिण्यामधे हातभार लागला आहे. जगभरात लाखो लोक हे सॉफ्टवेअर वापरतात.
  • ऑडासिटीचे काम मोबाईल वर एखाद्या दुसऱ्या ऍप ने होऊ शकते का? - काही अतिबेसिक कामे एखाद्या अँड्रॉइड ऍप वर होऊ शकतील पण ऑडासिटी एवढे फीचर्स दुसऱ्या कोणत्याही अँड्रॉइड ऍप मध्ये नाहीत.
  • मोबाइलपेक्षा लॅपटॉप/डेस्कटॉप चा वापर ऑडिओ एडिटिंग साठी बरा पडतो. स्क्रीन चा आकार मोठा असल्याने एडिटिंग करत असताना वेगवेगळ्या गोष्टी करताना सोपे जाते.

अजून एक टीप: ऑडासिटी वापरताना धीर धरणे / पेशन्स ठेवणे आवश्यक आहे. एखादे बटन दाबले की लगेच त्याप्रमाणे क्रिया होईल असं नाही. तुमच्या कॉम्प्युटरच्या स्पीडनुसार गोष्टी फास्ट/स्लो होतील. एक बटनावर क्लिक करून लगेच दुसऱ्या (किंवा त्याच) बटनावर क्लिक करू नका, आधीची क्रिया पूर्ण होण्याची वाट बघा, मगच दुसऱ्या बटनावर क्लिक करा. भराभर बरीच बटणे क्लिक केली तर सॉफ्टवेअर क्रॅश होऊ शकते (म्हणजे बंद पडू शकते).

१. वेगवेगळ्या टूलबारची तोंडओळख

टूलबार म्हणजे विशिष्ट उद्देश असलेल्या बटनांचा समूह / ग्रुप.

ट्रान्सपोर्ट टूलबार (Transport Toolbar)
ee

यात ६ बटन आहेत. यातले फक्त प्ले (Play) आणि स्टॉप (Stop) चे बटनच तुम्हाला मुख्यतः वापरावे लागेल.

टूल्स टूलबार (Tools Toolbar)

ee

या टूलबारची डिटेल ओळख नन्तर कधीतरी - सध्यापुरते एवढे लक्षात असू द्या कि सलेक्ट (Select) बटन (म्हणजे उभी रेषा ज्यात दिसते ते) प्रेस केलेले आहे.

एडिट टूलबारची ओळख खाली एका सेक्शन मध्ये दिलेली आहे.

२. एका वेळेस दोन ऑडिओ ट्रॅक कसे हाताळायचे

हा व्हिडीओ पहा https://youtu.be/4Ybd9RAiwu4

व्हिडीओ पहात असताना कमीतकमी 480p रिझोल्युशन ठेवावे, जेणेकरून अक्षरं नीट वाचता येतील.
या व्हिडिओत आम्ही मराठी सबटायटल्स जोडली आहेत. ती ऑन केली म्हणजे व्हिडिओत काय होत आहे हे कळेल.

ट्रॅक कंट्रोल पॅनल वरच्या मोकळ्या जागेत

ww

क्लीक करून एखादा ट्रॅक सलेक्ट करता येतो

या व्हिडिओमध्ये खालील गोष्टी दाखवल्या आहेत. (मी नंतर प्रत्येक पॉईंटची व्हिडिओमधली वेळ लिहीन, पण सध्यासुद्धा समजेल असं वाटतं )

१. एका नंतर एक दोन वेगवेगळ्या ऑडिओ फाईल कशा ओपन करायच्या
२. माउसच्या चाकाचा वापर करून स्क्रीनवरील ऑडिओ ट्रॅक कसे वर खाली करायचे
३. उजवीकडच्या स्क्रोलबार चा वापरकरून वरती/खाली असलेले ट्रॅक कसे पहायचे
४. खालचा स्क्रोलबार वापरून उजवीकडचा/डावीकडचा ट्रॅक कसा पाहायचा.

५ . सोलो (Solo) चे बटन वापरून दोनपैकी एकच ट्रॅक कसा ऐकायचा

झूम इन - झूम आउट करण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातले काही पुढे सांगितले आहेत.

६ . कीबोर्डवरचे कंट्रोल बटन ( Ctrl ) एका बोटाने दाबून माउस चे चाक फिरवल्यावर आडवे झूम इन - झूम आउट कसे होते
७. एखादा भाग सलेक्ट करायचा असेल तर माउस चा पॉइंटर ट्रॅक वर हवा त्या ठिकाणी न्यावा. त्यांनतर लेफ्ट क्लिक चे बदन दाबून धरून माउस उजवीकडे/डावीकडे आडवा ड्रॅग करावा (ओढावा). हवा तेवढा भाग सलेक्ट झाला की लेफ्ट क्लिक चे बटन सोडून द्यावे.
८. सलेक्ट केलेला भाग झूम करून बघण्यासाठी View -> Zoom to selection करावे
९. परत नॉर्मल दिसण्यासाठी कंट्रोल बटन ( Ctrl ) एका बोटाने दाबून माउस चे चाक फिरवावे.
१०. एखाद्या ट्रॅक मधला काही भाग कसा कॉपी करावा
११. कॉपी केल्यांनतर जिथे पेस्ट करायचा आहे तिथे माउस पॉइंटर नेऊन क्लिक करावे. मग एडिट मधून पेस्ट ऑप्शन घ्यावा
१२. दोनपैकी एखादा ट्रॅक स्क्रीनवरून कसा काढून टाकावा

