कोणी नोकरी देता का नोकरी ???

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in काथ्याकूट
27 Aug 2009 - 11:01 am
गाभा: 

राम राम मंडळी,
कसे आहात ? काय चालु आहे ?
("रोजच्या गप्पाटप्पा करण्यासाठी,वाढदिवस, बातम्या आणि इतर अश्याच तात्कालीक चर्चांसाठी हा खरडायचा फळा आहे" हे आठवल्याने बाकीच्या गप्पा खरडफळ्यावर. असो.")

तर आम्ही आज तुमच्यापुढे एक जटिल समस्या घेऊन आलो आहोत.
त्याचे आहे की परवा तो विनायक पाचलगच्या धाग्यातली "दमलेल्या बापाची कहाणी" ऐकुन आम्ही ( बाप न होताच ) हळवे झालो व एका बेसावध क्षणी तशी प्रतिक्रिया देऊन बसलो. त्याचा मग शॉट असा झाला की असे "हळवे होणे" हे सरळसरळ "पैशासाठी धावाधाव" करणार्‍यांच्या हलक्या, स्वार्थी, निष्ठुर आणि दगडाचे काळीज असणार्‍या हलकट मनोवॄत्तीचे लक्षण आहे असा एक भयंकर शोध आम्हाला लागला. शिवाय अशा लोकांतच कुठेही आणि कशावरही हळवे होण्याची लक्षणे दिसु लागतात अशा आशयाचा एक शोधनिबंधही वाचनात आता, हे तर मग स्वाईन-फ्ल्यु पेक्षाही भयानक हो. तिकडे निदान मास्क घालुन तोंड तरी लपवता येते, इकडे ती ही सोय नाही.

आता तसे तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्ही सध्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत ( शिव्या घालायला सोपे जावे म्हणुन फार फार तर तुम्ही अमेरिकन कंपनीत म्हणु शकता ) एका बर्‍यापैकी हुद्द्यावर संगणकावर काम करुन करावी लागणारी नोकरी करतो, आयटी वगैरे नाही बरं का (पण शिव्या देण्याच्या सोईसाठी तुम्ही आम्हाला "आयटी वाले" म्हणु शकता) !
मग काल आम्ही तडकाफडकी आम्ही आमची "मनोवॄत्ती" लगेचच "राष्ट्रप्रेम, निष्ठा, संस्कृती, संस्कार, भावनात्मकता, हळवेपणा" असे अनेक फिचर्स असलेल्या एका देशी अ‍ॅन्टीव्हायरसला स्कॅन करण्यासाठी दिली. फटफट रिपोर्टही आला, सरकारी काम आणि ६ महिने थांब असले लाड परवडत नाहीत हो आम्हाला ( असो, त्यावरचा कौल समसद्वारे घेऊ आम्ही नंतर कधीतरी ). अहो आश्चर्यम् ! त्या स्कॅनिंग सॉफ्टवेअरने आमची मनोवृत्ती "कचर्‍यात फेकुन देण्याच्या लायकीची" असल्याचा निर्वाळा दिला व बरोबर एरर कोड्सची जंत्री दिली ...
आम्हाला अत्यंत दु:ख झाले !!!

आज सकाळी उठल्यावर आम्ही ह्या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचेच ठरवले हा काथ्याकुट खरडायचा निर्णय घेतला ...

तर मंडळी, असे आहे सर्व ...

हवी आहे एक मस्तपैकी नोकरी !!!

आमची अर्हता :
लिहण्यावाचण्यापुरते व्यवस्थित शिकलो आहोत.
संगणकावरही खरडता येते.
काम सोडुन मराठी संकेतस्थळांवर तासनतास टीपी करण्याचे वादादीत कौशल्य.
शुद्धलेखनाचा व हिब्रु भाषेचा मनापासुन तिरस्कार करतो कारण यातले आम्हाला घंटा कळत नाही, "स्वाहिली" भाषेवर पीयच्च्डी कारण्याचा विचार आहे, पुर्वतयारी म्हणुन एक प्रतिसादही प्रकाशित केलेला आहे ( व तो देवदयेने अजुन उडाला नसण्याचे चान्सेस आहेत ).
संधी दिल्यास "सरकारचे डोके ठिकाणावर आहे / देवाला निवॄत्त करा " असे जळजळीत अग्रलेख लिहण्याची पात्रता.
आम्ही कट्टर "धर्मनिरपेक्ष" आणि "सेक्युलर" आहोत.
"चित्रपट परिक्षणे" लिहु शकतो.

