साहित्यः-
लालबुंद टोमॅटो ४ मध्यम आकाराचे.
चण्याचे पिठ (बेसन) मावेल इतके.
कांदे २
आलं १ "
कोथिंबीर आवडीनुसार.
काश्मिरी तिखट १ टीस्पून
मीठ चवीनुसार.
चटणी साठी:
चिरलेली कोथिंबीर १ वाटी
चिरलेला पुदीना १ वाटी
हिरव्या मिरच्या ३
मीठ चवीनुसार
लिंबू रस १ टेबलस्पून
इतरः
ब्रेड स्लाईस १, कडा काढून
टोमॅटो केचप
अमूल बटर
कृती:
चटणीसाठीचे साहित्य मिक्सरमध्ये फिरवून मुलायम वाटून चटणी करून घ्या.
कांदे बारीक चिरुन घ्या.
आल्याचे बारिक तुकडे करून घ्या.
टोमॅटोची प्यूरी करून गाळून घ्या. त्यात मावेल इतके चण्याचे पीठ (बेसन) घाला.फार पातळ नको पण फ्राय पॅन मध्ये ओतल्यावर पसरले पाहिजे. (साधारणपणे मधासारखे मध्यम घट्ट असावे.)
त्यात एक कांदा (बारीक चिरलेला), आले (बारीक चॉप केलेले), बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ इत्यादी साहित्य घालून नीट मिसळा. आवश्यकता भासल्यास थोडे पाणी घाला.
फ्राय पॅन मध्ये एक चमचा तेल घालून तापवा. तेल तापले की त्यावर एक डाव वरील मिश्रण घाला. फ्रायपॅन फिरवून ते नीट पसरवून घ्या. (उत्तपा सारखे जाडसर असावे). झाकण ठेवून शिजवा. शिजल्यावर उलटवून दूसर्या बाजूनेही शिजवून घ्या. (उलटवल्यावर वर झाकण ठेवायला नको.)
पूर्ण शिजल्यावर प्लेट मध्ये काढून घ्या.
एका छोट्या चटणी वाटीत अर्ध्या भागात हिरवी चटणी आणि उरलेल्या अर्ध्या भागात टोमॅटो केचप घाला. ऑम्लेट शेजारी चटणी/केचपची वाटी, त्रिकोणी कापलेले स्लाईस, बारीक चिरलेला कांदा ठेवून ऑम्लेटवर मध्यभागी चमचाभर अमूल बटर टाकून सर्व करा.
टीपः
खाताना ऑम्लेटवर अमूल बटर, चटणी, केचप पसरवून ब्रेडचा तुकडा तोडून तो ऑम्लेटच्या तुकड्यावर ठेवून खावा.
टोमॅटो गोडसर असतील तर मिश्रणात किंचित लिंबू पिळावे.
टोमॅटो कमी लाल असतील तर मिश्रणात चमचाभर टोमॅटो केचप मिसळावे.
मैद्याच्या पांढर्या पावापेक्षा, गव्हाच्या ब्राऊन ब्रेडचा स्लाईस जास्त चांगला लागतो.
शुभेच्छा....!
प्रतिक्रिया
16 Aug 2009 - 1:42 pm | JAGOMOHANPYARE
सुन्दर... चित्र बघूनच चव समजली..... आजचा डेस्क टॉप ... :)
16 Aug 2009 - 1:49 pm | गणपा
वाह काका, बर्याच दिवसांनी तुमची पाककृती आली..
ऑम्लेट नेहमी अंड्याचेच खाल्लय. अस पण करुन पाहतो आता.
बाकी फोटो नेहमी सारखाच जीवघेणा.
16 Aug 2009 - 1:53 pm | अरुण वडुलेकर
टोमॅटो ऑम्लेटची सही पाककृति. धन्यवाद.
उडपी डोश्याच्याच पिठात टोमॅटोचे तुकडे घालून जाडसर डोसा (किंवा) उत्तपा घालून टोमॅटो ऑम्लेट म्हणून चक्क फसवतो हे आता
ध्यानांत आले. आता हा मी स्वत: करून पहीन.
16 Aug 2009 - 2:10 pm | टारझन
अ रे बा प रे !!
के व ळ अ प्र ति म !!!
लवकरंच यत्नकर्म मधे स्टमकाग्नी शांत केला पाहिजे
-(खाद्यप्रेमी ) टारोबा इटर
16 Aug 2009 - 3:17 pm | क्रान्ति
मस्त चविष्ट पाकृ.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
16 Aug 2009 - 3:33 pm | मदनबाण
आहाहा...फोटु वरुनच चवीची कल्पना आली !!! :)
मैद्याच्या पांढर्या पावापेक्षा, गव्हाच्या ब्राऊन ब्रेडचा स्लाईस जास्त चांगला लागतो.
होय...अगदी खरयं. :)
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
16 Aug 2009 - 4:12 pm | विसोबा खेचर
शब्द नाहीत...!
तात्या.
16 Aug 2009 - 4:51 pm | चतुरंग
ख अ ल्ला आ स अ !
बरेच दिवसांनी एका सा ध्या सोप्या परंतु अतिशय चविष्ट पाकृचे फोटॉतून का होईना, सदेह दर्शन झाले. धन्य झालो!
(यज्ञकर्मातच आहुती द्यावी म्हणतो. बघूया कधी योग आहे!)
(गर्गमुनी)चतुरंग
16 Aug 2009 - 5:43 pm | लवंगी
आमलेट खरपूस दिसतय.
