लेखाचा झटपट अभ्यास

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
24 Feb 2008 - 8:04 am

झटपट न्याहारी या सृष्टीलावण्य यांनी लिहिलेल्या लेखात बेकरीमधील 'बटर'पासून दहीवडे तयार करण्याची कल्पक अशी पाककृती दिली आहे. त्या लेखावर आलेल्या उदंड प्रतिक्रिया 'झटपट' वाचतांना खूप गंमत वाटली. मुख्य मुद्दा सोडून दूर भटकत जाण्याच्या मनोगतावरील प्रथेचे अत्यंत यशस्वी पुनर्प्रत्यारोपण (अबब, केवढा मोठा शब्द!) मिसळपावावर झालेले दिसले. हा धागा असाच सुरू राहिला तर तैमूरलंगाच्या स्वारीपासून भटकरांच्या महासंगणकापर्यंत कुठेही आपण पोचू. 'सुताने स्वर्गाला जाणे' असा वाक्प्रचार आहे, पण तेवढी घाई बहुतेक कोणाला नसावी. अजून पोटभर मिसळपाव खायची आहे ना? त्या लेखावर मी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहेच. पण इतर प्रतिक्रियांच्या गर्दीत कदाचित ती कोणाला दिसणारही नाही म्हणून या लघुलेखाचा प्रपंच केला आहे.

त्याशिवाय 'खवैयेगिरी' किंवा 'खादाडीची हौस' भागवण्यासाठी स्वयंपाकघरातली फडताळे धुंडाळतांना त्यात 'झटपट पाककला'आणि 'पावाचे पन्नास पदार्थ' (वाः, काय अनुप्रास आहे?) अशासारखी पुस्तकेसुद्धा सापडली. अभिजात पाककौशल्यपटूंनी ती पाहिली व वाचली किंवा कोळून प्यायली असतील.

मी मुद्दामच इतके धागे पेरून ठेवले आहेत हे सूज्ञ वाचकांच्या केंव्हाच लक्षात आले असेल? (असे विनयाने म्हणायचे असते हे मुद्दाम सांगायला नको.)

मौजमजा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Feb 2008 - 8:51 am | विसोबा खेचर

मुख्य मुद्दा सोडून दूर भटकत जाण्याच्या मनोगतावरील प्रथेचे अत्यंत यशस्वी पुनर्प्रत्यारोपण (अबब, केवढा मोठा शब्द!) मिसळपावावर झालेले दिसले.

हा हा हा! अहो चालायचंच.. सगळी आपलीच माणसं आहेत.. :)

मी मुद्दामच इतके धागे पेरून ठेवले आहेत हे सूज्ञ वाचकांच्या केंव्हाच लक्षात आले असेल?

आहे आहे! विषयांतराला भरपूर वाव आहे! :)

आपला,
(भरकटलेला) तात्या.

आनंद घारे's picture

24 Feb 2008 - 12:42 pm | आनंद घारे

सगळी आपलीच माणसं आहेत..
म्हणूनच मी भरकटत इथे आल्यानंतर स्थिरावलो.

सुधीर कांदळकर's picture

24 Feb 2008 - 10:17 am | सुधीर कांदळकर

सुरुंग आहेत. आम्ही वाचक त्यात दारू भरूच. दारू आहे तेथे मजा आहेच.

विसोबा खेचर's picture

24 Feb 2008 - 10:23 am | विसोबा खेचर

दारू आहे तेथे मजा आहेच.

हा हा हा! सहमत आहे...! :)

आपला,
(ग्लेन-मोरांजी प्रेमी) तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Feb 2008 - 10:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>मनोगतावरील प्रथेचे अत्यंत यशस्वी पुनर्प्रत्यारोपण (अबब, केवढा मोठा शब्द!) मिसळपावावर झालेले दिसले.

हे 'मनोगत' काय आहे ? तिथे कोणती प्रथा होती ?
आम्हाला लेखन अनुमतीची वाट पाहावी लागत नव्हती ते 'मनोगत' आठवतेय, त्याबद्दल आपण बोलताय का ? :)

जिज्ञासू
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आनंद घारे's picture

24 Feb 2008 - 12:44 pm | आनंद घारे

समझनेवाले समझ गये हैं.