आमच्या अपेक्षा :
आमच्या ग्रीन बुकमधुन सर्वात प्रथम "हलक्या, स्वार्थी, निष्ठुर आणि दगडाचे काळीज असणार्‍या हलकट पैशाला हापापलेल्या मनोवॄत्तीचे नामोनिषाण" मिटवुन टाकावे.
सर्वात महत्वाचे, पैशासाठी धावाधाव करायला अजिबात नको.
जो काही पैसा मिळतो तो आम्ही राष्ट्र-उभारणीच्या महान कार्यात उचलेल्या वाट्याबद्दल फुल ना फुलाची पाकळी म्हणुन योग्य ते ( म्हणजे जे मला योग्य वाटते ते, तुमच्या मताला काही किंमत नाही ) मानधन ( ता.क. : भारतीय रुपायातच, तो डॉलर्सचा माज तुमच्याकडेच राहुद्यात ) म्हणुन द्यावे.
नोकरी शक्यतो माझ्या गावीच असावी म्हणजे मला पुढचे डावपेच ठरवणे सोपे जाईल.
"ऑनसाईट" वगैरे ऑफर्स अरबी समुद्रात बुडवण्यात येतील.
नव्या व्यवस्थापनाकडुन राहण्यास घर, गाडी, फोन वगैरे सुविधा मिळणार असल्यास त्याचा अनादर केला जाणार नाही ( मात्र न मिळाल्यास आम्ही निषेध करण्यास मोकळे आहोत).

आमच्या कमिटमेंट्स :
( अहो ***चे रक्त आहे, काय समजलात ? एक वेळ शीर कापुन देऊ पण इमानाला बोल लाऊन घेणार नाही. )
आमच्या कडव्या "स्वामीनिष्ठे"बाबत काळजी नसावीच. जॉब बदलण्याचा व "पैशामागे धावाधाव" करुन स्विच मारण्याचा विचारही करणार नाही.
मात्र तुमचे जे काही नियम असतील त्याप्रमाणे पगारवाढ मिळावी नाहीतर आम्ही ... हॅ हॅ हॅ ...

असो, तुर्तास एवढेच.
बाकी सुचेल तशी अटींमध्ये भर घालत राहिन ...

मायबाप मिपाकरांनो, कुणी तरी मला नोकरी सुचवा हो नवी नोकरी ...!!!
जीव शिणला आहे हो "पैशामागे धावाधाव" करुन

टीप : निखळ मनोरंजन आणि टाईमपास म्हणुन हा धागा आहे ह्याची अवश्य नोंद घ्यावी, अवांतर चर्चेस आमची ना नाही पण वैयक्तिक हल्ले टाळावेत ही विनंती. प्रतिसाद देताना आपल्या "मोनॅको पॉवर्ड" प्रतिसादांची काळजी आपण स्वतःच घेतल्यास उत्तम ...!!!
बाकी सर्वांनी ह.घ्या. हे वेगळे सांगायला नको.

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Aug 2009 - 11:21 am | बिपिन कार्यकर्ते

आय मीन... सर्च फॉर टू जॉब्स. 'पैशासाठी धावाधाव' करून मलाही कंटाळा आलाय. जॉब चेंज करावा म्हणतोय.

(दमलेला बाप) बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

27 Aug 2009 - 11:34 am | निखिल देशपांडे

सर्च फॉर थ्री जॉब्स.
("कचर्‍यात फेकुन देण्याच्या लायकीच्या मनोवृत्तीचा")निखिल

शैलेन्द्र's picture

27 Aug 2009 - 11:30 am | शैलेन्द्र

मीही मिसळ्पावमध्ये करीअर करण्याचा विचार करतोय.. तात्या हल्ली ऑप्शन्स्मधे बरेच कमावतायत अस खात्रिलायक सुत्रांकडुन कळलय...