३. आवाज मोठा करणे (अँप्लिफाय)

हा व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=sP7dtCjxqEI

आपल्या रेकॉर्डिंगमधल्या एखाद्या भागाचा आवाज वाढवण्यासाठी अँप्लिफाय (Amplify) हा इफेक्ट वापरावा. साधारण एका वेळेस ४-५ डेसिबल ने आवाज वाढवून ऐकून बघावा. म्हणजे आपल्याला अंदाज येतो कि नेमका किती वाढला पाहिजे. आवाज कमी करायचा असेल तर ऋण संख्येने अँप्लिफाय करा उदा. - ४ dB

एकच इफेक्ट पुन्हा पुन्हा देता येतो. म्हणजे रिपीट ऍम्प्लिफाय करता येतं.

४. फेड इन - फेड आउट इफेक्ट [Fade in - Fade out]

रेकॉर्डिंगमधल्या एखाद्या भागाचा आवाज काळानुसार हळू-हळू वाढवत नेला तर त्याला फेड इन असे म्हणतात.

त्याचप्रमाणे आवाज हळू हळू कमी केला तर त्याला फेड आउट असे म्हणतात. गाण्यांच्या शेवटी बऱ्याचदा हा इफेक्ट वापरला जातो.

या इफेक्ट चा वापर करून एखादी व्यक्ती बोलता बोलता जवळ येत आहे किंवा दूर जात आहे - हे भास निर्माण करता येतात.

फेड इन / फेड आउट करण्यापूर्वी आवाज पुरेसा मोठा असणे जरुरी आहे. सुरवातीचे/शेवटचे शब्द ऐकूच येत नाहीत असे नको. नीट फेड झाले नसेल तर पुन्हा तोच इफेक्ट देऊ शकता.

हा इफेक्ट कसा द्यायचा हे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा. https://www.youtube.com/watch?v=AS55rzFCSsk

फेड इन / फेड आउट करण्याचे अजूनही काही वेगळे मार्ग ऑडासिटी मध्ये आहेत - त्याबद्दल नंतर कधीतरी सांगू.

५. अन डू (Undo) - एकेक करून बदललेला ऑडिओ पूर्ववत करणे

ऑडिओ एडिट करताना केलेला एखादा बदल आपल्याला हवा तसा झालेला नसेल तर आपण ते बदल अन डू (Undo) करू शकतो. अन डू मुळे एक एक करून आधीच्या स्टेप वर जाता येते. यासाठी वरती Edit मध्ये जाऊन Undo ऑप्शन निवडावा.

याच्या उलट क्रिया म्हणजे री डू (Re Do). म्हणजे अन डू करून मागच्या एखाद्या स्टेप वरून पुढे येणे.

अन डू कसे करायचे समजून घेण्यासाठी हा व्हिडीओ पहा. https://youtu.be/r8qmG0IA73A

६. एडिट टूलबार वापरणे

वरती सांगितल्यापैकी बऱ्याच क्रिया आपण एका वेगळ्या प्रकारे सुद्धा करू शकतो.
ff

हा आहे एडिट टूलबार. यात बऱ्याच कृतींची शॉर्टकट बटणे आहेत.
जसे कि

  • कट, कॉपी, पेस्ट
  • झूम इन, झूम आउट
  • अन डू, री डू,
  • एखाद्या भागातला आवाज नष्ट करणे (Silence)
  • एखाद्या भागातला आवाज सोडून इतर सर्व आवाज नष्ट करणे (Trim)

माऊस पॉइंटर त्या त्या बटनांवर ठेवून (क्लिक न करता) त्या बटनांची माहिती कळते

हा पहिला व्हिडीओ पहा https://www.youtube.com/watch?v=uWuXtxcXGDg

या एडिट टूलबारचा वापर कसा करावा हे समजून घेण्यासाठी हा दुसरा व्हिडीओ पहा

https://youtu.be/iL0u_FSA2hk

७. फाईल एक्स्पोर्ट करणे (File Export)

एडिटिंग च काम झाल्यांनतर फाईल सेव्ह करयण्यासाठी तिला एक्स्पोर्ट करावे लागते. यासाठी एक्स्पोर्ट सलेक्टड ऑडिओ हे ऑप्शन वापरावे. एक्स्पोर्ट करत असताना नवीन फाईलचे नाव द्यावे लागते.

