CPU ची गोष्ट

फ्रॅक्चर बंड्या's picture
फ्रॅक्चर बंड्या in जे न देखे रवी...
21 Sep 2009 - 3:08 pm

माझ्या बायका वेळ आणि मेमरी साठी भांडतात
भांडणात गुंगतात अन स्वता:चे काम विसरतात
वेळेची कमतरता , मेमरीची कमतरता
बायकांची मागणी , मला जरा वेळ देता

एकाच आईच्या ह्या पोरी, पण भांडतात किती
अन सासुबाईंनीही समजुत घालायची तरी किती
Restart झाल्याशिवाय ह्यांना कळणार नाही
सासुबाईंनी वाटणी केल्याशिवाय जमणार नाही

कधी कधी मी स्वता:चा गजनी करुन घेतो
Restart होतो अन सगळं विसरुन जातो
मग सगळ्या बायका बसतात , परत एकदा बोंबलत
अन सासुबाई मरतात , मेमरीची मांडवली करत

आता ही नवी कोण आयुष्यात आली
माझा वेळ अन मेमरी घेउन गेली
मी तिच्या प्रेमात अडकत चाललोय
का वायरस मध्ये फसत चाललोय

ह्या बायका अन पोरांना वेळ देता देता नाकी नऊ येतात
मग मलाही कधी कधी वायरसची गोड गोड स्वप्ने पडतात
इतक्या बायका असुनही , मन काही थार्‍यावर नाय
वायरसच्या गुलाबी स्वप्नांशिवाय जगायची मजाच नाय

बाप माझा बोलला, नविन घराण्याशी नाते जोडु
आता फक्त Linux, Windows ची नाळ तोडु
आता काय मज्जाच मज्जा, नविन बायका नविन सासु
बापाचे म्हणणे फक्त एकच , वायरसला नको फसु

कविता

प्रतिक्रिया

सचीन जी's picture

22 Sep 2009 - 3:16 pm | सचीन जी

बायका == Application Programs
सासुबाई == Operating System

बरोबर का?

फ्रॅक्चर बंड्या's picture

22 Sep 2009 - 5:13 pm | फ्रॅक्चर बंड्या

शाब्बास