ईस्ट इंडिया कंपनी

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
7 Jun 2018 - 8:55 am

हल्ली एका वादातून काही नवीन गोष्टी लक्षांत आल्या. मिपा सदस्यासाठी इथे लिहीत आहे.

अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तान भागांत जी युद्धे चालवली आहेत त्याचा अंत अजून तरी दृष्टिक्षेपाला येत नाही. त्याशिवाय सीरिया आणि येमेन इथे अजूनही अमेरिकेचे सैन्य कार्यरत आहे. चारी ठिकाणी मिळून अब्जावधी डॉलर्स चा चुराडा दार वर्षी होत आहे. इराक युद्धांत अमेरिकेने सुमारे २ ट्रिलियन डॉलर्स उडवले आहेत आणि युद्धाचा एकूण खर्च (जखमी सैनिकांचे पेन्शन, बॉण्ड्स वरील इंटरेस्ट इत्यादी ) मिळून तो सुमारे ६ ट्रिलियन डॉलर होईल. काही दिवस आधी अमेरिकन सैन्याने ९६ मिसाईल्स सीरिया मध्ये वापरली ह्यांचा एकूण खर्च १०० मिलियन इतका होता. हा फक्त मिसाईल्स चा खर्च. अफगणिस्तानात कोट्यवधी दारुगोळा अमेरिकेने नेला नंतर माघार घेताना वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने ३ मिलियन डॉलर्स वापरून सुमारे ८० मिलियन डॉलर्स चे अँम्युनिशन नष्ट केले. त्याच वेळी अफगाणिस्तानात क्रिकेट चा प्रसार करण्यासाठी अमेरिकेने २० मिलियन्स डॉलर्स खर्च करून अफगाणी क्रिकेट चे लाईव्ह टेलिकास्ट केले पण अफगाणी लोकांकड़े टीव्हीच नसल्याने ते कुणी जास्त लोक पाहू शकले नाहीत.

इथे अमेरिकन करदात्यांचे पैसे कसे उडवले गेले हे सांगण्याचा हेतू नाही तर हा पैश्यांचा गैरवापर नक्की कसा होतो आणि भारतीय पारतंत्र्य ह्या विषयाचा कसा संबंध आहे हे सांगणे आहे.

अमेरिकन युद्धानी अनेक अमेरिकन कंपन्यांचा फायदा होतो. अमेरिकन राजकारणी मंडळींनी आधीपासून ह्या विविध कंपन्यात सरळ नाहीतर इतर मार्गानी गुंतवणूक केली आहे. निवृत्तीनंतर अनेक कंपन्या राजकारणी आणि बाबू मंडळींना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या देतात. नाही तर त्यांच्या मुलांना मोठ्या नोकऱ्या देतात. मग हेच राजकारणी मंडळी उगाच "अमेरिका खतरे में" आवई उठवतात आणि शहनाईच्या मागे पों वाजते त्या प्रमाणे इतर "एक्स्पर्ट" मंडळी सुद्धा तोच सूर धरतात. ह्या एक्स्पर्ट मंडळींना विविध विश्वविद्यालयांत tenure देण्याची जबाबदारी मग विविध लॉबिस्ट ग्रुप उठवतात. ट्रम्प आणि NYT ह्यांत विस्तव जात नसला तरी सीरिया मध्ये मिसाईल ऍटेक चे पुरेपूर समर्थन NYT ने केले होते.

इथे तीन वेगळे मत प्रवाह उभे राहतात :

- इतर जग, भारतीय , naive लोग : अमेरिका हि युद्धे तेल चोरण्यासाठी करत आहे.
- अमेरिकन राजकारणी : अमेरिकेला धोका आहे म्हणून आम्ही युद्ध लढत आहोत
- (काही) अमेरिकन जनता : आमचे पदराचे पैसे मोडून मुळी इराक अफगाणिस्तानात इतका वेळ रहावेच का ? हाच पैसा आपल्या देशांत गुंतवावा.
- अमेरिकन डिफेन्स कंपनी executive : लोक मरोत आमचा स्टॉक वाढत आहे ना मग झाले .

इतिहास लिहत असताना अनेक लोकांना ह्या विचार प्रवाहांचा विसर पडतो. अनेक वर्षे जातात आणि फक्त काहीच मते लोकांच्या आठवणीत राहतात.

ईस्ट इंडिया कंपनी आणि भारत

इतिहास शिकताना किंवा एखादा चित्रपट वगैरे बघताना असे दाखवले जाते कि सर्व ब्रिटिश एकसंध होऊन भारताच्या विरोधांत होते. चुकून एकदा ब्रिटिश भारताची बाजू उचलून धरत आहे. पण भारतीय कॉलोनी आणि त्यावरील तत्कालीन विविध ब्रिटिश राजकारणी आणि विचारवंत ह्यांचा विचार काय होता ? ज्या प्रमाणे अमेरिकन युद्धांचे आर्थिक परिणाम अभ्यासले जातात त्याप्रमाणे ब्रिटिश आणि इस्ट इंडिया कंपनीचे आर्थिक विश्लेषण कितपत केले जात होते ?

७व्या शतका पासून अरब आणि व्हेनिस वाले व्यापारी भारत आणि चीन मधून सामान आणून युरोप मध्ये विकायचे. तेंव्हापासून भारतीय माल युरोप मध्ये अतिशय लोकप्रिय होता. ह्यामुळे अरब आणि व्हेनिस अतिशय गब्बर झाले होते त्याच वेळी इतर युरोपिअन राष्ट्रे भारतांत जाण्यासाठी इतर मार्ग शोधू लागली. गुजराती व्यापारी अरब प्रदेशांतून वारंवार युरोप भागांत जायचे. नंतर पोर्तुगजीस लोकांनी जेंव्हा भारताचा सागरी मार्ग शोधला तेंव्हा सर्वच युरोपिअन राज्ये भारतात आपल्या कंपन्यांना पाठवू लागली.

१५०० नंतर अमेरिकेतून युरोप मध्ये सोने आणि चांदी येऊ लागली. इंग्लंड मध्येच अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी जहाज बांधायला घेतली. अमेरिकेतून सोने आणायचे आणि ते सोने भारतात नेवून भारतातून वस्त्रे, मसाले इत्यादी विकत घ्यायचे असा व्यापार सुरु झाला. ह्या व्यापारांत इतका प्रचंड फायदा होता कि अक्षरशः हजारो जहाजे बांधली जाऊ लागली. मग काही मोठ्या कंपन्यांनी छोट्या कंपन्यांचा धंदा ह्या ना त्या मार्गाने बुडवण्याचा सत्र आरंभले. अजून पर्यंत अनेक ग्राहक असल्याने भारतीयांचा फायदाच होत होता. ग्राहक जास्त असले कि त्यामुळे स्पर्धा वाढते त्यामुळे आपल्या मालाला जास्त दर मिळतो आणि त्यामुळे आधुनिक पद्धतीने कपडे करणे, शेती करणे ह्यांत भारतीय लक्ष घालू लागले (आधुनिक शेती आणि भारत हे दोन्ही शब्द एकाच वाक्यात वापराने आज हास्यास्पद वाटते पण अनिर्बंध एक्स्पोर्ट मुळे भारतीय शेतकऱ्यांची अक्षरशः चांदीच होत होती) .

आता भारतात ज्या प्रमाणे अदानी किंवा अंबानी दिल्लीतील तक्थ हलवू शकतात त्याच प्रमाणे अनेक व्यापारी इंग्रजी राजघराण्याला वेठीस धरत होते. त्याशिवाय स्पेन, पोर्तुगिज, फ्रांस, डेन्मार्क इत्यादी राज्ये इंग्रजांच्या नाकांत दम करत होती ते वेगळे. सर्वप्रथम युरोपिअन राज्यांनी समुद्रांत आपले साम्राज्य स्थापन केले. ते एकमेकांत भांडत असले तर भारत, चीन इत्यादींच्या जहाजांना ते "चाचे" म्हणून एकजुटीने मारत असत. पायरेट्स ऑफ कॅरिबयन चित्रपटांत कान्होजी आंग्रे ह्यांचा मुलगा संभाजी आंग्रे हा चाचा म्हणून दाखविला गेला आहे.

पण युरोपिअन देशानी जहाज बांधणीत भरारी घेतलीच कशी ? त्याचे कारण राजघराणी आणि चर्च ह्यांत आहे.

आधी राजाला जर दोन मुले असायची तर राजा आपले राज्य वाटून दोघांना द्यायचा. एक दोन मुले झाली कि राणीला विटून राजा मग जास्त तरुण कोवळ्या मुलींच्या सानिध्यांत रमायचा आणि अनेक बास्टर्ड मुले निर्माण करायचा. ह्यावर चर्च मंडळींनी आक्षेप घेतला. मग राजाला नाईलाजाने बायकोबरोबर जास्त वेळ घालवावा लागला. मग तिला जास्त मुले झाली. आता राज्य ५ भागांत वाटले गेले तर पाचही मुलांची पवार कमी होते म्हणून चर्चला हाताशी धरून राजे मंडळींनी नियम बदलले. आत फक्त मोठा मुलगा राजा व्हायचा. चर्च ने एकूणच राजाचे लग्न , त्याचे लैगिक जीवन ह्यांत हस्तक्षेप करायला सुरुवात केली होती. मुलांत राजाने सेक्स करूच नये ह्यावर त्यांचा भर असायचा कारण एकदा राजाला मूल नाही झाले तर उत्तराधिकारी ठेवायची जबाबदारी चर्च वर यायची. १४०० मध्ये राजा राणीला सेक्स करायला चर्च नियमा प्रमाणे साधारण २० दिवस मिळायचे.

