विकास यांची एक प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in काथ्याकूट
11 Sep 2009 - 10:07 am
गाभा: 

विकास यांचे रा स्व संघाच्या धाग्यात डिस्क्लेमर वाचले. मला स्वतःला विकास यांचे लेखनापेक्षा प्रतिक्रियाच अधिक विचारार्ह वाटतात. त्या पटणे न पटणे भाग वेगळा आहे. विकास यांच्या प्रतिक्रियांच आउटसोर्सिंग विकी यांचे कडे दिले आहे असे मिभो म्हणतात. विकास आपल्या डिस्क्लेमर मधे म्हणतात.
"इतके दिवस गांधीचे मारेकरी असे बोंबलत त्यांच्या विरोधकांनी स्वतःचे (चुकीचे) शस्त्र बोथट केले, परीणामी आता जनतेला त्याचा काही फरक पडत नाही. याचा अर्थ सर्व स्वयंसेवक झाले अथवा संघाचे झाले असा नसून साम्यवादी आणि तथाकथीत समाजवादी यांची खरी प्रतिमा आता जनतेला समजून चुकू लागली आहे. मग आता बाकी कशावरून तरी झोडा असा हा प्रकार आहे."
साधना या समाजवादी विचारांना वाहिलेले साप्ताहिकात १२ जुलै २००८ मधील विकास यांची प्रतिक्रिया या निमित्त वाचा.या प्रतिक्रियेची पोस्टमन गिरी ( आउट सोर्सिंग म्हणा हव तर) आम्ही केली होती म्हणुन ती इथे द्यावीशी वाटते.

प्रतिक्रिया- समाजवाद्यांनी केलेली मोठी चुक

आपल्या १० मे च्या अंकातील डॉ
राहुल वसंत रेवले यांचा "समाजवाद्यांनी केलेली सर्वांत मोठी चूक!" हा लेख वाचनात आला आणि काही विचार/प्रतिक्रीया डोक्यात आल्या त्या आपल्याला कळवाव्याशा वाटल्या.

या लेखात सर्व प्रथम खटकलेला भाग म्हणजे साम्यवादाची केलेली गांधीजींच्या विचारधारेशी तुलना. मार्क्सवाद हा विचार , भारताला केवळ परक्याने सांगीतला म्हणूनच परका आहे अशातला भाग नाही तर त्यातील विचार हे आपल्या हाडामासाशी खिळलेल्या सामाजीक संस्कृतीसाठी पूर्णपणे भिन्न आहेत. मला कधी तरी कॉ. डांग्यांच्या नावाने वाचल्याचे आठवते की स्टॅलीन त्यांना म्हणाला होता की मार्क्सवाद हा भारतात रुजणे शक्य नाही. ह्यात कोण बरोबर कोण चूक हा भाग बाजूस ठेवूया पण त्याचे असे म्हणायचे मूळ कारण इतकेच असावे की भारतीयांची मानसीककता ही मार्क्सवादी विचारसणीत बसू शकत नाही.या उलट स्वतःस सनातनी हिंदू म्हणण्यात कमीपणा न बाळगणार्‍या गांधीजींचे विचार हे भारतीयांच्या मानसिकतेसाठी जवळ असणारे वाटतात
. वास्तव वेगळे असले तरी, कम्युनिझम तत्त्व म्हणून सर्वांना समान मानते. पण तसे गांधीजींनी आणि म्हणून पर्यायाने त्यांच्या विचारसरणीने मानलेले दिसत तरी नाही. अर्थात येथे सर्वांना समान मानणे आणि समान हक्क असणे यातील ढोबळ फरक लक्षात ठेवावा. म्हणून गांधीवादाला "अहिंसक कम्युनिझम" असे म्हणणे, कुठेतरी अयोग्य वाटले.
गांधीजींच्या विचारांना जगभरातील काही महान चाहते मिळाल्याचे आपल्याला दिसून येते. त्यात दोन मोठी व्यक्तिमत्वे आहेत, ज्यांनी गांधीवादाचा सामाजीक संघर्षासाठी उपयोग केला - एक म्हणजे मार्टीन ल्यूथर किंग आणि दुसरे अर्थातच नेल्सन मंडेला. या दोघांनी गांधीजींच्या मार्गावरील चळवळ स्वतःच्या बांधवांच्या हितासाठी चालू केली - काही अंशी त्या मार्गावर ते यशस्वी पण झाले. तरी देखील त्यांच्यासाठी "परकीय विचारसरणी" असलेल्या अशा चळवळीस, स्वकीयांच्या हितासाठी राबवताना त्यांनी समाजाभिमुख आणि कालानुरूप बदल केले. परीणामी चळवळीचे तात्त्विक अधिष्ठान हे गांधीजींच्या विचाराशी प्रामाणिक पण व्यावहारीक आधिष्ठान मात्र स्वकीयांच्या जनसामान्यांच्या व्यावहारीक जगाशी प्रामणिक झाले. थोडक्यात आचारप्रणाली स्वकीयांना साजेशी राहील्यामुळे गांधीजींची विचारप्रणाली तत्त्वतः परदेशी न राहता वैश्विक होऊ शकली.

आता लेखातील मथळ्यासहीत आणि त्यातील संदर्भासंबंधी मूळ प्रश्न
: "समाजवाद्यांनी नक्की सर्वात मोठी चूक काय?" हे म्हणताना लेखकाने चूक कशा संदर्भात याचे स्पष्टीकरण दिलेले दिसत नाही. लेखकाच्या मते समाजवादी कशात कमी पडले? - समाजपरीवर्तनात? सत्ताग्रहणात? या दोन्हीत, का अजून कशात?

