एक नवा प्रस्ताव मांडू इच्छितो!

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in काथ्याकूट
25 Sep 2009 - 9:32 pm
गाभा: 

सर्वश्री तात्यासाहेब, विकास, चतुरंग, बिपिन व इतर मिपा मॅनेजमेंटचे सदस्यः (इतरांची नावें अद्याप माहीत नाहींत)
मी एक प्रस्ताव मांडू इच्छितो.
बर्‍याचदा आपल्या वाचनात एकादी झकास ललितकलेतली गोष्ट येते; ते व्यंगचित्र असेल किंवा एकादा आंग्ल भाषेतला लेख असेल किंवा कविता असेल. ती प्रस्तुतकर्त्याने लिहिलेली नसेल, अमराठी असेल, पण त्याला/तिला ती मिपावरील सभासदांना सांगण्यायोग्य वाटत असेल तर आज मिपावर अशी कांहीं सोय नाहीं.
उदा: जेंव्हा ए. आर. रहमान यांना ऑस्कर पारितोषिक मिळाले त्यावेळी एका पाकिस्तानी विचारवंताने/प्राध्यापकाने एका पाकिस्तानी वृत्तपत्रात लिहिलेला एक अतीशय सुंदर लेख माझ्या वाचनात आला. तो इतका टॉपर आहे की तो मला सांगितल्याशिवाय रहावत नाहीं. मी तसाच विनापरवाना चढवला तर आपण नाराज व्हाल. एक तर तो इंग्रजी भाषेतला आहे व मी लिहिलेला नाही!
मग काय करायचे?
काल "सहज"साहेबांनी एक मस्त लेख माझ्या 'खव'वर पाठविला. आपली अतिरेक्यांविरुद्धची "तयारी" किती बेगडी आहे हा विषय होता. हा विषय सर्वांच्याच जिव्हाळ्याचा. पण तो सहजसाहेबांनी लिहिलेला नाहीं व वर आंग्ल भाषेतला आहे. मग काय त्या लेखापासून मिपावाल्यांना वंचित करायचे? असे होऊ नये असे मला प्रमाणिकपणे वाटते.
माझा असा प्रस्ताव आहे कीं आणखी एक लेखनप्रकार (category) निर्माण करावा. त्याला आपण "तात्पुरता" किंवा "क्षणिक" "बुलेटिन बोर्ड" किंवा "Transit Lounge" असे नाव देऊ. तिथे आज "वर्ज्य" असलेल्या गोष्टी (इतर कुणी लिहिलेले लेख, स्वतः किंलेखैतरांनी लिहिलेले मराठीतर भाषेतले साहित्य, व्यंगचित्रे वगैरे) "चढवू" द्याव्यात व त्या ४८ किंवा ७२ तासांनंतर आपोआप नाहींशा कराव्यात किंवा ज्याने प्रस्तुत केल्या त्याला डिलीट करू द्याव्यात. (शक्यतो स्वयंचलित पद्धत बनवावी). असे केल्यास सभासदांचा खूप फायदा होईल अशी मला खात्री आहे.
पहा पटते का!
इतर मिपाकरांनीही आपली मतें नोंदवावीत.
सुधीर काळे

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

25 Sep 2009 - 10:34 pm | मदनबाण

जालावर फिरताना काय सापडेल याची काही खात्री नाही आणि आपल्याला सापडलेली चांगली माहिती दुसर्‍यांना सांगता यावी असे बर्‍याच जणांना वाटते ( यात मी सुद्धा येतो... ;) ) इथे मिपावर खरडायचा फळा आहेच पण तिथे भटकणारे काय करतात ते त्यांनाच ठाऊक !!!
बाकी मिपावरील जेष्ठ मंडळींना या बद्धल काय म्हणायचे आहे तेही वाचायला आवडेल...
मला जी माहिती दुसर्‍यांना सांगावी वाटते ती बर्‍याच वेळा मी माझ्या प्रतिसादाच्या खाली देतो.(दुवा इ.).ज्यांना ती वाचण्यात रस असेल ते नक्की वाचत असतील असा अंदाज मी करतो...

अवांतर :--- आपला हा प्रस्ताव वाचल्यावर सहज लहर आली आणि गुगुल बाबावर मदनबाण नाव टंकुन सर्च मारल्यावर वेगवेगळी माहिती मिळाली आणि त्यातच एक मस्त संकेतस्थळ सापडले...
http://www.khapre.org/

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

Age 52, weight 5000 kgs, hero of Mysore
http://www.ndtv.com/news/india/age_52_weight_5000_kgs_hero_of_mysore.php

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

25 Sep 2009 - 11:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपाचे एक संपादक विकास यांनी आजच एक धागा टाकला आहे. संदर्भ आहे टाईम्स ऑफ इंडीयाच्या एका बातमीचा! दुसर्‍याचं लिखाण, कलाकृती इ मिपावर टाकताना थोडीफार स्वतःची भर टाकली की अनेकदा चांगली चर्चाही घडून येते.

अ-दिती

सागर's picture

25 Sep 2009 - 11:23 pm | सागर

सुधीर आणि मदनबाण यांना माझे अनुमोदन...
ज्ञानाचे आदान प्रदान महत्त्वाचे :)

ऋषिकेश's picture

25 Sep 2009 - 11:32 pm | ऋषिकेश

मिपावर इतरांचे लिखाण योग्य नामनिर्देशासहित देण्यास बंदी आहे असे वाटत नाहि. मात्र केवळ लिखाण न देता लेखकाने त्यावर स्वतःचं मत / शक्य मतांतरे / त्या लेखाचे थोडक्यात रसग्रहण करून चर्चाप्रस्ताव मांडला तर छान चर्चा होऊ शकतेच की
अदितीने असे एक उदा. वर दिले आहेच.

