ईस्ट कोस्ट स्पेश्शल!!!!

वरदा's picture
वरदा in जनातलं, मनातलं
21 Feb 2008 - 6:54 am

मी, प्राजु, धनंजय आणि मुक्तसुनीत एवढे जमलो अजुन कोण कोण आहे?
न्यूजर्सी ला जमूयात माझ्या घरीही हरकत नाही..किंवा हॉटेलही भरपूर आहेत....बोला कधी जमूयात? एप्रिलच्या आसपास म्हणाल तर माझ्याकडे या बार्बेक्यू करु....विंटर मधे किती जणांना जमेल माहीत नाही....

मौजमजा

प्रतिक्रिया

वरदा's picture

21 Feb 2008 - 6:57 am | वरदा

चतुरंग तुमचं पोस्ट नाही वाचलं..तर आपणही ५ जण झालो की

प्राजु's picture

21 Feb 2008 - 7:00 am | प्राजु

एकदम मान्य....

नाहीतर माझ्याकडेही चालेल.. मॅस आणि न्युजर्सी-न्युयॉर्क यांच्या मध्ये माझ्याकडे मस्त कट्टा जमवू...

- प्राजु.

न्यूजर्सीत जरा हॉटेल भरपूर आहेत म्हणून आणि शॉपिंग करायला मिळेल ना सगळ्यांना म्हणून म्हटलं या इथे....मला कुठेही चालेल.....

प्राजु's picture

21 Feb 2008 - 7:09 am | प्राजु

शॉपिंग वगैरे.... असं काही बोललीस का....?
हम्म..... ह्या मोहात नको पडू प्राजु.. नको पडू.. नको... ठिक आहे वरदा म्हणतेच आहे तर.... न्युजर्सि...डन्न्न्न्न...!

- प्राजु

विकास's picture

21 Feb 2008 - 7:05 am | विकास

इस्टकोस्टचे कदाचीत पहील्यांदा भेटणे माझे आणि धनंजयचे झाले असावे...

मॅस की न्यूजर्सी?

विकास's picture

21 Feb 2008 - 7:14 am | विकास

मी बॉस्टनला (मॅस) राहतो.

प्राजु's picture

21 Feb 2008 - 7:17 am | प्राजु

मॅसला तर चतुरंग ही राहतात... ठरवा.. मार्च मध्ये ठरवंल तर फारच उत्तम.. एप्रिल ला भारताच्या दौर्‍यावर मी जाण्याची शक्यता आहे.. खास आंबे खाण्यासाठी.

- प्राजु

बेसनलाडू's picture

21 Feb 2008 - 7:52 am | बेसनलाडू

एप्रिल ला भारताच्या दौर्‍यावर मी जाण्याची शक्यता आहे.. खास आंबे खाण्यासाठी.
--- होय मी पण!! ईस्ट-वेस्ट सगळे कोस्ट सोडून!!! :)
(भारतीय!)बेसनलाडू

मानस's picture

21 Feb 2008 - 7:20 am | मानस

इस्टकोस्ट वाले आम्ही सुद्धा, मुक्तसुनितच्या जवळ

वरदा's picture

21 Feb 2008 - 7:38 am | वरदा

मग ठरलं का न्यू जर्सी? हे हे हे प्राजु गाडी भरून सामान नेशील बघ्....अच्छा विकास म्हणून तुम्ही चतुरंगना भेटला होतात तर....

वरदा's picture

21 Feb 2008 - 7:41 am | वरदा

आपली टीम मोठी आहे तर ...वेलकम मानस...अगं प्राजु तुम्हाला चालणार असेल तर मला चालेल मार्च मला वाटलं तुम्हाला मुलांना घेऊन मुद्दाम थंडीत नको वाटेल्..कारण अजुन थंडी कमी व्हायची काही चिन्ह दिसत नाहीत...

एप्रिलमधे थंडीही थोडी कमी होते आणि बर्फ नसल्यामुळे ड्रायव्हिंग सुध्दा थोडं सोपं होतं.

विकास तू खुद्द बॉस्टनला आहेस का कुठे उपनगरात?
मी विल्मिंग्टन ला आहे.

