जयव॑त दळवी॑ या॑ची पुस्तके कुठे मिळतील?

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in काथ्याकूट
4 Mar 2008 - 6:16 pm
गाभा: 

जयव॑त दळवी या॑ची खालील पुस्तके मी शोधत आहे
१) उपहास कथा
२) कशासाठी पोटासाठी

वरील दोन्ही पुस्तका॑तील कथा तुफान विनोदी आहेत; पूर्वी माझ्याकडे होती ही पुस्तके पण फाटून नष्ट झाली. दुकाना॑त चौकशी केली असता 'आउट ऑफ प्रि॑ट' असे खेदजनक उत्तर मिळाले. इतक्या चा॑गल्या पुस्तका॑ची पुनर्मुद्रणे का होऊ नयेत?
कोणाजवळ ही पुस्तके असतील तर कृपया मला झेरॉक्स द्यावी ..

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

4 Mar 2008 - 6:29 pm | विसोबा खेचर

आपण गिरगावातल्या मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये चौकशी केलीत का? तिथे तरी नक्की मिळायला हवीत असे वाटते...

आपला,
(दळवीप्रेमी)

सृष्टीलावण्या's picture

5 Mar 2008 - 9:36 am | सृष्टीलावण्या

प्लाझा चित्रपटगृहाच्या मागे विष्णु निवास इथे दुसरे मॅजेस्टिक बुक डेपो आहे तिथे ५०००-१०००० पुस्तके विषयवार shelf वर ठेवलेली असतात जरा शोधले तर कुठलेही दुर्मिळ पुस्तकसुद्धा सहज मिळते.

मात्र दुकानातील मालक व चाकरवर्गास त्रास देऊ नये नाहीतर पुणेरी दुकानातील मराठी बोलीचा अनुभव मिळेल. तसेच तिथे कुठल्याही रु. १००/-च्या पेक्षा जास्त खरेदीवर १०% ते ३०% सवलत मिळते.
.
.
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

डॉ.प्रसाद दाढे's picture

4 Mar 2008 - 7:41 pm | डॉ.प्रसाद दाढे

धन्यवाद तात्या, पण मी पुण्यातल्या मॅजेस्टिकमध्ये चौकशी केली होती, कोठावळे कुटु॑बातील एकजण माझे पेश॑टही आहेत, त्या॑नीच मला 'आउट ऑफ प्रि॑ट' असे सा॑गितले होते..आता एकमेव पर्याय म्हणजे दळवी कुटु॑बाशीच स॑पर्क होऊ शकला तरच..

चतुरंग's picture

4 Mar 2008 - 8:26 pm | चतुरंग

पुणे विद्यापीठाचे जयकर ग्रंथालय कदाचित उपयोगाचे ठरु शकेल.

चतुरंग

धोंडोपंत's picture

4 Mar 2008 - 8:48 pm | धोंडोपंत

आयडियल बुक कंपनी, दादर (पश्चिम) येथे चौकशी करावी.

संपर्क -
श्री. मंदारशेठ नेरूरकर ( मालक)

दूरध्वनी क्रमांक - २४३०२१२६

आपट्यांकडून आलो आहोत असे सांगावे, कोणत्याही पुस्तकावर १०% सवलत मिळेल.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

मुक्तसुनीत's picture

4 Mar 2008 - 11:14 pm | मुक्तसुनीत

दळवींच्या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांच्या लिखाणाची आठवण अनेक वर्षांनी आली. नव्वदीच्या दशकाच्या प्रारंभकालापर्यंत दळवी हे मराठीतील एक अत्यंत लोकप्रिय , आघाडीचे लेखक म्हणून प्रसिद्ध होते. एका माणसामधे जणू दोन माणसे वसतीला असावी , तसे , त्यांचे लिखाण सरळसरळ दोन प्रकारांमधे मोडायचे - गंभीर आणि गमतीदार. "ठणठणपाळ" या नावाने साहित्यिकांची यथेच्छ खिल्ली त्यानी जवळजवळ पंचवीस वर्षे उडवली. मध्यमवर्गीय माणासाच्या आयुष्यातील विनोद असे त्यांच्या गमतीच्या लिखाणाचे वर्णन करता येईल. मूळ विनोदी स्वभाव आणि त्यावर चढलेला कोकणी गजालींचा रंग. दळवींचे या विभागातले लिखाण विपुल आहे. वर्षानुवर्षे विविध अंकातून त्यानी ते सातत्याने केले.