ऋषिकेश
------------------
रात्रीचे ११ वाजून ३२ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "शेम टू शेम.. जसेच्यातसेऽऽ...."

सुधीर काळे's picture

26 Sep 2009 - 5:28 am | सुधीर काळे

व्यक्ती तितकी मते हे तर खरंच. संगमरवराच्या ताजमहालाला माझी वीट लावायला मला तरी प्रशस्त वाटत नाही. आहे तसे द्यावे असे मला वाटते.
चर्चा करण्यासारखं असेल तर ती घडून येईलच!
इतरांनीही मतप्रदर्शन करावे व संपादकांनी त्यानुसार निर्णय घ्यावा.
स्_धीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

आता या अतिसुंदर लेखाला (by Nadeem Ul Haque, former Vice Chancellor of PIDE.) माझ्या शेर्‍याची कांहीच गरज नाहीं. अगदी बवन्नकशी सोनं आहे. शेवटी लेखकाला जय हिंद म्हणायचं असावं, पण हिम्मत झाली नसावी!
खरं तर मी सुचविलेल्या प्रस्तावानुसार ज्याला आवडेल तो कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या हार्ड डिस्कवर सेव्ह करेल. अन्यथा ७२ तासांनी तो आपोआप पुसला जाईल जेणेकरून आपल्या सर्व्हरवरील जागा जाणार नाहीं.
म्हणुनच मी हा विन-विन प्रस्ताव संपादकांच्या अनुमतीसाठी मांडला आहे. जय हो!
सुधीर
====================================
Many of us watched the Oscars with a lump in our throats when AR Rehman was given a standing ovation by the American movie establishment. Rehman, a Muslim from a country we don’t consider friendly to Muslims, was eulogised by the Hollywood establishment, traditionally controlled by those of the Jewish persuasion. Rehman’s obvious talent overwhelmed them all. Jai ho!

There he stood, saying simple but powerful words: “I had a choice between love and hate. I chose love!” A simple Muslim of simple origins made us all proud with his talent. Jai ho!

What would he have been had he been in Pakistan ?

He converted from Hinduism to Islam in 1989. Here, such a conversion would have put him in grave danger; quite possibly, some zealot might even have snuffed out his talent. Yet in his acceptance speech at the Oscars, at one point he said “Allah-o Akbar!” Jai AR Rehman!

For many years we have comforted ourselves by saying that Muslims have no opportunities in India and that Pakistan was made to give Muslims opportunities. Indeed, Pakistan has given some a lot of opportunities to get rich. There are numerous stories of excess wealth gained through government-dispensed licenses and plots, misuse of power, and other abuses of public office. Wealth has been created and the new class of rich shows off its Porsches, Range Rovers and other expensive toys. Their lifestyles could even dwarf some of the well-heeled rich and famous in India and the West. While we laud wealth and power, talent has no place in Pakistan .

The rest of us run around serving these princes. Talented musicians like AR Rehman play at the pleasure of this class. They play at their parties and the expensive weddings of their children; they play and the aristocracy hardly notices them. They do not even stay quiet during performances, pay no attention to the artists or give them the feeling of stardom. Because the stars are the aristocrats who managed to make their money through corruption and manipulation. Jai power!

In Pakistan , this would have been the fate of AR Rehman. He would have been a mere court musician. No Oscars, no recognition. Many a talented Pakistani musician has been forgotten. They leave behind some good music, of which we buy pirated versions. None is honoured. There are no Nur Jehan avenues or airports. No Nusrat Fateh Ali Khan squares, universities or buildings. No concerts; no awards and certainly no major movies that could get them to the Oscars.

We are all aware of how Bollywood is full of Indian Muslims. And they are widely respected in India . Darwin ’s ideas seem to be at work: Indian Muslims are flowering under competition and showcasing major talent. Jai ho!

Darwin is right here too. We in Pakistan face no competition. Our path to success is rapid gain through actions such as raiding the exchequer, befriending the powerful, influence-peddling or power-brokering.

Lives of privilege — where the taxpayer picks up the tab for everything: from umrahs to polo, from mujras to free air travel, and from plots to stocks — have led to generational deterioration. Hard work is looked down upon and he who competes internationally is only a kammi kamin. Ministers, the well-connected and the powerful, are not supposed to dirty their hands or even consort with kammis like AR Rehman and Nusrat Fateh Ali Khan.

Why? The answer is simple. Our leaders wanted to save themselves the hard work of competition. They wanted and got easy rents — handouts from the government. The army, the bureaucracy, the landed and the licensed industrialist all got it easily. They took no risks, they did not innovate, and they developed no products. They competed against no one for their ill-gotten gains, nor was there any accountability. Kids now see that the path to success is rents and influence, and that hard work and talent does not pay. After all, what did we do to Dr Abdus Salam? So why work hard?

We do produce talent, for no country of 200 million can be devoid of talent. Hashim Khan and his family, Imran Khan and his cousins, several cricketers and hockey players, the wrestler Bashir, and, of course, Abdus Salam. Now thankfully a few younger people like Mohsin Hamid and Daniyal Moinuddin are beginning to blaze some sort of trail. Will our musicians and artists have the opportunity to vie for the Oscars? No, for our elites are too busy destroying institutions, and talent cannot emerge without institutions.

