ती ...

मनीषा's picture
मनीषा in जे न देखे रवी...
25 Sep 2009 - 9:19 am

अशीच एकदा, मला ती दिसली
बरीचशी माझ्यासारखी .....
पण तरीही खूप वेगळी

तिला विचारलं मी,
कुठून आलीस? आणि आता
कुठे चाललीस?

गाव तुझं तुला, आहे का माहिती ?
ही वाट तुझ्या, आहे का ओळखीची ?

माझ्या प्रश्नांवर, ती फक्त हसली
चमकणार्‍या डोळ्यांनी
माझ्याकडे पहात राहिली

तीच्या उत्तराची मग,
मी वाट नाही पाहिली
घर गाठायची,
आता होती मला घाई

घर माझं होतं दूर
मग निघाले पुढे तशी
वाट ही होती अवघड
पण, पायाखालची

रस्त्यावरची माती, तशी ओळखीची
अन उन्हाची तलखी, --- रोजची सवयीची

रणरणतं ऊन, आणि निष्पर्ण वृक्ष
पण ती वाट होती माझ्या घराची

उन्हाचं त्या मला, काहीच नाही वाटलं
अन झाडांचं काय?
मला कुठे थांबायचं होतं त्यांच्या सावलीत?

चालता चालता वळले
पाहते, तर ... ती
नि:शब्दपणे, तापलेल्या मातीत उभी

मी म्हणलं, कोण गं तू?
अन अशी का पाठराखणी, करते आहेस माझी?

परत ती हसली,
पण या वेळी मात्रं बोलली
"ओळखलं नाहीस का ? "
मला ती म्हणाली

मी म्हणजे तर तूच
कालची, परवाची ... त्याच्याही आधीची
पण तूच ती
बघ पटते का ओळख तुझी?
का या निर्जन वाटेवर, विसरलीस ओळख स्वतःची ?

मग मी म्हणलं, "मी जर तू....
तर तू कालची, काल तर कालच संपला,
मग आज तू इथे कशी? "

ती खळखळून हसली...
डोळ्यातलं चांदणं चेहर्‍यावर घेऊन बोलली,
"तुझ्यासाठी.... फक्त तुझ्यासाठी .. "

या अवघड वाटेवर, नाही तुला कुठे सावली
मग मी म्हणलं ... मीच होते, --तुझी पाठराखीण !

मग मीही हसले, ... तिला म्हणाले
कशी विसरले मी ओळख तुझी?
तू तर माझ्या जीवाची सखी

तू आहेस, म्हणून चालू शकते अजून
कोणी बरोबर येवो, न येवो..
घर नक्की गाठायचं, असं पक्कं ठरवून

वाटेवरच्या वळणांना, उगीच नाही घाबरायचं
ती वळत राहिली, --तरी आपण सरळ जायचं

आलीस तू सोबत आता,
नाही कुणासाठी थांबायचं
हाक दिली कुणी तरी,
परत नाही फिरायचं

मग माझा हात, ती घेऊन म्हणाली हाती
"चल तर मग,
अजून खूप दूरपर्यंत .. वाट आहे चालायची "

मुक्तक

प्रतिक्रिया

दशानन's picture

25 Sep 2009 - 9:24 am | दशानन

वाह !

सुंदर कवी कल्पना !

छान...

मग माझा हात, ती घेऊन म्हणाली हाती
"चल तर मग,
अजून खूप दूरपर्यंत .. वाट आहे चालायची "

+१

***
राज दरबार.....

अवलिया's picture

25 Sep 2009 - 9:32 am | अवलिया

हेच बोलतो

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

राघव's picture

25 Sep 2009 - 11:40 am | राघव

असेच म्हणतो. आवडली कविता. :)

राघव

प्रभो's picture

25 Sep 2009 - 12:00 pm | प्रभो

हेच बोलतो

--प्रभो

मराठमोळा's picture

26 Sep 2009 - 10:50 am | मराठमोळा

सुंदर!!!!

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

लवंगी's picture

25 Sep 2009 - 9:30 am | लवंगी

मी माझा सांगाती..
कल्पना आवडली आणी पटलीसुद्धा..

मदनबाण's picture

25 Sep 2009 - 12:05 pm | मदनबाण

छान कविता...

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
अण्वस्त्रनीती : समज, गैरसमज व अपसमज!
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=100...

श्रावण मोडक's picture

25 Sep 2009 - 12:26 pm | श्रावण मोडक

प्रसन्न केलं या कवितेनं.

विलास आंबेकर's picture

25 Sep 2009 - 8:03 pm | विलास आंबेकर

मनीशा ताई,
तुमची "ती "वाचली. खुप खुप आवडली.
मला सर्वच कवी लोकांचे कौतुक वाटते की त्यांना कविता कश्या काय सुचतात ते! आणि तुमची कविता तर किती मोठ्ठी आहे!
छान कवितेबद्दल धन्यवाद!

श्रीकृष्ण सामंत's picture

25 Sep 2009 - 9:57 pm | श्रीकृष्ण सामंत

कविता आवडली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com

क्रान्ति's picture

26 Sep 2009 - 8:19 am | क्रान्ति

मस्त कविता आहे. आपणच आपली ओळख आणि आपणच आपली सावली ही कल्पनाच खूप छान आहे. :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

सुबक ठेंगणी's picture

26 Sep 2009 - 8:29 am | सुबक ठेंगणी

कल्पना चांगली आहे. कवितेतला साधेपणा पण आवडला.

अवांतरः सावली झाली तरीही उजेड असतानाच साथ देते...अंधार असेल तर मग तीही नसतेच. असं पण वाटून गेलं क्षणभर :)

manjiri puntambekar's picture

26 Sep 2009 - 5:45 pm | manjiri puntambekar

अन्धारात सावली "अद्वैत" होउन जाते !

बाकी मनिशा " कोसळुनी यावे " पण तुझीच होती का? ती पण मस्त होती.

प्रमोद देव's picture

26 Sep 2009 - 6:00 pm | प्रमोद देव

मस्त आहे कविता.
सावलीवरून एक शेर आठवला...

हात धरून सावली गेली उन्हाचा
मी तिचे आभास कुरवाळीत गेलो

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)/strong>

मनीषा's picture

27 Sep 2009 - 4:24 am | मनीषा

सर्वांचे मनःपूर्वक आभार !