The Windy City...

अंतु बर्वा's picture
अंतु बर्वा in कलादालन
27 Sep 2009 - 8:50 am

राम राम मंडळी,

महिन्याभरापुर्वीची गोष्ट... मित्रांबरोबर ओल्ड मंक रिचवत बसलो होतो. सहज बोलता बोलता विषय निघाला की मोठ्या विकांताला काय करायचं? वेगवेगळे ऑप्शन्स चाळून झाल्यावर या वेळी शिकागोला जाउ अस सर्वानुमते ठरलं. बोस्टनहुन विमानाची तिकीटं पाहत असताना एकजण सहज म्हणाला, "आपण ड्राईव्ह करुन जायचं का?"
हा बाब्या हे वाक्य मजेत म्हणाला होता आणी त्याच्यासहीत मलाही "काहीतरीच काय?", "वेडा आहेस का?" असे डायलॉग्स ऐकायला मिळणार याची खात्री होती. कारण हजार मैल ड्राईव्ह करुन जायचं आणी तितकचं ड्राईव्ह पुन्हा येताना करायचं म्हणजे अर्धा वेळ त्यातच जाणार होता. पण असं काहीही न होता सर्वजण एक वेगळा अनुभव म्हणुन तयार झाले. आस्मादिकही मेजॉरिटी विन्स म्हणत त्याना सामील झाले... :-)

खाली काही छायाचित्रे डकवत आहे, आशा आहे तुम्हाला आवडतील.
तत्पूर्वी शिकागो विषयी थोडसं... १८७१ मधे जवळ्जवळ १४ स्क्वे. कि.मी. एवढा भाग आगीत भस्मसात झाल्यानंतर पुर्ण शिकागो शहरच नव्याने वसवण्यात आलं. शिकागोला विंडी सिटी असं नाव मिळण्याचं कारण म्हणजे ईथे रस्त्यावरुन फिरताना जाणवरा वारा. याला कारण या शहराची एकुण रचना ही एखाद्या आडव्या आणी उभ्या रेषांनी बनलेल्या मॅट्रिक्स सारखी आहे. त्यात भर म्हणुन मोठमोठ्या गगनचुंबी ईमारती ज्यामुळे या उभ्या आडव्या रस्त्यांमधे वारा वेग घेतो. अर्थात यातही काही लोकांचे दुमत आहे, ज्यांना याचं कारण वेगळं असाव असं वाटतं...

बकींगहॅम फाउंटन... ईथून रात्री शिकागोची स्कायलाईन फारच छान दिसते.

शिकागो डाउनटाउन... रात्री फिरताना आणी दिवसा शिकागो नदीतून भटकंती करतानाचे काही नमुने...

समोरील काळ्या रंगाची ईमारत म्हणजे सिअर्स टॉवर (आताचा विली'ज टॉवर...). १०८ माळे असलेली ही ईमारत एकेकाळी जगातील सर्वात उंच ईमारत होती. आजही ती जगातील सर्वात उंच ईमारतींमधे पाचव्या क्रमांकावर आहे आणी अजूनही युएसए मधील सर्वात उंच ईमारत आहे.

आणी हे सिअर्स टॉवरच्य १०३ र्‍या माळ्यावरून... येथे ३ मोठया खिडक्यांना बाहेर जाड काचा आडव्या बसवलेल्या आहेत... जिथे उभं राहिल्यानंतर खाली पाहिलं आपण किती उंचावर आहोत याचा भितीदायक अंदाज येतो... तुम्हीच पहा ना... ज्यांनी कॅनियन मधला स्कायवॉक पाहिला आहे त्यांना हे कदाचित ओळखीच वाटेल...

या जागेचं नाव अगोरा... ही अशी विचीत्र पायांची वस्ती उभारण्यामागचा उद्देश मात्र नाही कळाला.

आणी हा मिलेनियम पार्क. इथे अनिश कपूर यांनी डिझाईन (मराठी शब्द ?? ) केलेला हा खुप छान नमुना पाहावयास मिळतो. यामागची प्रेरणा अशी की पार्‍याचा एक थेंब जमिनीवर पडतो आहे आणी पडण्याच्या क्षणभर आधी तो कसा दिसेल याची एक प्रतिमा. याला लोक बीन (bean) म्हणतात आणी त्यात शिकागोच्या सर्व गगनचुंबी ईमारतींचं प्रतिबिंब दिसतं. शेवटचा फोटो जालावरुन साभार...

क्राउन फाउंटन...