चतुरंग

विकास's picture

21 Feb 2008 - 9:00 pm | विकास

मी समरव्हीलमधे राहतो.

वरदा's picture

21 Feb 2008 - 7:54 am | वरदा

तरी आणा नं आम्हाला ३ वर्षात एकही हापूस नाही खाल्ला...आई रस आटवून ठेवते माझ्यासाठी पण आंबा डायरेक्ट खाण्यातली मजा औरच....

प्राजु's picture

21 Feb 2008 - 9:19 am | प्राजु

हो नक्की आणेन. पण वरदा.. मार्चमध्येच जमवू आपला कट्टा.

आवांतर : मधे एकदा इथे आम्ही मेक्सिकन आंबा आणला होता... काय तो आंबा!!...देवा हा आंबा कोणाही भारतीयावर खाण्याची वेळ आणू नको. या फिरंग्यांना काय कळणार हापूस आंबा म्हणजे काय?? त्याचा तो थाट काय.. आमरस काय?? आंबावडी काय...?

- प्राजु

धनंजय's picture

21 Feb 2008 - 10:22 am | धनंजय

पूर्वेकडे आहेत. मी मेरीलँड (उच्चार : मर्लन्)मध्ये, आणखी एक धनंजय न्यू जर्सीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Feb 2008 - 8:45 pm | llपुण्याचे पेशवेll

मी रहायला जर्सी सिटी मधे आहे.
कदाचित मार्चच्या ३र्‍या आठवड्यात मातृभूला परत जाण्याची शक्यता आहे. त्याआगोदर करावे सम्मेलन.
पुण्याचे पेशवे

नंदन's picture

21 Feb 2008 - 10:51 am | नंदन

वा, पूर्वेला बरीच मंडळी आहेत की. कट्ट्यासाठी शुभेच्छा.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

अरे रत्नांग्रित येणार आहे का कोणी?

एप्रिलमध्ये मिसाळपाववाल्यांना आमच्याकडे आवतण आंबे खायचं.

खेड्यात रहायची तयारी पाहिजे हो. विहिरीचं पाणी प्यायला लागेल. बिसलेरी वगैरे भानगड नाही.

आपला,
(आदिवासी) धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

प्राजु's picture

21 Feb 2008 - 7:04 pm | प्राजु

धोंडोपंत काका,
मी एप्रिलमध्ये भारतात येणार आहे.. तेव्हा येऊ का रत्नांग्रिला..? मला आवडेल तुमच्या कडे यायला. माझ्या आत्याकडे चिपळूणात केतकी गावी मी बर्‍याच वेळेला गेले आहे. तेव्हा येऊ का?

- प्राजु

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 8:59 pm | विसोबा खेचर

काय रे मुलांनो, सकाळपासून काय गडबड सुरू आहे तुमची? मी पण येऊ का तुमच्या कट्ट्याला? :)

आणि काय रे मेल्यांनो? कट्टे कसले करता रे? कामं करा कामं! भरपूर पैशे कमवा आणि ते पैशे घेऊन लवकर मायदेशी परत या पाहू कसे! :)

तात्या.

काय रे मुलांनो, सकाळपासून काय गडबड सुरू आहे तुमची? मी पण येऊ का तुमच्या कट्ट्याला? :)

....या नावाने संस्था रजिस्टर करून हा बापू काणे पैसे जमवण्यास सुरवात करतो आहे. पहिले फंडरेझर इस्ट कोस्ट कट्ट्यामधे !
(अरे , अरे , मुलानो , असे पळता काय !! थांबा , थांबा........यांना आपले म्हणा !)
(ह्.घ्या !)

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 9:34 pm | विसोबा खेचर

ओ मुक्तसुनीतराव,

आम्हाला काय पण गरज नाय हो तुमच्या पैशांची! आमचं आम्ही पाहून घेऊ!

आम्ही आपलं प्रेमाने येऊ का म्हणून विचारलं होतं! त्याला दिलखुलासपणे या म्हणाला असतात तर आम्हालाही बरं वाटलं असतं! आणि आम्ही थोडेच निघालो होतो लगेच तिकडे यायला?

पण लेको तुम्ही लोकं अमेरिकेला गेलात की आम्हा निवासी भारतीयांची फक्त तुमच्या त्या डॉलरमधल्या पैशांवरच नजर आहे असंच का वाटतं रे तुम्हाला? साला उद्या फंड रेजिंगची गरज वाटलीच तर कुठूनही पैसा उभा करीन तो सुद्धा भारतात राहणार्‍या भारतीयांकडून! ते सुद्धा अगदी इज्जतीने आणि स्वत:चा स्वाभिमान राखून! पण अमेरिकेत तुमच्या दाराशी येण्याची लाचारी करणार नाही याची खात्री बाळगा!

तात्या.

मुक्तसुनीत's picture

21 Feb 2008 - 9:37 pm | मुक्तसुनीत

... हे तुम्ही वाचलेले दिसत नाही :-) असो !

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 9:47 pm | विसोबा खेचर

असो..!

माझ्याकडून हा विषय संपला. तुमचा कट्टा अगदी यथास्थित होऊ द्या. माझ्या मनापासून शुभेच्छा!

तात्या.

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 10:05 pm | विसोबा खेचर

मुक्तसुनीतराव,

सॉरी..

मी जरा जास्तच बोलून गेलो! खरं सांगायचं तर मला पैशांवरून मस्करी सहन नाही होत. इथे खरं तर पैशांचा विषयही नव्हता आणि तुम्ही एकदम फंडरेझिंगचा विषय काढलात ते खरंच मला सहन झालं नाही. परंतु आता जरा झटका ओसरल्यावर त्यतल्या 'ह घ्या' चा इफेक्ट मला जाणवू लागला आहे! :)

मी असं लिहायला नको होतं! मनापासून माफी मागतो..

मी नक्की येईन तुमच्या कट्ट्याला! मिसळपावकरता सगळे मिळून किती फंड जमा करताय तेवढं सांगा म्हणजे पैशे भरून न्यायला मोठ्ठी पिशवी घेऊन येईन...

अजून काय लिहू?

आपला,
(किंचित वेडझवा आणि तेवढाच हळवा!) तात्या.

:)

मुक्तसुनीत's picture

21 Feb 2008 - 10:39 pm | मुक्तसुनीत

मनात जे असेल ते आडपडदा न ठेवता बोलता हे उत्तम ! तुमचा हा मोकळेपणा तुम्ही निर्माण केलेल्या या व्यासपीठावरवरही म्हणूनच आलेला आहे. घुमेपणा आणि आढ्यता या गोष्टींपेक्षा हा मोकळेपणा (ज्याला तुम्ही विनोदाने वेड**पणा म्हणता ;-) ) तो केव्हाही स्वागतार्ह !

मिसळपाववर आमचे प्रेम आहे. जनरल डायरवरसुद्धा आहे हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.

एकलव्य's picture

21 Feb 2008 - 11:08 pm | एकलव्य

तात्या, एक तिकीट तर कालच पाठविले ना? अजून किती जमवायचा विचार आहे... cheers!

स्वागत आहे...

चतुरंग's picture

21 Feb 2008 - 9:46 pm | चतुरंग

अहो आपण आलात तर कट्ट्यावर आणखीन धमाल येईल!

कामं तर चालूच आहेत हो! ती कुणाला सुटली आहेत का?
पण भाईकाकांच्या शब्दात सांगायचं झालं तर "कामाबरोबरच आयुष्यात एखादातरी छंद जोपासा कारण काम तुम्हाला कसं जगायचं ते शिकवतं आणि छंद का जगायचं त्याचं प्रयोजन देतं!"

अवांतर - सध्या थंडी मात्र जाम आहे तेव्हा जरा चांगला सीझन बघून आलात तर तुम्हाला इथे फिरवूनही आणू. तुमचे काका-काकूही इकडे असतात ना नॉर्थ कॅरोलिना मधे त्यांचीही भेट घेता येईल तुम्हाला.

चतुरंग

विसोबा खेचर's picture

21 Feb 2008 - 10:16 pm | विसोबा खेचर

तुमचे काका-काकूही इकडे असतात ना नॉर्थ कॅरोलिना मधे त्यांचीही भेट घेता येईल तुम्हाला.