JAGOMOHANPYARE's picture

27 Aug 2009 - 11:38 am | JAGOMOHANPYARE

अरे वा ..फ्युचरचे नवे ऑप्शन शोधता शोधता मग आता ऑप्शन मध्ये फ्यूचर काय ? :)

महेश हतोळकर's picture

27 Aug 2009 - 11:42 am | महेश हतोळकर

आयला काँपीटीशन वाढली? आता आजून दमणूक (माझी, बाबांची नाही)

(आधीच दमलेला) महेश
-----------------------------------------------------------------
येथे तेराव्याचे कूपन्स जमा करून घेतले जातील आणि त्यांचे नि:पक्षपाती पणे वाटप केले जाईल.
-----------------------------------------------------------------

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Aug 2009 - 11:48 am | ब्रिटिश टिंग्या

व्हिजीट मॉन्स्टर डॉट कॉम!

छोटा डॉन's picture

27 Aug 2009 - 11:50 am | छोटा डॉन

जाऊ द्या टिंग्याशेठ,
आंतरजालावर प्रत्येकालाच प्रत्येक गोष्ट समजावीच असा आमचा मुळेच आग्रह नसतो आणि अट्टाहास तर अजिबातच नसतो ..

बाकी सल्ल्यासाठी आभार ...!!!
------
छोटा डॉन

ब्रिटिश टिंग्या's picture

27 Aug 2009 - 11:52 am | ब्रिटिश टिंग्या

कुठेही जा!
मानेवरचं जु बदलता येईल....मुसक्या मात्र कायम इतरांच्या हातात राहतील!

परिकथेतील राजकुमार's picture

27 Aug 2009 - 12:17 pm | परिकथेतील राजकुमार

आमच्याकडे तुम्हाला हव्वी तश्शी एक नोकरी आहे बघा.

आमच्या एका मित्राच्या खापरपणजोबाचा घोड्यावर बसलेला पुतळा त्याच्या वाड्यात आहे. पुतळा मोठा भव्य आहे.

कामाचे स्वरुप :-
१) रोज सकाळ दुपार संध्याकाळ घोडा व खापरपणजोबा दोघांची इमाने इतबारे साफ सफाई करणे.

२) रोज सकाळ दुपार संध्याकाळ आजोबाच्या तलवारीला आणी घोड्याच्या लगामाला पॉलीश करणे.

वेतन :-
गरजेला पुरुन उरेल येव्हडे निश्चीत मिळेल.

अन्न :-
१)सकाळी नाष्ट्याला चणे मिळतील. (भिजवलेले)

२) दुपारी १ वाजता २+२ भाकर्‍या अथवा रोट्या (रात्री काय उरलय त्यावर अवलंबुन) १ सुकी भाजी १ पातळ भाजी, डाळ व वाटीभर भात मिळेल. (स्वखर्चाने चटणी, लोणची आणल्यास हरकत नाही)

३)सकाळी ९ ला व संध्याकाळी ५ ला चहा मिळेल.

४) रात्रीच्या जेवणात (वेळ घरच्यांचे जेवण उरकल्या नंतरची) २+२ भाकर्‍या अथवा रोट्या, १ सुकी भाजी, १ पातळ भाजी व भात मिळेल.

(तुरीचे भाव वाढल्याने दिवसातुन एकदाच डाळ मिळेल.)

(ताट, वाटी, भांडे आपले आपण घासुन ठेवावे. जेवताना तोंडाचा 'मचमचा' आवाज करु नये')

वस्त्र :-
१)महिन्यातुन एकदा २ फडकी (पुतळ्यांसाठी)

२) वर्षातुन २ वेळा १ शर्ट, १ टी-शर्ट, २ प्यांटी मिळतील. (बोहारणीने काही कपडे नाकरल्यास ह्यात वाढ होउ शकते)

निवारा :-
हिवाळा व उन्हाळ्यात घोड्याच्या पायात झोपण्यास ऐसपैस जागा आहेच. पावसाळ्यात वाड्याची पडवी वापरता येईल.

आकर्षक संधीचा त्वरीत लाभ घ्या.