These few talented people struggle against huge odds, with little recognition at home. But most of our younger generation is lost. Rich kids are given to pleasure and privilege, and the poor are turning to religion out of desperation.

We should be grateful that some Muslims remained in India and learned to compete. These Muslims are going to compete internationally and give us something to be proud of while our elites in Pakistan , who shun excellence and hard work, maintain their privilege and extravagance.

So thank you, AR Rehman. Jai Indian Muslims!

Nadeem Ul Haque is former Vice Chancellor of PIDE.

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ऋषिकेश's picture

27 Sep 2009 - 9:22 pm | ऋषिकेश

श्री सुधीर काळे,
हा लेख मला आवडला.. मात्र तो तुम्हाला आवडला याचे अपरंपार आश्चर्य वाटले. तुमच्या जुन्या भुमिके नुसार तुम्हाला एका देशद्रोह्याचा लेख कसा काय वाचवला?
कारण ज्याने त्याने आपापल्या देशांतील व्यंगांवर चारचौघात लिहून आपल्या देशाची अब्रु धुळीस मिळवावी हे तुम्हाला पटत नाहि ना? जसे अमेरिकन मिडीया यांनी स्वतःच्या देशांतील अन्यायावर आवाज उठवणे तुम्हाला देशद्रोह वाटतो मग हा लेख प्रस्तुत लेखकाचा देशद्रोह नाहि का? नसल्यास का नाही?

ऋषिकेश

ऋषिकेष-जी,
पाकिस्तानी नागरिकाने पाकिस्तानची भलावण केली किंवा त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक प्रणालीमधले किंवा पद्धतीमधले दोष दाखविले तर तो देशद्रोह कसा? भारतात राहून भारताचे खाऊन भारताच्या मातीशी जे वैर करतात ते देशद्रोही. डॉ. खान यांनी अण्वस्त्रे बनवली हे आपल्याला त्रासदायक जरी असले तरीही ती त्यांची देशभक्तीचच आहे, देशद्रोह नव्हे. त्यांनी पाकिस्तानमध्ये राहून आपला बाँब बनवला असता तर तो देशद्रोह झाला असता.
नदीम उल हक यांनीही "जय-हिंद" न म्हणता जय-भारतीय-मुस्लिम (Jai Indian Muslims) म्हटले आहे हे विसरू नका. त्यांनी भारताला नावे न ठेवता पैसेखाऊ पाकिस्तानी नेत्यांना व लष्करशहांना दोष दिला आहे. मी आधी लिहिल्याप्रमाणे पाकिस्तानात haves आणि have-nots मध्ये जी खोल दरी आहे (जी आपल्याकडेही आहे, पण इतकी खोल नाहीं) त्याच्यावर टीका केली आहे. ते म्हणतात तसे जर रहमान पाकिस्तानात राहिले असते तर ते एक मोठमोठ्या जमीनदारांचे court musician च राहिले असते असे म्हणतात ते खोटे आहे का?
आजपर्यंत पाकिस्तानात कुणी विनोबा भावे, महर्षी कर्वे, महात्मा फुले यांच्यासारखे संत जन्मले नाहींत. त्यामुळे सर्व जनतेत शिक्षणप्रसार, त्यातही स्त्री-शिक्षण, भूदान, कूळकायदा, अशा ज्या क्रांतिकारक गोष्टी भारतीय लोकशाहीने केल्या त्या पाकिस्तानात झालेल्या माझ्या वाचनात तरी नाहींत. हेही त्या देशाचे मोठे अपयश आहे.
शत्रू कसा विचार करतो व वरवर शिव्या देत असला तरी आपल्याकडे "खरोखर" कसा बघतो हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे असे नाहीं का वाटत आपल्याला?
पण "अल-घरीब"मधील अत्याचारांची (जे कैदी स्वतःच नराधम होते) कथा जगापुढे मांडणे व देशाच्या राजकीय/सामाजिक प्रणालीमधला किंवा पद्धतीमधला दोष सांगणे, त्याची कारण-मीमांसा करणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. जर इराकमधल्या सज्जन माणसाला असे छळले तर ते बिंग फोडणे चांगलेच (उदा: जोडेफेकू इराकीचा छळ), पण ज्यांनी स्वतः सत्तेवर असतांना अनन्वित अत्याचार केले त्यांना थोडेसे "थोपटले" व ते जर अमेरिकन मीडियाने स्वतःच्या वृत्तपत्राचा खप वाढविण्यासाठी छापले तर ते वेगळेच आहे.
मला तरी असे वाटते. पण प्रत्येकाचे perception वेगळे असू शकते. मला तरी कुठे (माझा) वैचारिक गोंधळ दिसत नाहीं.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

ऋषिकेश's picture

29 Sep 2009 - 9:08 am | ऋषिकेश

पाकिस्तानी नागरिकाने पाकिस्तानची भलावण केली किंवा त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक प्रणालीमधले किंवा पद्धतीमधले दोष दाखविले तर तो देशद्रोह कसा?