आता मग वेगळी समस्या निर्माण झाली. मधले आणि धाकटे पुत्र मोठ्या भावाला मारण्यासाठी षडयंत्र लहानपणा पासूनच रचू लागले. मग काही बिशप मंडळी लहान असतानाच मुलाला हेरून त्याला आपल्या मोठ्या भावाला मारण्यात मदत करायची त्यामुळे बिशप मंडळीत सुद्धा भांडण लागून चर्च आणि पोप ला त्याचा त्रास व्हायला लागला.

म्हणून विविध राजांनी नवीन स्कीम काढली. मोठा मुलगा सोडून इतर सर्व मुलां वयांत येतंच प्रचंड पैसा द्यायचा आणि त्या बदल्यांत त्यांनी सर्व हक्क त्यागून देश सोडून द्यायचे. मग काही चतुर entrepreneur मंडळींनी शिपिंग कंपन्या स्थापन केल्या. एका राजकुमाराला पैसे मिळताच तो पैसा ह्या कंपन्यांना द्यायचा, त्या कंपन्या मग वास्को गामा सारखे नराधम शोधून त्यांना गुलाम वगैरे देऊन नवीन जमीन शोधायला पाठवायचे. एकदा जमीन सापडली अव्वाच्या सव्वा डाँ ह्या राजकुमाराला मिळायचा आणि पाहिजे तर मग त्याला त्या भागाचा शासक म्हणून अनिर्बंध सत्ता मिळायची.

ह्या प्रकारच्या गुंतवणुकीमुळे युरोपमध्ये जहाज बांधणी व्यवसाय भरभराटीला आला. आपण इंग्लंड मध्ये गेलात तर एखाद्या जहाज संग्रहालयांत जा आणि जुन्या काळाची जहाजे किती थक्क करणारी होती हे आपण पाहू शकाल. विविध प्रकारचे सामान नेण्यासाठी विविध प्रकारची आणि आकाराची जहाजे. शिडांचा कपडा पासून हगंदारी पर्यंत प्रत्येक गोष्टीत विविधता आपल्याला दिसून येईल.

हळू हळू युरोपिअन देशांची मक्तेदार एकट्या इंग्लंडने मोडून काढली. ह्यांत हेन्री आठवा ह्याचा मोठा हाथ आहे. १५०० मध्ये ह्याचा घटस्फोट करून द्यायला रोमन चर्च ने नकार दिला. हेन्री हा क्रूरात्मा होता असे इतिहास सांगतो पण चर्च साठी तोच वस्ताद होता. त्याने कॅथॉलिक चर्चलाच झुगारले आणि स्वतःची चर्च स्थापन केली. कॅथॉलिक लोकांना त्याने हाकलले, त्यांची संपत्ती जप्त केली. इत्यादी. पुढील शतकांत चर्च ची लुडबुड नसल्याने ब्रिटिश राजसत्तेला जास्त स्वातंत्र्य होते त्याच्या उलट पोर्तुगीस इत्यादी धर्मांध बनले आणि तिथेच त्यांचा ह्रास झाला.

ईस्ट इंडिया कंपनी चा उदय

१६९० आधी फक्त ब्रिटिश पार्लमेंट कडून परमिशन घेऊन ब्रिटिश कंपन्या भारत व्यवहार करू शकत असत. त्यात ईस्ट इंडिया कंपनी पुढे होती.

१६९० मध्ये कुणीही ब्रिटिश व्यापारी भारतात आपले जहाज पाठवू शकत होता. ब्रिटिश नेव्ही त्यांचे फ्रांस इत्यादी पासून रक्षण करायची. अश्यांत दुसऱ्या ईस्ट इंडिया कंपनी चा उदय झाला आणि ती चांगला नफा कमावू लागली. दोन्ही कंपन्या मध्ये तीव्र स्पर्धा असल्याने ब्रिटिश राजकारणी सुद्धा कुना एकाची बाजू घेऊन भांडत असत.

काही वर्षांनी दोन्ही कंपनी आणि ब्रिटिश राजकारणी एकत्र आले आणि त्यांनी दोन्ही कंपन्या मर्ज करण्याचा निर्णय घेतला त्याच बरोबर इतर सर्व कंपन्यांना भारतात व्यवहार करण्याला बंदी घातली गेली. मग ब्रिटिश राजकारण्यांनी ह्या कंपनीचे भाग विकत घेतले आणि ते सर्वांत मोठे गुंतवणूकदार बनले. पुढे कंपनीच्या डिरेक्टकरच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमून त्या कमिटीला कामपणीच्या व्यवहारावर नजर ठेवायला सांगितले गेले.

ब्रिटिश जनता आणि ईस्ट इंडिया कंपनी

आधी आधी कंपनी फक्त व्यापार करत असे. मोनोपोली असल्याने वाट्टेल तो दर लावून ब्रिटिश लोकांकडून पैसे उकळावयाचे आणि नफा राजकारणी मंडळींनी वाटून घ्यायचा असे सत्र सुरु झाले. १७७० पर्यंत कंपनीने आणि राज्यकर्त्यांनी बक्कळ पैसा कमवला. कोलकाता इत्यादी ठिकाणी त्यांची ठाणी होती. १७७० नंतर अमेरिकेने ब्रिटिश राज्यसत्तेला चांगलाच बांबू दिला. तेथून पैसे येणे बंद झाल्यावर ब्रिटिश राज्यकर्त्यांना पैश्यांची चणचण भासू लागली आणि ईस्ट इंडिया कंपनीवरील दबाव वाढला.

इथे कंपनीने सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीला मारायचे ठरवले. जबरदस्तीने भारतीय लोकांकडून जमीन, धान्य काढून घ्यायचे, संपत्ती लुटायची असे करून शॉर्ट टर्म मध्ये जास्त पैसे कमवायचा पण त्याच वेळी लॉन्ग टर्म मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडायचे असे सत्र आरंभले. त्यातूनच बंगालचा दुष्काळ भारतीयांसाठी प्रचंड जीवघेणा ठरला.

भारतीय राजे काही एकदमच मूर्ख नव्हते. व्यापारी ईस्ट इंडिया कंपनी विनाकारण भारतीयांचा छळ करते आहे हे लक्षांत येतंच त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी ला लगाम लावायचा प्रयत्न केला अश्या वेळी ईस्ट इंडिया कंपनीला कळून चुकले कि आणखीन चोरी करायची असेल तर भारतावर राजकीय नियंत्रण सुद्धा मिळवणे आवश्यक आहे. हे नियंत्रण मिळविण्यासाठी कंपनीला अनेक बेकायदेशीर गोष्टी कराव्या लागल्या. लहान मुलांना मारणे, लोकांचे हाथ छाटणे, जिवंत जाळणे, डाकू लोकां बरोबर संगनमत करणे, बाकी थकवणे, इतर राजा बरोबर असलेला करार मोडणे इत्यादी.

ह्या सगळ्याकडे ब्रिटिश पार्लमेंट कानाडोळा करायची.

ऍडम स्मिथ

ऍडम स्मिथ, डेविड ह्यूम इत्यादी स्कॉटिश enlightenment चे मुख्य विचारवंत होते. वैयक्तिक स्वातंत्र्य, फ्री ट्रेड, भांडवलशाही इत्यादी विषयावर ऍडम स्मिथ ला जनक मानले जाते. त्यांनी ह्या सर्व गोष्टींना scandal म्हणून कडाडून विरोध केला. अश्या प्रकारच्या मोनोपोलीने ईस्ट इंडिया कंपनीला माज चढेल असे त्यांचे मत होते त्या शिवाय ब्रिटिश जनतेचे ह्यांत किती नुकसान आहे हे त्याने दाखवून दिले. “An Inquiry Into the Nature and Causes of the Wealth of Nations” (1776) ह्या पुस्तकांत त्यांनी जे काही लिहिले ते आज सुद्धा अर्थशास्त्रांत शिकवले जाते आणि त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचा जनक मानले जाते.

Adam Smith highlighted the government-granted monopoly of the EIC and its abuses and inefficiencies. He argued that the Bengal drought was turned into a famine due to the EIC’s incompetence.

भारतीय लोकांना सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीत भाग असायला पाहिजे आणि राजकीय नियंत्रणा पेक्षा भारतात जास्तीत जास्त व्यापार करणे हे कंपनीचे धोरण असायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते.

ब्रिटिश जनतेने ह्या सर्वांच्या विरुद्ध आवाज उठवला तयारीस सुद्धा त्यांना फरक पडत नसे. कवडीच्या मोलांत सुद्दा जरी वस्त्रे आणि इतर सामान कंपनीने प्राप्त केले तरी ब्रिटिश जनतेला मात्र अव्वाच्या सव्वा दाम देऊनच विकत घ्यायला मिळायचे. त्याशिवाय जे सैनिक कंपनी बरोबर जायचे त्यांचा खर्च कंपनी करायची नाही तर राजा करायचा म्हणजे करदात्याच्या पैशातून. ईस्ट इंडिया कामपणीच्या धोरणाने भारतीय मालाचा दर्जा सुद्धा कमी कमी होत होता आणि उलट वाढलेल्या युद्धानी ब्रिटिश सैनिकांचे जीव जायचे ते वेगळे. ह्यामुळे सामान्य जनतेत ईस्ट इंडिया कंपनीचा रोष वाढला होता. त्यात अमेरिकन लोकांची भरभराट आणि त्यांनी ज्या पद्धतीने ब्रिटिश लोकांना युद्धांत तर हरवलेच वरून ब्रिटिश राजसत्ता आणि त्यांचा अनागोंदी कारभाराचे वारंवार जे वाभाडे काढले त्यामुळे सामान्य जनता पेटून उठली होती.