समाजपरीवर्तनात म्हणायचे असले तर समाजवादी गांधीजींच्या विचारापासून दुरावले ही एक चूक होती असे कोणी म्हणाले, तर थोड्याफार फरकाने मान्य होऊ शकेल. पण सत्तास्थानी येण्यात अथवा मिळालेली सत्ता सामान्यांसाठी राबवण्यात आणि तशी राबवता यावी म्हणून टिकवण्यात ते कमी पडले म्हणावेत तर मात्र म्हणावे लागते की याचा संबंध केवळ गांधीवादाशी जोडणे अयोग्य ठरेल. कारण, स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झालेल्या अहींसक चळवळीत गांधीजींच्या नेतृत्वाखालीच गांधीवादाची परीक्षा होऊ शकली आणि म्हणूनच त्यातील बलस्थाने आणि तॄटी यांबाबत आपण आजही लिहू शकतो. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गांधीजींच्या दुर्दैवी निधनामुळे गांधीवाद हा स्वराज्यात त्यांच्या नेतृत्वखाली आणणे शक्य झाले नाही. थोडक्यात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे गांधीजींच्या स्वप्नातील रामराज्य कसे होते, ते तसेच राबवले गेले/प्रयत्न केले गेले का वगैरे, "जर-तर" चे प्रश्न आहेत. त्यांची व्यावहारीक मिमांसा होणे नाही.

तरी देखील, समाजवाद हा केवळ शब्दात राहण्यापुरता आणि बोलताना बरे वाटण्याइतकाच (फील गूड) राहीला असे जर वाटले तर त्याची कारणे काय अथवा त्या संदर्भात समाजवाद्यांची (लहान/मोठी) चूक काय? - यावर प्रतिक्रीया म्हणून वर केलेल्या उहापोहासंदर्भात इतकेच म्हणावेसे वाटते की कुठल्याही वैचारीक चळवळीचे आधिष्ठान हे जनसामान्यांसाठी परके असले तर ती चळवळ कितीही बुद्धीनिष्ठ असली, बुद्धीवादी आणि प्रामाणिकपणे योग्य कारणासाठी असली तरी तीच्या यशाला एकतर मर्यादा तरी येतात अथवा अशा चळवळीसाठी यश हे क्षितीजाजवळ जमिनीस मिळणार्‍या आकाशासारखे ठरते. कालपरत्वे आणि समाजपरत्वे करावे लागणारे बदल जी विचारसरणी आत्मसात करते ती जिवंत म्हणता येईल, आणि या उलट तसे करत नसलेल्या विचारसरणी या एकतर मृतवत असतात अथवा निद्रीस्त.
"व्यक्ती अथवा समाज हे महत्त्वाकांक्षेविना मोठे होऊ शकत नाहीत आणि महत्त्वाकांक्षा ही चांगल्या अर्थाने पण त्याच वेळेस "डोळस" अहंकार असल्याशिवाय येऊ शकत नाही," हे विधान जर तत्त्वतः मान्य केले तर काय लक्षात येते? कुठेतरी, समाजातील अनिष्ठतेवर कोरडे ओढताना समाजवादी चळवळीने (आणि त्या संदर्भात मार्क्सवादी चळवळीनेदेखील) समाजाचा अहंकार तर दुखावलाच पण पर्याय म्हणून येथील मानसीकतेस रुचतील असे ठोस काहीच सुचवले नाही. जिथे जिथे कुठल्याही विचारसरणीने पर्यायी व्यवस्था दिली नसते तिथे त्या विचारसरणीचा एकतर लोप होतो अथवा त्यातील शहाणे नेतृत्व सिंहावलोकन करत, स्वतःमध्ये योग्य ते बदल घडवत विचारसरणी स्थलकालसापेक्ष करते. त्यात विरोधासाठी विरोध नसतो तर स्वतःच्या आणि इतरांच्या उन्नतीसाठीचा राजसीक स्वार्थ असतो.

आज विचार करा जेथे अधुनीक समाजवाद तयार झाला त्या फ्रेंचांचा समाजवाद हा भांडवलशहांच्या विरोधात असेल पण जनसामान्यांपासून ते फटकारून वागतात असे वाचल्याचे निदान आठवत तरी नाही. तेच अमेरिकेत. येथील "डेमोक्रॅटीक" विचारसरणी ज्याला अमेरिकन पारीभाषेत "लिबरल्स" असे संबोधले जाते, ते समाजवादाशी जवळीक असलेले आहेत. पण त्यांची विचारसरणी ही अमेरिकन जनतेस "परकीय" अथवा स्वतःचे खच्चीकरण करणारी वाटत नाही. त्याच वेळेस अमेरिकन सामान्यांच्या भावनांना सांभाळत इथले "लिबरल" नेतृत्व सामाजीक बदल आणायला कमी देखील पडत नाहीत. परत, ते सर्व करत असताना त्यांची वैचारीक निष्ठा ही अमेरिका या देशासंदर्भातच असते. "जगाला प्रेम अर्पण्याच्या" भानगडीत ते पडताना दिसत नाहीत. कदाचीत म्हणूनच अमेरिकन जनसामान्यांना मात्र ते त्यांचे नुसतेच स्वकीय नाही तर तारणकर्ते वाटतात.

म्हणून म्हणावेसे वाटते की समाजवाद्यांनी विचारच करायचा असेल तर आत्मपरीक्षणार्थ काही प्रश्न स्वतःस विचारावेत - आपण जनसामान्यांशी फारकत करून त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करतोय का? अथवा, आपण देशाचे बळकट नेतृत्व वाटतो, का बलहीन नेतृत्व, जे स्वतः आधी जगाचा विचार करणारे आहे असे वाटतो? आपल्या विधानांतून आणि प्रतिक्रीयातून आपण समाज एकसंध करण्याच्या ऐवजी समाजात जात, धर्म, सामाजीक स्थान आदी संदर्भात भेद, तेढ तर निर्माण करत नाही आहोत ना? मुख्य म्हणजे कालपरत्वे चालत आलेला "समाजवाद" हा आपण "श्रॄती-स्मृती-पुराणोक्त" समजून त्यातच स्थलकालसापेक्ष बदल न घडवता रममाण तर झालेलो नाही आहोत ना?