बरोबर आहे माझ्यामते तो देशद्रोह नाहिच..
मात्र आपल्याच काहि जुन्या प्रतिक्रीयांवरून असे दिसते की स्वतःच्या देशांतील चुका दाखवणे स्वतःच्याच आईवर शिंतोडे उडविण्यासारखे आहे असे आपले मत आहे. (आपण तेव्हा अमेरिकन मिडियाने मुसलमानांवरल केलेला अत्याचार उघड करणे राष्ट्रद्रोहाचे होते अश्या अर्थाची वक्तव्ये केली होतीत असेही स्मरते.. शोधल्यास नेमकी प्रतिक्रिया मिळेलच). आपण स्वतःचेच मत पुनरावलोकन करून बदललेले दिसते. हे स्वागतार्ह आहे. अभिनंदन.

माझ्याकडून मुळ विषयाशी हा अवांतर विषय संपवत आहे. (संपादकांना अवांतर वाटल्यास ते माझे प्रतिसाद उडवू शकतात.. नाहीतर चांदण्या मिळवा! ;) )

ऋषिकेश

अजून आपल्या लक्षात नाहीं आले असं वाटतय!
ज्या मीडियाने ते केले ते (माझ्या मते) स्वार्थीपणाने केले होते. पण इथे नदीम उल हक अंतर्मुख होऊन पाकिस्तानचे काय चुकले याचा विचार करत आहेत असे मला वाटते.
अशी निस्वार्थी टीका कुठे व क्रूर लोकांना जरा थोपटलं म्हणून आपल्याच देशाची इज्जत काढण्याची क्रिया कुठे?
मतितार्थ कळेल अशी आशा आहे.
पण माझी मतं सगळ्यांना पटतीलच असं नाहीं. कारण मानवतेविरुद्धच्या या गोष्टींचा कांहीं लोकांना संताप येतही असेल. पण मला नाहीं येत! उलट अशा लोकांना त्यांच्याच पद्धतीने शिक्षा व्हायला हवी अशा मताचा मी आहे.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

मोहन's picture

26 Sep 2009 - 8:19 am | मोहन

सुधीरजींशी सहमत
मोहन

सहज's picture

26 Sep 2009 - 9:06 am | सहज

मला पटत नाही. याचे कारण असे आहे की मिपावर लेखन करताना काय लिहावे यावर एक धोरणात्मक लेख इथे लिहला आहे, बरेचदा नवसदस्य ते न बघताच लेख चढवतात. त्याचे उदाहरण काल एका सदस्याने ज्याला फाल्तु टाइमपास म्हणता येईल असे धागे टाकले होते बर एखादा धागा असला तर ठीक आहे दुर्लक्ष करता येते, ह्या सदस्याने जवळजवळ १० धागे तसे टाकले.

बर लेख सर्वांना दाखवण्यासारखा आहे की नाही हे सापेक्ष आहे. कोणाला कुठला लेख आवडेल काही सांगता येणार नाही. जर बाहेरच्या लिंका लेख चिकटवणे चालते हे कळले तर अतिउत्साही सदस्यांकडून सरळसरळ कुठल्याही लिंका चढवल्या जातील (कारण त्यात काही विशेष मेहनत नसते)व मिपाच्या पहील्या पानावर (जिथे सर्व प्रकारचे साहीत्य) सगळे असलेच "साहीत्य" कायम दिसत राहील अशी भिती वाटते.

याचे कारण ज्यांनी इमेल हा प्रकार किमान एक ते दोन महिने वापरला आहे त्यांना कळेल लोक किती उत्साहाने काय वाट्टेल ती इमेल फॉरवर्ड करण्यात धन्यता मानतात.

त्यामुळे एखादा उपयुक्त लेख असला तरी त्यावर स्वःता भाष्य करुन इथे टंकणे, शक्यतो रोमन लिपी टाळून हेच उत्तम.

बाकी इथे राहून सदस्यांची ओळख / पारख करुन समविचारी सदस्यात नक्कीच काही लेख खरडवहीच्या माध्यमातुन फिरवले जाउ शकतात. ते मुख्य धाग्यावर लिंका टाकण्यापेक्षा जास्त चांगले असे मला वाटते. लोक इतरांच्या खरडवह्यादेखील अतिशय प्रेमाने वाचतात. :-)

अमित बेधुन्द मनचि लहर's picture

26 Sep 2009 - 9:51 am | अमित बेधुन्द मन...

जय हो सुधिरजि

मिसळभोक्ता's picture

26 Sep 2009 - 1:16 pm | मिसळभोक्ता

काळेकाका,

इंग्रजीतली वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेली आर्टिकल्स आम्ही रोज शेकड्याने वाचतो. तीच पुन्हा इथे तशीच्या तशी मिसळपावावर का दिसावी ? ट्यावर तुमची काही स्वतःची मते असतील, तर ती लिहा, आम्ही वाचू. मूळ आर्टिकल्स देऊ नका, दुवे द्या. बस.

(किंवा एक सुचवतो, टार्‍याची शिकवणी लावा, आणि त्या विंग्रजी लेखांची हीन आणि हिणकस विडंबने करा. हिट जातील !)

-- मिसळभोक्ता

खरं तर executive summary शिवाय दुवे देऊ नयेत या विचाराचा मी आहे. कारण बर्‍याचदा लोक स्वतः न वाचता दुवे पाठवतात. त्यामुळे कमीतकमी executive summary दिलीच पाहिजे इथपर्यंत ठीक आहे.
पण executive summary म्हणजे माझे विचार नसून कमीतकमी मी तो लेख वाचला आहे याचा पुरावा आहे व तशी अट असावी.
पण रहमानवरील लेखावर टिप्पणी करणे म्हणजे त्या लेखाची शान थोडी-फार कमी करण्यासारखे आहे, नाहीं का?
म्हणूनच "क्षणभंगुर" दालनात फक्त ४८ तास असे लेख ठेवायची कल्पना मला (माझी म्हणून नव्हे तर जास्त व्यवहारिक म्हणून) योग्य व अत्युक्त (optimum) वाटते.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 2:05 am | शक्तिमान

खरडफळाच वापरा की!