१८५७ च्या बंड उंटांचे कंबरडे मोडणारी शेवटची काठी ठरली. ज्या निर्र्लज्जतेने इंदिरा गांधी ह्यांनी खाजगी बँक गिळंकृत केल्या त्याच निर्ल्लजतेने ब्रिटिश सरकारने कंपनीचा ताबा घेतलाच पण वरून सर्व भागीदाराकनं डिव्हिडंड आणि मोबदला दिला. खरे तर इथे कंपनी पूर्णपणे दिवाळखोर ठरायला पाहिजे होती पण ब्रिटिश करदात्यांचा पैसा वापरून ब्रिटिश लॉर्ड्स मंडळी आणखीन एकदा गब्बर झाली.

१८५७ नंतर ब्रिटिश सरकारने भारताचा ताबा ठेवण्यासाठी प्रचंड पैसा खर्च केला. ह्यामुळे ब्रिटिश जनतेचा काडीचाही फायदा झाला नाही उलट नुकसान जास्त झाले.

ज्या पद्धतीने अमेरिकेच्या इराक युद्धातून बुश, हिलरी, ओबामा, लोकहिड मार्टिन, बोईंग, इत्यादींचा फायदा झाला पण जनतेचे नुकसान झाले त्याच प्रमाणे १८५७ नंतर ब्रिटिश जनतेचा प्रचंड पैसा भारतांत रस्ते, रेल्वे, न्यायालये, निकृष्ट दर्जाची विद्यालये, आर्मी कॅंटोन्मेंट, बर्राक्स इत्यादीत खर्च झाला तर ईस्ट इंडिया कंपनीच्या काळांत सारखे लोक अतिशय गब्बर झाले. थॉमस पिट सारखेच लोक ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने भारतांत आले पण नंतर फरार झाले आणि बाहेरून गुपचूप पाने भारतीय माल युरोप मध्ये स्मगलिंग करून गब्बर झाले.

ईस्ट इंडिया कंपनीचा एकूण व्यवहार त्या काळी इंग्लंडच्या GDP च्या २% इतका होता. म्हणजे त्या दृशीतकोणातून ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंड साठी इतकी महत्वाची नव्हती पण इंग्लंडच्या करदात्यांचा प्रचंड पैसा सुद्धा ईस्ट इंडिया कंपनीच्या मोनोपोलीच्या रक्षणा साठी खर्च होत होता. आणि तो पैसा इंग्लंड मधील कदाचित १००-२०० लोकांच्या हातातून जात होता. त्यांच्यासाठी तो फार होता.

ब्रिटिश सरकारचे नुकसान

६० पेक्षा जास्त हिल स्टेशन्स, १०० पेक्षा जास्त कॅंटोन्मेंट, ३ महाभयंकर पैसे खर्च करून केलेले दिल्ली दरबार, ७०,००० ब्रिटिश नोकरदारांचे पगार ह्यावर ब्रिटिश जनतेचा प्रचंड पैसा जात होता. काही लोक म्हणतात कि ब्रिटिश सरकारने ह्या बदल्यांत भारतातून प्रचंड पैसा चोरून नेला पण त्यांत तथ्य नाही कारण ब्रिटिश सरकार शेवटी पैसे देऊनच धान्य विकत घेत असे, पैसे देऊनच वस्त्रे , कोळसा इत्यादी विकत घेत असे आणि जो माल चोरून विकला जायचा त्याचे पैसे ब्रिटिश सरकार किंवा जनते ऐवजी ब्रिटिश काही थोड्याच लोकांच्या हातांत जात असे.

ह्याउलट समजा ब्रिटिश लोकांनी काढता पाय घेतला असता आणि त्यावेळच्या राज्याकडे फ्री ट्रेड करार केला असता तर भारतीय लोकांनी आनंदाने आपले सामान ब्रिटिश किंवा इतर कुणालाही विकले असतेच. ह्या उलट ब्रिटिश सरकारचा सरकारी यंत्रणेवरील खर्च वाचला असता आणि स्वतः सुरक्षित असल्याने भारतीय शेतकरी आणि उद्योगधंद्यांत जास्त गुंतवणूक होऊन भारताने सुद्धा अधिक प्रगती केली असती.

ऍडम स्मिथ ह्यांनी हे त्या काली ओळखले होते आणि शेवटी जेंव्हा काढता पाय घ्यायची वेळ आली तेंव्हा ऍडम स्मितच्याच विचारांचा प्रभाव लोकांच्या मनावर पडला होता.

One Historian, writing in the new Oxford History of the British Empire has gone so far to speculate that if Britain had got rid of the Empire in the mid 1840s, she could have reaped a ‘decolonization dividend’ in the form of a 25% tax cut that could have been diverted to industrial modernization at home.

मिल्टन फ्रीडमन ह्यांच्या अंदाजानुसार भारतीय लोकांना गुलाम ठेवून ब्रिटिश राजसत्तेचे नुकसानच जास्त झाले.

भारतीयांचे नुकसान

पण गुलामगिरीच्या काळांत सर्वांत मोठे नुकसान भारतीय लोकांचे झाले. आधी ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर ब्रिटिश राजघराणे ह्यांनी भारताला आपली पुनः बटीक बनवले. (संपादित)

पॉर्न पाहण्यासाठी लॅपटॉप वापरणाऱ्या मुलाचा लॅपटॉप चोराला तर त्याचे फक्त लॅपटॉप चे नुकसान होते पण कोडिंग करून पोटभरणाऱ्या माणसाचा लॅपटॉप चोरला तर त्याचे लॅपटॉप + बुडालेला रोजगार ह्या दोन्हीचे नुकसान होते. चोराला मात्र फक्त लॅपटॉप चा फायदा होता. त्या न्यायाने भारतीयांचे फक्त आर्थिक नुकसान नाही झाले तर भारतीयांचे जे पोटेन्शिअल होते त्याचे सुद्धा नुकसान झाले.

ब्रिटिश आणि नंतर त्यांचे कठपुतळी नेहरू ह्यांच्या मुले भारतीय लोक आज सुद्धा अतिशय tyrannical सरकार खाली जगत आहेत जिथे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सरकारी बांबूची परवानगी लागते. जिथे आज सुद्धा सरकारी लोक जाताना लाल दिव्याची गाडी वापरतात आणि सर्वसाधारणतः peasant लोकांना मान खाली घालून वाट करून द्यावी लागते. जिथे आर्मी अधिकार कवडीमोल किंमत देऊन उच्चभ्रू जागांत राहतात आणि आम्हा तुम्हाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजून साधा फ्लॅट घ्यावा लागतो.

ऑफ टॉपिक : गांधी हत्या का केली गेली ? ह्यावर श्री एलस्ट ह्यांचे अतिशय सुदंर लेक्चर आहे.
https://www.youtube.com/watch?v=E4ZInGd7Rqg

Originally published on : http://www.sadhana108.com/2018/06/07/%E0%A4%88%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9...

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

उत्तम व माहितीपूर्ण लेख

अनिंद्य's picture

7 Jun 2018 - 10:46 am | अनिंद्य

सावकाशीने वाचावा असा लेख.
बरेच मुद्दे एका लेखात गुंफले आहेत.

उत्तम व माहितीपूर्ण तसेच डोळे उघडणारा लेख !!
लेखीकेची ओघवती लेखणी व त्यातुन त्याकाळची परिस्थिती समोर उभी रहाते !!

रामदास२९'s picture

7 Jun 2018 - 1:08 pm | रामदास२९

उत्तम लेख..पण लक्षात कोण घेणार .. जपान, चीन, रशिया, फ्रान्स, दक्षिण-पूर्व आशियाई देश स्वत:च्या भाषा, सन्स्क्रुति ला न सोडता प्रगति करत आहेत आणि आपण पाश्त्यान्च अन्धानूकरण करत आहोत...

वा! हे सगळे एकाच लेखात सलग वाचायला मिळाले त्यामुळे वाचताना मजा आली. छानच लिहिलय. माहितीपुर्ण लेख. आवडला.

manguu@mail.com's picture

7 Jun 2018 - 6:26 pm | manguu@mail.com

नवीन सरकार नवीन इतिहास.

गान्धी , पटेल, नेहरु नाच्या होते. मग गोळवलकर , हेडगेवार , नथुराम व त्याचे गुरु हे कोण होते ? कोपर्यात बसून शिट्ट्या मारणारे आणि फेटे उडवणारे का ?

गोळवलकर, हेडगेवार आणि नथुराम ह्यावर कधी तरी भविष्यांत लिहीन. पण तुम्हाला जर मी RSS वाली वाटते तर तसे नक्कीच नाही. पण जो व्हिडीओ दिला आहे तो जरूर बघा त्यांत नथुराम गोडसेचे जे विवेचन दिले आहे ते बरोबर वाटते.

मधे फेसबूक वर एक लेख वाचनात आलाय. हि घ्या लिन्क काहि फोटो हि आहेत नेहरुजी चे.

manguu@mail.com's picture

7 Jun 2018 - 6:28 pm | manguu@mail.com

ब्रिटिश आणि नंतर त्यांचे कठपुतळी नेहरू ह्यांच्या मुले भारतीय लोक आज सुद्धा अतिशय tyrannical सरकार खाली जगत आहेत जिथे प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला सरकारी बांबूची परवानगी लागते. जिथे आज सुद्धा सरकारी लोक जाताना लाल दिव्याची गाडी वापरतात आणि सर्वसाधारणतः peasant लोकांना मान खाली घालून वाट करून द्यावी लागते. जिथे आर्मी अधिकार कवडीमोल किंमत देऊन उच्चभ्रू जागांत राहतात आणि आम्हा तुम्हाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजून साधा फ्लॅट घ्यावा लागतो.