तात्पर्यः अचूक कोणीच नसते आणि १००% चूकही कोणी नसते. पण त्यात जर काही घोडचूक असेलच तर ती आत्मपरीक्षण करून योग्य बदल घडवणे (करेक्टीव्ह ऍक्शन्स घेणे) ही असते. ती जर होत नसली तर रामदासांनी म्हणल्याप्रमाणे अवस्था होते:

अचूक यत्न करवेना, म्हणोनी केले ते सजेना |

आपुला अवगूण जाणवेना, काही केल्या ||

धन्यवाद

विकास देशपांडे
बॉस्टन

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

11 Sep 2009 - 1:45 pm | नितिन थत्ते

प्रतिक्रिया द्यावी की नाही याचा निर्णय होत नाहिये. :|
पण देतोच. :)

विकास यांच्या प्रतिसादात समाजवादी (लोहियावादी व त्यांचे वंशज आणि कम्युनिस्ट(सर्व प्रकारचे) यांना एकाच मापाने तोलले आहे.
लोहियांना आम्ही पाहिले नाही, जयप्रकाशांविषयी नुसते वाचले. आमच्यापुढे समाजवादी चेहरा म्हणून एसेम, ना ग गोरे, वसंत बापट, दंडवते, नरहर कुरुंदकर, मृणाल गोरे आणि मधु लिमये इत्यादि आले (नवलोहियावादी यादव कंपनीविषयी न बोललेले बरे). यातले कुणीच समाजाशी फटकून वागणारे होते असे म्हणायला अजिबात वाव नाही. किंवा ते कुठली तरी परकी विचारसरणी तशीच्या तशी लोकांवर लादत होते असे म्हणता येणार नाही.

कम्युनिस्ट हे मात्र काही प्रमाणात लोकांशी फटकून वागणारे म्हणता येईल. ते सुद्धा लोकांच्या प्रश्नांविषयी फटकून वागत नसून ते सोडवण्याच्या मार्गासाठी 'बाहेर' पहात असत. त्यातही धर्माविषयीचे त्यांचे धोरण सोडले (आणि त्यांच्यात अंतर्गत चालणारे कम्यून वगैरे प्रयोग सोडले) तर जनतेला आवडत नाही असे त्यांच्याकडेही काही नव्हते. देशनिष्ठा हा एक कच्चा दुवा त्यांच्यात असू शकेल.

असे असूनही समाजवादी राजकारणात यशस्वी झाले नाहीत. याची दोन कारणे मला जाणवतात. त्यातले एक कारण म्हणजे त्यांच्याकडे धोरणात्मक आणी वैचारिक पातळीवर काँग्रेसपेक्षा वेगळे* काही नव्हते. घोषणा काँग्रेसही समाजवाद आणण्याच्याच देत होती.
दुसरे कारण फार महत्त्वाचे आहे आणी त्याचे परिणाम आपण आजही भोगत आहोत. ते म्हणजे काँग्रेसशी मुकाबला करण्यात येत असलेल्या अपयशाला कंटाळून 'कोणीही चालेल' या धोरणाची अंमलबजावणी चालू झाली. त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतले व्हिलन मोरारजी देसाई, निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलणारे जगजीवन राम वगैरे मंडळी आलीच पण मुख्य म्हणजे इतकी वर्षे भारतीय राजकारणात मार्जिनवर असलेल्या संघ-जनसंघाची मंडळी पण आली. त्यामुळे जनसंघाचा उंट विरोधी पक्षाच्या तंबूत आला नंतर त्याने तंबूच बळकावला आणि पुढे सत्ताही मिळवली

साम्यवाद्यांचे तत्त्वज्ञान अधिक परके असूनही त्यांना अधिक यश मिळाल्याचे दिसते.

नितिन थत्ते

विकास's picture

12 Sep 2009 - 1:13 am | विकास

आमच्यापुढे समाजवादी चेहरा म्हणून एसेम, ना ग गोरे, वसंत बापट, दंडवते, नरहर कुरुंदकर, मृणाल गोरे आणि मधु लिमये इत्यादि आले (नवलोहियावादी यादव कंपनीविषयी न बोललेले बरे). यातले कुणीच समाजाशी फटकून वागणारे होते असे म्हणायला अजिबात वाव नाही. किंवा ते कुठली तरी परकी विचारसरणी तशीच्या तशी लोकांवर लादत होते असे म्हणता येणार नाही.

अगदी खरे आहे. माझे मत पण यातील (कुठल्याही) आदरणीय व्यक्तीविषयी वेगळे नाही. दंडवते म्हणले असल्याने मी दंडवते दांपत्य असे गृहीत धरतो. मात्र असे नेते जो पर्यंत जनतेला दिसत होते, तो पर्यंत त्यांच्यामुळे समाजवाद हा पण जनतेला जवळचा/जिव्हाळ्याचा वाटत होता (जरी निवडणूकीच्या राजकारणात त्याला यश आले नसले तरी). मात्र कालांतराने त्यातील समाजवादी एकतर बदलत गेले, अंतर्गत मतभेद होऊ लागले अथवा जे नवीन आले त्यांनी "प्रतिमा आणि प्रत्यक्ष" हे दोन्ही भयंकर केले. ज्या मधू दंडवत्यांबद्दल मला आदर होता त्यांनी जेंव्हा, "मुसलमान हा हिंदू पेक्षा देशाशी जास्त इमान राखतो, कारण मेल्यानंतर ही तो मातीत राहतो" असल्याप्रकारचे विधान केले, तेंव्हा वाईट वाटले की यांनाच आपण निरपेक्ष आणि स्वतंत्र समजत होतो का? (यात आक्षेप इतकाच होता की अशापद्धतीने कोणाचे इमान ठरवणे आणि तसे अशा व्यक्तीने बोलणे ठिक आहे का?). कुरुंदकर हे एक वेगळेच व्यक्तीमत्व होते. त्यांच्याबद्दल कधीतरी वेगळ्या लेखात (प्रतिक्रीयेत नाही ;) ).