सुधीर काळे's picture

27 Sep 2009 - 8:06 am | सुधीर काळे

खरडफळ्याची उपयुक्तता सीमित नसती तर मी हा प्रस्ताव मांडलाच नसता. जरी कुणीही कुणाच्याही खरडफळ्यावर जाऊन वाचू शकत असला तरी कुणाच्या खरडफळ्यावर काय लिहिले आहे हे माहीत नसल्याने त्याच्या उपयुक्ततेला मर्यादा आहेत.
जर एकाद्या Notice Board सारखा फळा असेल तर त्याचा वापर करता येईल व माझा प्रस्ताव तोच आहे. फक्त त्याला काय नाव द्यायचे ते ठरवायचे एवढेच. मी म्हणतो त्या प्रस्तावात मी Bulletin Board हाही शब्द वापरला आहे. तिथे जे कांहीं पोस्ट केले जाईल ते ठराविक कालानंतर पुसून टाकले जावे.
पण आता दोन्ही बाजूंनी पुरेसे विचारमंथन झालेले आहे व आता संपादकमंडळींनी निर्णय घेण्याची वेळ आली आहे.
१. असे स्थळ निर्माण करायचे कीं नाहीं?
२. केल्यास किती तासानंतर तिथे केलेल्या पोस्टस पुसल्या जाव्यात?
Over to you, Editors.....!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 12:22 pm | शक्तिमान

हा घ्या नोटिस बोर्ड म्हणजेच खरडफळा.

खरडवही आणि खरडफळा या मध्ये थोडासा फरक आहे...
खरडफळा हा नोटिस बोर्ड म्हणुन वापरता येतो.. आणि मिसळपाव या स्थळावर सार्वजनिक असा खरडफळा उपलब्ध आहे...

आणि आपण ज्याला खरडफळा म्हणत आहात.. तो खरडफळा नसून खरडवही आहे..

खरडफळ्याचा दुवा हा डाव्या हाताला, लेखन करा या दुव्याखाली "खरडायचा फळा" या नावाने दिला आहे..

सुधीर काळे's picture

27 Sep 2009 - 9:49 pm | सुधीर काळे

खाली आजचे खरडफळ्याचे शेवटचे पान दिले आहे (कॉपी-पेस्ट). खरडवही व खरडफळा यात माझी तरी गफलत झालेली नाही असे मला आता तरी वाटते.
या एकाच पानावरची (पान क्र. ९४) पहिली व शेवटची पोस्ट २८ जाने २००९ ची आहे.
मला हा पर्याय योग्य वाटतो जर तिथे अपलोड केलेल्या पोस्टबद्दल सर्व सभासदांना आपोआप माहिती दिली जायची सोय असेल तर. उदा: "चितपावन" या फोरमवर फाईल अपलोड केल्यास ऑटोसिस्टिमने त्याची नोटीस सर्व सभासदांना जाते. (तात्यासाहेबही त्या फोरमचे सभासद आहेत व आमची ओळख त्या फोरमवरच झालेली आहे.)
तशी सोय झाल्यास प्रश्नच मिटला. मला असेच कांहीं तरी हवे आहे.

सुधीर
=========कट-पेस्ट केलेले पान खाली आहे=========
खरडायचा फळा.
नमस्कार,
रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.
Add guestbook entry
Message: *
Scrapper: ३_१४ विक्षिप्त अदिती, Wed, 01/28/2009 - 12:04
नाही रे, मी नाही झाडू मारला. नीलकांतने केलं असणार हे काम, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
बाकी काय म्हणता चोच्यांनो?
Scrapper: II राजे II, Wed, 01/28/2009 - 12:04

>ये क्या हुवा? कैसे हुवा? कब हुवा? क्यु हुवा?

Rolling On The Floor

हेच म्हणतो !

कोणी आमचा इतिहास फुसला Sad
Scrapper: घाशीराम कोतवाल १.२, Wed, 01/28/2009 - 11:58

टार्या आहेस का गेलास आफ्रिकेला?
Scrapper: घाशीराम कोतवाल १.२, Wed, 01/28/2009 - 11:57

अरे गप रे महेंद्र हि बातमी ईकडे नको देउ हि ख फ आहे मज्जा करायला
Scrapper: निखिल देशपांडे, Wed, 01/28/2009 - 11:31

अरे ख फ रिकमा झाला तर पुर्ण
Scrapper: महेंद्र, Wed, 01/28/2009 - 10:56

मित्रहो...
रामसेना आणि मनसे ...
काल बातमी वाचली...
कितपत योग्य आहे हे??
http://tinyurl.com/dyrnwo
Scrapper: तात्या सोमण, Wed, 01/28/2009 - 10:52

बुच्चु.....
Scrapper: टारझन, Wed, 01/28/2009 - 09:50

Rolling On The Floor Rolling On The Floor Rolling On The Floor

शेवटी कचरा साफ झाला तर Smile
Scrapper: इनोबा म्हणे, Wed, 01/28/2009 - 03:31

आदिमायाबाई झाडू मारुन गेल्या वाटतं. Smile
Scrapper: ब्रिटिश टिंग्या, Wed, 01/28/2009 - 03:02

ये क्या हुवा? कैसे हुवा? कब हुवा? क्यु हुवा?
« first‹ previous… 86 87 88 89 90 91 92 93 94
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

शक्तिमान's picture

27 Sep 2009 - 12:26 pm | शक्तिमान

हा पहा खरडफळ्याचा उद्देश:

रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे. येथे खुप लेखन करू नये. कारण तीन दिवसांनी हे लेखन उडवल्या जाईल.