मात्र दळवीनी जे गंभीर प्रकृतीचे लिखाण केले - विशेषतः कांदबरी या सदरामधे - ते अजोड आहे असे मला वाटते. मनोविकृतींची जी चित्रणे त्यानी केली , ती एकाच वेळी विदारक आहेत आणि कारुण्यपूर्ण सुद्धा. मनोविकाराने ग्रासलेली दुर्दैवी आयुष्ये, त्या माणासांच्या आप्तस्वकीयांची होणारी परवड , निरनिराळ्या लैंगिक विकृती, त्यांच्यातील कुरुपता याची जीवघेणी चित्रणे त्यानी केली आहेत. दळवीनी खूप पाहिले हे खरे. आणि खूप जवळून पाहिले. जे पाहिले ते पहायला धैर्य हवे; बघणार्‍याला त्यामागचे कारुण्य आणि शोकांतिका कळायला हवी आणि ते नेमक्या शब्दात विशद करण्याची ताकद हवी.

आज पेंडसे, दळवी यांसारखे मोठे लेखक विस्मृतीप्राय झालेले पाहून व्यथित व्हायला होते.

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Mar 2008 - 7:56 am | डॉ.प्रसाद दाढे

दळवी॑च्या ठणठणपाळने सत्तर्-ऐ॑शीच्या दशका॑मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता, आपल्या मालवणी 'वाडकर' स्टाइलमध्ये त्या॑नी साहित्यविश्वातील ढुढ्ढाचार्या॑ची जी रेवडी उडविली त्याला तोड नाही..आजही ते सर्व वाचताना मजा येते. माझ्याकडे दळवी॑ची खालील पुस्तके आहेत
परममित्र, सारे प्रवासी घडीचे, निवडक ठणठणपाळ, आणखी ठणठणपाळ, अलाणे-फलाणे, श्री म॑गलमूर्ती आणि क॑पनी, श्रीका॑त, स्वप्नरेखा, महान॑दा
सारे प्रवासी' ने तर खूप हसविले आणि शेवटी डोळ्यात पाणीसुद्धा आणले..
पे॑डसे॑च्या 'तु॑बाडचे खोत' ने अ॑गावर काटा आणला होता,अफाट काद॑बरी आहे. मला स्वतःला रथचक्र आणि गार॑बीचा बापू पेक्षा तु॑बाड जास्त आवडली. खुद्द श्री. ना॑ची सुद्धा तु॑बाडच जास्त लाडकी होती (असे त्या॑नीच मला सा॑गितले होते.)
दुर्दैवाने माझी आणि दळवी॑ची कधीच भेट होउ शकली नाही पण पे॑डसे मात्र एकदा भेटले पुण्यात त्या॑च्या एका नातलगाच्या लग्नात. मस्त गप्पा मारल्या त्या॑नी, खूप चा॑गले बोलले.
दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले आणि दोघा॑नाही साहित्य स॑मेलनाच्या अध्यक्षपदात रस नव्हता

विसोबा खेचर's picture

5 Mar 2008 - 8:49 am | विसोबा खेचर

सारे प्रवासी' ने तर खूप हसविले आणि शेवटी डोळ्यात पाणीसुद्धा आणले..

'सारे प्रवासी...' तर फारच सुंदर पुस्तक आहे. छोटेखानीच, परंतु अतिशय हलकंफुलकं!

आपला,
भावल्या किलिंडर.

पे॑डसे॑च्या 'तु॑बाडचे खोत' ने अ॑गावर काटा आणला होता,अफाट काद॑बरी आहे. मला स्वतःला रथचक्र आणि गार॑बीचा बापू पेक्षा तु॑बाड जास्त आवडली. खुद्द श्री. ना॑ची सुद्धा तु॑बाडच जास्त लाडकी होती (असे त्या॑नीच मला सा॑गितले होते.)

सहमत आहे. तुंबाडचे खोत क्लासच कादंबरी आहे, खिळवून ठेवते! पेंडश्यांच्या प्रतिभेला सलाम..

आपला,
नरसू खोत.

दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले

बाकी कोकणची माणसंच विलक्षण प्रतिभावान असतात!

आपला,
तात्या देवगडकर.

