शब्दसंभ्रम...

हृषीकेश पतकी's picture
हृषीकेश पतकी in जे न देखे रवी...
11 Sep 2009 - 2:29 pm

घसा जरा जास्तच ओला झाला की....

फुटपाथ वरच्या रस्त्याने, अगदी सावकाश चालत यावे |
खिडकीचे दार उघडून ,कुलूप हळूच ढकलून द्यावे ||

आपलाच पाय आत ठेवावा, पाटीवरचे दार पाहात |
समजेल की आपल्याच घरात, तुम्ही वाट चुकला आहात ||

कळेल जेव्हा मनावरचा ताबा ,इतका सुटला आहे |
आरशात पाहून म्हणाल ,हा अनोळखी माणूस कुठला आहे?

ओल्या गोष्टी उशीराच वाळतात ,त्यात तुमची चूक नाही |
पण अशा वेळी मात्र ,झोपेसारखं दुसरं सुख नाही ||

म्हणून उशीवर चादर टाकून ,गादीची छान सोय करावी |
पायांवरती पडून जरा ,पाठ लांबवर पसरावी ||

स्वप्नात डोळे करता करता ,विचारांची उघडझाप होते |
रात्रीच्या आठवणीतच ,आख्खी बाटली निघून जाते ||

काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल |
घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल ||

आता फक्त काही ग्लास काढायचे ,तोवर पुढचा तास येतोच आहे |
कोंबडा उगवला एकदाचा ,सूर्य बांग देतोच आहे ||

हास्यकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

11 Sep 2009 - 2:36 pm | मदनबाण

काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल |
घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल ||

सॉलिट्ट्ट्ट... :)

मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Sep 2009 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते

हृष्या, लेका हे धंदे कधीपासून रे?

कविता भन्नाटच. तुझ्या आधीच्या कविता एकदम गंभीर इ. इ. होत्या. ही एकदम जीवनाला स्पर्श वगैरे करून जाणारी ... ;) मस्तच.

बिपिन कार्यकर्ते

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 Sep 2009 - 4:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

पिंप ओले करुन नाही, घशात बसूनच लिहीले आहे वाटते.
गुगली वाचनात पहिल्या पडला
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

राघव's picture

11 Sep 2009 - 5:25 pm | राघव

कोंबडा उगवला एकदाचा ,सूर्य बांग देतोच आहे
=)) वा! मस्त!!

राघव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Sep 2009 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काट्यांमधून घड्याळ फिरताना ,मंतरलेला काळ सरेल |
घश्यामधला रंग जाऊन ,डोळ्यात फक्त ओल उरेल |

अरे वा ! काय भारी ओळी उतरल्या आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दशानन's picture

11 Sep 2009 - 7:03 pm | दशानन

=))

निशब्द !!!!!!!!!!!!

प्राजु's picture

11 Sep 2009 - 11:16 pm | प्राजु

हाहाहा..
आवडली कविता..
मस्त जमली आहे.
"पिताना मी कधी रिस्क घेत नाही" ची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

11 Sep 2009 - 11:18 pm | चतुरंग

हा घ्या दुवा. ;)

(तळीराम)चतुरंग

टुकुल's picture

12 Sep 2009 - 12:47 am | टुकुल

सलाम..
कविता भन्नाट.. घसा ओला करुनच लिहलि असनार :-)

--टुकुल

हृषीकेश पतकी's picture

12 Sep 2009 - 7:39 pm | हृषीकेश पतकी

सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद...
:)

आपला हृषी !!