टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
संपादक कसा वापरावा ?
मिसळपाव वर आता श्रीमंत संपादक (Rich Text Editor) आहे. त्यावर लेखसंपादनासाठी लागणार्या जवळपास सर्व प्रकारची बटन्स दिलेली आहेत.
आकार : याने तुम्ही आकार वाढवू शकाल.
ठ : अक्षरे ठळक करता येतील.
ति : याने अक्षरे तिरकी होतात.
अ : याने अक्षरांना अधोरेखांकन करता येते.
काड : याने अक्षरांवर काड मारता येते.
खाली : याने अक्षरांच्या खाली लिहीता येते. शास्त्रीय लिखानाच्या वेळी याचा उपयोग होतो.
वरः याने अक्षरांच्या वर लिहिता येते. घातांक वगैरे लिहीण्यासाठी ह्याचा उपयोग होतो.
या पुढील तीन बटन्स एकूण लेख डाव्या, उजव्या अथवा मध्य भागी केंद्रितकरण्यासाठी उपयोगाची आहेत.
पुढील दोन सूची बनवण्यासाठी कामाची आहेत.
त्यापुढची दोन सुध्दा लेख कसा दिसावा या साठीची आहेत.
खालील ओळीत
रंग : यामुळे शब्दांना रंग देता येतो.
पार्श्वरंग : यामुळे शब्दांना पार्श्वरंग देता येतो.
कापा : हवे तेवढे लेखन काढता येईल.
प्रत करा: हव्या त्या लेखाची प्रत करता येईल.
डकवा : हव्या त्या लेखाला चौकटीत डकवता येईल.
प्रतिक्रमः सलग क्रमाने केलेल्या कृती उलट करत जाईल.
अनुक्रम : उलट केलेल्या कृती सलग करत जाईल.
टेबलः लेखात टेबल लावण्यासाठी.
चित्रे : लेखामधे चित्रे लावता येतील.
दूवा : लेखामधे दूवा देण्यासाठी उपयोगी.
HTML : लेखाचा HTML कोड बघता येईल.
आणि: ह्यात काही सामन्यतः चुकणार्या मराठी शब्दांची काळजी घेतलीआहे. ते आपसूक योग्य लिहील्या जातील.
F1 : हे मदत पान आहे. गमभनचा विस्तृत कळ फलक येथे दिलेला आहे.
-----------------------------------------------------------------------------
माहिती असलेल्या अडचणी : फायरफॉक्स मधे पार्श्वरंग देता येत नाहित.म्हणजेच पार्श्वरंग दिल्यास तो त्या शब्दांपुरता मर्यादित न राहतासंपुर्ण लेखाचा पार्श्वरंग होतो. इन्टरनेट एक्स्प्लोरर मधे असं होत नाही.
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.

उलट सुलट
लिहिण्याची भाषा मराठी निवडली कि इंग्रजी आणि इंग्रजी निवडली कि मराठीत लिहिले जात आहे.
इथल्या coding चा दोष असेल तर पहावे.
कदाचित
कदाचित माझ्याकडुनच काहि चूकिचे होत होते.
आता नीट निवडली जात आहे.