हे फक्त ब्रिटिश अन कॉण्ग्रेस काळातच घडले का ? वाजपेयी अन मोदीन्च्या काळात काय परिस्थिती आहे ?

manguu@mail.com's picture

7 Jun 2018 - 6:41 pm | manguu@mail.com

ईस्ट इंडीयाचे आणि राणी सरकारचे खरे गुलाम होते, भारतातील राजे व संस्थानिक. इंग्रजाना व्यापार करायचे अधिकार ह्यानीच प्रदान केले. स्वतःच्या स्वार्थासाठी इंग्रजाना धरुन शेजारी राजाशी युद्धे केली. इंग्रजाना कर गोळा करायचे अधिकार दिले. त्यामोबदल्यात स्वतःचे राजमहाल भरुन घेतले. वर इंग्रजांकडून पेन्शनही घेतली , जी स्वतंत्र भारत सरकारनेही १९७१ अखेर दिली ( आणि त्यानण्तर काँग्रेसच्या इंदिरा गांधीनीच ती बन्द केली. )

हा सगळा इतिहास , काँग्रेस - गांधी- नेहरु - ह्यांच्यापूर्वीपासूनच घडलेला आहे.

विजुभाऊ's picture

7 Jun 2018 - 6:49 pm | विजुभाऊ

हो ना
धादांत खोटा लेख. इतिहास हवा तसा जुळवलाय.
ज्

या निर्र्लज्जतेने इंदिरा गांधी ह्यांनी खाजगी बँक गिळंकृत केल्या

हे वाक्य तर खोटारडेपणाचा आणि रडेपणाचा कळस म्हणायला हवा.
इंदिरा गांधीनी बँकांचे सरकारीकरण केल्यामुळेच आज भारतीय अर्थव्यस्था तरली आहे.

अनुप ढेरे's picture

8 Jun 2018 - 10:19 am | अनुप ढेरे

इंदिरा गांधीनी बँकांचे सरकारीकरण केल्यामुळेच आज भारतीय अर्थव्यस्था तरली आहे.

हे निखालस खोटं आणि चूक विधान आहे. या निर्णयामुळेच सरकारी बँकाम्मध्ये एन्पिएचा भस्मासुर दिसतो आहे. सरकारी बँका लुटायलाच आहेत. इंदिरा गांधीने या बँका जनतेचा पैसा लुटता यावा म्हणुनच नॅशनलाईज केल्या.

मराठी कथालेखक's picture

7 Jun 2018 - 7:02 pm | मराठी कथालेखक

लेख वाचायला मजा आली

वरुण मोहिते's picture

7 Jun 2018 - 7:41 pm | वरुण मोहिते

लेख म्हणून चिकटवायचे का?

निमिष ध.'s picture

7 Jun 2018 - 8:34 pm | निमिष ध.

सुरूवात जरा बरी वाटली होती. पण नंतर मात्र लेख लिहायचा म्हणू कुठेच्या कुठे नेला आहे आणि कसलेही संबंध नसलेली विधानं केलेली आहेत. आवरा

Ram ram's picture

7 Jun 2018 - 9:38 pm | Ram ram

M.k.gandhi ha ingrajancha agent hota. Jasa ki anna hujure.gandhi asaram tulna barobar ahe.

डँबिस००७'s picture

7 Jun 2018 - 10:23 pm | डँबिस००७

जिथे आर्मी अधिकार कवडीमोल किंमत देऊन उच्चभ्रू जागांत राहतात आणि आम्हा तुम्हाला अव्वाच्या सव्वा पैसे मोजून साधा फ्लॅट घ्यावा लागतो.

मला तर बुवा आदर्श घोटाळा आठवला!!

आर्मी अधिकार्यांच्या नावावर कॉंग्रेसी नेत्यांनी कवडीमोल किंमत देऊन उच्चभ्रू
जागांत जमिन सरकारकडुन उकळली व त्यावर टोलेजंग टॉवर बांधले !

कॉग्रेस किती धुतल्या तांदळाची आहे हे सर्वांना आता कळुन चुकलय !!

काँग्रेसलाच दोष देऊ नका. आर्मी अधिकाऱ्यांचे हात सुद्धा ह्यांत बरबटले आहेत.

द्वितीय महायुद्धांत भारताच्या सैनिकांचा सहभाग अहिंसेचा पुरस्कार करणार्या म. गांधीजींच्या परवानगीनेच झाला होता अस ईतिहास सांगतो !!

अहिंसा ऐनवेळी गुंडाळुन ठेवली की तो ऐक गहन राजकारणाचा भाग होता ?

जर तेव्हांचे नेते राजकारणात ईतके मुरलेले होते तर देशाच विभाजन करण्याच कारस्थान त्यांच्याच नाकाखालीच कस काय घडल बुवा ??

कारण राष्ट्रहित हे त्यांचे लक्ष्य नव्हते, सत्ता प्राप्त करावी हे त्यांचे लक्ष्य होते. आता मोदी, कपिल सिब्बल किंवा चिदंबरम वगैरे राष्ट्र हिताच्या ज्या गप्पा मारतात त्याच प्रकारच्या गप्पा नेहरू आणि इतर मंडळी मारत होती.

स्किन इन द गेम :

बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले हे तुकोबांनी सांगितले आहेच. पण आपले "प्रिन्सिपल" किती स्ट्रॉंग आहेत हे आपण त्यासाठी किती त्रास भोगू शकता ह्यावर अवलंबून आहे. उदाहरणार्थ बोस किंवा सावरकर ह्यांनी आपल्या तत्वासाठी प्रचंड प्रचंड त्रास भोगले ह्यावरून ब्रिटिश त्यांना खरोखर किती घाबरत होते हे कळून चुकते. ह्या उलट गांधी नेहरू हे व्हाईसरॉय ह्यांच्याबरोबर उठ बसणारे लोक होते, त्यांना जेल मध्ये जाणे म्हणजे डोक्यावर टपली मारण्यासारखे होते.

ज्या पद्धतीने भारत सरकार हुर्रियत वगैरेंना पोसते त्याच प्रकारे ब्रिटिश सरकार काँग्रेस वाल्याना पोसत होते. हुर्रियत वाले भारत सरकारच्या विरोधांत गरळ ओकत राहिले तरी भारत सालच्या मलिद्या वर जगतात आणि वारंवार शांती चे नाटक तरी प्रस्थापित करायला मदत करतात.

राजकारणाच्या खेळांत सगळेच नंगे आहेत. नेहरू काय तर मोदी काय. आपण उगाच लोकांना संत बनवतो.

manguu@mail.com's picture

7 Jun 2018 - 11:37 pm | manguu@mail.com

नेहरू गांधी देशाची वाट लावणार हे माहीत होते तर rssवाल्यानी का नाही election लढवल्या ?

Deserter's picture

7 Jun 2018 - 11:57 pm | Deserter

मूर्ख जनता,गांधी हा अत्यंत धूर्त व कावेबाज माणूस होता त्याला जनतेशी काही कर्तव्य नव्हते .आपला जगात नावलौकीक व्हावा पुढील अनेक शतके लोक आपल नाव घेत रहावं हीच या माणसाची वासना होती ,या सगळ्यांसाठी त्याने संतपद धारण केले आणि लोकांना आपल्या नादी लावले हाच खरा इतिहास आहे .एक उदाहरण घ्यायच झाले तर खिलाफत चळवळीचे घेता येईल हिंदू महासभा आणी सावरकरांचा विरोध असतानाही हजारो हिंदू गांधीजी च्या आग्रहाने या चळवळीत सहभागी झाले आणी पुढे त्यांचा नरसंहार घडवण्यात आला .

ठाऊक नाही ! विवेकानंदानी का नाही इलेक्शन लढवले ? टाटांनी का नाही आपली पार्टी काढली ? ध्यानचंदानी हॉकी सोडून का नाही इलेक्शन लढवले ? शंकराचार्यांनी का नाही मोर्चा काढला ? माझ्या आजोबानी का नाही आपली मिलिशिया उभारून ब्रिटिशांवर हल्ला का नाही चढवला ? मला काय ठाऊक ? इथे त्याचा संबंध काय ?

हिंदूंच्या वतीने हिंदू महासभा ने बऱ्यापैकी काम केले होते. तसे पाहता टिळक सारखे जुने काँग्रेसी लोक पूर्ण स्वराज्य मागत होते. पण टिळकांना मिळालेला बडगा पाहून गांधीजी नेहरू ह्यांनी ते धोरण बदलून ब्रिटिशांनी आमच्या गळ्यांत पट्टा टाकून चाबूक आमच्या हाती द्यावा असे धोरण पत्करले. ब्रिटिशाना पण तेच हवे होते.

हिंदू महासभा आधी काँग्रेसबरोबरच एक लॉबी प्रमाणे काम करायची पण नेहरू ह्यांचे धोरण पाहून त्यांनी आपली वेगळी चूल मांडली आणि विरोधाचे धोरण पत्करले. नेहरू गांधी इत्यादी हिंदू महासभा वाल्याना कडवे मानायची. आज काल ह्या प्रकारे काँग्रेस पार्टी RSS आणि RSS इतर हिंदू संघटनांना कमी लेखते आणि बाकीचे लोक कसे "कडवे" आहेत असा प्रोपोगांडा करते त्याच प्रमाणे त्या काली काँग्रेस हिंदू महासभा, सावरकर इत्यादींना कमी लेखायची. पण जेंव्हा फाळणी झाली आणि लक्षावधी हिंदू मारले गेले तेंव्हा बहुतेक हिंदू पेटून उठले आणि त्यावेळी नेहरू गांधी जोडगोळीची पॉप्युलॅरीटी अगदी कमी झाली.

नथुराम गोडसे माझ्या मते पहिला हिंदू टेरॅरिस्ट होता. त्यांनी गांधींना गोळी घालताच बहुतेक हिंदूंना नेहरू गांधी बरोबर म्हणत होते हे पटले आणि माझ्या मते हिंदू महासभा आणि एकूणच हिंदू केंद्रित राजकारणाचे प्रचंड नुकसान झाले. गांधी ह्यांना स्वातंत्र्यानंतर गोळी घालून विशेष फायदा झाला नाही.