आपल्या बहुतेक सर्व मागण्या यातून पूर्ण होतील......

विसोबा खेचर's picture

27 Sep 2009 - 12:39 pm | विसोबा खेचर

शक्तिमान यांचा पर्याय योग्य वाटतो आहे...

तात्या.

सुधीर काळे's picture

27 Sep 2009 - 7:26 pm | सुधीर काळे

खरडफळ्यावर जर कुणी कांहीं लिहिलं तर काहींतरी नवीन लिहिलं आहे हे सर्वांपर्यंत कळवायचं कसं?
अशी जर सोय केली गेली तर खरडफळा ही मी म्हणतोय अशीच गोष्ट आहे. पण सध्या मी पाहिले तर २८ जानेवारीपासून आजपर्यंतच्या अगणित पोस्टस आजही तिथे आहेत (५०० पेक्षा जास्तच असतील). तीन दिवसात पुसल्या गेलेल्या दिसत नाहींत.
पण कदाचित मला या फळ्याचा उपयोग नीट कळला नसेल ही शक्यता आहे. कुणी सांगितले तर मी उपकृत होईन.
धन्यवाद.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुधीर काळे's picture

27 Sep 2009 - 9:11 pm | सुधीर काळे

आताच लिहिल्याप्रमाणे खरडफळ्यावर या क्षणी २८ जाने पासून आजपर्यंतच्या ९४ पानांवर ५००+ पोस्टस आहेत (मोजण्याच्या पलीकडे आकडा आहे). तीन दिवसात त्या पुसण्याचा "प्लॅन" असेल पण "वस्तुस्थिती" मात्र फारच वेगळी आहे!
कदाचित ऑटोडिलीटची सोय नसल्यामुळे असे होत असेल.
असो.
समजा मी इतरांनी लिहिलेले पण मला आवडलेले कांहीं अमराठी लेख खरडफळ्यावर अपलोड केले व त्याची माहिती "मी-लिखित" एक ओळीच्या "लेखा"ने create content येथे दिली तर ते कायदेशीर मानले जाईल काय?
जर "होय" असे उत्तर असेल तर प्रश्नच मिटला.
मी अपलोड केलेल्या अशा आगंतुक पोस्टस मी स्वतः डिलीट करेन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

संदीप चित्रे's picture

27 Sep 2009 - 6:41 am | संदीप चित्रे

अशी एखादी कॅटेगरी असेल तर उत्तम होईल.

विसोबा खेचर's picture

27 Sep 2009 - 8:23 am | विसोबा खेचर

'प्रस्ताव नामंजूर' असे विनम्रपणे सांगू इच्छितो..

मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांनी लिहिलेले लेखन प्रसिद्ध करण्याचे व्यासपिठ आहे आणि तसेच राहील. ४८ नाही, २४ नाही, मिपाबाहेरील व्यक्तिने लिहिलेले लेखन येथे एक मिनिटही राहता कामा नये असेच मिपाचे धोरण आहे आणि राहील!

कृपया मिपाच्या धोरणांचा आदर करावा..

तात्या.
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

सुधीर काळे's picture

27 Sep 2009 - 8:46 am | सुधीर काळे

धन्यवाद
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

विसोबा खेचर's picture

27 Sep 2009 - 8:49 am | विसोबा खेचर

एखाद्या लेखा/चर्चेदरम्यान केवळ संदर्भाकरता म्हणून अन्य ठिकाणच्या दोनचार ओळी किंवा एखादा लहानसा परिच्छेद देण्यास हरकत नाही.

इतरत्र प्रसिद्ध झालेले लेखन जर मिपाकरांनी वाचावे व त्याच्यावर चर्चा घडवून आणावी असे जर एखाद्याला/एखादीला वाटत असेल तर त्याने/तिने संबंधित लेखनाचा दुवा (लिंक) द्यावा...

जर काही आस्वादात्मक, कलात्मक, अनुवादात्मक भाष्य करायचे असेल तरच मिपाव्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रसिद्ध झालेली एखादी कविता/गझल/लेख/ संदर्भाकरता म्हणून मिपावर प्रसिद्ध करण्यास हरकत नाही....

मिपाच्या धोरणांपैकी वरील कलमांचा विचार व्हावा..

तात्या.

