कान्होजी आंग्रे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in कलादालन
29 Aug 2009 - 4:49 am

पुलंचे कान्होजी आंग्रे यांच्यावरचे पुस्तक वाचतांना नोट्स काढत असतांना सहज चाळा म्हणून कान्होजी आंग्रे यांचे चित्र वहीवरच रेखाटले आहे.

KanhojI Aangre
छाया.१

KanhojI Aangre Pic2
छाया.२

रेखाटन

प्रतिक्रिया

मीनल's picture

29 Aug 2009 - 5:13 am | मीनल

चित्र छान आहे .त्या पेक्षा आजूबाजूचे अक्षर.
पण त्या पेक्षा ही पुस्तक वाचताना नोट्स काढायाची सवय.

मीनल.

पाषाणभेद's picture

29 Aug 2009 - 8:19 am | पाषाणभेद

अक्षर बद्दल दोन अक्षरे कौतूके लिहील्यबद्दल धन्यवाद.
शाळेत असतांना मास्तर लोक माझ्या कडून कॅटलॉग, ईतर स्टेशनरी लिहून घेत असत.

रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

भाग्यश्री कुलकर्णी's picture

29 Aug 2009 - 1:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी

+१
अगदी मिनलसारखेच म्हणावे वाटले.

शहराजाद's picture

14 Sep 2010 - 1:41 am | शहराजाद

चित्र छान आहे .त्या पेक्षा आजूबाजूचे अक्षर.
पण त्या पेक्षा ही पुस्तक वाचताना नोट्स काढायाची सवय.

असेच म्हणते.
अभ्यासच्या नोट्स काढणंही आम्हाला धड जमलं नाही त्यामुळे आपलं कौतुक वाटतं. अक्षर मात्र आमचंदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं. ते फक्त पुण्यवंतांनाच वाचता येतं.

प्रमोद देव's picture

29 Aug 2009 - 8:26 am | प्रमोद देव

रेखाटन आणि हस्ताक्षर....दोन्हीही छान आहे.

आमच्या बाबतीत असे लिहावे लागते......कृपया आक्षरास हासू नये. ;)

माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे

क्रान्ति's picture

29 Aug 2009 - 4:53 pm | क्रान्ति

रेखाटन आणि हस्ताक्षर....दोन्हीही छान आहे.

असेच म्हणते!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

दिपक's picture

29 Aug 2009 - 9:26 am | दिपक

वा वा अशीच चित्रे काढत रहा. :)

मदनबाण's picture

29 Aug 2009 - 9:41 pm | मदनबाण

हेच म्हनतो दफोराव... :)
मदनबाण.....

Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

ऋषिकेश's picture

29 Aug 2009 - 9:31 am | ऋषिकेश

अक्षर सुबक आहे. (उर्ध्वरेखा का टाळाता? काहि विषेश कारण?)
रेखाटन ठिक.
आणि वर मीनल म्हणतात त्याप्रमाणे टिपा काढायची सवय लै भारी!!!

ऋषिकेश

स्वाती दिनेश's picture

29 Aug 2009 - 10:58 am | स्वाती दिनेश

अक्षर सुबक आहे. (उर्ध्वरेखा का टाळाता? काही विशेष कारण?)
आणि वर मीनल म्हणतात त्याप्रमाणे टिपा काढायची सवय लै भारी!!!

ऋषिकेशसारखेच म्हणते,
रेखाटनही छान !
स्वाती

पाषाणभेद's picture

30 Aug 2009 - 10:16 am | पाषाणभेद

"उर्ध्वरेखा का टाळाता? काहि विषेश कारण?"

पक्के लिखाण लिहितांना मी नोट्स काढतांना उर्ध्वरेषा जरूर काढतो पण कच्चे लिहितांना उर्ध्वरेषांना मी टोपी लावतो. हे करण्यामुळे वेगात लिहीता येते.

दोघांनी शंका विचारल्याबद्दल धन्यवाद.

नोट्स काढतांना व चांगले अक्षर येण्यासाठी मी केलेले प्रयत्न यांवर मी एक वेगळा धागा काढतो जेणे करून ईतरांनाही यापासून काही लाभ होईल कारण हा प्रतिसाद सगळे जण वाचतीलच असे नाही.

थोडा वेळ द्या मला त्यासाठी.

आणि एक, मला आहो, जावो म्हणत जावू नका. मी परका वाटतो त्यामूळे. आपला नाम्या काय म्हणतो ते बघा. (तो म्हणतो : "नाय आता ऐकेरी आरे तूरे केल्यानी मानूस कसा जवळचा वाटतो पघा.")

"रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या
(वाहना)शी होणारी धडक टळू शकते."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2009 - 10:36 am | भडकमकर मास्तर

रेखाटन छान आहे..
अवांतर : एक सूचना..
तुमची स्वाक्षरी मुख्य मजकूरापासून अलग केलीत तर बरे होईल...
( मध्ये रेघ मारून किंवा इतर प्रकारे).. मला प्रत्येक संदेशाच्या वेळी मध्ये मध्ये येते आणि गोंधळात पाडते...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

यशोधरा's picture

29 Aug 2009 - 9:48 am | यशोधरा

>>टिपा काढायची सवय लै भारी!!!