एक काळ असा होता की लालू प्रसाद यादव एक आदर्श लोहीयावादी आणि समाजवादी म्हणून गणले जायचे. मात्र सत्तेचा स्पर्श झाला आणि काय झाले ते इतिहास आहे आणि अजून वर्तमानही आहे...अशा वेळ पासून चांगला समाजावादी मार्ग चुकू लागला असे म्हणावेसे वाटते.

बाकी समाजवाद्यांबद्दलचा मूळ लेख हा केवळ निवडणूक हा निकषावर नव्हता तर समाजवादी चळवळीवर होता. निवडणूक आणि त्यातील यशापयश हे त्यातील एक फळ होते. त्यामुळे माझा वरील प्रतिसाद पण त्याच संदर्भात होता.

त्यामुळे जनसंघाचा उंट विरोधी पक्षाच्या तंबूत आला नंतर त्याने तंबूच बळकावला

संघ आणि जनसंघालाच जनता पार्टीच्या अपयशाला जबाबदार ठरवणे हे हास्यास्पद होते. जनता पार्टीची मोट कशी मोडता येईल हे इंदिरा गांधींना हरवणार्‍या (बाकी राजकीय विदुषक म्हणून ओळखले जाणार्‍या) राजनारायण यांना चांगले माहीत होते. त्यांच्या महत्वाकांक्षावर त्यांना मोरारजी पंतप्रधान झाल्याने पाणी सोडावे लागले होते त्यामुळे सुरवातीपासूनच ते नाराज होते. तरी त्यांनी चरणसिंग या दुसर्‍या नाराज नेत्यास पाठींबा दिला होताच. अशा राजनारयण यांनी, वाजपेयी-अडवाणी यांना राजकीय जनता पार्टीशी संबंध ठेवण्यासाठी, अराजकीय संघाशी काडीमोड घ्यावा म्हणून मागणी केली. ते होणार नव्हते आणि तसे केले असते तरी खोटेच ठरले असते. मग त्यांनी बाहेर पडणे श्रेयस्कर ठरवले. तिथपर्यंत ठिक आहे. पुढे काय झाले? याच राजनारायण यांना देखील पक्षातून बाहेर काढले. यात अजून एक (खर्‍या अर्थाने) विद्वान व्यक्ती पण भरकटलेली होती - सुब्रम्हण्यम स्वामी...त्यांच्या बरोबर चरणसिंग, रामविलास पासवान, आदी पण आवाज करू लागले आणि शेवटी संघ/जनसंघ विरहीत आणि समाजवाद्यांनी भरलेली जनता पार्टी फुटली. पंतप्रधानासाठी परत क्लेम केला गेला तो उपपंतप्रधान चरणसिंग म्हणजे परत संघाशी संबंध नसलेल्या राजकारण्याकडून. त्यांचे सरकार सहा+ महीने संसद न चालवता चालले आणि संसदेच्या पहील्याच दिवशी पडले ते देखील इतर समाजवाद्यांनी पूर्ण पाठींबा न दिल्याने (केवळ ६४ खासदारांचा पाठींबा) ही वस्तुस्थिती शिल्लक राहतेच...

मात्र माध्यमांमधे सातत्याने जनसंघ म्हणून ओरड केली आणि तीच कालांतराने खरी वाटू लागली. (आता लोकसत्ता संपादक - आणिबाणी कशी योग्य होती आणि जयप्रकाश/समाजवादी नेते कसे देशविघातक गोष्टी करत हे सांगण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. त्याना राज्यसभेत जाता येवो वा न येवो, पण आशा करतो त्यांच्या या विचारांना प्रसिद्धीचे यश येणार नाही...)

साम्यवाद्यांचे तत्त्वज्ञान अधिक परके असूनही त्यांना अधिक यश मिळाल्याचे दिसते.

हा लेख/चर्चा समाजवाद्यांसंदर्भात असल्याने तुर्तास या लाडक्या विषयावर लिहायचे टाळतो. ;)

मिसळभोक्ता's picture

12 Sep 2009 - 12:08 am | मिसळभोक्ता

चार ओळींपेक्षा मोठ्या प्रतिक्रिया आम्ही वाचत नाही, म्हणून अशा प्रतिक्रियांना लेखाचे स्वरूप देण्याचा अत्यंत निंदनीय प्रयत्न ! निषेध !

(विकी, वरील प्रतिक्रिया वाचून बघ रे !)

-- मिसळभोक्ता

प्रकाश घाटपांडे's picture

12 Sep 2009 - 9:08 am | प्रकाश घाटपांडे

विकास यांच्या प्रतिक्रिया म्हणजे च लेख असतात हे एव्हाना आपणा सर्वांना माहित झालेलेच आहे. आता समजले असेल कि कुठल्याही गोष्टीचा विकास होणे का अवघड असत. ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2009 - 11:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकास यांचे लेखनापेक्षा प्रतिक्रियाच अधिक विचारार्ह वाटतात.

अगदी सहमत आहे. त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मिपावर मेजवानीच असते.
पण ते समाजवाद्यांना का झोडतात ते कळत नाही. :)

अवांतर : फाळणीचे गुन्हेगार डॉ. पी.सी. अलेक्झांडर यांचा लेख वाचलाय का ?

-दिलीप बिरुटे

विकास's picture

13 Sep 2009 - 6:27 am | विकास

त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मिपावर मेजवानीच असते.

