माझी पण एक (पाडीव) कविता (काव्यरस - टिंगल)

युयुत्सु's picture
युयुत्सु in जे न देखे रवी...
20 Aug 2009 - 9:40 am

बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो
असामान्य वा असो अमान्य बसुनी कविता कवि वितो

बुध्दीची मम झेप नवी ही नेते बरं का दिगंतरी
पाहून तिजला भरेल धडकी प्रिय मित्रा तव हृदंतरी

ग्रहगोलांची अगणित सूत्रे अणुरेणूंची पण तशीच ती
विश्वाच्या व्यापाहून भयंकर जीवघेण्या त्या मात्रांची

रे प्रिय मित्रा हितगुज करण्या मार्ग नवा मी अनुसरला
झटापटीने कविता करता शुद्ध कशाची नुरे मजला

व्याकरणाची फिकीर नसे पण प्रासासाठी व्याकुळता
काकुळतीने पणास लावी पणजोबांचे(*) पुण्य आता

* माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते. कै. राम गणेश गडकर्‍यांचे ते जीवश्च कंठश्च मित्र. गडकर्‍यांच्या 'एकच प्याला' या नाटकातील पदे आणी प्रस्तावना गुर्जरांची आहेत.

कविता

प्रतिक्रिया

कपिल काळे's picture

20 Aug 2009 - 10:14 am | कपिल काळे

एक कविता करता करता इ तकी दमछाक झाली?
असो.

नाना चे अजून एक वैशिष्ठ्य लक्षात आले..
<<बळेच शब्दा वेठीस धरूनी भाव नाना वाकवितो >>

अफजलखान लोखंडी तुळइ वाकवायचा आमचा नान्या भाव वाकवतो.
तूरडाळीचे भावसुद्धा वाकव रे नाना . जरासे.

(ह . घ्या बर्का!)

अवलिया's picture

20 Aug 2009 - 10:22 am | अवलिया

नाना चे अजून एक वैशिष्ठ्य लक्षात आले..
धन्यु रे कपिला... :)

तूरडाळीचे भावसुद्धा वाकव रे नाना . जरासे.
हरकत नाही, जरा माझ्या दुकानातील स्टाक खपु दे .. मग घेतो मनावर :)

बाकी कविता की काव्य जे काय आहे ते ज.म.ले. आहे असे म्हणायला माझी हरकत नाही.

वाचता वाचता शेवटी सांगे वडिलांची कीर्ति... अशा काही पंक्तींचे स्मरण झाले हे सांगावेसे वाटले, सांगितले. :)

--नाना चेंगट उर्फ अवलिया

कानडाऊ योगेशु's picture

20 Aug 2009 - 11:55 am | कानडाऊ योगेशु

बाप रे..तुम्हाला "हे" ही करता येते!!!! :O
चांगलेच जमले आहे..!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Aug 2009 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझे पणजोबा कै. विठ्ठल सीताराम गुर्जर हे मराठीतले जुन्या पिढीतील नामवंत साहित्यिक होते.

वि.स.गुर्जर यांच्या कथांबद्दल-वयक्तीक आयुष्याबद्दल काही लिहिता आले तर नक्की लिहा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

20 Aug 2009 - 9:56 pm | युयुत्सु

अवश्य विचार करीन.