वाचक's picture

28 Sep 2009 - 7:48 am | वाचक

सुधिरजी
आपल्याला अपेक्षित असलेली सोय सध्या दुसर्‍या एका संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (ते संकेतस्थळ अगदी ह्याच कारणासाठी तयार केले गेलेले आहे असे वाटते)
इथे पहा: कानो कानी

म्हणजे आमच्या लाडक्या तात्यासाहेबांना सोडून आणखी कुठं तरी जायचं? त्याच्यापेक्षा तात्यासाहेबांना एकादी चांगली कल्पना येईल अशी आशा करू या.
पण दोन्ही संकेतस्थळांचे सभासदत्व घेता येईल हेही खरं.
पण बर्‍याच लोकांनी माझ्या कल्पनेचं स्वागत केलं आहे. ते पाहून तात्यासाहेब माझ्यासारख्यांची काहीं तरी सोय करतील अशी आशा करू या!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

वाचक's picture

28 Sep 2009 - 7:23 pm | वाचक

गरज नसावी, मिपाची उद्दिष्ट्ये वेगळी आहेत आणि प्रत्येक प्रकारच्या गरजांसाठी संकेतस्थळे निर्माण झाली आहेत त्यांचा (त्याच गरजांकरिता) लाभ घेतला तर आंतरजाल अधिकाधिक योग्य तर्‍हेने समृद्ध होत राहील असे वाटते.

नंदू's picture

28 Sep 2009 - 6:59 pm | नंदू

प्रतिक्रियांमध्येच असा लेख टाकल्यास प्रकाशित तर होतोच आणि उडवला पण जात नाही..... ;)

नंदू

चतुरंग

शक्तिमान's picture

28 Sep 2009 - 8:26 pm | शक्तिमान

=)) =)) =)) =))
काय टायमिंग आहे!

खालील प्रश्नाचे उत्तर आलेले नाहीं!
"समजा मी इतरांनी लिहिलेले पण मला आवडलेले कांहीं अमराठी लेख खरडफळ्यावर अपलोड केले व त्याची माहिती स्वलिखित एक ओळीच्या "लेखा"ने create content येथे दिली तर ते कायदेशीर मानले जाईल काय?
जर "होय" असे उत्तर असेल तर प्रश्नच मिटला.
किंवा "चितपावन" या फोरमवर जर फाईल सेक्शनमध्ये जर कुणी एकादी फाईल अपलोड केली तर त्यांच्या ऑटोसिस्टिमने आपोआप सर्वांच्या इन-बॉक्स मध्ये त्याची माहिती येते. (तात्यासाहेबांना हे माहीत आहे)
या दोहोपैकी एक करावं असं मला वाटतं. (विनंती आहे, आग्रह नाहीं)
मी अपलोड केलेल्या अशा आगंतुक पोस्टस मी स्वतः डिलीट करेन.
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

चतुरंग's picture

28 Sep 2009 - 9:40 pm | चतुरंग

इथे 'कायदेशीर' बेकायदेशीर' अशा वादापेक्षा संस्थळाचे उद्दिष्ट काय आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.
लोकांना लिहिण्यासाठी - स्वत:चे साहित्य, कविता, विडंबने, प्रवासवर्णने, फोटो इ. ह्यासाठी उद्युक्त करणे हा मूळ उद्देश आहे. दुसर्‍या साहित्यावरचे विचार इत्यादी हा एक महत्त्वाचा भाग आहे परंतु प्रामुख्याने दुसरीकडचे साहित्य आणि एका ओळीचे धागे ह्यांचे सत्र सुरु झाले तर ते आवरणे अवघड होते हा एक भाग आणि मुळात लोकांनी काही लिहावे ह्याला बाधा येते हा दुसरा.
वरती मला वाटते तात्यांनी स्पष्टपणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे
http://www.misalpav.com/node/9537#comment-151013
तुम्हाला व्यक्तिशः ज्या सभासदांना कळवावे असे वाटत असेल त्यांना खरडवही/व्यनि द्वारे कळवू शकताच.
धन्यवाद!

चतुरंग

सुबक ठेंगणी's picture

29 Sep 2009 - 7:12 am | सुबक ठेंगणी

शब्दाशब्दाशी सहमत.

असंही आलं मनातः
राजहंसाचे चालणे, जगी झालिया शहाणे
म्हणोनी काय कवणे चालोचि नये?
इथे जर मातब्बर लेखकांचे लेख चिकटवायला लागले तर आमचे कोण वाचणार? आणि नवीन लेखन करण्याची तसदी तरी कोण घेणार?

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 7:58 am | मिसळभोक्ता

काय सारखे चित्पावन चित्पावन लावले आहे ? इथे देशपांडे, कुलकर्णी, काळे, गोरे, पटवर्धन, बापट, बिरुटे, जैन, सगळे आहेत. चित्पावनांचे नियम इथे कसे लागणार ? एवढी शिंपल गोश्ट आहे राव ! एवढी इतरांची चित्रे वाटायची असतील, तर तिथे चित्पावनांतच का नाही राहिलात ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)

निमीत्त मात्र's picture

29 Sep 2009 - 8:01 am | निमीत्त मात्र

अजूनही जातीव्यवस्थेचे लोढणे गळ्यात अभिमानाने वावरणारे काही मिपाकर आहेत.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 8:10 am | मिसळभोक्ता

स्वत्वाच्या *डीला गळू होतो, तेव्हा जातीचे मलम लावणारे अनेक असतात. (तुझ्यावर नजर ठेवून आहे, कुठेही घसर, नोंद ठेवण्यात येईल.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

निमीत्त मात्र's picture

29 Sep 2009 - 8:28 am | निमीत्त मात्र

तुझ्यावर नजर ठेवून आहे, कुठेही घसर, नोंद ठेवण्यात येईल.

काय मिपाचा नोंदणी कारकून म्हणून नेमलेय का तुला? ठेवत बस नोंदी.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 8:31 am | मिसळभोक्ता

मिपाचे नोंदणी कारकून म्हणून दोघे जण आहेत की ऑलरेडी!

