सूचना: या पाककृतीचा आणि खाण्याचा संबध आहे .. गाण्याशी काहि संबध नाहि..
मी जेंव्हा नविन लग्न होऊन सासरी आले तेंव्हा कोकणी सासरी आपला कसा निभाव लागणार हा मोठ्ठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण दुधात साखर मिसळावी तशी नविन घरी कधी रुळले ते कळलच नाही. जेवण करायची खूप आवड सुरवातीपासून असल्याने आईहि खूष होत्या. मलातर कोकणी पाककृतीच्या रुपात मोठा खजिना हातात
लागल्यासारखे झाले.
त्या सुरवातिच्या दिवसात आईंच्या हाताखाली शिकलेल्या पदार्थांपैकी एक बटाट्याचे सॉंग. आज नवरोंबाचा वाढदिवस म्हणून खास बनवली ही भाजी. बनवायला अगदि सोपी.
साहित्य : ४ उकडलेले बटाटे
१ बारीक चिरलेला कांदा
३ लहान चमचे तेल
चविपुरता मीठ
वाटण : ६-७ लाल मिरच्या
लिंबाएवढि चिंच
मुठभर धणे
कृती : १. मिरच्या, चिंच आणी धणे थोड पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
२. भांड्यात तेल गरम करून कापलेला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
३. कांदा गुलाबी झाल्यावर वाटलेला मसाला टाकून थोडे पाणी घालुन थोडे शिजवून घ्यावे.
४. उकडलेले बटाटे बारीक कापून घ्यावे.
५. शिजलेल्या वाटणात बटाटे घालावे.
६. चविपुरता मीठ घालावे.
७. थोडे पाणी घालून झाकून ६-७ मिनीट शिजवावे.
८. ताक-भात, पापड, दहि-काकडीची कोशिंबीर आणि लोणच्या सोबत आपल्या आवडत्या व्यक्तिला करुन वाढावे.
प्रतिक्रिया
22 Sep 2009 - 7:54 am | सहज
फोटो छान आहेत, पावभाजीसारखे दिसते.
आणि हो, वाढदिवसाला "खायला" गोड वगैरे काही नाही का?:-)
22 Sep 2009 - 9:15 am | विनायक प्रभू
दिसते.
रंगाशेठ ना विचारा.
22 Sep 2009 - 6:46 pm | चतुरंग
हे साँग जबराच लागतं! आम्ही हे पहिल्यांदा प्रभू मास्तरांच्या घरीच खाल्लं. काकूंच्या सुगरण हातांचं कौशल्य काय वर्णावं? =P~
आमच्या सौं. नी लगोलग स्वयंपाकघरात प्रवेश मिळवून कृती विचारुन घेतली आणि काकूंनी लग्गेच ती दिली! :)
अमेरिकेत आल्यावर लगेच पाककृती करुन आम्ही साँग चाखलं पण थोडा फरक होता (चिंचेचा कोळ टाकायचा विसरला असं आता लवंगी ताईंची कृती वाचून सौं. च्या लक्षात आलं. नाहीतर मास्तरांकडे फोनवायचा विचार करतच होतो.)
पावभाजीसारखं दिसत असलं तरी बरच वेगळं आहे.
पण डीश भन्नाटच जरूर चाखून बघा.
(स्वांग)चतुरंग
22 Sep 2009 - 9:05 am | अवलिया
मस्त :)
वाढदिवसाला गोडधोड नसते का कोकणी लोकांत..
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
22 Sep 2009 - 5:48 pm | लवंगी
गोड होत ना! श्रीखंड-पुरी आणी केक
22 Sep 2009 - 9:07 am | चकली
सोपी आणि छान रेसिपी.
चकली
http://chakali.blogspot.com
22 Sep 2009 - 9:24 am | दशानन
मस्तच !
सोपी आणि छान रेसिपी.
प्रयोगशील राजे
***
राज दरबार.....
