पाककृती : सांझ सवेरा...

दिपाली पाटिल's picture
दिपाली पाटिल in पाककृती
17 Aug 2009 - 1:30 pm

गेल्या वर्षी ऑरलॅन्डो ,फ्लोरिडा ला गेलो होतो तेव्हा तिथे एका भारतीय हाटेला त खाल्लेला हा पदार्थ... तशी पाहता अगदी सामान्य पंजाबी डिश आहे पण प्रेझेंटेशन एकदम मस्त होतं म्हणुन मला जास्त आवडलं. :) , यातल्या पालक पनीर कॉम्बिनेशन मुळे सांझ सवेरा म्हणतात. :)

फोटो तसा यथा-तथा च आला आहे .. :)

वाढणी: ५-६

साहीत्यः

३-४ लवंगा
१ वेलदोडा
१ छोटी दालचीनी ची काडी
२-३ मिरे

सांझ सवेरा
१ जुडी पालक , फ्रोझन पालक पण चालेल पण मी ताजा पालक वापरला होता.
१ वाटी किसलेले पनीर (घरी करत असाल तर किसायची गरज पडणार नाही.)
२-३ टेस्पु. कॉर्नफ्लोर
१ छोटा चमचा तिखट पण लाल तिखट ही चालेल.(मी हिरवं तिखट वापरते कारण त्यामुळे रंग फार बदलत नाही. त्यासाठी एका चाळणी त तिखट हिरव्या मिरच्या घेउन त्यावर उकळतं पाणी ओतायचं आणि मिरच्या वाळवून तिखट बनवायचं. )
चवीनुसार मिठ
तेल

ग्रेवी:
१/२ वाटी तेल
२ टोमॅटो
१ कांदा
२-३ लसुण पाकळ्या
१ १/२ इंच आलं
१ -२ टेस्पू तिखट
१ टीस्पू गरम मसाला
१ टेस्पू धणे-जीरे पावडर
३ टेस्पू काजु
२-३ टेस्पू क्रिम /बटर(नसल्यास काही फरक पडत नाही.)
२ टेस्पू पनीर
२-२.१/२ कप गरम पाणी (ग्रेवी च्या घट्ट्पणावर अवलंबून आहे)

कृती:
१) किसलेल्या पनीर मधे मिठ टाकुन त्याचे मध्यम (अंदाजे लिंबाएवढे)आकाराचे गोळे बनवुन घ्या. १ वाटी पनीर मधे ८-१० बनतात.
२) पालक स्वच्छ धुवुन घ्यावा. एका पातेली त पाणी तापत ठेवावे. पाणी उकळले की त्यात थोडे मिठ टाकुन पालक टाकावा.
३) पालक ५-७ मि. उकळवावा, मग चाळणीत ओतुन त्यावर थंड पाणी सोडावे त्यामुळे पालकाचा रंग सुंदर हिरवा राहतो.
४) पालक हाताने घट्ट पिळुन घ्या (हे पाणी नंतर कशातही वापरता येतं.)आणि बारिक चिरुन घ्या.
५) आता पालक + कॉर्नफ्लोर्+तिखट+ मिठ एकत्र करुन घ्यावे.
६) एका कढल्यात तेल तापत ठेवावे.
७) पालकाचा एक गोळा हातावर घेउन त्याला जरा चपटवावे (पालकाची पारी फार पातळ नसावी, माझी पारी थोडी पातळ झाली आहे) मग त्यात पनीर चा गोळा ठेवुन पनीर पुर्णपणे झाकुन टाकावे. हे काम अगदी हलक्या हाताने करावे.
८) आधी एक कोफ्ता तळुन पहावा जर पालक सुटत असेल तर अजुन कॉर्नफ्लोर टाकावे.
९) असे सगळे कोफ्ते छान कुरकुरीत तळुन घ्यावे. (रंग बदलु देऊ नये...)
१०) कोफ्ते अलगद हाताने अर्ध्यातुन कापुन बाजुला ठेवावे.
११) मिक्सर मधे टोमॅटो + कांदा + लसुण पाकळ्या+इंच आलं+ काजु ची बारिक पेस्ट करुन घ्यावी.
१२) आता गरम तेलात (जास्त रिच डिश हवी असल्यास बटर ही वापरु शकता) लवंगा,वेलदोडा,दालचीनी ची काडी, मिरे टाकावे.
१३) त्यात बारिक केलेली पेस्ट,गरम मसाला, धणे-जीरे पावडर,तिखट टाकावे आणि तेल सुटेपर्यंत सारखे हलवत रहावे नाहीतर कांद्याचा कच्चा वास येतो.
१४) तेल सुटले की गरम पाणी टाकावे आणि कमी आंचेवर २ उकळ्या येऊ द्याव्यात.
१५) गॅस बंद करुन किसलेले पनीर टाकावे.

सर्व्ह करताना वाटीत ग्रेवी टाकुन मग वरुन कापलेले कोफ्ते ठेवावे, फार सुंदर दिसतात. ही ग्रेवी फार पातळ नसते.

प्रतिक्रिया

स्मिता श्रीपाद's picture

17 Aug 2009 - 2:01 pm | स्मिता श्रीपाद

मस्त दिसतंय...

नक्की करुन पाहीन :-)

सुनील's picture

17 Aug 2009 - 2:13 pm | सुनील

पाकृ दिसतेय छान पण नावाशी याचा संबंध काय ते समजले नाही. (म्हणजे सकाळच्या जेवणासाठी भरपूर करून ठेवावी आणि रात्रीच्या जेवणालाही वापरावी, असे काही आहे काय?) ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

समंजस's picture

17 Aug 2009 - 2:15 pm | समंजस

झक्कास!!
बरेच दिवसां पासून तुमची पाककृती आली नाही हा विचार करत होतो!! :)
करून बघावी लागेल!!