माझी नजर तुझ्यावर आहे रे, मिपावर नाही !

तुझा स्पेश्शल नोंदणी कारकून म्हण वाटल्यास... कोई गल नही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

निमीत्त मात्र's picture

29 Sep 2009 - 9:02 am | निमीत्त मात्र

माझी नजर तुझ्यावर आहे रे, मिपावर नाही !

तुझी उतरली आणि शुद्धीत आलास की उद्या सकाळी बोलू आपण ह्या विषयावर.

सुधीर काळे's picture

29 Sep 2009 - 5:19 am | सुधीर काळे

कसले टायमिंग?
कांहीं कळले नाहीं!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Sep 2009 - 10:59 pm | बिपिन कार्यकर्ते

बरेच दिवस हा धागा बघतो आहे. काळे साहेबांनी पण हा अतिशय महत्वाचा प्रश्न अगदी नेटाने लावून धरला आहे. त्यामुळे मला सुचलेला उपाय देतो आहे.

काळेसाहेबांचा प्रस्ताव का योग्य नाही आणि म्हणून इथे अंमलात येणार नाही हे तात्या, चतुरंग वगैरेंनी लिहिलेच आहे. पण यावर उपाय असा की, काळेसाहेबांना आवडलेले लेख ज्यांना आवडतात आणि त्यांच्या शिफारसीप्रमाणे वाचायला आवडेल अशा लोकांनी काळेसाहेबांना इमेल पाठवावे. त्यांनी त्या इमेल पत्त्यांचा एक गट करून असे लेख, दुवे इत्यादी त्या त्या गरजू लोकांना इमेल मधून ढकलावे.

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

28 Sep 2009 - 11:04 pm | अवलिया

बिपिनशी सहमत आहे. काळेसाहेबांनी हा उपाय करुन पहावा त्याचबरोबर अनसबस्क्राईब ची पण सोय द्यावी ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सुधीर काळे's picture

29 Sep 2009 - 7:31 am | सुधीर काळे

बिपिन-जी,
तात्यासाहेबांनी "हळुवार" नकार दिला तेंव्हांपासून तो मार्ग मी सोडला आहे. पण आपल्या सभासदांपैकीच एकाने खरडफळ्याची कल्पना मांडली. रहाता राहिला सगळ्यांना कळवायचा मार्ग. तोच फक्त आता शोभतोय! आपणही सुचवा.
काल मी दसर्‍याच्या शुभेच्छा "गठ्ठ्या"ने पाठवायचा प्रयत्न केला, पण तो अयश्स्वी झाला. किती लोकांना एका वेळी अशी ग्रीटिंग्ज पाठवू शकतो याला कांहीं मर्यादा असाव्यात!
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 7:54 am | मिसळभोक्ता

मिसळपावाचे धोरण समजण्यासाठी सोप्पी दोन वाक्ये लक्षात ठेवा:

स्वतःचे चढवा. इतरांचे नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालूल मिळेल.)

सुधीर काळे's picture

29 Sep 2009 - 8:21 am | सुधीर काळे

"शिंपल गोष्ट" केंव्हांच कळली आहे हो! फक्त इतर काही सोय करून दर्जेदार लेख/व्यंगचित्रे "मिपा"करांकडे कशा पोचवायच्या एवढ्यापुरतीच चर्चा आता सुरू आहे आणि या पोस्टबरोबर माझ्या बाजून मी ती संपवत आहे कारण आता त्याच-त्याच मुद्द्यांची पुनरावृत्ती होत आहे.
मी आता अशा गोष्टी खरडफळ्यावर दर रविवारी व गुरुवारी चढवणार, कुणी वाचो वा न वाचो!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

निमीत्त मात्र's picture

29 Sep 2009 - 8:24 am | निमीत्त मात्र

मी आता अशा गोष्टी खरडफळ्यावर दर रविवारी व गुरुवारी चढवणार, कुणी वाचो वा न वाचो!

त्यापेक्षा शनिवारी आणि बुधवारी चढवा! तात्यासाहेब तुम्हाला नियमात सूट देतील कदाचित. :)

अवलिया's picture

29 Sep 2009 - 10:00 am | अवलिया

मी आता अशा गोष्टी खरडफळ्यावर दर रविवारी व गुरुवारी चढवणार, कुणी वाचो वा न वाचो!

+१
मस्त. आणि असे खफवर चिकटवले की एक ओळीचा धागा काढायचा असं असं चिकटवल आहे हे सांगायला !
म्हणजे स्वतःचे लेखन पण होते.. ! :)
विन विन !! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

29 Sep 2009 - 11:03 am | प्रभो

ज ब ह रा !!!! आयडिया.....

हा मात्र असली यॉर्कर होता बरं का अवलियासाहेब! स्टान्स घ्यायच्या पूर्वीच आमची दांडी गुल केलीत कीं!
इथे एका सभासदाचे वाक्य आहे, "किती जगलात हे महत्वाचे नसून कसे जगलात हे महत्वाचे आहे"
आम्हीही "किती लेख लिहिले" या पेक्षा "काय प्रतीचे लेख लिहिले" याला जास्त महत्व देतो.
(दांडी गुल झाल्याचे दु:ख नाहीं पण यॉर्कर सोकावतो!)
GBU
सुधीर

------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सुधीर काळे's picture

29 Sep 2009 - 10:54 am | सुधीर काळे

Nothing more from me. I have "packed up" on this subject.
Sorry for the use of English here!!
Sudhir
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.