मिपा हीच एक मेजवानी आहे. मी फार तर तर्रीतील एक सहस्त्रांश भाग ;)

पण ते समाजवाद्यांना का झोडतात ते कळत नाही.

तसा अजिबात उद्देश नव्हता आणि नाही. मला अनेक समाजवाद्यांबद्दल आदर होता आणि राहील.वरील प्रतिसाद/लेख हा त्या विषयाशी संदर्भात होता (समाजवाद्यांचे अपयश) म्हणून तसे वाटले असावे.

चिरोटा's picture

13 Sep 2009 - 9:06 pm | चिरोटा

संघ आणि जनसंघालाच जनता पार्टीच्या अपयशाला जबाबदार ठरवणे हे हास्यास्पद होते

सहमत. अपयशाला जॉर्ज फर्नाडीस ,मधु लिमयेही काही प्रमाणात कारणीभूत होते.माझ्यामते जनता पार्टीची स्थापनेचा उद्देशच कॉंग्रेसला हरवणे,मुख्य म्हणजे इंदिरा गांधीना वाटेल त्याप्रकारे नेस्तनाबूत करणे हा होता. म्हणूनच आणीबाणीला पाठिंबा देणार्‍या बाबु जगजीवन राम ह्यानाही जनता पार्टीत पावन केले गेले आणि उपपंतप्रधान बनवण्यात आले.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न

नितिन थत्ते's picture

14 Sep 2009 - 8:54 pm | नितिन थत्ते

जनता पार्टीच्य अपयशाला संघ जवाबदार होता असे मी मुळीच म्हटलेले नाही. जनता पार्टीच्या अपयशाला ते स्वतःच जवाबदार होते.

संघाला समाजवाद्यांनी (वेळोवेळी) जवळ करून क्रेडिबिलिटी मिळवून दिली तिचा संघाने पुरेपूर फायदा घेतला. त्यालाही संघ जवाबदार नसून त्यांना जवळ करण्याचा समाजवाद्यांचा करंटेपणाच जवाबदार म्हणावा लागेल.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

सुधीर काळे's picture

14 Sep 2009 - 10:13 pm | सुधीर काळे

मीसुद्धा एसेम, दंडवते, ना. ग. गोरे, मृ. गोरे (पाणीवाली बाई), मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस वगैरे उत्तुंग व्यक्तिमत्वाचे नेते समाजवादी पक्षात पाहिले. पण या सर्व नेत्यांचे आपापसात कधीच १०० टक्के मतैक्य नव्हते. प्रत्येक नेत्याने कुठल्याही विषयावर जाहीरपणे मतभेद बोलून दाखविणे हे फारच रोजचे होते. त्याखेरीज "साधनशुचिता" हे अस्त्र फारच "सोयिस्करपणे" वापरल्यामुळे ज्याला अमेरिकेत "wishywashy" म्हणतात तसे त्यांचे झाले.
केवळ याच आरोपामुळे जॉन केरी हा डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार बुश ४३ बरोबर २००४ साली हरला. व्हिएतनाम युद्धातला एक योद्धा (war veteran) या नात्याने त्याची प्रतिमा फारच उज्ज्वल होती. पण सिनेटमधल्या त्याच्या धरसोडीच्या मतदानाच्या इतिहासावर बुश४३ ने हल्ला चढवला व अगदी अटीतटीच्या या लढतीत "कुठल्याच विषयावर एक पक्के मत नसल्याचा" भास निर्माण करून बुश्४३ने केरीला हरविले. परिणमतः बुश४३ ची (आणि चेनी नावाच्या त्याच्या 'बोलवित्या धन्याची') आणखी चार वर्षे अमेरिकन लोकांना व इतर जगातील लोकांना सहन करावी लागली.
माझ्या मते बहुतेक सर्व समाजवादी नेते असेच wishywashy होते त्यामुळे त्यांच्याकडे कुणीच गांभिर्याने पाहिले नाही व ते "पक्ष" म्हणून कधीच निवडणूक जिंकू शकले नाहीत. फक्त वैयक्तिक पातळीवर कधी दंडवते, कधी नाथ पै, कधी "पाणीवाली बाई (मृ. गोरेबाई) दिल्लीमें और दिल्लीवाली बाई (इंदिराबाई) पाणीमें", कधी (बिहारमधून) मधू व जॉर्ज निवडून येण्याचे चमत्कार जरूर घडले!
पहा पटते का!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.

सूहास's picture

15 Sep 2009 - 8:25 pm | सूहास (not verified)

विष्लेषक !!!!

सू हा स...

निमीत्त मात्र's picture

19 Sep 2009 - 4:42 am | निमीत्त मात्र

घाटपांडेजी सांभाळून.
विकासच्या प्रतिसादातील उतारे जसेच्या तसे देणे अथवा त्यावरूनच चर्चा टाकणे बंद केलेत तर बरे होईल.ऐकले जाईल असे समजू नका. तुमच्यावर वैयक्तिक चिखलफेक करण्यात येईल.
मला नुकतीच अशी धमकी मिळालेली आहे.
संघाच्या मुशीतुन आलेल्या ह्या लोकांचे विचार कसे हिंसक असतात पाहा. मुद्दे संपले गुद्यांवर उतरायला ह्यांना वेळ लागत नाही. बाकी तुम्ही जाणताच.