आता नेव्ही पिअर बद्दल थोडसं... ही मला सगळ्यात जास्त आवडलेली जागा. एखादी जत्रा असावी त्याप्रमाणे इथले जायंट व्हील, चित्रविचीत्र आकार दाखवणारे आरसे, अनेक प्रकारचे खेळ ईत्यादींनी भरलेली जागा पाहुन चौपाटीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. असं म्हटल जात की ही शिकागो मधील पर्यटकांकडून सर्वात जास्त भेट दिली जाणारी जागा आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इथे होणारे फायरवर्क्स... ही त्याची थोडीशी झलक...

प्रवास

प्रतिक्रिया

टारझन's picture

27 Sep 2009 - 10:50 am | टारझन

झकास आहे हो फोटोज :)
आवडले !! पार्‍याचा थेंब तर के व ळ अ प्र ति म !!

(पारा प्रेमी) टारा

प्रभो's picture

27 Sep 2009 - 3:08 pm | प्रभो

के व ळ अ प्र ति म !!

सहज's picture

27 Sep 2009 - 10:53 am | सहज

फोटो आवडले.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Sep 2009 - 10:54 am | llपुण्याचे पेशवेll

आयला लयं भारी फोटू. एकदम ठाण्याला आल्यासारखे वाटले. ;)

अवांतरः फोटू लई भारी आहेत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

सोनम's picture

27 Sep 2009 - 12:47 pm | सोनम

फोटो खुपच छान होते. :) :)
सर्वच फोटू अप्रतिम होते. =D>

देवदत्त's picture

27 Sep 2009 - 12:56 pm | देवदत्त

छान आहेत प्रकाशचित्रे :)

झकासराव's picture

27 Sep 2009 - 1:43 pm | झकासराव

सगळे फोटो मस्तच. :)

क्रान्ति's picture

27 Sep 2009 - 2:35 pm | क्रान्ति

सगळे फोटो अप्रतिम!:)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

स्वाती२'s picture

27 Sep 2009 - 7:40 pm | स्वाती२

छान फोटो!

मिसळभोक्ता's picture

28 Sep 2009 - 11:25 am | मिसळभोक्ता

एवढे सगळे फोटो काढलेस, अंतू, पण जरा दोन ब्लॉक पुढे गेला असतास, तर मिशिगन एव्हेन्यूला "स्वामी विवेकानंद रोड" असे नाव दिलेले दिसले असते. आणि सर्व धर्म परिषदेत स्वामीजींनी जिथे "ब्रदर्स अँड शिष्टर्स" म्हटले ती जागा (आता शिकागोचे मॉडर्न आर्ट म्युझियम) दिसली असती. तिथली (नसलेली) धूळ मस्तकी लावली असतीस, तर तुझी हजार मैलाची ट्रिप सार्थकी लागली असती, रे !

-- मिसळभोक्ता

अंतु बर्वा's picture

29 Sep 2009 - 1:37 am | अंतु बर्वा

>>एवढे सगळे फोटो काढलेस, अंतू, पण जरा दोन ब्लॉक पुढे गेला असतास, तर मिशिगन एव्हेन्यूला "स्वामी विवेकानंद रोड" असे नाव दिलेले दिसले असते. आणि सर्व धर्म परिषदेत स्वामीजींनी जिथे "ब्रदर्स अँड शिष्टर्स" म्हटले ती जागा (आता शिकागोचे मॉडर्न आर्ट म्युझियम) दिसली असती. तिथली (नसलेली) धूळ मस्तकी लावली असतीस, तर तुझी हजार मैलाची ट्रिप सार्थकी लागली असती, रे !

मिशिगन एव्हेन्यूला भेट दिली होती... पण दुर्दैव पहा, तिथे जाण्याआधी पावसाची रिमझिम चालू असल्याने माझा camera एकाच्या backpack मधे ठेवायला दिला आणी नेमके त्याचवेळी आम्ही एकत्र नसल्याने माझ्या क्यामेर्‍यात हा फोटो नाहीये... :-(

प्राजु's picture

29 Sep 2009 - 1:50 am | प्राजु

फोटो आवडले.
वर्णनही छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अजिंक्य पोतदार's picture

29 Sep 2009 - 3:25 am | अजिंक्य पोतदार

फोटो छान !
वर्णन आवडले
अजिंक्य पोतदार

नंदन's picture

29 Sep 2009 - 3:49 am | नंदन

सगळीच छायाचित्रं मस्त आलीत. अगोरा बद्दल गूगलल्यावर ही माहिती मिळाली -

The Polish sculptor explained the sculptures as this: "They must be like one body that represents so many different meanings," she said. "It's the self against the whole world."

Many say that Abakanowicz' history gives context to her art. The artist was born into an aristocratic family in Poland and when she was 9, she saw Nazi soldiers shoot her mother's arm off.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी