पुरुषांचेही नियम- ही घ्या उदाहरणे

अमृतांजन's picture
अमृतांजन in काथ्याकूट
14 Aug 2009 - 11:51 am
गाभा: 

आज एक खूप फनी फॉरवर्ड आली. त्यात एक ऍटॅचमेंट आहे त्यात लिहीले आहे- "आम्ही स्त्रीयांनी पुरुषांसाठी घालून दिलेले नियम बऱ्याचदा ऐकलेत; आता वेळ आली आहे पुरुषांनी काही नियम करण्याची."

पुढे काही नियम आहेत ते भाषांतर करुन त्यातील मासलेदार नमुने येथे दिली आहेत-

१. तू जाड झाली आहेस असे तुलाच वाटत असेल तर तू सरळ जाडी कमी करायला सुरुवात करावीस; आम्हाला विचारु नये की, "मी जाड झाली आहे का?"
२. डोकेदुखी सलग १७ महिने असेल तर जनरली डॉक्टरला दाखवतात
३. तुला जर काही सांगायचे असेल तर ते कमर्शियल ब्रेकमधे सांगावेस
४. कोलंबसला कोणत्याही दिशादर्शकाची गरज पडली नाही, आम्हालाही ती नसते
५. आम्ही जर विचारले की, "काही प्रॉब्लेम आहे का?" आणि तुझे उत्तर "काही नाही" असे असेल तर आम्हाला काही घेणे नाही. आम्हाला माहिती असते की, तू खोटे बोलत आहेस पण एकदा तू तसे म्हणाल्यानंतर त्या भानगडीत आम्हाला नाक खूप्सायला आवडत नाही.
६. तू जर असा प्रश्न विचारला असशील की ज्याला उत्तर तुलाच नको असेल तर तुला न आवडणारे उत्तर ऐकायची सवय कर
७. आपल्याला जेव्हा बाहेर जायचे असेल तेव्हा खरतर तू जो काही कोणताही ड्रेस घातलेला असशील तो खरच चांगले असतोच.
८. माझा बांधा शेपदार आहे; गोलाकार हा ही एक शेपच आहे.

काही U/V-18 ला साजेसे नियम मी अनुवाद केले नाहीत. खरडवहीतून देण्यात येतील.

मला खात्री आहे की, मिपाकर पुरुष असे नियम करायला सरसावून पुढे येतील म्हणून आपल्या सेवेसी हे वरील नियम दाखल. फ़्रायडे नाईटला थोडासा विरंगुळा!

प्रतिक्रिया

योगी९००'s picture

14 Aug 2009 - 12:21 pm | योगी९००

आवडले..

माझ्या खरडवहीत आपले स्वागत आहे.

खादाडमाऊ

पाषाणभेद's picture

14 Aug 2009 - 12:24 pm | पाषाणभेद

१) साडी घ्यायची असेल तर डोक्यात आधीच डिझाईन पक्के करून ठेवणे. नंतर कटकट करू नये. साडिविक्रेता (ही) पुरूषच असतो.
२) तुझ्या माहेरच्या होणार्‍या फोनचे पैसे तुच भरत चल.

माझ्याही खरडवहीत आपले स्वागत आहे.

अवातंर : नियम ठिक आहेत पण नंतरचे भांडण कोण मिटवायला येणार?

वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

अमृतांजन's picture

14 Aug 2009 - 1:14 pm | अमृतांजन

नियम ठिक आहेत पण नंतरचे भांडण कोण मिटवायला येणार?

नियम वाचून दाखवायच्या आधी एक स्ट्राँग डिस्क्लेमर वाचून दाखवायचे की झाले.

आशिष सुर्वे's picture

14 Aug 2009 - 12:25 pm | आशिष सुर्वे

छान!
येऊद्यात.. आमच्या खरडवहीला आनंदच होईल!!
आणि आम्हाला... ;)
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

अवलिया's picture

14 Aug 2009 - 12:32 pm | अवलिया

हा हा हा

येवुन जा आमच्या खवमधे एकदा !

--अवलिया

अमृतांजन's picture

14 Aug 2009 - 12:37 pm | अमृतांजन

मागणीनुसार पुरवठा करण्यात आला आहे!

अमृतांजन's picture

14 Aug 2009 - 12:40 pm | अमृतांजन

आणखी एक नियम [ताजा-ताजा]

पुरुषांनी मिपावर एखादा धागा तयार केला की, त्याचे विड्म्बनात्म्क अथवा तस्साच दुसरा धागा तयार करु नये.

हर्षद आनंदी's picture

14 Aug 2009 - 1:21 pm | हर्षद आनंदी

बाकी नियम अफाट, अजुन लग्नाचा अनुभव नाही म्हणुन बायकोची कटकट देखील नाही,... पण ज्ञान वाया जात नाही म्हणतात,

तसे मला अजुन तरी मला तुळशीबाग, साड्यांची दुकाने इथे कंपनी द्यायला आवडते, (तेवढाच नजरेला व्यायाम, आणि वैविध्याचे सहज दर्शन) ;)

अमृतांजन's picture

14 Aug 2009 - 1:39 pm | अमृतांजन

सगळाच आनंदी-आनंद! [हर्षद आनंद]

मस्त कलंदर's picture

14 Aug 2009 - 2:23 pm | मस्त कलंदर

सुटलात आमच्या लेखाच्या तावडीतून!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

ज्ञानेश...'s picture

14 Aug 2009 - 1:25 pm | ज्ञानेश...

आमच्याही ख.व.मधे येऊन जावा.
जमल्यास इंग्रजीतूनच सगळी मेल डकवावी.

"Great Power Comes With Great Responsibilities"

शैलेन्द्र's picture

14 Aug 2009 - 2:31 pm | शैलेन्द्र

माझीही ख व आपली वाट पाहत आहे.

खालिद's picture

14 Aug 2009 - 4:26 pm | खालिद

तेवढीच ज्ञानाची आदान्प्रदान होईल!!!

अरुण वडुलेकर's picture

14 Aug 2009 - 4:33 pm | अरुण वडुलेकर

लग्नाच अनुभव नाही म्हणता आणि म्हणूनच (बहुदा) हर्षद आनंदी !!

अरुण वडुलेकर's picture

14 Aug 2009 - 4:34 pm | अरुण वडुलेकर

लग्नाच अनुभव नाही म्हणता आणि म्हणूनच (बहुदा) हर्षद आनंदी !!

llपुण्याचे पेशवेll's picture

14 Aug 2009 - 10:55 pm | llपुण्याचे पेशवेll

या या आमच्याही खरडवहीत आपले स्वागत आहे.

(अविवाहीत म्हणून आनंदी)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विश्वेश's picture

15 Aug 2009 - 8:39 am | विश्वेश

आमच्या खव मधे