हेडगेवार ह्यांनी RSS ला राजकारणात का उतरवले नाही हे मला ठाऊक नाही पण RSS चा खरा अपराध माझ्या मते त्यांनी ज्या पद्धतीने ढिसाळ वैचारिक धोरण पत्करले ह्यांत होते. राजकारणात भाग नसेल घ्यायचा तर वैचारिक लेव्हल वर शेकडो पुस्तके, थिंक टँक्स, वर्तमानपत्रे, इतर माध्यमे, विविध विषयांत स्वतंत्र संशोधकांना मदत इत्यादी कामे करायला पाहिजे होती. (जी त्या काळापासून कम्युनिस्ट लोक करत आले आहेत).

RSS हे वैचारिक पातळीवर किती ढिसाळ आहे हे पाहायचे असेल तर राम माधव ह्यांचे काम बघा.

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 12:55 am | manguu@mail.com

थिंक टंक आणि election हे दोन भिन्न रूट आहेत , ते एकमेकांना substitute करू शकत नाहीत , म्हणजे गोळी व इंजेक्शनसारखे , ते प्रत्येकवेळी एकमेकांना substitute करू शकत नाहीत , काही गोळ्या गोळ्याच असतात व काही इंजेक्शने ही इंजेक्शनच

त्यामुळे election का लढली नाही , ह्याचे think tank चालवली , हे उत्तर नाही, लोकशाही आली म्हटल्यावर आणि त्यातही नेहरू गांधीसारखे वाईट लोक आहेत म्हटल्यावर 7 कोटी हिंदूतून जागोजागी त्याविरोधात निवडणुकीत प्रतिनिधित्व घ्यायला हवे होते, ( सात कोटी आकडा वंदे मातरम गाण्यातला आहे बरं का , )

तेच जर केले नाही , आणि उगाचच पेपर, भित्तीपत्रके , गांधीहत्या , कुजबुज इ च करत राहिले तर it doesnt make any sense.

RSS ने इलेक्शन का लढवली नाही ह्याचे उत्तर मला ठाऊक नाही. माझ्या माहितीप्रमाणे तो हेडगेवार ह्यांचा निर्णय होता आणि त्याच्या मागे काय तर्क होता मला ठाऊक नाही. पण प्रत्येक देशप्रेमी, धर्म प्रेमी संघटनेने इलेक्षनच लढवायला आहे असे मला वाटत नाही. इलेक्शन सोडून इतर मार्गांत सुद्धा संघटना वाटचाल करू शकतात. त्यामुळे नेहरू गांधी विरोधांत संघाने इलेक्शन लढवले नाही ह्यांत मला काही गैर वाटत नाही. त्याशिवाय १९४७ आधी काँग्रेस इलेक्शन हा सगळा ब्रिटिश खेळ होता. ब्रिटिशांच्या तालावर नाचणारेच ह्या खेळांत भाग घेऊ शकत होते. नेहरू किंवा मुस्लिम लीग किंवा इतर ह्यांना ब्रिटिश नाचवू शकत होते म्हणूनच त्यांना लुटुपुटीची लढाई खेळण्याचे स्वातंत्र्य होती. कदाचित संघटन वाढवणे है हेडगेवारांचे लक्ष्य असेल आणि त्यासाठी ब्रिटिशांच्या रडारवर न येणे हि १९४७ आधी चांगली (कदाचित) स्ट्रॅटेजी होती. मला ठाऊक नाही हेडगेवारांचा अभ्यास असलेली व्यक्ती जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकेल पण मला त्यांत काहीही गैर वाटत नाही.

हेडगेवार ह्यांनी १९२५ चा दरम्यान RSS ची स्थापना केली आणि १९३७ पर्यंत ते काँग्रेस बरोबरच होते. १९३४ गांधी स्वतः शाखेवर गेले आणि त्यांनी हेडगेवार ह्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. असे असू शकते कि हेडगेवार ह्यांना काँग्रेस आणि नेहरू इत्यादींची भूमिका मान्य होती आणि संघाचा नेहरू द्वेष कदाचित नंतरचा असावा.

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 9:43 am | manguu@mail.com

दुसर्याच्या घरी गेले , समारंभ असला , जेवणावळी असली की एकमेकांची स्तुतीच होते.

संघ अशा वेळची वक्तव्ये जाहिरातीला वापरतो

अर्धवटराव's picture

8 Jun 2018 - 8:38 am | अर्धवटराव

त्यात सत्यासत्य किती हे काहि कळलं नाहि.

वास्को द गामा ला नराधम का म्हटले आहे?

""कंपन्या मग वास्को गामा सारखे नराधम शोधून त्यांना गुलाम वगैरे देऊन नवीन जमीन शोधायला पाठवायचे. ""

मराठी_माणूस's picture

8 Jun 2018 - 12:19 pm | मराठी_माणूस

हाच प्रश्न मलाही पडलेला आहे.

खालील वाचून काय वाटते ते सांगा मी भाषांतर सुद्धा करू शकत नाही.

Upon his second arrival in India Vasco da Gama began to seize any Arab vessel he came across. This led to the notorious Pilgrim Ship incident in which he captured a vessel carrying Muslims on a pilgrimage from Calicut to Mecca. Gasper Correia, a Portuguese historian, described his acts as one that is unequaled in cold-blooded cruelty. The Portuguese explorer looted the ship that was carrying 400 pilgrims among them were 50 women. He then proceeded to lock in every passenger on board and raze the ship. Women were bringing up their wealth and babies and begging for mercy. It is said that they brought up enough gold to ransom all the Christians in the Kingdom of Fez. Vasco da Gama would not spare any and burned alive every man, woman and child.

During his visit to Calicut he demanded that the King expel every Muslim from India. The King would refuse. In retaliation Vasco da Gama would bombard the city, destroying many houses and would also seize a rice vessel, capture the crew and cut off their hands, nose and ears. The King sent a priest to speak to Vasco da Gama. Da Gama would call him a spy and cut off his lips and ears and then proceed to sew a pair of dog ears onto his head.

मराठी_माणूस's picture

8 Jun 2018 - 12:43 pm | मराठी_माणूस

हा उतारा कशातला आहे ?

या लेखावर प्रतिक्रीया देण्यात काही अर्थ नाही. लेखकाने जे तारे तोडले आहेत त्या वरून काही म्हणणे म्हणजे साधकांच्या साधनेत पिशाच्चांनी व्यत्यय आणल्या सारखे होईल
आम्ही बाआआआआआआआआआआआस

डँबिस००७'s picture

8 Jun 2018 - 11:22 am | डँबिस००७

वास्को द गामा ला नराधम का म्हटले आहे?

वास्को द गामा को ण होता व त्याच कर्तृ त्व काय ह्याची कल्पना नसेल तर Urumi नावाचा मल्याळम सिनेमा अवश्य बघा !

भारतीय मसाले व त्यातल्या त्यात काळी मिरीचा ( भारतीय काळे सोने ) व्यवसा या आड ह्या वास्को द गामाने भारतीय जनतेवर अत्याचार केले, कित्येक भारतीय लोकांना मृत्युमुखी पाडले त्याची गणती नाही.

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 11:59 am | manguu@mail.com

वास्को द गामा अन्याय करत होता.

मग भारतीय विक्रेते भारतीय शेतकऱयांना योग्य दर द्यायचे का ? आता तरी देतात का ?

खालील वाचून काय वाटते ते सांगा मी भाषांतर सुद्धा करू शकत नाही.

Upon his second arrival in India Vasco da Gama began to seize any Arab vessel he came across. This led to the notorious Pilgrim Ship incident in which he captured a vessel carrying Muslims on a pilgrimage from Calicut to Mecca. Gasper Correia, a Portuguese historian, described his acts as one that is unequaled in cold-blooded cruelty. The Portuguese explorer looted the ship that was carrying 400 pilgrims among them were 50 women. He then proceeded to lock in every passenger on board and raze the ship. Women were bringing up their wealth and babies and begging for mercy. It is said that they brought up enough gold to ransom all the Christians in the Kingdom of Fez. Vasco da Gama would not spare any and burned alive every man, woman and child.

During his visit to Calicut he demanded that the King expel every Muslim from India. The King would refuse. In retaliation Vasco da Gama would bombard the city, destroying many houses and would also seize a rice vessel, capture the crew and cut off their hands, nose and ears. The King sent a priest to speak to Vasco da Gama. Da Gama would call him a spy and cut off his lips and ears and then proceed to sew a pair of dog ears onto his head.

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 1:42 pm | manguu@mail.com

पूर्वी जमीनदारही कुळांना त्रास द्यायचे.

साहना's picture

8 Jun 2018 - 2:34 pm | साहना

मग?

डँबिस००७'s picture

8 Jun 2018 - 3:34 pm | डँबिस००७

Vasco Da Gama मुसलमान लोकांना त्रास देत होता !! हे माहीत नव्हत ! हे ऐकुन मोगाखानचा जिव तळमळला असेल !!

ओडीशाच्या कोणार्क मंदिराच्या बाबतीत ऐक कथा सांगीतला जाते!!

कोणार्क मंदिराच्या जवळच्या समुद्रात असलेल्या बोटींना जल समाधी मिळायची !! कोणार्क मंदिरामुळेच
हे होत आहे असा समज करुन घेतल्या मुळे Vasco Da Gama ने कोणार्क मंदिरावर तोफांचा मारा केला व कोणार्क मंदिराला अतोनात नुकसान झाल !!

जेम्स वांड's picture

8 Jun 2018 - 4:25 pm | जेम्स वांड

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर कधी पोचला होता ह्याचा थोडा रेफरन्स द्या न प्लीज

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 5:08 pm | manguu@mail.com

मग त्यानंतर नावा बुडल्या की तरल्या ?

