मल्हारसांज

कौतुक शिरोडकर's picture
कौतुक शिरोडकर in जे न देखे रवी...
3 Aug 2009 - 5:09 pm

मल्हारसांज गर्भारलेली
उदरी निशा अशांत ओली
दिशांची दिशांना पुन्हा आर्त साद
डोहाळे पुरवी जलांच्या पखाली

घनभार हल्के जाता झरून
कृष्णांबरही झुके सावरून
आड धुक्याच्या घेई विचारून
गिरीराजाची ख्याली खुशाली

घनन घनन घनवृंद घुमा
सागर पाश क्षितिजी गनिमा
पश्चिमा सलज्ज निरखे प्रतिमा
लहरींच्या अधरी, पवनाच्या चाली

घुले श्यामरंगी, नभाची निळाई
विरत्या परिघा, समीपाची घाई
अधीरल्या प्रभेची कवडशी धिटाई
रवी पांघरूनी निजे मेघशाली

शृंगारअद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

दत्ता काळे's picture

3 Aug 2009 - 6:49 pm | दत्ता काळे

कविता आवडली.

क्रान्ति's picture

3 Aug 2009 - 9:52 pm | क्रान्ति

छान कविता. 'मल्हारसांज' शब्द खूप आवडला.

क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखा
रूह की शायरी

प्राजु's picture

4 Aug 2009 - 12:40 am | प्राजु

सुंदर शब्द! सुंदर कविता.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

4 Aug 2009 - 12:57 am | विसोबा खेचर

आयला! लै भारी...!

शब्द मात्र अवघड वापरले आहेत. अंमळ जडच गेले...

आम्हाला साधे सोपे शब्द असलेल्या कविता पटकन समजतात आणि आवडतात..

आड धुक्याच्या घेई विचारून
गिरीराजाची ख्याली खुशाली

हे शब्द त्यातल्या त्यात समजले...

आपला,
(मठ्ठ) तात्या.

बेसनलाडू's picture

4 Aug 2009 - 1:27 am | बेसनलाडू

चांगली वाटली. २रे कडवे विशेष आवडले.
(वाचक)बेसनलाडू

धनंजय's picture

4 Aug 2009 - 2:38 am | धनंजय

२रे कडवे चांगले वाटले.

विशाल कुलकर्णी's picture

4 Aug 2009 - 9:11 am | विशाल कुलकर्णी

कौतुका, स्वागत रे! मस्त !! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...