एक्स्पोर्ट करताना तुम्ही संपूर्ण ट्रॅक सलेक्ट करून एक्स्पोर्ट करू शकता (ट्रॅक कंट्रोल पॅनल वर क्लीक करून पूर्ण ट्रॅक सलेक्ट करता येतो). किंवा विशिष्ट भाग निवडून त्याला एक्स्पोर्ट करता येते.

या व्हिडिओमध्ये हे दोन्ही प्रकार दाखवले आहेत.

आजपुरते एवढेच! (काही चित्रे इथून घेतली आहेत)

- चहा-बिस्कीट प्रोडक्शन
आमची वेब सिरीज

आम्ही कोण आहोत

प्रतिक्रिया

चहाबिस्कीट's picture

18 Jun 2018 - 6:14 pm | चहाबिस्कीट

वरच्या सर्व व्हिडीओजना मराठी सबटायटल्स जोडली आहेत म्हणजे समजायला सोपे जाईल . युट्यूब वर सबटायटल चे बटन ऑन करावे.

सम्पूर्ण प्लेलिस्ट इथे आहे

https://www.youtube.com/playlist?list=PLCM1GoAdLTYa8iZpPjym2okgX4ubxJfW4

___________________________________________________________________________________________
स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

सुंदर आणि सविस्तर माहिती.

चहाबिस्कीट's picture

18 Jun 2018 - 8:05 pm | चहाबिस्कीट

@शाली - धन्यवाद!

मराठी_माणूस's picture

19 Jun 2018 - 12:52 pm | मराठी_माणूस

अवांतरःव्हीडीओ संबधी शंका

YTD Downloader वापरुन डाउनलोड केलेला चित्रपट avi मधे convert करुन philips dvp3608 प्लेयर वर चालवण्याचा प्रयत्न केल्यास , तो चालत नाही.

ह्या प्लेयर वर काही avi चालेल्या आहेत. मग काही avi का चालत नाही ?

मुळ उद्देश हा डाउनलोडेड चित्रपट टीव्ही( CRT) वर पहायचा आहे

चहाबिस्कीट's picture

20 Jun 2018 - 8:58 am | चहाबिस्कीट

तुमच्या प्लेयरला कम्पॅटिबल अशा avi फाईल मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वेगळं सॉफ्टवेअर/सेटिंग वापरावी लागेल. आधी माहितीसाठी पहा https://forum.videohelp.com/threads/297868-Question-about-AVI-files-and-DVD-player-Philips-DVP-5982

मराठी_माणूस's picture

25 Jun 2018 - 5:02 pm | मराठी_माणूस

धन्यवाद.
ह्या फोरम वर ह्याच प्रकरच्या समस्या मांडण्यात आली आहे आणि स्पष्टीकरण दिले आहे.
मी जालावर अजुन शोध घेतला आणि एक converter इंस्टॉल केला . त्यातले काहे पर्याय वापरुन पाहीले , त्यातला एक चालला.

हे पान सेव करत आहे. अनेक आभार. माझ्या व्यक्तिगत कामांसाठी अत्यंंत उपयुक्त माहिती आहे.

चहाबिस्कीट's picture

20 Jun 2018 - 8:28 am | चहाबिस्कीट

@arunjoshi123

धन्यवाद. वेळ मिळेल तेव्हा प्रयत्न करून बघा आणि लेखात एखादी ऍडिशन सुचवायची असेल (जेणेकरून अजून जास्त लोकांना हे सॉफ्टवेअर कसे वापरायचे आहे ते समजेल) तर सांगा.

_________________________________________
स्वाक्षरी: आमची वेब सिरीज पाहिली का?

सुंदर आणि सविस्तर माहिती बद्दल धन्यवाद.
एक शंका.
जर एखादया विडिओ ला प्रोफेशनल ऑडिओ लावायचा असल्यास कोणते टूल वापरावे ?

text to speech बरेच अँप आहेत, पण एखादी फ्री आणि open source सॉफ्टवेअर आहे का, ज्यामध्ये आपण टेक्स्ट input देऊन mp3 output मिळेल?

चहाबिस्कीट's picture

23 Jun 2018 - 10:52 am | चहाबिस्कीट

टेक्स्ट टू स्पीच कोणत्या भाषेचं करायचं आहे?

जगड्या's picture

23 Jun 2018 - 1:15 pm | जगड्या

Indian English or American English

चहाबिस्कीट's picture

25 Jun 2018 - 8:35 am | चहाबिस्कीट

FLITE वापरून पहा (अमेरिकन इंग्लिश साठी). पण अजून पर्यंत टेक्स्ट टू स्पीच तंत्रज्ञान हवं तेवढं चांगलं झालं नाहीये.

हा व्हिडीओ पहा. यात काही TTS सॉफ्टवेअर ची तुलना केली आहे.

-------------------------------------------------------------