हो हो, नक्की! त्यांना एकदा भेटायचंच आहे आणि दोन्ही कर जोडूनी नमस्कार करायचा आहे! :))

तात्या.

प्राजु's picture

21 Feb 2008 - 9:18 pm | प्राजु

काय रे मुलांनो, सकाळपासून काय गडबड सुरू आहे तुमची? मी पण येऊ का तुमच्या कट्ट्याला? :)

जरूर या.. आलात तर आमचे भाग्यच..

आणि काय रे मेल्यांनो? कट्टे कसले करता रे? कामं करा कामं!

कामं तर रोजचिच.. यामध्ये हाच तर विरंगुळा.

भरपूर पैशे कमवा आणि ते पैशे घेऊन लवकर मायदेशी परत या पाहू कसे! :)

या वाक्याने "चिठ्ठी आयी है "या गाण्याची आठवण झाली.

- प्राजु

लंबूटांग's picture

24 Feb 2008 - 6:02 am | लंबूटांग

मी पण बॉस्टनला राहतो. University of Massachusetts Boston मध्ये MS in Computer Science करतो आहे.

मला पण आवडेल कट्ट्याचा मेंबर व्हायला. भेटायची जागा सार्वजनिक प्रवासाच्या साधनाने पोहोचण्याजोगी असल्यास उत्तम. अजून ४ चाकी नाही आहे ना.

वरदा's picture

23 Feb 2008 - 4:10 am | वरदा

आता एप्रिल नाही मार्च ३रा आठवडा नाही...मार्च च्या १-२ विक मधे जमणं कठीण वाट्टंय कारण स्नो चा जोर इतक्यात कमी होताना दिसत नाहीये...मग काय मे मधे या बार्बेक्यूला अजुन काय्?...तेव्हा तरी आहात का सगळे इथे? एक विकेंड ठेवा ना आपल्या कट्ट्यासाठी....
तात्या आत्ताच नॉर्थ कॅरोलिना ला जाऊन आले...पण तुमचे काका काकू रहातात हे माहीतच नव्हतं...पण मी जात असते तिथे अधुन मधुन पुढच्या ट्रीप ला तुम्हाला आधी सांगते नक्की..तोवर फोन दिलात तर गप्पा मारेन की त्यांच्याशी....आणि तुम्ही कधी येताय ते सांगा....माझ्याकडे रहायला या एवढं नक्की....मग नॉर्थ कॅरोलिना ला जा आधी माझ्याकडे.....

विसोबा खेचर's picture

23 Feb 2008 - 6:59 am | विसोबा खेचर

पण मी जात असते तिथे अधुन मधुन पुढच्या ट्रीप ला तुम्हाला आधी सांगते नक्की..तोवर फोन दिलात तर गप्पा मारेन की त्यांच्याशी....

नको! त्यांचं आणि माझं हल्ली बरं नाही. आमच्यात भांडणं आहेत! तू नकोच जाऊस त्यांच्याकडे! :)
शिवाय आपल्या मिसळपावच ते खूप राग राग करतात! नंतर तुला सवडीने पत्र पाठवतो...

आणि तुम्ही कधी येताय ते सांगा....माझ्याकडे रहायला या एवढं नक्की....मग नॉर्थ कॅरोलिना ला जा आधी माझ्याकडे.....

हो, नक्की...! :)

तात्या.

मीनल's picture

23 Feb 2008 - 6:02 am | मीनल

मी जुनीच सभासद आहे.पासवर्ड पुन्हा पुन्हा मागुनही आला नाही.शेवटी नवे खाते करावे लागले.

मी अटलांटा ,जॉर्जियाला राहते.
सध्या तरी कट्ट्यात शामिल होणे जमणार नाही.पुन्हा कधीतरी पाहु.

वरदा's picture

3 Mar 2008 - 9:32 pm | वरदा

काय ठरलं शेवटी? प्राजु तू परत कधी येतेयस? अजुन खूप थंडी आहे गं सगळ्यांना नाही जमणार मार्च मधे....

