बटाट्याचे साँग (song)
सूचना: या पाककृतीचा आणि खाण्याचा संबध आहे .. गाण्याशी काहि संबध नाहि..
मी जेंव्हा नविन लग्न होऊन सासरी आले तेंव्हा कोकणी सासरी आपला कसा निभाव लागणार हा मोठ्ठा प्रश्न माझ्यासमोर होता. पण दुधात साखर मिसळावी तशी नविन घरी कधी रुळले ते कळलच नाही. जेवण करायची खूप आवड सुरवातीपासून असल्याने आईहि खूष होत्या. मलातर कोकणी पाककृतीच्या रुपात मोठा खजिना हातात
लागल्यासारखे झाले.
त्या सुरवातिच्या दिवसात आईंच्या हाताखाली शिकलेल्या पदार्थांपैकी एक बटाट्याचे सॉंग. आज नवरोंबाचा वाढदिवस म्हणून खास बनवली ही भाजी. बनवायला अगदि सोपी.
साहित्य : ४ उकडलेले बटाटे
१ बारीक चिरलेला कांदा
३ लहान चमचे तेल
चविपुरता मीठ
वाटण : ६-७ लाल मिरच्या
लिंबाएवढि चिंच
मुठभर धणे
कृती : १. मिरच्या, चिंच आणी धणे थोड पाणी घालून बारीक वाटून घ्यावे.
२. भांड्यात तेल गरम करून कापलेला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावा.
३. कांदा गुलाबी झाल्यावर वाटलेला मसाला टाकून थोडे पाणी घालुन थोडे शिजवून घ्यावे.
४. उकडलेले बटाटे बारीक कापून घ्यावे.
५. शिजलेल्या वाटणात बटाटे घालावे.
६. चविपुरता मीठ घालावे.
७. थोडे पाणी घालून झाकून ६-७ मिनीट शिजवावे.
८. ताक-भात, पापड, दहि-काकडीची कोशिंबीर आणि लोणच्या सोबत आपल्या आवडत्या व्यक्तिला करुन वाढावे.

वाचने
8582
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
फोटो
In reply to फोटो by सहज
फक्त
In reply to फक्त by विनायक प्रभू
ओह येस्स!
मस्त
In reply to मस्त by अवलिया
श्रीखंड-पुरी आणी केक
छान दिसतय
In reply to छान दिसतय by चकली
+१
In reply to +१ by दशानन
प्रयोगशील
In reply to प्रयोगशील by अवलिया
जरुर करा राजे, सोपीतर आहे
आवडती
लगेच पाकृ.
वाह ! मस्तच
मस्त आहे रेसिपी,
चांगली
In reply to चांगली by सखी
मी अंदाजाने घालते ग.
In reply to मी अंदाजाने घालते ग. by लवंगी
मिरची
In reply to मिरची by विनायक प्रभू
हा हा हा!!
In reply to मिरची by विनायक प्रभू
नव्हे...
In reply to नव्हे... by प्रदीप
म्हणूनच ताक-भाता बरोबर खावे
बरं झालं
करायलाच पाहिजे
मस्त!!! बहुत
छान
बटाटा साँग
In reply to बटाटा साँग by दिपाली पाटिल
बारीक फोडी करायच्या