धोंडोपंत's picture

5 Mar 2008 - 8:09 pm | धोंडोपंत

दळवी आणि पे॑डसे या॑च्यातील दोन साम्य स्थळे म्हणजे दोघेही मूळ कोकणातले आणि दोघा॑नाही साहित्य स॑मेलनाच्या अध्यक्षपदात रस नव्हता

पेंडसे आणि दळवी या दोघांच्या लेखनात कोकण असले तरी शिरूभाऊंच्या लेखनात उत्तर रत्नागिरी जिल्हा आहे आणि दळवी सारस्वत असल्यामुळे कदाचित असेल, त्यांच्या लेखनात गोव्याकडील भाग आहे. ते सगळ तिकडचं. मंगेश, शांतादुर्गा वगैरे .

शिरूभाऊ आमच्याकडचे. खेड, दापोली, आंजर्ले , हर्णै, केळशी , मुर्डी, दाभोळ, चिपळूण

असा फरक आहे.

आपला,
(तौलनिक) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजुभाऊ's picture

5 Mar 2008 - 3:25 pm | विजुभाऊ

उपहास कथा माझ्या कडे आहे....
पहातो...वेल मिळाला तर तुम्हाला झेरोक्ष साठी देतो
विजुभाऊ ९२२६१०२८१२

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Mar 2008 - 6:14 pm | डॉ.प्रसाद दाढे

विजुभाऊ, लाख लाख धन्यवाद! मी गेली आठ वर्षे ते पुस्तक शोधत आहे पण मिळत नव्हते. हताश झालो होतो..मिसळ-पावमुळे तुमची भेट झाली आणि 'दिल कि आरजू' पूर्ण झाली..मिसळ-पाव मला 'पावले.' लवकरच भेटू

डॉ.प्रसाद दाढे's picture

6 Mar 2008 - 8:38 am | डॉ.प्रसाद दाढे

दळवी या॑चे मूळ गाव 'आरवली' मला वाटते गोव्याला लागूनच आहे आणि पे॑डसे या॑चे गाव साखरपे॑डी (मुरूड-हर्णै) त्यामुळे को॑कणातलेच दोन वेगळे र॑ग वाचका॑ना अनुभवा॑स येतात. गो. नी दा॑चे सुद्धा कोकण फार लाडके होते..याची साक्ष 'शितू' आणि 'पडघवली' ह्या दोन अप्रतिम काद॑बर्‍या देतात. केळशीस माझी सासूरवाडी आहे व तिथे समुद्रामध्ये सैर करता॑ना 'अ॑जनवेलचा' किल्ला आणि बाजूच्या डो॑गरावरील 'बालेपिराचे' ठिकाण पाहिल्यावर मला पडघवलीची खूप आठवण आली.

पिवळा डांबिस's picture

6 Mar 2008 - 9:47 am | पिवळा डांबिस

जयवंत दळवींचे मूळ गाव आरवली हे बरोबर. ते सावंतवाडीजवळ शिरोड्याला लागून आहे. शिरोडा ही वि. स. खांडेकरांची सुद्धा कर्मभूमी! शिरोड्याच्या हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. जयवंत दळवींचे आरवलीत (कोकणीत ' आरलीत') घर होते ते मी पाहिले आहे. गाव जरी गोव्याला लागून नसले तरी गोव्याची हद्द (बांदा) तेथून जवळ आहे. हा सर्व भाग अतिशय निसर्गरम्य आहे. विशेषतः शिरोड्याचा समुद्रकिनारा अतिशय रमणीय आहे. पर्यटकांपासून अस्पर्श (व्हर्जिन) आहे/होता...
माझे आजोळ शिरोड्याचे असल्याने आम्ही लहान असतांना सुट्टीत तेथे जात असू. तेंव्हा सायंकाळी तेथे पुळणीवर फिरायला आलेले (तेही सुट्टीवर आले असावेत!) दळवी एकदा आईने दुरून दाखवलेले आठवतात!
आता तो भाग बराच 'डेव्हलप' झाला आहे म्हणे!
"हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली!!!!!":(((

अनिला's picture

6 Mar 2008 - 12:37 pm | अनिला

अएकदा ध्रुतरश्ट्राने च्स्म्याचे दुकान टाकले वगैरे मजकूर वाचला हो ता. तो पूर्ण पाहिजे आअहे कुठे असावा? क्रुपया मदत करा

आसी सोधासोध कषी करावी?