प्राजु's picture

4 Mar 2008 - 9:10 am | प्राजु

मी मे महिन्याच्य शेवटी येते आहे परत. तेव्हा माझे आई-बाबा ही असतील माझ्यासोबत..
- (सर्वव्यापी)प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Mar 2008 - 9:54 am | llपुण्याचे पेशवेll

लोकहो ईथे तसे बरेच लोक आहेत आसपास. कोण इतक्यात भेटू शकते का?
कळवा. मी जर्सी सिटी मधे राहतो.
पुण्याचे पेशवे

मग प्राजु तुला कधी जमेल सांग ना..आणि चतुरंग, मानस, विकास तुम्हाला तेव्हा जमेल का तेही पहा...मी आहे तयार धनंजय...मी रॉकवे मधे आहे..आपण २०-२५ मिन. वर असू....

प्राजु's picture

5 Mar 2008 - 12:20 am | प्राजु

जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात केले तर नक्की जमेल मला. आई-बाबा ही असतील सोबत. आणि नवरोबाही जरा कामातून रिकामे झालेले असतील थोडे. तेव्हा चालेल का सगळ्यांना? चतुरंग, आपण तेव्हा कामातून थोडे मोकळे व्हाल का? धनंजय, वरदा .. काय म्हणता तुम्ही?
- (सर्वव्यापी)प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Mar 2008 - 2:39 am | llपुण्याचे पेशवेll

मी तर कदाचित एप्रिल मधे फॉर गुड परत जायचे म्हणतो आहे.

पुण्याचे पेशवे

बरेच कार्यबाहुल्य आहे. मी टांगून ठेवत नाही. ज्यांना जमते आहे त्यांनी कार्यक्रम केलात तरी चालेल.
मला जमण्यासारखे असेल तर कळवीनच.

चतुरंग

वरदा's picture

5 Mar 2008 - 5:43 am | वरदा

प्राजु मला चालेल....तोवर आंबे रहातील का पणः)
अरे बापरे धनंजय मग आपण भेटू शकतो(आजच पाहीलं आपण साधारण १ तासावर आहोत).....बाकी कुणी इतकं जवळ नाही....विकास, मानस, चतुरंग तुम्हाला जमेल का जून? चतुरंग आता आहे ना कार्यबाहुल्य करुन टाका ना २ महीन्यात...:) नाहीतर आम्ही येतो तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला नाही म्हणायचा स्कोपच नाही:) ...

विकास's picture

7 Mar 2008 - 1:21 am | विकास

कदाचीत चालू शकेल. कदाचीत तेंव्हा मी भारतात गेलेलो नसलो तर...

प्राजु's picture

5 Mar 2008 - 9:42 am | प्राजु

चतुरंग.. आता कुठे जाणार?? आमच्यामध्ये सामिल व्हावेच लागेल... :))

- (सर्वव्यापी)प्राजु

चतुरंग's picture

5 Mar 2008 - 8:26 pm | चतुरंग

तुम्ही आम्हाला असे धर्मसंकटात टाकू नका!
तसे मी व आमची धर्मपत्नी दोघेही माणूसप्रेमी आहोत पण सध्या आमची अवस्था पुलंच्या नारायणासारखी आहे - अनेक आघाड्यांवर धुमश्चक्री सुरु आहे:)
ती साधारण मे च्या पहिल्या आठवड्यात संपेल. मग जरा मित्रांमधे 'मिसळ'ण्याची उसंत लाभेल.
तेव्हा जरा सबुरीने घ्यावे ही विनंती.
(अवांतर - 'वरदाताई' तुम्ही एकदम असा बाँबगोळा टाकलात त्यामुळे तुम्हाला 'वरदराजनताई' म्हणावे की काय असा (अ)विचार चाटून गेला:))ह.घ्या:))

चतुरंग

प्राजु's picture

5 Mar 2008 - 11:46 pm | प्राजु

तसेही मी मे महिन्याच्या शेवटिच येणार आहे परत..
भेटू तेव्हा नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु

वरदा's picture

7 Mar 2008 - 12:40 am | वरदा

प्राजु तु आलीस की कळव मग लगेच जमू सगळे...चतुरंग काहीच हरकत नाही..पण वरदराजन नाव मुलाचे आहे ना..मग नवीन काहीतरी शोधा....