भोपळ्याची (दुधी) कोफ्ता करी
ज्याला भोपळा आवडतो/ नाही आवडत त्यांनासुद्धा आवडेल.... (असे मला वाटते)
साहित्य :
१ मध्यम आकाराचा भोपळा(दुधी),
१/२ वाटी बेसन,
२ कांदे,
२ टोमॅटो ,
६-७ पाकळ्या लसून,
१ वाटी तेल,
१ चमचा तिखट, मिठ , हळद, जीरे इ.
कृती :
प्रथम भोपळा सोलून घ्या, नंतर त्याला किसनीने किसुन घ्या. त्याला पाणी सुटले असेल ते सगळे पिळुन काढुन घेणे. मग त्यात बेसन, थोडीशी चविपुरती तिखट, मीठ , हळ्द आणि हे सगळे नीट मिक्स करुन त्याचे पाहिजे त्या आकाराचे गोळे करुन घेणे. व ते तेल गरम करुन गोळे मंद आचेवर तळुन घेणे.
कांदा व टोमॅटो बारीक किसुन घेणे (मिक्सरमधुन पेस्ट केली तरि चालेल), लसुन ठेचुन घेणे, कढईत तेल गरम करुन जिरे टाकावे, मग कांदा (पेस्ट) टाकुन तो तांबुस झाल्यावर टोमॅटो(पेस्ट) टाकावी हे चांगले तेल सुटेल तोपर्यंत चांगले होवु द्यावे आणि मग त्यात तिखट, हळ्द टाकुन थोडा वेळ होवु द्यावे आणि ग्रेव्ही च्या घट्ट पणानुसार पाणि टाकुन चवीनुसार मीठ घालावे व चांगली उकळी येवु द्यावी. आणि त्यानंतर तळ्लेली गोळे टाकुन एक उकळि येवु द्यावी. गॅस बंद करुन गरम गरम पोळी/पराठ्या सोबत खा.
प्रतिक्रिया
26 Aug 2009 - 11:30 am | चटोरी वैशू
ऑफिस मधे बसुन लिहीले आहे चुक भुल द्यावी घ्यावी
27 Aug 2009 - 5:22 pm | खडूस
no doubt she is THE BEST
मा तुझे सलाम
- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
26 Aug 2009 - 11:33 am | चिरोटा
करुन बघायला पाहिजे.
(हे ही ऑफिसमध्ये बसुन लिहिले आहे!!)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
26 Aug 2009 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार
फोटु ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
26 Aug 2009 - 12:31 pm | अवलिया
फटु नसल्याने प्रतिक्रिया काढुन टाकली आहे.
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
26 Aug 2009 - 7:18 pm | सूहास (not verified)
प्रतिक्रिया नसल्याने फटु काढुन टाकला आहे.
--नावालिया
सू हा स...
26 Aug 2009 - 12:51 pm | विकि
बर झाले ही रेसीपी दिलीत,करून बघतो.भोपळ्याच्या भाजीच्या अजून कृती असेल तर लिहा.
आपला(सध्या पुर्णपणे प्रेमामध्ये पडलेला आणि या अगोदर बराच वेळा आपटलेला)
मिपा २००९ सुधारीत आवृत्ती
भोपे भाऊ
26 Aug 2009 - 1:18 pm | चिरोटा
अवांतर्-या वेळी प्रेमात भोपळा नको असेल तर तिला ही पा.क्रु. करुन खिलवा.! जर यशस्वी झालात तर चटोरी ताईंचे आभार माना.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
26 Aug 2009 - 2:24 pm | चटोरी वैशू
मी ही करी केली तेव्हा घरातली वीज गेली होती त्यामुळे फोटो नाही घेता आला.... पण पुढच्या वेळेला नक्कि टाकेल....
26 Aug 2009 - 5:23 pm | वेताळ
फोटो शिवाय कशी प्रतिक्रिया लिहणार?
वेताळ
26 Aug 2009 - 5:24 pm | वेताळ
फोटो शिवाय कशी प्रतिक्रिया लिहणार?
वेताळ
26 Aug 2009 - 6:58 pm | चकली
मस्तच आहे रेसिपी,
चकली
http://chakali.blogspot.com
27 Aug 2009 - 7:10 am | चटोरी वैशू
आपली इच्छा...
16 Sep 2009 - 7:51 am | चटोरी वैशू
27 Aug 2009 - 7:56 am | चटोरी वैशू
#:S
27 Aug 2009 - 9:39 am | पिवळा डांबिस
केवळ भूतदयेपोटी प्रकाटाआ!!!!