पहा निकाल अपडेट

भोचक's picture
भोचक in काथ्याकूट
22 Oct 2009 - 10:06 am
गाभा: 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांचं अपडेट येथे नकाशाद्वारे पहायला मिळेल. नकाशावर कर्सर नेल्यास राज्याची एकूण स्थिती कळेल. नकाशावर क्लिक केल्यास प्रत्येक मतदारसंघातील स्थिती कळेल.

येथे टेक्स्ट व्ह्यू पहायला मिळेल.

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

22 Oct 2009 - 10:29 am | प्रमोद देव

:)

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Oct 2009 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणखी काही लिंका:

महाराष्ट्राच्या नकाशावर माहिती आणि प्रत्येक मतदारसंघाची, उमेदवारांसकट फक्त शाब्दीक माहिती.

अदिती (लिंकाळे)

बाकरवडी's picture

22 Oct 2009 - 10:51 am | बाकरवडी

हे निकाल किती वेळाने अपडेट होत आहेत ?
कारण TV वरचे आणि इथले निकाल यात तफावत दिसत आहे म्हणून विचारले

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2009 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

इथेही माहिती मिळेल !!!

अवांतर : भाजपचे प्रवक्ते नक्वी म्हणतात महाराष्ट्रात भाजपचा पराभव इव्हीएम मशीनमुळे झाला.
हा हा हा.......

-दिलीप बिरुटे

एकलव्य's picture

22 Oct 2009 - 11:02 am | एकलव्य

माहिती मिळेल असे दिसते आहे. बाकी सगळीकडे आनंद आहे.

धन्यवाद!

सुनील's picture

22 Oct 2009 - 11:14 am | सुनील

पक्षनिहाय अधि़कृत विदा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

निखिल देशपांडे's picture

22 Oct 2009 - 11:19 am | निखिल देशपांडे

अरे बाकी ठिकाणी औरंगाबाद पश्चिम निकाल घोशित येत आहे... ईथे तर एकही राउंड नाहि झाला असे दाखवत आहे

निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!

चिरोटा's picture

22 Oct 2009 - 11:23 am | चिरोटा

भाजपचे प्रवक्ते नक्वी म्हणतात महाराष्ट्रात भाजपचा पराभव इव्हीएम मशीनमुळे झाला

छान. उद्या EVM मधील chip सोनिया गांधीनीच डिझाईन केली होती असेही ते म्हणू शकतील.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

गणपा's picture

22 Oct 2009 - 1:25 pm | गणपा

भाजपची अवस्था खुपच हिन दीन झाली आहे.
धड कसलच धोरण नाही. विरोधाला विरोध म्हणुन विरोध बास.
येउन जाउन आपाल राम मंदिर हा एकच मुद्दा चाटत बसायच. कीव येते यांच राजकारण पाहुन.
युतीमुळे थोडीफार मतं तरी मिळताहेत.

(एके काळी भाजपला मतदान करणारा.) गणपा.

विनायक प्रभू's picture

22 Oct 2009 - 2:20 pm | विनायक प्रभू

मुद्दा पण चाटायची गोष्ट आहे का?

गणपा's picture

22 Oct 2009 - 3:56 pm | गणपा

मास्तर भावना पोहोचल्याशी मतलब :)
बाकी कोण काय चाटतो हे गौण.
(गणप्या भाजप समर्थकाच्या धोतराला हात घातला की काय) :?

विजुभाऊ's picture

22 Oct 2009 - 1:58 pm | विजुभाऊ

ते म्हणतात तर बरोबरही असु शकेल
भारताला स्वातंत्र्य जीन्ना मुळे मिळाले असेही उद्या म्हणायला कमी करणार नाहीत.
त्यांचे म्हणणे नाकारु नका अन्यथा परिवाराचा रोष पत्कराल.
आणि साधकांच्या साधनेत पिशाच्चे व्यत्यय आणतील
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

गणपा's picture

22 Oct 2009 - 1:15 pm | गणपा

वाह भोचक साहेब छान दुवा दिलात, त्याबद्दल आमचा दुवा घ्या.

चिरोटा's picture

22 Oct 2009 - 3:16 pm | चिरोटा

शिवसेना/काँग्रेस्/राष्ट्रवादीला सध्या जवळपास सारख्याच जागा मिळाल्या आहेत.१८/२०/२१. मनसे जास्त जागा जिंकेल असे वाटले होते.दुपारी १२ पर्यंत सगळे निकाल जाहीर होतील अशी अपेक्षा होती. अजुनही पारडे फिरु शकते.
EVMs असूनही मतमोजणीला एवढा वेळ का लागतोय? कोणी जाणकार प्रकाश टाकतील काय?
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रभो's picture

22 Oct 2009 - 3:39 pm | प्रभो

http://eciresults.nic.in/PartyWiseResult.htm

डायरेक्ट निवडणूक आयोगाची साईट..
सध्याचे निकाल(कॉपी-पेस्ट केले आहेत)

Party Won Leading Total
Bharatiya Janata Party 29 18 47
Communist Party of India (Marxist) 1 0 1
Indian National Congress 45 36 81
Nationalist Congress Party 39 24 63
Samajwadi Party 4 0 4
Shivsena 28 15 43
Others 31 18 49

--प्रभो

भास्कर केन्डे's picture

22 Oct 2009 - 4:30 pm | भास्कर केन्डे

जरा जागा निहाय निकाल बघून जाणकार प्रकाश टाकतील काय? बीड जिल्यात स्वतःच्या घरची (परळी) जागा सोडून युतीला एकही जागा मिळालेली नाही. मुंडेंचा पूर्ण सुपडा साफ झालेला दिसतोय. निलंग्यात माजी मुख्यमंत्र्यांना हरवून त्यांचा नातू कमळाकडून निवडून आलाय.

तिकडे कोकणात गुहाघर तसेच रत्नागिरितही अनपेक्षित निकाल लागत/ले आहेत. आणि विदर्भात शेखावत/देशमुख लढतीचे काय झाले?

शेखावत/देशमुख लढतीत देशमुख आघाडीवर होते २ वाजेपर्यंत...पण शेवटी रावसाहेब शेखावत जिंकले...

-प्रभो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Oct 2009 - 5:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>कोकणात गुहाघर

गुहागरचा निकाल अनपेक्षीत नसावा असे वाटते. एकतर तो त्यांचा मतदार संघच नव्हता. सुरुवातीपासून सर्वच दैनिके आणि विश्लेषक म्हणत होते की रामदास कदम पडणार ! अर्थात विजयासाठी ते किती प्रयत्न करतात इतकाच तो भाग असे वाटते. त्यांना अपक्ष उमेदवार नडला [पाहा]

-दिलीप बिरुटे