( वास्कोचा इतिहास वाचायला हवा. बकेट लिस्ट वाढली. )

गामा पैलवान's picture

8 Jun 2018 - 1:27 pm | गामा पैलवान

साहना,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला. अगदी समर्पक आहे. माझी मतं सांगतो.

१.

नथुराम गोडसे माझ्या मते पहिला हिंदू टेरॅरिस्ट होता.

हिंदू टेररिस्ट म्हणजे हिंदू कार्यासाठी टोकाचं पाऊल उचलणारा म्हणावा काय? की केवळ जन्माने हिंदू असलेला? दुसरा अर्थ घेतल्यास मो.क. गांधी हा पहिला हिंदू टेररिस्ट ठरतो. तसाही तो 'स्वतंत्र' भारतातला पहिला टेररिस्ट फायनान्सर आहेच.

२.

त्यांनी गांधींना गोळी घालताच बहुतेक हिंदूंना नेहरू गांधी बरोबर म्हणत होते हे पटले आणि माझ्या मते हिंदू महासभा आणि एकूणच हिंदू केंद्रित राजकारणाचे प्रचंड नुकसान झाले.

गांधी मेल्यावर तो व नेहरू बरोबर होते हे जनतेस कळलं .... ? आणि त्यामुळे हिंदूकेंद्रित राजकारणाचं नुकसान झालं .... ? तुम्हाला काय म्हणायचंय ते ध्यानात येत नाहीये. कृपया अर्थ उलगडून सांगावा.

३.

गांधी ह्यांना स्वातंत्र्यानंतर गोळी घालून विशेष फायदा झाला नाही.

टेररिस्ट फायनान्सरला गोळी घालून उडवल्यावर कोणाचा तरी फायदा होणं अपेक्षित आहे. या घटनेचा लाभ उठवून नेहरूची गठडी वळण्यात तत्कालीन सत्ताधारी वर्गातले लोकं कमी पडले हे खरंय.

४.

RSS चा खरा अपराध माझ्या मते त्यांनी ज्या पद्धतीने ढिसाळ वैचारिक धोरण पत्करले ह्यांत होते.

असू शकतो. पण एक गोष्ट नक्की. ती म्हणजे ढिसाळ का होईना संघाकडे वैचारिक धोरण आहे.

५.

राजकारणात भाग नसेल घ्यायचा तर वैचारिक लेव्हल वर शेकडो पुस्तके, थिंक टँक्स, वर्तमानपत्रे, इतर माध्यमे, विविध विषयांत स्वतंत्र संशोधकांना मदत इत्यादी कामे करायला पाहिजे होती. (जी त्या काळापासून कम्युनिस्ट लोक करत आले आहेत).

मी संघाचं साहित्य फारसं वाचलेलं नसल्याने माझा पास. पण तुम्ही कम्युनिस्ट लोकांनी वैचारिक काम करून ठेवलंय म्हणता, तो खरातर शुद्ध भंपकपणा आहे. डाव्या कंपूस कसलंही वैचारिक अधिष्ठान नाही. हे दाखवून द्यायला संघवाले कमी पडले. ही संघाची गंभीर वैचारिक त्रुटी माझ्या मते आहे. इतरांची निंदा न करणे अशा काहीशा सोज्वळ भूमिकेत संघ गेल्यासारखा वाटतो. या भूमिकेचा कसलाही उपयोग नाही.

६.

RSS हे वैचारिक पातळीवर किती ढिसाळ आहे हे पाहायचे असेल तर राम माधव ह्यांचे काम बघा.

संघ पोखरला गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस ब्रिटिशांनी पोखरली होती तसाच संघात सुद्धा भारतविरोधी शक्तींनी प्रवेश केलेला असू शकतो. नव्हे तसा केलेला आहेच.

७.

ज्या पद्धतीने भारत सरकार हुर्रियत वगैरेंना पोसते त्याच प्रकारे ब्रिटिश सरकार काँग्रेस वाल्याना पोसत होते. हुर्रियत वाले भारत सरकारच्या विरोधांत गरळ ओकत राहिले तरी भारत सालच्या मलिद्या वर जगतात आणि वारंवार शांती चे नाटक तरी प्रस्थापित करायला मदत करतात.

अत्यंत समर्पक विवेचन. माझ्यासाठी हा एकदमच नवा दृष्टीकोन आहे. त्याबद्दल आभार! :-)

आ.न.,
-गा.पै.

> हिंदू टेररिस्ट म्हणजे हिंदू कार्यासाठी टोकाचं पाऊल उचलणारा म्हणावा काय? की केवळ जन्माने हिंदू असलेला? दुसरा अर्थ घेतल्यास मो.क. गांधी हा पहिला हिंदू टेररिस्ट ठरतो. तसाही तो 'स्वतंत्र' भारतातला पहिला टेररिस्ट फायनान्सर आहेच.

आपण हिंदू आहोत भावनेने प्रेरित होऊन हिंदू साठी काही तरी करू किंवा हिंदू विरोधी शक्तींविरुद्ध बदला घेऊ ह्या साठी शस्त्र वापरून नेहमीच्या युद्ध विषयक नियमांना न जुमानता शस्त्र प्रयोग करणारा माणूस.

> गांधी मेल्यावर तो व नेहरू बरोबर होते हे जनतेस कळलं .... ? आणि त्यामुळे हिंदूकेंद्रित राजकारणाचं नुकसान झालं .... ? तुम्हाला काय म्हणायचंय ते ध्यानात येत नाहीये. कृपया अर्थ उलगडून सांगावा.

सध्याचे उदाहरण देऊन सांगते. २००७-८ मध्ये काँग्रेस पार्टीचे पारडे वर होते. अजून मोठे घोटाळे उघड झाले नव्हते. अश्यांत मोदी ह्यांची लोकप्रियता वाढत होती. हळू हळू घोटाळे बाहेर यायला लागले आणि काँग्रेसला उतरती कळा लागली. त्याच वेळी मोदी ह्यांचा धोका वाटून काँग्रेसने मोदी आणि २००२ चा मुद्दा लावून धरला. मोदी एक हृदयहीन माणूस असून सत्तेसाठी निरपराध लोकांना मारू शकतो, किंवा मुस्लिम लोकांचे शिरकाण करायला पाहत आहे वगैरे प्रोपागंडा चालू केला.

एका बाजूने मोदींची लोकप्रियता वाढत होती आणि काँग्रेसची क्रेडिबिलिटी खाली जात होती. अश्या स्थितीत समजा मोदींच्या एखाद्या महत्वपूर्ण माणसाने सोनिया गांधी ह्यांना २०१२ साली गोळी घातली तर काय होईल ? समाज काँग्रेस मधील एखाद्या खरोखर प्रामाणिक माणसाने मग त्या हत्येच्या षडयंत्रांत मोदी सुद्धा सामील आहेत असे चित्र रंगवले तर ? (आणि जनतेसाठी सोशल मीडिया, इंटरनेट इत्यादी नाही असे समजा)

अश्या परिस्थितीत मोदी चांगले माणूस असले तरी मोदी हे माथेफिरू असून सत्तेसाठी कुठल्याही ठरला जाऊ शकतात हे काँग्रेसचे आधीचे विधान कदाचित बहुतेक मतदात्यांना पटू लागेल आणि २०१४ च्या इलेक्शन मध्ये मोदींना कमी मते मिळतील.

अर्थांत त्या काली गांधीहत्या हे कारण वापरून हिंदू संघटनांना दोषी लेखण्यात नेहरू पटेल ह्यांनी काहीही कमतरता ठेवली नाही. त्या काली बहुतेक मीडिया त्यांच्याच तालावर नाचत होती त्यामुळे देशाच्या काना कोपऱ्यांत त्यांना पाहिजे त्याच बातम्या पोचत होत्या. गोडसे हा माथेफिरु होता असाच प्रोपोगांडा आज पर्यंत चालू होता.

> टेररिस्ट फायनान्सरला गोळी घालून उडवल्यावर कोणाचा तरी फायदा होणं अपेक्षित आहे. या घटनेचा लाभ उठवून नेहरूची गठडी वळण्यात तत्कालीन सत्ताधारी वर्गातले लोकं कमी पडले हे खरंय.

माझ्या मते गांधींना जर १०-१५ वर्षे आधी गोळी घातली असती तर जास्त फायदा झाला असता. एकदा खुर्ची मिळाली कि नेहरूंना गांधींचा विशेष फायदा नव्हता. समाजा तीच गोळी नेहरूंना घातली असती तर जास्त फायदा झाला असता कारण पटेल हे जास्त कार्यक्षम मंत्री होते.

गांधी येत्या काही वर्षांत नैसर्गिक कारणानेच मेले असते.

> RSS चा खरा अपराध माझ्या मते त्यांनी ज्या पद्धतीने ढिसाळ वैचारिक धोरण पत्करले ह्यांत होते.

संघाकडे वैचारिक धोरण नाही. बहुतेक विषयांवर संघाची मते कम्युनिस्ट किंवा काँग्रेस प्रमाणेच आहेत कारण बहुतेक वेळा त्यांनी ती त्यांच्याकडूनच उचलली आहेत. इथे आमचे विचार पटत नाहीत.

> राजकारणात भाग नसेल घ्यायचा तर वैचारिक लेव्हल वर शेकडो पुस्तके, थिंक टँक्स, वर्तमानपत्रे, इतर माध्यमे, विविध विषयांत स्वतंत्र संशोधकांना मदत इत्यादी कामे करायला पाहिजे होती. (जी त्या काळापासून कम्युनिस्ट लोक करत आले आहेत).

