रोंरावत आला वारा

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
12 Sep 2009 - 2:39 pm

रोंरावत आला वारा
उधळीत धुळ धूराळा
वटव्रुक्ष ही गळूनी पडले
आकांत पेटला सारा
मी सान कळी इवलीशी
अजिबात हलले नाही
झेलुनी वादळ सारे
मी किंचित फुलले नाही

तू अजस्त्र असशी मोठा
मी सान कळी इवलीशी
धैर्याने ट्क्कर देते
तू अखंड मी अविनाशी

तू ज्ञानवंत अधिकारी
परि तुज अहंपणाचा शाप
स्वार्थ साधण्या प्रज्ञा
तव जळुनी झाली राख

रे ठावूक नाही तुजला
सत्याची अमोघ शक्ती
सत्तेच्या कैफाहूनही
श्रेष्ठच ठरती भक्ती

जा अहंपणाला तुझिया
मी मूळीच मानत नाही
मज आदर असे ज्ञानाचा
मी गर्व जुमानित नाही

फुलविण्यास रे मजला
एक नाजुक फुंकर बास
हे जीवन म्हणजे वेड्या
एक मस्त मोकळा श्वास

कविता

प्रतिक्रिया

लवंगी's picture

12 Sep 2009 - 2:47 pm | लवंगी

हे जीवन म्हणजे वेड्या
एक मस्त मोकळा श्वास ..
मस्त

राघव's picture

12 Sep 2009 - 3:32 pm | राघव

पुष्कराजशेठ, क्या बात है!
तुमच्या कविता आता मस्त झोकदार होऊ लागल्यात. :)

कल्पना उचलली छान आहे.
मधूनच थोडी विस्कळीत वाटते. जसे पहिली ३ कडवी रूपकात मोडत नाहीत. पण नंतरची ४ कडवी रूपक धारण करतात. पण असो. चलता है. पु.ले.शु!

राघव

sujay's picture

13 Sep 2009 - 8:13 pm | sujay

फुलविण्यास रे मजला
एक नाजुक फुंकर बास
हे जीवन म्हणजे वेड्या
एक मस्त मोकळा श्वास

ह्या ओळी क्लास्स .

सुजय

क्रान्ति's picture

13 Sep 2009 - 10:01 pm | क्रान्ति

तू ज्ञानवंत अधिकारी
परि तुज अहंपणाचा शाप
स्वार्थ साधण्या प्रज्ञा
तव जळुनी झाली राख

रे ठावूक नाही तुजला
सत्याची अमोघ शक्ती
सत्तेच्या कैफाहूनही
श्रेष्ठच ठरती भक्ती

वा! शेवटच्या ओळी तर परमोच्च बिंदू!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Sep 2009 - 9:01 am | llपुण्याचे पेशवेll

सहीच रे पुष्क्या.. कविता आवडली मधेच पाडगांवकरांच्या 'गवताचे फूल' ची आठवण झाली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Sep 2009 - 5:36 pm | फ्रॅक्चर बंड्या

हे जीवन म्हणजे वेड्या
एक मस्त मोकळा श्वास

आवडले

अजिंक्य's picture

14 Sep 2009 - 8:04 pm | अजिंक्य

फुलविण्यास रे मजला
एक नाजुक फुंकर बास
हे जीवन म्हणजे वेड्या
एक मस्त मोकळा श्वास

मस्त. छान कविता - (वृत्तात 'बसवली' असती, तरी इतकी छान झाली नसती.)
असेच लिहीत राहावे.
अजिंक्य.

टुकुल's picture

15 Sep 2009 - 3:29 am | टुकुल

सुदंर कविता...

मदनबाण's picture

15 Sep 2009 - 8:11 am | मदनबाण

हे जीवन म्हणजे वेड्या
एक मस्त मोकळा श्वास
मस्त... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://videos.oneindia.in/watch/12877/now-china-incursion-uttarakha

अनिल हटेला's picture

15 Sep 2009 - 3:03 pm | अनिल हटेला

सुंदर कविता !!

:-)
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)

नरेंद्र गोळे's picture

15 Sep 2009 - 4:07 pm | नरेंद्र गोळे

फुलविण्यास रे मजला
एक नाजुक फुंकर बास
हे जीवन म्हणजे वेड्या
एक मस्त मोकळा श्वास >> वा भाई वा! सुरेख!!

मंगेश पाडगावकरांच्या।

जरी तुझिया सामर्थ्याने
ढळतील दिशाही दाही |
मी फूल तृणातील इवले,
उमलणार तरीही नाही ||

या काव्यपंक्तींची आठवण करून दिली.

अटल बिहारींची पण अशीच एक सुंदर कविता आहे.