©º°¨¨°º© परा.कॉम ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

नंदन's picture

27 Aug 2009 - 12:17 pm | नंदन

लेख डॉन्राव. लेख वाचून अंमळ हळवा झालो. पण असे होणे हे संवेदनशीलतेचे नसून पैशामागे धावणार्‍या, हपापलेल्या वृत्तीचे लक्षण असल्याचे ठरवण्यात आल्याचे लक्षात आले आणि मग ती चूक सावरण्याचा प्रयत्न केला. काय वाचून हळवे व्हावे किंवा होऊ नये याची जंत्री सध्या तयार होत असल्याचं समजतं. तयार झाल्यावर तिचा समावेश वाविप्रमध्ये करता येईल काय? म्हणजे अशी चूक पुन्हा होऊ न देण्याची दक्षता घेता येईल :)

असो, लेख उत्तम असला तरी तपशीलात एक चूक आहे. हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर स्कॅनिंगच्या वगैरे भानगडीत पडत नाही. ते थेट निर्वाळ्याचा फतवा काढतं. 'सटॅनिक व्हर्सेस' न वाचताच अयातुल्ला खोमेनींनी काढलेला तसा. अर्थात हा चर्चाविषय असल्याने त्याला चुकीच्या गृहीतकाशिवाय शोभा नाही, हेही बरोबरच म्हणा.

तेही असो. काही दिवसांपूर्वी मीच लिहिलेल्या लेखातला एक परिच्छेद इथे देण्याचा मोह आवरत नाही. (ही सवय स्वाईन-फ्ल्यू सारखी संसर्गजन्य असावी असा दाट संशय आहे.)

बहुतेक म्हणूनच प्रत्येक धर्मात, समाजात या सुप्त पण खदखदणार्‍या द्वेषभावनेचा निचरा करायला एक जागा असते, आणि नसलीच तर प्रत्येक व्यक्ती आपापल्या कलाप्रमाणे ती शोधत असते. ज्याचा त्याचा बागुलबुवा. ज्याला कृतीने किंवा उक्तीने झोडपून काढलं की मन शांत होतं, रोजच्या आयुष्यातलं वैफल्य कमी होतं असं काहीतरी. उदाहरणं शोधली तर अनेक सापडतील. मक्केत सैतानाचं प्रतीक म्हणून उभारलेल्या खांबावर त्वेषाने दगडफेक करणारे भाविक, वाय टू केच्या चक्रात नोकरी गेल्यावर घरी बायकोला येऊन मारहाण करणारे काही पुरूषोत्तम, मुलांवर राग काढणार्‍या आया, बेणारे बाईंवर खटला चालवणारे सभ्य लोक, 'वॉर अँड पीस'मधल्या वेरेश्चागिनचा जमावाने घेतलेला बळी; एक ना अनेक.

त्यामुळे ह्या गोष्टी चालायच्याच (अधिक माहितीसाठी वाचा - अंतू बर्वा). हडप्पा-मोहेंजदरोच्या अवशेषांतही कुठेतरी हे लोथल शहरातले, परकीयांशी संबंध ठेवून असणारे लोक फार माजले आहेत असा एखादा शिलालेख मिळाला तरी आश्चर्य वाटू नये. ऋग्वेदात कितीही 'आ नो भद्रा क्रतवो यन्तु विश्वत:' असे कानीकपाळी ओरडून सांगितले तरी 'त्याचा येळकोट जाईना' त्याला काय करणार? (शेवटचं वाक्य बळंच या सदरात मोडतं. त्याचा अर्थ खुद्द प्रतिक्रियालेखकालाच अद्याप कळला नसल्यामुळे स्पष्टीकरण मागू नये ;))

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

28 Aug 2009 - 10:44 pm | मिसळभोक्ता

हडप्पा-मोहेंजदरोच्या अवशेषांतही कुठेतरी हे लोथल शहरातले, परकीयांशी संबंध ठेवून असणारे लोक फार माजले आहेत असा एखादा शिलालेख मिळाला तरी आश्चर्य वाटू नये.

हा शिलालेख औरंगाबादेजवळ सापडला म्हणतात. त्यात अर्धमागधीत "लोथल मुलांनी वार्‍यावर सोडलेल्या वृद्धांची काळजी" असे काहीसे खरडलेले होते म्हणतात. बरेच दिवस आम्ही "लोकल" समजत होतो.