लोणी कुठे ठेवले आहे हे कम्युनिस्ट आणि त्यापेक्षा जास्त काँग्रेसला ठाऊक आहे. नागपूर त्या दृशीतकोणातून आंधळ्याप्रमाणे चाचपडतो. उदाहरणार्थ काँग्रेस ने भारतीय राज्यघटना १०० पेक्षा जास्त वेळा बदलली. बहुतेक बदल १० वर्षे आधीच सुचवले होते आणि इलेक्शन नांतर पहिला ६ महिन्यात आणले गेले. संघ आणि संबंधित मंडळींना
ह्याचा पत्ता सुद्धा नाही, आपले काही बदल करणे दूरच.

> संघ पोखरला गेल्याचं हे लक्षण आहे. ज्याप्रमाणे काँग्रेस ब्रिटिशांनी पोखरली होती तसाच संघात सुद्धा भारतविरोधी शक्तींनी प्रवेश केलेला असू शकतो. नव्हे तसा केलेला आहेच.

असू शकते. माझ्या मते राम माधव अश्या प्रकारची व्यक्ती आहे.

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 3:04 pm | manguu@mail.com

ह्याला गोळी घाल , त्याला गोळी घाल

अन मग त्या खुर्चीत बसणार कोण होते ? गुरुजी अन उपाध्याय का ?

खुर्चीत बसूनच काम होणार होते तर निवडणुका लढवायच्या

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 3:10 pm | manguu@mail.com

पटेल चांगले पं प्र झाले असते हा अजून एक संघी प्रोपागंडा

पटेल साहेबांचा श्वासनाविकार तेंव्हा अगदी लास्ट स्टेजला होता व 1950 साली म्हणजे 1947 नंतर अवघ्या 2-3 वर्षातच ते निवर्तले

संघाकडे पुस्तके लिहिणारे , कविता लिहिणारे भरपूर होते , खुर्चीत बसू शकणारे कुणी नव्हते का ?

आनन्दा's picture

8 Jun 2018 - 1:56 pm | आनन्दा

बर्‍याच प्रकारचे वेगळे दृष्टीकोन देणारा लेख.. काही गोष्टी पटकन पचत (समजणे या अर्थाने, भावनिक पचणे नाही) नाहीत, जसा जसा अधिक अधिक विचार करत जाइन तसे प्रश्न विचारीन.

तसेच यानिमित्ताने जगातला पहिला स्टॉच्क मार्केट घोटाळा - ईस्ट इंडिआ कंओअनी बद्दल देखील वाचायला आवडेल.

हा लेख मी अगदी ३० मिनिटांत लिहिला होता. इकडचे चांगले आणि थोडेफार टोकाचे प्रतिसाद पाहता थोडा खोलांत जाऊन ईस्ट इंडिया कंपनीचा संदर्भ सहित इतिहास लिहायला घेते.

डँबिस००७'s picture

8 Jun 2018 - 4:18 pm | डँबिस००७

सहाना,

जरुर लिहा ,

अश्याने खर्या ईतिहासाची ओळख आम्हा सर्वांना होईल !!

आता पर्यंत ईतिहासाच्या नावाखाली खोट्या गोष्टीचा प्रसार झालेला आहे !

जर शक्य असेल तर काश्मिर बाबत ही लिहा !!

काश्मिर बाबत पं. नेहरुंची भुमिका सदैव संदिग्ध होती ! नेहरु मुळचे काश्मिरचे असल्याने भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मिरला अस्थिर ठेवण्यात काय गेम होता ? स्वतंत्र भारताच्या राजकारणात आपली डाळ शिजली नाही तर स्वतंत्र काश्मिर तरी आपल्या हातात राहील असा विचार ह्या मागे होता अस ही वाचल्याच स्मरत आहे !! त्या मुळे काश्मिरच्या नाड्या शेख अब्दुल्लाच्या हातात दिलेल्या होत्या !

manguu@mail.com's picture

8 Jun 2018 - 10:29 pm | manguu@mail.com

कासमीर स्वतंत्र ठेवावे ही तिथला राजा हरिसिंग याची भूमिका होती, पाकिस्तानने आक्रमण केले , मग तो भारतास शरण आला.

पण त्याला कुणी दोष देत नाहीत

डँबिस००७'s picture

8 Jun 2018 - 10:51 pm | डँबिस००७

त्याला कुणी दोष देत नाहीत
ख्खिकक !!

मोघलांचे विचार !!

महाराज हरीसींग यांच्याशी कट कारस्थान करुन आपल्या रक्ताला जागलेल्या शेख अबदुल्ला ला शेवटी नेहरुंनी आपल्या डोक्यावर घेतले !!

Kashmir Conspiracy Case was the legal case filed by Government of Kashmir and Investigations Department of the Government of India,[1] by which Sheikh Abdullah and others were arrested and jailed. Abdullah along with Mirza Afzal Beg and 22 others, who were accused of conspiracy against the state for allegedly espousing the cause of an independent Kashmir.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2018 - 12:08 am | डॉ सुहास म्हात्रे

मंगूजी, विशेषतः या विषयावर धडधडीत खोटे ठोकून देण्याची सवय सोडा...

दुसरया एका साइटवर ही आदित्य श्रीपद यांची लेखमाला सापडली...त्याची लिंक देत आहे..

काश्मीर आणि भारतीय जनमानस. भाग ३
Submitted by अदित्य श्रीपद on 29 March, 2017 - 21:48
आधीच्या भागांची लिंक
http://www.maayboli.com/node/62143
http://www.maayboli.com/node/62151

दुसरया एका साइटवर ही आदित्य श्रीपद यांची लेखमाला सापडली...त्याची लिंक देत आहे..

काश्मीर आणि भारतीय जनमानस. भाग ३
Submitted by अदित्य श्रीपद on 29 March, 2017 - 21:48
आधीच्या भागांची लिंक
http://www.maayboli.com/node/62143
http://www.maayboli.com/node/62151

कुसुमिता१'s picture

8 Jun 2018 - 2:45 pm | कुसुमिता१

वास्को द गामा च्या प्रश्नाबाबत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ही बाब माहीत नव्हती. @साहना आणि डॅंबिस००७

ब्रिटिशानी भारतावर जे "राज्य" तसेच "अत्याचार" केले (अवतरण चिन्हे वापरण्याचे कारण येव्हढेच की हे शब्द आणि त्यान्चे यथायोग्य विश्लेषण हाच या सगळ्या चर्चेचा एक महत्वाचा भाग आहे) याबद्दल आणखी एक जोरदार प्रतिपादन

https://www.youtube.com/watch?v=f7CW7S0zxv4
https://www.youtube.com/watch?v=jaNotcGak3Y

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jun 2018 - 10:39 pm | अमरेंद्र बाहुबली

साहना ताई खूप छान लेख. सहजसोपा लिहिल्या मूळे खूप खुललाय. बरीच माहिती मिळाली. अजून लिहा.

अमरेंद्र बाहुबली's picture

11 Jun 2018 - 10:41 pm | अमरेंद्र बाहुबली

बाकी गांधी, नेहरू ने देशाचे जे नुकसान केले ते न भरून निघणारे होते. गांधी हा लाचार आणी आत्मप्रौढी मिरवणारा माणुस होता. लोक कसे त्याच्या बुद्धिभेदाला बळी पडले देव जाणे.

महामाया's picture

12 Jun 2018 - 2:15 am | महामाया

साहना ताई खूप छान लेख. बरीच माहिती मिळाली.

गामा पैलवान's picture

12 Jun 2018 - 3:04 am | गामा पैलवान

साहना,

लेख चांगला आहे पण लेखाचं प्रयोजन कळलं नाही. मला म्हणायचंय की, कंपनीची काळी बाजू जमेल तितक्या पूर्णपणे दाखवून द्यायची आहे? की तुमच्या लक्षात आलेल्या काही गोष्टीच वाचकांच्या निदर्शनास आणवून द्यायच्या आहेत?

असा प्रश्न उद्भवण्याचं कारण असं की कंपनीनं अंमली पदार्थांच्या व्यापारात गडगंज पैसा कमावला. त्यावर वाचायला आवडलं असतं. तसंच कंपनीच्या भारताखेरीज इतरत्रच्या कारवायांवर देखील प्रकाश पाडलेला रंजक व रोचक ठरला असता.

मात्र तरीही लेख नेहमीच्या पठडीपेक्षा बराच वेगळा आणि म्हणूनंच रोचक आहे.

आ.न.,
-गा.पै.

>तुमच्या लक्षात आलेल्या काही गोष्टीच वाचकांच्या निदर्शनास आणवून द्यायच्या आहेत?

हेच !

ईस्ट इंडिया कंपनीच्या पापांचा पाढा वाचण्यासाठी आणखीन एक लेख (माला ) लिहावी लागेल.

ईस्ट इंडिया कंपनीच्या पापांचा पाढा वाचण्यासाठी आणखीन एक लेख (माला ) लिहावी लागेल.

जरुर लिहा !!

वाचकांपैकी काही लोकांचे डोळे उघडले तरी लेख माला सफल होईल !!

कथामालेची वाट बघतोय

लेख आवडला. लेखिकेने सांगितल्याप्रमाणे सदर लेख अत्यल्प काळात लिहीलेला असल्याने त्यांनी पुन्हा एकदा विस्तारपूर्वक लिहावे आणि विविध प्रतिसादांतून चर्चेस आलेल्या मुद्द्यांवरही मुद्देसूतपणे आपले विचार प्रकट करावेत अशी विनंती करतो.
लेख वाचताना आमचे चित्त एका वाक्याने फार आकर्षून घेतले. ते वाक्य म्हणजे:

१४०० मध्ये राजा राणीला सेक्स करायला चर्च नियमा प्रमाणे साधारण २० दिवस मिळायचे.

हे वाचून आम्हास असा प्रश्न पडलेला आहे, की ते वीस दिवस दरएक महिन्यात, की वर्षात, की संपूर्ण आयुष्यात ? लेखिकेने कृपया याचे स्पष्टीकरण दिल्यास फार चांगले होईल.
"कुणाला कशाचे तर बोडकीला केसांचे" ...... "कुणाला कशाचे तर आम्हाला 'त्या' वीस दिवसांचे.