विकास's picture

19 Sep 2009 - 6:20 am | विकास

वरील प्रतिसादातील वाक्यनवाक्य वैयक्तिक आहे. मी जरी संपादक असलो तरी माझ्याविरुद्धचे कुठलेही लेखन मी कधी काढत नाही. म्हणून हे उत्तरः

प्रकाशरावांनी माझ्याशी सल्लामसलत करून झाल्यावरच तो लेख टाकला आहे. "वैयक्तिक चिखलफेक" हे माझे शब्द नाहीत मात्र तुम्ही मनाला येईल ते माझ्या नावावर घालत आहात. माझ्या त्या प्रतिसादातील खालील वाक्ये आता "फॉर द रेकॉर्ड" येथे सांगतो:

मग (साभार म्हणत पण) माझ्या लेखातील उतारे जसेच्या तसे देत प्रतिसाद देणे अथवा त्यावरूनच चर्चा टाकणे बंद केलेत तर बरे होईल. सुरवात मी करत नाही. पण म्हणून उगाच काहीतरी लिहीणे चालू केले तर ऐकले जाईल असे समजू नका. जे होईल ती माझ्या दृष्टीने रास्त टिकाच असेल तुम्हाला चिखलफेक वाटली तरी.

-----------
संघाच्या मुशीतुन आलेल्या ह्या लोकांचे विचार कसे हिंसक असतात पाहा. मुद्दे संपले गुद्यांवर उतरायला ह्यांना वेळ लागत नाही. बाकी तुम्ही जाणताच.

असे आपण वागत आहात. मी नाही.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Sep 2009 - 10:29 am | प्रकाश घाटपांडे

विकासराव आपल्या भुमिकेशी आग्रही असले तरी दुराग्रही नाहीत. असा आमचा पुर्वानुभव आहे. समजा त्यांची या धाग्यास अनुमती नसती तरीही मी हा धागा टाकला असता. कारण तो 'यावरुन आठवले" अशा सदरात तो मोडतो. संघाच्या हिंदुत्ववादी विचारश्रेणीचा फेरविचार हा हिंदुत्ववादी विचारवंत स.ह.देशपांडे यांनीच मांडला होता. त्यांनी यावर तीन दिवसाची व्याखानमाला घेतली होती. हे मुद्दे न संपणारे असल्याने गुद्द्यावर येतील असे वाटत नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

निमीत्त मात्र's picture

20 Sep 2009 - 1:11 am | निमीत्त मात्र

घाटपांडे,

नथुराम आणि हिटलर ह्या चर्चेवरचे विकासचे प्रतिसाद संपादित होण्यापूर्वी पाहायाला हवे होतेत. म्हणजे तुम्हाला कळले असते मुद्दे संपले की गुद्द्यावर येणे म्हणजे काय आणि तोल सुटून वैयक्तिक पातळीवर घसरणे म्हणजे काय.

त्यावर आलेला कालिंदी मुधोळकरांचा प्रतिसादही पुरेसा बोलका होता (जोही आता संपादित झाला आहे).

आणि अजूनही माझ्या विचारांचा प्रतिवाद न करता मी बाकीचांच्या लेखावर काय प्रतिक्रिया देतो, पाचलगला मी काय सांगीतले, त्यावरुन मी विकृत कसा असल्या हिणकस गोष्टीतच विकासला इंटरेस्ट आहे असे दिसते. तो प्रतिसाद अजून तसाच आहे. त्यावर तुम्हाला काय वाटते ते जाणून घ्यायला आवडेल.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Sep 2009 - 4:27 am | बिपिन कार्यकर्ते

काही बोलायचे नाही असे ठरवले होते. पण आज राहवले नाही. शिवाय, एक हद्द ओलांडल्यासारखे वाटले म्हणून लिहित आहे.

नथुराम आणि हिटलर ह्या चर्चेवरचे विकासचे प्रतिसाद संपादित होण्यापूर्वी पाहायाला हवे होतेत. म्हणजे तुम्हाला कळले असते मुद्दे संपले की गुद्द्यावर येणे म्हणजे काय आणि तोल सुटून वैयक्तिक पातळीवर घसरणे म्हणजे काय.

विकासना मी आज बरीच वर्षे मराठी जालावर बघत आहे, त्यांचे लेखन आणि प्रतिसाद वाचत आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही वादात वैयक्तिक पध्दतीने टीका केल्याचे मला आठवत नाही. किंबहुना, त्यांचे ज्यांच्या ज्यांच्याशी वाद झाले त्या सगळ्यांना जरी विचारले तरी वैयक्तिकरित्या संबंध सुहृदाचेच राहिले असतील हे नक्की. तुम्ही ज्या एक दोन चर्चांचे उल्लेख केले आहेत तिथेही विकासनी व्यक्तिगत उल्लेख केल्याचे मला तरी जाणवलेले नाही.

त्यावर आलेला कालिंदी मुधोळकरांचा प्रतिसादही पुरेसा बोलका होता (जोही आता संपादित झाला आहे).

खरं तर तुमच्या या ओळीमुळे मी हे सगळे लिहायला उद्युक्त झालो. ज्या प्रतिसादाला तुम्ही 'संपादित झाला' असे म्हणत आहात, तो का, कसा, कोणामुळे संपादित झाला या बद्दल तुम्हाला काही ठोस माहिती आहे का? की उगाच अनमानधपक्याने पुडी सोडलेली आहे? माझ्या माहितीप्रमाणे कालिंदि मुधोळकर यांचा त्या चर्चेवरील एकच प्रतिसाद संपादित झाला आहे आणि तो मी केला आहे. त्यामागे काय कारण आहे हे केवळ मी, विकास आणि स्वतः कालिंदि मुधोळकर यांना माहित आहे. स्वतः कालिंदि मुधोळकरांना त्याबद्दल तक्रार नसावी असे माझ्याकडे उपलब्ध लिखित संदेशांवरून मला वाटते. खरं तर, मला कालिंदि मुधोळकरांचे, त्यांनी हा प्रकार ज्या रितीने हाताळला त्याबद्दल कौतुक वाटले. तुमच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत बर्‍याच वेळा मला हे जाणवलेले आहे की तुम्ही एक पूर्वग्रह करून घेतला आहे आणि त्या आधारेच सगळ्या घटनांकडे बघत आहात. तुमच्या इतर काही सदस्यांबरोबर खवमधून झालेल्या गप्पांमधून हे स्पष्ट जाणवले. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे आणि ते चूकही असू शकते.