16 Aug 2009 - 5:46 pm | रेवती
टोमॅटो ऑम्लेटची नेहमीपेक्षा वेगळी कृती आहे. नक्कीच करून पाहीन व कळवीन. कृतीप्रमाणे फोटूही चविष्ट आलाय.
एका वाटीत अर्धा भाग चटणी व अर्धा भाग केचप ही कल्पना मजेशीर वाटली.
रेवती
16 Aug 2009 - 6:12 pm | विंजिनेर
ह्मम्म्म...
टॉमॅटो ऑमलेट... मला तरी ही पाकृ म्हणजे खर्या ऑमलेटशी केलेली प्रतारणा वाटते. त्यामुळे तरी चित्रातच बरी...
असो...
16 Aug 2009 - 6:21 pm | स्वाती२
मस्त फोटो. उद्याच्या डब्याची सोय झाली. अर्धा भाग चटणी अर्धा भाग केचप ची आयडिया आवडली.
16 Aug 2009 - 7:02 pm | सुनील
अप्रतिम. आजवर टोमॅटो ऑमलेट म्हणजे शाकाहारी दिवसात अंड्याच्या ऑमलेटऐवजी खाण्याचा प्रकार असेच समजत होतो. तो गैरसमज आता दूर झाला!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Aug 2009 - 8:24 pm | चकली
मस्त दिसतय!
>>टोमॅटो कमी लाल असतील तर मिश्रणात चमचाभर टोमॅटो केचप मिसळावे.
ही टिप आवडली.. मस्त रंग येतो.
चकली
http://chakali.blogspot.com
16 Aug 2009 - 10:10 pm | प्रभाकर पेठकर
JAGOMOHANPYARE, गणपा, अरुण वडूलेकर, टारझन, क्रान्ति, मदनबाण, विसोबा खेचर, चतुरंग, लवंगी, रेवती, विंजिनेर, स्वाती२, सुनिल आणि चकली.
सर्वांचे मनःपूर्वक आभार.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
17 Aug 2009 - 9:15 am | आशिष सुर्वे
तोंडाल पाणी सुटले होs s s s !!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
17 Aug 2009 - 1:39 pm | समंजस
ह्याच पाककृतीच्या शोधात होतो!!
धन्यवाद काका :)
22 Aug 2009 - 2:28 pm | मसक्कली
फोटो बगुन पाणी सुटल तोन्डाला =P~
बकि प्रेझन्टेशन तर उत्क्रुस्ट.....:)
24 Aug 2009 - 10:58 am | प्रभाकर पेठकर
९६-मराठा, समंजस आणि मसक्कली धन्यवाद.
मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
13 Sep 2009 - 4:45 pm | chipatakhdumdum
काही कारणामुळे मी आम्बोळीच पीठ खात नाही, त्यामुळे मला आवडत असूनही होटेलमध्ये टोमेटो आम्लेट खाउ शकत नव्हतो. तुम्ही माझी चान्गलीच सोय केली, म्हणून तुमचा आभारी आहे.
28 Sep 2009 - 6:22 am | रेवती
आजच टोमॅटो ऑम्लेट्स केली होती. फारच चविष्ट पाककृती आहे. आपण सांगितल्याप्रमाणे वाटीत अर्धा भाग पुदिन्याची चटणी व अर्धा भाग केचप असे घेतले होते. यावेळेस फ्रेश टोमॅटो प्युरे वापरली, पुढच्या वेळेस तयार प्युरे वापरून बघीन. आपण दिलेल्या सुचनेनुसार गव्हाचा ब्रेड वापरला. व्हाईट ब्रेडपेक्षा नक्कीच चांगला लागला. आणखी एका चांगल्या पाकृसाठी धन्यवाद!
रेवती
28 Sep 2009 - 10:25 am | प्रभाकर पेठकर
chipatakhdumdum धन्यवाद.
रेवती,
टोमॅटो ऑम्लेट ही मलाही फार आवडणारी पाककृती आहे. आणि ती व्यवस्थित सजविल्यावर फारच भन्नाट दिसते. धन्यवाद.
आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
24 Oct 2012 - 12:45 pm | कपिलमुनी
टोमॅटो ऑम्लेट सार्ख्या साध्या पदार्थाला एक्दम फाईव्ह स्टार बनवलेत !!
लै भारी !! प्रेझेंटेशन तर दिलखेचक !!
24 Oct 2012 - 1:42 pm | सर्वसाक्षी
आता असे करुन पाहीले पाहिजे!
25 Oct 2012 - 1:23 pm | कच्ची कैरी
मस्तच !! आता उद्या नाश्त्याला मी हेच बनवनार बरी आठवण करुन दिलीत ,धन्यवाद :)
26 Oct 2012 - 4:17 pm | बापू मामा
एक नंबर पाककृती
26 Oct 2012 - 6:16 pm | माम्लेदारचा पन्खा
नुसता फोटो पाहूनच कळतंय ओमलेट मस्तच झालेलं असणार.......
फाईव स्टार हॉटेलचा शेफ सुद्धा लाजेल अशी डिश पाहून......
मजा आली...........
26 Oct 2012 - 6:58 pm | अनन्न्या
कसला सुंदर आलाय!! भारी!!
26 Oct 2012 - 9:46 pm | शुचि
अफलातून फोटो.... भूक चाळवली आहे :(
26 Oct 2012 - 10:07 pm | पप्पु अंकल
आवडल्या गेली आहे