-- मिसळभोक्ता

धमाल मुलगा's picture

27 Aug 2009 - 12:39 pm | धमाल मुलगा

डानराव,
बर्‍याच काळानंतर आपण मोठा उद्भोदक आणि वाचकांच्या विचारशक्तीला, सारासारबुध्दीला पुनःश्च कामाला लावणारा चर्चाप्रस्ताव सादर केला आहे त्याबद्दल आपलं करावं तेव्हढं अभिनंदन थोडंच.

आपल्या उपरोल्लेखित विचारधारेशी सहमत असणारे लोक निदान आंतरजालावर तरी शेकडा सत्त्तर तरी नक्कीच सापडतील असा आम्हाला विश्वास आहे.
एकुणच ह्या असल्या हिणकस मनोवृत्तीने आजचा समाज पुरता ढवळुन गेला आहे. पैशासाठी धावाधाव करणार्‍यांना भाव-भावनांचं मोल ना उमजतं, ना त्याकडे लक्ष द्यायला रिक्कामा वेळ असतो. आणि मग उग्गाच कसल्यातरी कविता फिविता वाचुन अचानक आपण हळावे असल्याचा साक्षात्कार होतो.
ह्या सर्वाचा आम्हालाही मोठा कंटाळा आलाय..एक माणुस म्हणुन जगायचंय...भले चार पैसे कमी का मिळेनात! (ते वाढवुन कसे घ्यायचे ते चांगलंच कळ्तं की! नाहीच कळलं तर आस्थापनेतले शिनियर्स शिकवतीलच )

आमच्या कडव्या "स्वामीनिष्ठे"बाबत काळजी नसावीच. जॉब बदलण्याचा व "पैशामागे धावाधाव" करुन स्विच मारण्याचा विचारही करणार नाही.

हे वाक्य तर काळजाला भिडलं साहेब!
आम्ही पाहतो ते स्वतःच्या करियरवर,पात्रतेवर (अवाजवी?) विश्वास असलेले सगळॅ.. म्यानिजराला दिसेल असा आपला स्क्रीन ठेऊन त्यावर वॉलपेपर म्हणुन सिंव्हाचं चित्र आणि शब्द "I work for money & appreciation...If u need loyalty, hire a dog" ! मग आहेच, "दे पगारवाढ नायतर चाल्लो...एकाला धा नोकर्‍या मिळतील मला!"
पण आपलं वरचं वाक्य वाचलं आणी जीव भरुन आला...

मात्र तुमचे जे काही नियम असतील त्याप्रमाणे पगारवाढ मिळावी नाहीतर आम्ही ... हॅ हॅ हॅ ...

अर्थातच! नाही मिळत म्हणजे काय? त्याचे मार्गही असतातच की!
ऐन सणासुदीच्या तोंडावर किंवा मोठ्या सुट्ट्यांच्या आधी बरोब्बर वेळ हेरुन ब्यांका बंद अभियान करायचं...गप सगळॅ सरळ येतात. उपोषणं, संप, चक्का जाम... एक हत्यार आहे का? वर पैसे बुडण्याचीही भिती नाही!

एकुणातच अश्या सगळ्या गोष्टींमुळेच छोट्या छोट्या गोष्टी मनाला लाऊन घेण्याची आपली सवय वाढली आहे का हो?

@टिंगोजीराव,

व्हिजीट मॉन्स्टर डॉट कॉम!

अहो त्यांना पैशामागे धावाधाव न करता पैसा मिळवणारी नोकरी हवी आहे हो.. मॉस्टर कितीही नाही म्हणलं तरी आयटीवाल्यांचीच सद्दी असलेलं प्रकरण आहे.

कुठेही जा!
मानेवरचं जु बदलता येईल....मुसक्या मात्र कायम इतरांच्या हातात राहतील!

पण निदान पराकोटीचा हळवेपणा तरी कमी होईल ना? त्या मुसक्यावाल्यांशी लढायला कंपू तरी मिळेल ना?