.

साहना's picture

11 Jun 2022 - 2:52 am | साहना

वर्षांतून २० दिवस.

रविवार, शनिवार, बुधवार आणि शुक्रवारी पत्नीसोबत शरीरसंबंध वर्ज्य होता. कारण हे दिवस "तपाचे" मानले जायचे. इथे काळ साधारण ११००स आहे. त्याशिवाय ईस्टर दरम्यानचे ३ आठवडे, डिसेम्बरचा संपूर्ण महिना, पेंटेकॉस्ट चे एक ते ७ आठवडे, विविध संतांची फिस्ट, कॉन्फेशन चे दिवस, हे सर्व वजा केल्यास फारतर २० दिवस राहतात.ह्या सर्व नियमांचे मुख्य कारण म्हणजे राजसत्तेला/इतर सरंजामदारांना वारस मिळू नये आणि पर्यायाने ती संपत्ती चर्च च्या घश्यात जावी म्हणून हे नियम होती.

तुम्हाला जर ह्यांत जास्त इंटरेस्ट आहे तर नेटफ्लिक्स वरील तुडर्स ही मालिका पहा. चर्चचे नियम किंग हेन्री ८ शेवटी कसे झुगारून लावतो आणि चर्च ऑफ इंग्लंड ची स्थापना कशी होते हे त्यांत दाखवले गेले आहे. आधुनिक जगावरील ख्रिस्ती धर्माची पकड नेहमीसाठी कमी व्हावी ह्यासाठी हि घटना अत्यंत महत्वाची आहे.

अनेक आभार साहना.
काही वर्षांपुर्वी मी 'बोर्जियाज' मालिका अतिशय आवडीने बघितली होती आणि खूपच भारावून गेलो होतो. विशेषतः Holiday Grainger हिने साकारलेली ल्युक्रेशिया बघून (इतिहासात बदनाम असलेल्या) त्या मुलीबद्दल अनुकंपा निर्माण झालेली होती. त्या निमित्ताने अशा मालिका कितपत 'ऐतिहासिक सत्या' ला धरून असतात वगैरेंवर रोचक लेखही वाचले होते, आणि रोम-फ्लॉरेन्स नधील बोर्जिया, फार्नेजी, ओर्सिनी, मेदिची आणि इतर नामवंत घराणी पूर्वी जिथे रहात ते प्रासाद मुद्दाम शोधून प्रत्यक्ष बघितले होते. माझ्या अद्याप अपूर्ण राहिलेल्या 'मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा' या मालिकेत ल्युक्रेशिया आणि चेझारे वगैरे पात्रे मी ती मालिका बघूनच घातलेली आहेत. (ही मालिका पूर्ण करण्याआधी आता पुन्हा एकदा रोममधे एक महिना राहून या विषयात आणखी खोलात जाऊन भटकंती करावी अशी इच्छा आहे -या दृष्टीने उपयुक्त आणि रोचक अशी काही माहिती असल्यास त्यावर अवश्य लिहावे)
'ट्यूडर्स' मालिका बघणे मी दोन-तीनदा सुरु केले होते पण काही ना काही कारणाने ते राहून गेले. आता पुन्हा प्रयत्न करेन.

बहुतेक मालिका ह्या तपशिलाच्या बाबतीत थोड्या गरजेपेक्षा जास्तच "रोमँटिक" असतात. पण मुख्य घटनांच्या बाबतीत बहुतेक वेळा सत्यास धरून असतात. किमान तुङोर च्या बाबतीत तरी माझा तोच अनुभव आहे.

sunil kachure's picture

13 Jun 2022 - 1:13 pm | sunil kachure

ईस्ट इंडिया कपनीच इतिहास उगळून काही फायदा नाही.
लोक आंधळी ती आंधळी च आहेत.
ईस्ट इंडिया पेक्षा खुप मोठ्या कंपन्या आता अस्तित्वात आहेत.
बहुसंख्य जनतेला ते गुलाम बनवत आहेत.
जगाची नैसर्गिक मालमत्ता लुटत आहेत
जगातील अशा खूप मोठ्या कंपन्यांची लिस्ट बनवून त्यांची अनेक तुकड्यात विभागणी केली पाहिजेत

तेव्हा ईस्ट इंडिया पासून काही शिकलो हे सिद्ध होईल
अमेरिका च्या सर्वोच्य न्यायालय नी असे एका कंपनीचे अनंत तिकडे केले होते.
नाव आठवत नाही.
राजकारणी लोक स्वार्थी असतात त्यांच्या कडून चांगले काही घडणार नाही.

राजकारणी स्वार्थी नसते ,राजे ,महाराजे,बादशाह स्वार्थी नसते तर हजार ईस्ट इंडिया कंपनी सारख्या वृत्तीच्या कंपन्या आल्या असत्या तरी भारत त्यांना ताब्यात घेता आला नसता

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Jun 2022 - 2:37 pm | अमरेंद्र बाहुबली

अमेरिका च्या सर्वोच्य न्यायालय नी असे एका कंपनीचे अनंत तिकडे केले होते.
नाव आठवत नाही.
स्टॅंडर्ड ओईल.

गामा पैलवान's picture

13 Jun 2022 - 6:38 pm | गामा पैलवान

sunil kachure,

तुम्ही ईस्ट इंडिया कपनीच इतिहास उगाळून काही फायदा नाही, असं म्हणताय. आणि लगेच पुढे तिच्यापासून काही शिकायला हवं असं सूचित करताय. हे दोन्ही पर्याय परस्परविरोधी आहेत.

तर, इतिहास उगाळणे म्हणजे नेमकं काय, हे कृपया विशद करा.

आ.न.,
-गा.पै.

ईस्ट इंडिया कंपनी चे कारनामे बघून पण लोक आंधळी ती आंधळी च आहेत.
काही शिकलेली नाहीत.
आज पण जगात ईस्ट इंडिया सारख्या विशालकाय कंपन्या आहेत आणि त्यांचे कौतुक आंधळ्या लोकांना आहे.
सरळ कोणत्या देशांची सत्ता ह्या हस्तगत करत नसतील पण अनेक देशांना गुलाम करण्याचे उद्योग चालू च आहेत..

sunil kachure's picture

13 Jun 2022 - 1:55 pm | sunil kachure

मला वाटतं otis ही लिफ्ट service मधील कंपनी त्या parent कंपनीचा एक तुकडा आहे.
ज्या कंपनीचे तुकडे करा असा आदेश अमेरिकेच्या सर्वोच्य न्यायालय नी दिला होता.
नक्की हीच कंपनी हे सांगता येत नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

13 Jun 2022 - 9:48 pm | अमरेंद्र बाहुबली

क्रांतिकारी जगपालट घडवून आणणार्‍या व्यापारी कंपन्या
हे वाचा
http://misalpav.com/node/28773

मिल्टन फ्रीडमन ह्यांच्या अंदाजानुसार भारतीय लोकांना गुलाम ठेवून ब्रिटिश राजसत्तेचे नुकसानच जास्त झाले.
आपल्या देशाला सर्व प्रकारे लुटणारे,अमानुष अत्याचार आणि हत्याकांड करणार्‍यांचे नुकसान कसे काय बाँ शक्य आहे ?
हल्लीच माझ्या वाचनात आपल्या देशाच्या लुटी विषयी एक लेख [ लेख २०१८ चा आहे. ] वाचनात आला होता तो इथे देऊन ठेवतो.
How Britain stole $45 trillion from India

नथुराम गोडसे माझ्या मते पहिला हिंदू टेरॅरिस्ट होता.
कोणता अतिरेकी गोळी मारण्या आधी ज्याला मारायचे त्याला वाकुन नमस्कार करतो आणि नंतर शस्त्र चालवतो ? हिंदू स्त्रियांचे बलात्कार होत असताना गांधीनी याला तुम्ही विरोध करु नका, विष प्राशन करा किंवा जीभ बाहेर करुन बलात्कार करणार्‍याला बलात्कार करु ध्या, बहुतेक त्याचे मन नंतर पालटेल अशी हिंदू द्रोही शिकवण गांधींनी त्या हिंदू स्त्रियांना दिली. मुसलमानांची मनसोक्त चाटण्याची विकृत संधी या व्यक्तीने कधीही सोडली नाही आणि त्याच्या या विकृतीला संपवण्यासाठी शेवटी गोडसे ने त्यांचा "वध" केला.

गांधी नक्की कोण होते ? कसे होते ? अचानक कोट्यावधी लोकांचे ते मसीहा / तारणहार / राष्ट्रीय नेते कसे झाले ? :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- समान नागरी कायदा आला नाही तर काहीच वर्षात मुस्लिम राष्ट्र होण्याचा धोका :- Sharad Ponkshe

कानडाऊ योगेशु's picture

14 Jun 2022 - 10:57 am | कानडाऊ योगेशु

नथुराम गोडसे माझ्या मते पहिला हिंदू टेरॅरिस्ट होता.

ह्यावर बराच वाद झाला आहे आणि होतो. माझे काही अ-ब्राह्मण मित्र मुद्दामुन हा मुद्दा काढतात. नथुराम गोडसेला एक खूनी म्हणता येईल,अतिरेकी असता तर कसाबसारखेच जवळच्या चार पाच जणांचे ही मुडदे पाडले असते. खरेतर मुद्दा मुद्दामुन ब्राह्मणांना खजील करण्याचा असतो पण हिंदु दहशतवादी असे म्हटल्याने समोरचा जरी तो ब्राह्मण नसला तरी तितकाच दोषी ठरतो व काही नेत्यांच्या "हिंदु आतंकवाद" ह्या मुद्द्याचे नकळत समर्थन होते. पण हे लक्ष्यात घेतो कोण?