ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा?

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जे न देखे रवी...
27 Jul 2009 - 12:03 pm

ए आई, सांग ना, कधी येइल बाबा घरा?
ए आई......,सांग ना SSSSS!

आता गोष्ट नको आम्हाला,
गाण्यातला रस संपला!
लुटुपुटीच्या भातुकलीचा,
आला खुप खुप कंटाळा SSSS!
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा?

नकोच आई मजला,
चॉकलेटचा तो बंगला !
अन बर्फीची ती झाडे,
इथे आहेत, हवी SSSS कुणाला?
ए आई, सांग ना SSSSS, कधी येइल बाबा घरा?

राजपुत्र अन परीराणीच्या,
गोष्टींचा स्टॉकही संपला !
टॉम अँड जेरी, पापायनेही,
बघ जीव; आमचा SSS उबला !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?

चिवचिव करती चिमणपिले,
चोचीतच घास राहीला !
असेल का गं गेला ?
त्यांचाही बाबा टूरSSS ला?
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?

बघ चांदोबा तो रुसला,
चांदण्याही..., बघ धुसफुसल्या !
अंगाई नच रुचे आम्हाला,
आम्हा हवाय बाबा......, थोपटायलाSSSSS !
ए आई, सांग नाSSSSS, कधी येइल बाबा घरा?

विशाल.

बालगीत

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2009 - 12:20 pm | प्रकाश घाटपांडे

पार्श्वभुमी व प्रेरणास्थान कळले नाही
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विशाल कुलकर्णी's picture

27 Jul 2009 - 12:59 pm | विशाल कुलकर्णी

प्रेरणास्थान "आयुष्यावर बोलु काही" ....
पार्श्वभुमी ....? एक माजी पोलीस हे विचारतोय? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Jul 2009 - 8:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कविता वाचल्यावर मलाही परवा झी मराठीवर पाहिलेल्या "आयुष्यावर बोलु काही" ची आठवण झाली. काय मुळुमुळू रडतात स्त्रीया बाबांच्या आठवणींनी...!
(सर्वच स्त्रीयांचा एक वीक प्वॉइंट म्हणजे...'बाबा' ....असे वाटते)

-दिलीप बिरुटे

विसोबा खेचर's picture

27 Jul 2009 - 5:04 pm | विसोबा खेचर

कविता आवडली..

बाकी, बाबा कुठे उलथलाय देव जाणे! :)

तात्या.

पक्या's picture

27 Jul 2009 - 9:55 pm | पक्या

छान कविता.
एकच खटकले...घरला हा शब्द. सगळी कविता शहरी बोली भाषेत आहे आणि घरला हा एकच शब्द ग्रामीण वाटतोय.

विशाल कुलकर्णी's picture

28 Jul 2009 - 9:36 am | विशाल कुलकर्णी

धन्यवाद, पक्या मलाही ते लक्षात आले होते, पण बदल करायचे काल राहुनच गेले. आज अपेक्षित बदल केला आहे. धन्स ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

बेचवसुमार's picture

28 Jul 2009 - 12:45 pm | बेचवसुमार

पण ह्या नादात ला..ला..ला हे यमक फसले की हो! :T ह.घ्या.

विशाल कुलकर्णी's picture

28 Jul 2009 - 12:55 pm | विशाल कुलकर्णी

'ला' नसला तरी 'आ' आहे ना! चालीत गुणगुणता आली म्हणजे झाले. आता तुम्ही "आ" वासु नका म्हणजे झाले. :T ह. घ्या. >:)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आशिष सुर्वे's picture

28 Jul 2009 - 9:48 am | आशिष सुर्वे

विशाल भाऊ,

आपली कविता आवडली !
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''