22 Sep 2009 - 9:26 am | अवलिया
प्रयोगशील राजे
अजिबात नको.... :''(
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
23 Sep 2009 - 4:47 am | लवंगी
प्राजु म्हणतेय तस साँग/सोंग काहितरी होईलच .. निदान एखादा लेख तरी पदरात पडेलच ना! :)
22 Sep 2009 - 9:24 am | सुनील
अरे व्वा! माझी आवडती बटाट्याची पाकृ करायलाही सोपी आणि चवीलाही मस्त!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
22 Sep 2009 - 1:47 pm | गणपा
लगेच पाकृ. टाकल्य बद्द्ल धन्यु.
एकदम यम्मी दिसतेय. एकदा गाउन पहाव म्हणतो हे साँग.
22 Sep 2009 - 2:09 pm | परिकथेतील राजकुमार
वाह !
मस्तच दिसतीये. करुन बघतोच आता.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
22 Sep 2009 - 5:45 pm | स्वाती राजेश
करून पाहायला पाहिजे.
वरचा धने घातलेला मसाला आणि त्यात ओले खोबरे याचे वाटण साउथ कडचे लोक खूप वापरतात....भाज्यांमधे...
22 Sep 2009 - 6:12 pm | सखी
चांगली दिसतेय गं पाकृ. करुन बघेन. फक्त ते धन्याचे प्रमाण बरोबर आहे का? पाकृ. मधे मुठभर लिहीले आहे, चित्रात मला कमी वाटत आहेत.
22 Sep 2009 - 6:21 pm | लवंगी
थोडेफार कमी-जास्त चालतात
22 Sep 2009 - 6:39 pm | विनायक प्रभू
मिरची चे प्रमाण जपुन
नाहीतर यु विल बी सिंगिंग डिफरंट साँग
22 Sep 2009 - 6:51 pm | चतुरंग
हे जबराच!! ;)
(सिंगर)चतुरंग
22 Sep 2009 - 7:59 pm | प्रदीप
इन दॅट केस, द आवडती व्यक्ति मे सिंग अ डिफरंट साँग!!!
'स्स हाय, स्स हाय,स्स हाय,स्स हाय,
तुगेले कितें जाले गो बाय........'
विनोद राहू दे, पण पाकृ आवडली.
22 Sep 2009 - 10:28 pm | लवंगी
मी घेतलेल्या मिरच्या रंगाने लालभडक असल्या तरी फार ति़खट नाही आहेत. :)
22 Sep 2009 - 7:28 pm | रेवती
बरं झालं लवंगीताईनं ही पाकृ दिली. वाचनखूण साठवते आहे ग!
सौ. प्रभूमास्तर यांनी ही भाजी भन्नाट केली होती. आता चिंच न विसरता घालीन. येत्या विकांताला प्रभूसरांकडे फोन करणारच होते काय चुकतय हे विचारण्यासाठी. भाजीचं नावही संगीतमय आहे त्याची मजा वाटली.
रेवती
22 Sep 2009 - 10:12 pm | धनंजय
खोबरे नसलेली ही कोकणी पाककृती भन्नात दिसते आहे.
22 Sep 2009 - 11:45 pm | प्राजु
मस्त!!!
बहुतेक होईलच ही पाकृ घरी आता.
सांगते गं तुला.
@ राजे, तुम्ही प्रयोग नका करु. नाहीतर तुमचा बहादूर विल्बी सिंगिंग अ डिफ्रंट साँग. आणि तुम्ही केलेल्या पदार्थाला बटाट्याचे साँग म्हणण्या ऐवजी बटाट्याचे (झालेले)सोंग म्हणावे लागेल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Sep 2009 - 2:37 am | चित्रा
छानच दिसते आहे साँग.
23 Sep 2009 - 3:43 am | दिपाली पाटिल
बटाटा साँग अगदी खतरी दिसतंय...नक्की बनवेन पण एक सांग की हे उकडलेले बटाटे पुर्ण मॅश करायचे की फोडी ठेवायच्या?
दिपाली :)
23 Sep 2009 - 4:41 am | लवंगी
पण बटाटे चांगले उकडून घ्यायचे .. मग उकळवल्यावर ते थोड्या फोडी आणी थोडे मॅश झाल्यासारखे दिसते..