पुन्हा केव्हातरी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
16 Sep 2009 - 11:39 pm

संवाद काही राहिले, साधू पुन्हा केव्हातरी
काही तराणेही नवे, छेडू पुन्हा केव्हातरी!

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या,
सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी

झाले कधी हाराकिरीचे वाद; केली भांडणे,
तेव्हा असे का वागलो, बोलू पुन्हा केव्हातरी

दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे,
आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी!

सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही
हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी"

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

गझल

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

16 Sep 2009 - 11:53 pm | श्रावण मोडक

हाराकिरीत काय झालं?
बाकी रचना चांगली.

बेसनलाडू's picture

17 Sep 2009 - 1:58 am | बेसनलाडू

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या,
सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी

फारच छान शेर! भेटू पुन्हा वाला शेर मात्र काहीशी याचीच पुनरावृत्ती झाल्यासारखे; हे टाळता आल्यास बरे वाटेल. गझल एकंदर चांगली झालीये. हाराकिरीबाबत श्रामोंशी सहमत आहे.
(बोलका)बेसनलाडू

नरेंद्र गोळे's picture

17 Sep 2009 - 7:50 am | नरेंद्र गोळे

वा! शाब्बास!!

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

क्या बात है!

आताच पाहू नक्षी काचेची, नको केव्हातरी
साकारलेले दृश्य पाहू, ते नको केव्हातरी

पाषाणभेद's picture

17 Sep 2009 - 8:22 am | पाषाणभेद

वा, छान.
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सुबक ठेंगणी's picture

17 Sep 2009 - 8:23 am | सुबक ठेंगणी

दोघांसही काहीतरी होते जरी मागायचे,
आली कधी ना वेळ ती, मागू पुन्हा केव्हातरी!

"सांगू पुन्हा केव्हातरी" नादात मागे राहिल्या,
सांगायच्या गोष्टी अशा, सांगू पुन्हा केव्हातरी

रोज भेटूनही वाटतं गं असं कधीकधी...

नंदन's picture

17 Sep 2009 - 8:29 am | नंदन

छान गझल, फार आवडली.

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

- सुरेख!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अजिंक्य's picture

17 Sep 2009 - 1:54 pm | अजिंक्य

फॅन्टास्टिक! छान जमलीय गझल.
आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

हे तर खूपच छान. असेच लिहीत राहावे.

आहे प्रवाही शायरी, काव्यातली क्रान्ती जणू,
येईल जे काही नवे, पाहेन आनंदात मी!
- अजिंक्य.

मदनबाण's picture

17 Sep 2009 - 2:34 pm | मदनबाण

सांगून नाही भेटलो तेव्हा; कधी भेटूनही
हे एवढेसे बोललो, "भेटू पुन्हा केव्हातरी"

व्वा. छान :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

ऑपरेशन अलर्ट:---
http://timesofindia.indiatimes.com/news/india/Indian-army-on-Operation-A...

यशोधरा's picture

17 Sep 2009 - 3:23 pm | यशोधरा

आयुष्य शोभादर्शकाच्या काचनक्षीसारखे,
काही नवे आकारले, पाहू पुन्हा केव्हातरी!

सही!

हृषीकेश पतकी's picture

17 Sep 2009 - 8:02 pm | हृषीकेश पतकी

:)
आपला हृषी !!

प्राजु's picture

17 Sep 2009 - 8:29 pm | प्राजु

मस्त!!!!

अप्रतिम!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अनिल हटेला's picture

17 Sep 2009 - 9:29 pm | अनिल हटेला

नेहेमीप्रमाणे उत्तम !!!
:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)