असो. एकच विनंती, यापुढे एखादी (तुम्हाला) अप्रिय अशी घटना मिपावर घडली आणि तुमचा त्यात प्रत्यक्ष संबंध असला तर आधी तात्या अथवा संपादकांपैकी कोणाशी तरी संपर्क करून नक्की काय घडले आहे ते जाणून घ्यावे. तुमच्याशी खटके उडून सुध्दा आत्तापर्यंत कोणत्याच संपादकांनी तुमच्याशी संवाद बंद केला नाहीये. उलट तुमच्याशी संवाद करून तुमचे म्हणणे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. कमीत कमी एवढे तरी श्रेय संपादकांना द्या की...

बिपिन कार्यकर्ते

काही बोलायचे नाही असे ठरवले होते. पण आज राहवले नाही.

हेच म्हणतो...

निमीत्त मात्र (चुकीची दुरुस्तीसाठी प्रतिसाद संपादित ;)) विकासरावांची सगळी मते आम्हालाही पटतात असे नाही पण त्यांना हिंसक म्हणण्याचा विकृतपणा आपण करता आहात.

आणि राहता राहली बात मुद्यांवरून गुद्यांवर यायची. विकासरावांच्या बस की बात नाहीच ती. काहीवेळ मुद्यांची भाषा न करता गुद्यांचीच भाषा करावी लागते यावर माझा तरी विश्वास आहे.

शब्दच्छलच करायचा तर माझा हा प्रतिसाद म्हणजे मी मुद्दे सोडून गुद्यावर येतो आहे असा काढल्यास त्याला सरळसोट विकृतपणा असे लेबल मी लावणार नाही पण त्याला विकृतपणा का म्हणू नये असा प्रश्न सुजाण जनांनी स्वतःच्या मनाला विचारावा असे नक्की म्हणेन.

चीअर्स!

निमीत्त मात्र's picture

20 Sep 2009 - 5:41 am | निमीत्त मात्र

विकासरावांची सगळी मते आम्हालाही पटतात असे नाही पण त्यांना हिंसक म्हणण्याचा विकृतपणा आपण करता आहात.

कालिंदी ताईंचा संपादित झालेला प्रतिसाद, माझ्या आठवणीप्रमाणे काहीसा 'विकास भाऊ आता काय त्रिशुळ वगैरे काढणार की काय?" असा होता. मुद्दे सोडून गुद्यांवर उतरण्याचे स्पष्टीकरण सध्या इतके पुरेसे असावे..

काहीवेळ मुद्यांची भाषा न करता गुद्यांचीच भाषा करावी लागते यावर माझा तरी विश्वास आहे.

नक्की कुठे प्रॉब्लेम आहे ते समजले. धन्यवाद!

एकलव्य's picture

20 Sep 2009 - 5:49 am | एकलव्य

नक्की कुठे प्रॉब्लेम आहे ते समजले.
आय सिन्सिअरली होप यू रिअली डू.

धन्यवाद!
आपले स्वागत आहे.

निमीत्त मात्र's picture

20 Sep 2009 - 5:42 am | निमीत्त मात्र

आदरणीय संपादक बिपीन कार्यकर्ते,

विकासना मी आज बरीच वर्षे मराठी जालावर बघत आहे, त्यांचे लेखन आणि प्रतिसाद वाचत आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही वादात वैयक्तिक पध्दतीने टीका केल्याचे मला आठवत नाही. किंबहुना, त्यांचे ज्यांच्या ज्यांच्याशी वाद झाले त्या सगळ्यांना जरी विचारले तरी वैयक्तिकरित्या संबंध सुहृदाचेच राहिले असतील हे नक्की. तुम्ही ज्या एक दोन चर्चांचे उल्लेख केले आहेत तिथेही विकासनी व्यक्तिगत उल्लेख केल्याचे मला तरी जाणवलेले नाही.

"तुम्हाला आक्षेप असेल तर इथून निघून जा!", "बाकीच्यांच्या लेखावर तुम्ही कसले प्रतिसाद देता?" "तुमची विकृत विचारसरणी आहे"...इ.इ. गोष्टी बोलून विकासने माझ्यावर वैयक्तिक टीका केली आहे. असे मी तरी मानतो. असे केल्याचे तुम्हाला जाणवले नाही ह्याला काही वेगळे कारण असू शकते. मला त्याची कल्पना नाही.

राहता राहिला मुद्दा कालिंदी ताईंचा प्रतिसाद संपादित होण्याचा. तो संपादित झाला ही फ्याक्ट आहे. आणि मी तो प्रतिसाद संपादित झाला इतकेच म्हणालो आहे. कारण आधी तो प्रतिसाद दिसत होता आता तो नाहिसा झाला आहे, सिंपल! ह्यात अनमानधपक्याने पुडी सोडण्याचा काय संबंध? तुमचे हे शब्द नक्कीच खटकले. ह्यावर तुमचे स्पष्टीकरण अपेक्षीत आहे.

आता तो कशामुळे संपादित झाला, त्यावर तुमचा आणि कालिंदी ताईंचा काय पत्रव्यवहार झाला हे जाणून घेण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. तो का संपादित झाला ह्याविषयी माझी कसलीही तक्रार नाही. असे असताना त्यावरुन तुम्ही मला ही अनावश्यक माहिती का पुरवत आहात?

तुमच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत बर्‍याच वेळा मला हे जाणवलेले आहे की तुम्ही एक पूर्वग्रह करून घेतला आहे

असे तुम्हाला वाटते. मला मात्र माझी मते पटत नसल्याने काही संपादकांनीच माझ्याविषयी पूर्वग्रह करुन घेतलेला आहे असे वाटते. नाण्याची दुसरी बाजूही लक्षात घेत जा.