आपलाच,
(पैशामागे धावाधाव करुन अतिहळवा झालेला) ध.

llपुण्याचे पेशवेll's picture

27 Aug 2009 - 7:23 pm | llपुण्याचे पेशवेll

हा धमालराव आमच्या मनातलं लिहीतो बरंका अगदी.. म्हणूनच आता "बा#@*ला त्या अमेरीकेच्या" असे म्हणून आम्ही स्वदेशी परतायचा निर्णय घेतला आहे. :) त्यामुळे पुण्यात आल्यावर भेटून तुम्हास अधिक मार्गदर्शन करू. त्याहून अधिक माहीती तुम्हास हवी असल्यास "अधिक चर्चा" खरडवहीत करावी.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विजुभाऊ's picture

27 Aug 2009 - 12:57 pm | विजुभाऊ

नोकरी शक्यतो माझ्या गावीच असावी म्हणजे मला पुढचे डावपेच ठरवणे सोपे जाईल.

अरे वा छान.
तुम्ही देवाच्या गावचे. तेथे विठोबाला तात्पुरती एक रीप्लेसमेन्ट हवीच आहे बिचारा कंटाळलाय. त्याने कंटालून हात जर्रा नुस्ते कमरेवर ठेवले तर लोकानी त्याला त्याच अवस्थेत युगानुयूगे उभे केले.
बघा नव्या मॉडीफाइड अवतारातला विठोबा लॅपटॉपावर मिपा ब्राऊज करणारा असेल

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

सूहास's picture

27 Aug 2009 - 2:15 pm | सूहास (not verified)

शहरातला कवी,गावावर कविता करतो आणी गावाकडचा कवी शहरावर कविता करतो...चालायचच ...असमाधानी रहाण हा देखील प्रगतीचा एक मार्ग आहे....

सू हा स...

ऋषिकेश's picture

27 Aug 2009 - 2:30 pm | ऋषिकेश

कहि भी जाओ कव्वे सब जगह कालेही होते है| ;)

ऋषिकेश
------------------
दूपारचे २ वाजून २९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "पैलतो गे काऊ कोकताहे...."

अवलिया's picture

27 Aug 2009 - 2:50 pm | अवलिया

डान्रावांकडुन गंभीर आणि विचार प्रवर्तक विषयावर काथ्याकुटाचा प्रस्ताव पाहुन अतिशय आनंद झाला.. चला कोणी तरी मार्गी लागला!

खरे तर अशा प्रस्तावांवर जन्मजात टवाळखोर असल्याचा शिक्का असल्याने प्रतिक्रिया देण्याची लायकी नाही तरी खरडुन पाहतो. टिकला तर आनंद, उडाला तर त्याहुन अधिक आनंद.. असो.

डान्राव तुमच्यासाठी एक जाब आहे.

आमचे एक अनाथाश्रम आहे. त्यात अनेक त-हेची अनाथ मुले, मुली आणि माणसे आहेत. काही मुले आणि मुली फार हुशार आहेत. सतत विचारात गढलेली असतात. तत्वचिंतन करत असतात. काही खोडकर मुले आणि मुली पण आहेत. काही माणसे पण अशी आहेतच. त्यांच्यातच काही मानसिक संतुलन बिघडलेली, मानसिक वय कमी असलेली, बोलतांना लाळ गळणारी, एक टक नको त्या ठिकाणी पहाणारी, गलिच्छ अशी मुले पण आहेत.

तुमचे काम या सर्वांवर नीट लक्ष ठेवुन कुणी काही गडबड करणार नाही ना हे पहायचे आहे. ज्याला जे करायचे असेल ते करु द्यायचे, फक्त दंगा होवु द्यायचा नाही. मात्र काही विवक्षित मुलांना मात्र त्यांनी काहीही केले तरी फटके मारायचे. फार कोडगी मुलं आहेत ती.. त्यांची यादी एक्सेल शीट मधून तुम्हाला दिली जाईल. दंगा होत नसतांना सुद्धा या मुलांना झावडात मारली तर तुमच्या अप्रेझल मधे विशेष नोंद केली जाईल, ज्याचा फायदा तुम्हाला पगारवाढीसाठी होईल. अशा मुलांबरोबर मिळुन गप्पा मारायला सुद्धा तुम्हाला बंदी असेल, जर बोलतांना दिसलात तर ..... त्या दिवसाचा पगार कापला जाईल.