हेच म्हणते!! शालेय जीवनात अगदी सिन्सिअर विद्यार्थी होता की काय! :)

सुनील's picture

29 Aug 2009 - 3:17 pm | सुनील

रेखाचित्र आवडले. हस्ताक्षरदेखिल सुंदर.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विकास's picture

29 Aug 2009 - 6:46 pm | विकास

वर सर्वांनी म्हणल्याप्रमाणे सगळेच उत्तम! अक्षर चांगले आहे ते जपून ठेवा. (कधीकाळी माझे अक्षर चांगले होते. लिहीताना देखील एक खाडाखोड न करता पानभर+ लिहू शकायचो. नोट्स च्या बाबतीतमात्र बोंब! मात्र नंतर काँप्युटर-किबोर्डच्या सवयीने अक्षर पार खराब केले आणि लिहीण्यापेक्षा टंकताना जास्त जलद विचार करायची नवीन आणि काही अंशी चुकीची सवय लागली :( )

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Aug 2009 - 9:17 pm | बिपिन कार्यकर्ते

हस्ताक्षर, रेखाटन आणि वाचनाची पध्दत (म्हणजे टिपा वगैरे काढणे) सगळेच लै भारी ब्वॉ... यातले चांगले हस्ताक्षर सोडले तर बाकीच्या दोन्ही गोष्टी मात्र जमल्या नाहीत कधीच.

बिपिन कार्यकर्ते

शैलेन्द्र's picture

29 Aug 2009 - 10:43 pm | शैलेन्द्र

कान्होजी आन्ग्रे हे माझे एक आवडते ऐतीहासिक व्यक्तिमत्व.. पेशवाइच्या ऊदयास कन्होजी आन्ग्रे हे अप्रत्यक्षरीत्या कारणीभुत होते. त्याच पेशव्यांच्या तीसर्‍या वंशजाने, नानासाहेबाने, आंग्र्यांचे म्हणजेच मराठ्यांचे आरमार ईंग्रजांच्या मदतीने बुडवले.

पेशवाईच्या अस्ताचे ते पहीले पाऊल...

विसोबा खेचर's picture

31 Aug 2009 - 9:03 am | विसोबा खेचर

कान्होजी आंग्रे चकणे होते का? :)

तात्या.

पाषाणभेद's picture

31 Aug 2009 - 9:51 am | पाषाणभेद

पण ते सुधारणावादी व्रूत्तीचे होते. :-)

"दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा."

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

भडकमकर मास्तर's picture

31 Aug 2009 - 10:39 am | भडकमकर मास्तर

चकणे नव्हते पण कावेबाज इंग्रजांनी जाणूनबुजून त्यांचे चित्र तसे रंगवले असेल... ;)

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

प्राजु's picture

31 Aug 2009 - 9:07 am | प्राजु

रेखाटन आणि हस्ताक्षर.. दोन्ही उत्तम!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सोनम's picture

15 Sep 2009 - 8:44 pm | सोनम

अक्षर आणि रेखाटन दोन्ही ही उत्तम आहे. :) :)

"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

संदीप चित्रे's picture

15 Sep 2009 - 11:20 pm | संदीप चित्रे

अरे मित्रा नागपूरच्या वन डे मधे श्रीकांत बघत बसला आणि गावसकरने न्यूझिलंडला झोडपलं तसं तू रेखाटन इथे टाकलंस आणि सगळ्यांना तुझं अक्षर आवडलं :)

पण jokes apart विकास म्हणाला तसं अक्षर जपून ठेव.
च्यायला, इथे शाळेतही नोट्स वगैरे काढायचा कंटाळा यायचा आणि तू पुस्तक वाचताना नोट्स काढतोस ! धन्य आहेस !!

पाषाणभेद's picture

16 Sep 2009 - 2:36 am | पाषाणभेद

नका हो सगळे एवढ कौतूक करू, मला सवय होईल त्याची.
बाकी चांगल्या अक्षरलेखनासाठीच्या टिप्स चा धागा आता टंकायला घेतोच जेणे करून मला हा विषय किती समजला आहे ते समजेल व काहितरी 'भरीव' लिहील्याचे समाधान लाभेल.
-----------------------------------
काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

दशानन's picture

16 Sep 2009 - 8:29 pm | दशानन

छ्या... हे काय अक्षर आहे .... :(

आम्ही लिहलेले कधी तरी देऊ वाचायला... एक शब्द जरी निट वाचला तर पेढे देईन खायला =))

* लै भारी अक्षर आहे भावा... आम्ही गेली १५ वर्ष पेन आहात फक्त हस्ताक्षर करण्यासाठीच घेतला आहे... उद्या बघतो एक पेज टाइप करुन चढवतो मिपावर.. होऊन जाऊ दे स्पर्धा तुझं अक्षर भारी का माझं !

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Sep 2010 - 12:49 am | लॉरी टांगटूंगकर

कुठल्या पुस्तकातून काढत होता नोस्ट???मला उत्साह आहे पण फारसे काही लाय्ब्रार्र्य मध्ये वाचायला (ऐतिहासिक)उरले नाही .please please pleaseसांगा न .

पाषाणभेद's picture

13 Sep 2010 - 7:08 pm | पाषाणभेद

कान्होजी आंग्रे
"कान्होजी आंग्रे " या पु ल देशपांडे अनुवादील पुस्तकातील मुखपृष्ठावरील चित्रावरून काढलेले चित्र आहे ते.
कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजीत लिहिलेली कादंबरी पु लं नी अनुवादीत केलेली आहे. ओघवती भाषाशैली हे तिचे वैशिष्ठ्य आहे. मिळाली तर जरूर वाचा.