मदनबाण's picture

17 Aug 2009 - 2:16 pm | मदनबाण

फोटो तसा यथा-तथा च आला आहे .
असं म्हणता ठीक आहे...पण हा फोटो पाहुनसुद्धा भुक लागते !!! :)

(पनीर क्रेझी)
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

पर्नल नेने मराठे's picture

17 Aug 2009 - 2:27 pm | पर्नल नेने मराठे

=P~ चला लन्चला जावे
चुचु

टारझन's picture

17 Aug 2009 - 4:56 pm | टारझन

ती लाळ आवर आधी !! =)) नाय तर लंच ला जाईस्तो डि-हायड्रेशन मुळे दावखाण्यात* भरती करावं लागायचं !!

वा दिपाली !! पाकॄ दिसायला लै भारी !! पणिर तसा ही आपल्याला लई आवडतो :)
जियो !!!

-(पणिरप्रेमी) टारोबा डीनर

चिरोटा's picture

17 Aug 2009 - 3:15 pm | चिरोटा

मस्त दिसतोय. रफी/आशाचे एक गाणे होते ते आठवले-
"यही है वो सांझ (और) सवेरा... जिसके लिये तडपे हम सारा जीवनभर.."
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रभाकर पेठकर's picture

17 Aug 2009 - 3:27 pm | प्रभाकर पेठकर

छायाचित्र आकर्षक आहे. एकूण पाककृती वाचता वाचता चमचमीत चवीचा अंदाज येतो.
पालक आणि पनीर दोन्ही आवडते 'आयटम' आहेत. लवकरच करून पाहतो.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

रेवती's picture

17 Aug 2009 - 4:26 pm | रेवती

पाकृ वेगळीच दिसते आहे. फोटो छान आलाय. पालक बारीक चिरून कॉर्नफ्लोर, तिखट मीठ घालून त्याचे कव्हर बनवणे ही आयडीया मस्त आहे पण अवघड असावी असा अंदाज आहे.

रेवती

मीनल's picture

17 Aug 2009 - 4:30 pm | मीनल

संजिव कपूर च्या ऑन लाईन रेसिपी साठी साईन केले की ही डिश आहे त्यात. नाव ही हेच दिले आहे.
यातले कोफ्ते चटणी बरोबर स्टार्टर म्हणूनही खाता येतात.
खरोखर आकर्षक दिसतात ह हे कोफ्ते.

मीनल.

सहज's picture

17 Aug 2009 - 6:31 pm | सहज

मस्त! केलीच पाहीजे अशी अजुन एक डीश.
दिपाली तै धन्यु.

ऋषिकेश's picture

17 Aug 2009 - 7:43 pm | ऋषिकेश

अहा! काय भन्नाट लुक आहे..
कधी येऊ खायला बोला?

ऋषिकेश
------------------
संध्याकाळचे ७ वाजून ४३ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक बडबडगीत "कशासाठी पोटासाठी...."

दशानन's picture

17 Aug 2009 - 8:06 pm | दशानन

असेच म्हणतो....

दिपाली बोलव कधी तरी खायला.... :)

***

तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

शाल्मली's picture

17 Aug 2009 - 8:01 pm | शाल्मली

व्वा!
एकदम टेम्प्टिंग दिसते आहे सांज सवेरा डीश!
मी मागे एकदा खाल्ली होती त्यात एका डीश मधे निम्मी हिरवी ग्रेव्ही (पालकाची) आणि निम्मी पांढरी ग्रेव्ही अशी भाजी होती. त्याचे नाव सांज-सवेरा असे होते ते आठवते आहे..

मस्त! अशाही पद्धतीने करुन पहायला हवी!

--शाल्मली.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Aug 2009 - 8:43 pm | llपुण्याचे पेशवेll

ही सांझ सवेरा आणि शाम-सवेरा एकच का?
आमच्या इथे सगळीकडे शाम-सवेरा मिळते.

(शामसवेराप्रेमी)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

दिपाली पाटिल's picture

17 Aug 2009 - 8:47 pm | दिपाली पाटिल

मिनल...ही डिश संजीव कपूर ची 'सिग्नेचर डिश' आहे , त्याच्या "यलो चिलीज" या रेस्टॉरंट मधली एकदम Hit डिश आहे बहुतेक.
ऋषिकेश, राजे - कधिही या जेवायला...
प्रभाकर - ही डिश तशी चमचमीत आहे खरं...
रेवती- फार अवघड नाहीये , ते तसं वाटतय कारण पाकृ मोठी आहे फार पण वेळखाऊ आहे ... :D

दिपाली :)

पर्नल नेने मराठे's picture

29 Aug 2009 - 2:04 pm | पर्नल नेने मराठे

माझ्ह्या गावात खाना खजाना आहे, जाउन ट्राय करेन
चुचु

प्राजु's picture

17 Aug 2009 - 8:53 pm | प्राजु

बास!! काहीही म्हणत नाही बाकी!!
कधी करावी बरं ही आता?? ... :?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

18 Aug 2009 - 11:05 am | दिपाली पाटिल

धन्यवाद प्राजु, कधीही कर सांझ-सवेरा, मस्त लागते.. :)

दिपाली :)

मसक्कली's picture

22 Aug 2009 - 1:49 pm | मसक्कली

फोटो तर लै भरि दिसतोय........;)
झेण्डया चे रन्ग.......:)
यला खर तर तिरन्गि सांझ सवेरा म्हणल पाहिजे....

मस्तच ........ =P~