तुमच्याशी खटके उडून सुध्दा आत्तापर्यंत कोणत्याच संपादकांनी तुमच्याशी संवाद बंद केला नाहीये. उलट तुमच्याशी संवाद करून तुमचे म्हणणे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. कमीत कमी एवढे तरी श्रेय संपादकांना द्या की...

माझ्या खरडवहीत चतुरंग ह्यांची आलेली शेवटची खरड पाहा..
"बाकी तुमची मर्जी. असो. ह्या विषयावर माझ्याकडून पुढे चर्चा होणे शक्य नाही. धन्यवाद!"
संपादक हे कसलेही स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीत हे तात्यांचे धोरण मला मान्य आहे त्याविषयी कसलीही तक्रार नाही हे आधीच नमूद करुन ठेवतो. तुम्ही संवाद सेवा बंद वगैरे उल्लेख केलात म्हणून एक उदाहरण दिले इतकेच. कसलीही तक्रार नाही.

असो. एकच विनंती, यापुढे एखादी (तुम्हाला) अप्रिय अशी घटना मिपावर घडली आणि तुमचा त्यात प्रत्यक्ष संबंध असला तर आधी तात्या अथवा संपादकांपैकी कोणाशी तरी संपर्क करून नक्की काय घडले आहे ते जाणून घ्यावे.

मी वेळोवेळी संपादकांना/तात्यांना प्रश्न विचारुन माझे शंका निरसन करत असतो. तरीही सल्ल्या बद्दल आभारी आहे.

सहज's picture

20 Sep 2009 - 6:36 am | सहज

विकासना मी आज बरीच वर्षे मराठी जालावर बघत आहे, त्यांचे लेखन आणि प्रतिसाद वाचत आहे. त्यांनी आजपर्यंत कोणत्याही वादात वैयक्तिक पध्दतीने टीका केल्याचे मला आठवत नाही. किंबहुना, त्यांचे ज्यांच्या ज्यांच्याशी वाद झाले त्या सगळ्यांना जरी विचारले तरी वैयक्तिकरित्या संबंध सुहृदाचेच राहिले असतील हे नक्की. तुम्ही ज्या एक दोन चर्चांचे उल्लेख केले आहेत तिथेही विकासनी व्यक्तिगत उल्लेख केल्याचे मला तरी जाणवलेले नाही.

बिपिनशी सहमत आहे. तुमचे व विकासराव यांचे मतभेद असले तरी विकासराव तुमच्याशी मुद्दाम वाईट वागत असतील असे अजिबात वाटत नाही. मिपासदस्य विकि यांना विचारा किंवा खरडवह्या चाळा. त्यांच्यासारखी संयत, सभ्य माणसे मसंवर फारच कमी आहेत.

निमित्तमात्र, संपादक हे एकंदर सगळ्यांच्या "सोयीसाठी" आहेत, फक्त "सेवेसाठी" नाही असे मला वाटते.

निमीत्त मात्र's picture

20 Sep 2009 - 6:40 am | निमीत्त मात्र

निमित्तमात्र, संपादक हे एकंदर सगळ्यांच्या "सोयीसाठी" आहेत, फक्त "सेवेसाठी" नाही असे मला वाटते.

मला ते "सेवेसाठी" आहेत असे वाटते, असा निष्कर्ष तुम्ही कशावरुन काढलात ते कृपया कळेल का?

सहज's picture

20 Sep 2009 - 6:54 am | सहज

जसेकी तक्रार नाही पण
मला मात्र माझी मते पटत नसल्याने काही संपादकांनीच माझ्याविषयी पूर्वग्रह करुन घेतलेला आहे असे वाटते.

संपादकांच्या अमुक तमुक खरडी.

मी वेळोवेळी संपादकांना/तात्यांना प्रश्न विचारुन माझे शंका निरसन करत असतो..

असेच अजुन शोधले काही तर सापडेल. पण आपण संपादकांचा बराच वेळ घेताय असे दिसतेय खरे.

मिपावर दंगा करायचा, सतत चर्चेत रहायचा असा आपला काही अजेंडा आहे का? (कृपया खुलासा मागु नका. आधीच ह्या धाग्याचे तुम्ही स्व:तासाठी अवांतरकुरण केले आहे , हे कोणीही वाचक समजेल. सबब हा माझा शेवटचा प्रतिसाद.)

निमीत्त मात्र's picture

20 Sep 2009 - 7:02 am | निमीत्त मात्र

जसेकी तक्रार नाही पण
मला मात्र माझी मते पटत नसल्याने काही संपादकांनीच माझ्याविषयी पूर्वग्रह करुन घेतलेला आहे असे वाटते.

संपादकांच्या अमुक तमुक खरडी

.

ह्यात काय 'सेवा' अपेक्षीत आहे?
का उगीच काहीही करुन मला टारगेट करायचे आहे?

मी वेळोवेळी संपादकांना/तात्यांना प्रश्न विचारुन माझे शंका निरसन करत असतो..

हा मला संपादक बिपीन कार्यकर्ते ह्यांनी दिलेला सल्ला आहे, किंबहुना त्यांच्या सल्ल्याला मी दिलेले उत्तर आहे.

असेच अजुन शोधले काही तर सापडेल. पण आपण संपादकांचा बराच वेळ घेताय असे दिसतेय खरे.

संपादक म्हणतात काहीही (अप्रिय) घडले तर आधी आम्हाला विचारायचे, 'सहज' म्हणतात संपादकांचा वेळ का घेता?..एकंदरीत कशाचा कशाला पायपोसच नाही.

मिपावर दंगा करायचा, सतत चर्चेत रहायचा असा आपला काही अजेंडा आहे का?

होय. तुमच्या दृष्टीने माझा, विकासचा मिपावर चर्चा करणार्‍या सर्वांचाच असा अजेंडा आहे.