जर जमत असेल तर कळवा (खव वा व्यनीतुन)

आई भवानी आपल्याला यश देवो हीच इच्छा !

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

27 Aug 2009 - 6:25 pm | दशानन

मला बी हवा आहे नवीन जॉब....

जास्त अपेक्षा नाहीत...

ईडी-काडी व ताडी (विस्कि..रम.. बीयर चालू शकेल) व दोन टाईमचं चिकन-मटनचे जेवणं व आठवड्यातूण एकदा चेंज म्हनूण एकदा शाकाहारी !

;)

महेश हतोळकर's picture

27 Aug 2009 - 7:13 pm | महेश हतोळकर

राहाय ल्यायच काय? न्हाय पैशे बी मागनास आन् कापडं बी म्हून इचारलं. राग मानु नगस. पर तसच र्‍हानार हायस का? बग बाबा.
-----------------------------------------------------------------
येथे तेराव्याचे कूपन्स जमा करून घेतले जातील आणि त्यांचे नि:पक्षपाती पणे वाटप केले जाईल.
-----------------------------------------------------------------

अभिज्ञ's picture

27 Aug 2009 - 7:30 pm | अभिज्ञ

हम्म्,
डॉनराव
प्राध्यापकांचा संप मिटला आहे अन प्राध्यापकांच्या बहुतेक अटी मान्य देखील झाल्यात.
आता बोला.
:)

(सुज्ञ) अभिज्ञ

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

लिखाळ's picture

27 Aug 2009 - 9:48 pm | लिखाळ

मंदीच्या दिवसात आलेले हे शीर्षक पाहून अंमळ हळवा झालो, सचिंत झालो. तू तर अनेकांची व्यथा मांडली आहेस असेच वाटले. शांतपणे जीवन जगण्याची, काम न करता पैसा मिळवण्याची इच्छा कोणाची नसते रे.. (या पुढे.. रे..मित्रा..उसासा..वगैरे वगैरे)

अरे ((या पुढे.. रे..मित्रा..उसासा..वगैरे वगैरे)),

शुद्धलेखनाचा व हिब्रु भाषेचा मनापासुन तिरस्कार करतो कारण यातले आम्हाला घंटा कळत नाही, "स्वाहिली" भाषेवर पीयच्च्डी कारण्याचा विचार आहे,

शुद्धलेखनाची तिरस्कार कर रे..पण दुसर्‍या कोठल्या भाषेचा असा तिरस्कार नको !

-- लिखाळ.
आम्ही पैशामागे पळत नाही. त्याला आम्ही दामटून खिशात भरून ठेवतो ;)

हर्षद आनंदी's picture

27 Aug 2009 - 10:45 pm | हर्षद आनंदी

पुन्याच्या नायडुमध्ये (हास्पीटलात) संगणकावर याद्या करणारा हवा आहे, जाता काय?

तुमी धंद्याला का नाही लागत?
धंदा सुखाचा बरा, मानेवर जु नाय आणि मुसक्या आवळण्याचा, कुणाचा शेंबूड पुसण्याची पन गरज नाय...

१ नंबर.. .तुमी धंदा करा राव !!

टारझन's picture

27 Aug 2009 - 11:42 pm | टारझन

वेळ जात नाहीये का डॉणराव ? ;)

बाकी धागा अंमळ मजेशिर .. फक्त मस्करीची कुस्करी होणार नाही एवढी काळजी घ्या !
@ परा : "वर्षातुन २ वेळा १ शर्ट, १ टी-शर्ट, २ प्यांटी मिळतील." ह्यासाठी "प्यांटा" हा शब्द वापरता येत नव्हता का ? असो !

-(जॉबप्रेमी) टारोबा रिकृटर

विनायक प्रभू's picture

28 Aug 2009 - 11:56 am | विनायक प्रभू

साधा.
नक्कीच दिलासा मिळेल.

निमीत्त मात्र's picture

28 Aug 2009 - 10:53 pm | निमीत्त मात्र

कुणावर रोख आहे, संदर्भ काय आहे काही समजले नाही
सामान्य मिपाकरांच्या आकलना बाहेरचा धागा आणि प्रतिसाद.
त्यामुळे आमचा पास..