निफ्टी घेऊन बसा, कॉल विकत रहा..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
24 Jul 2009 - 12:14 pm
गाभा: 

डिस्क्लेमर : खालील व्यवहारात पैसे बुडू शकतात व नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे पैसे मिळून फायदाही होऊ शकतो. लोकांनी आपापल्या जिम्मेदारीवर व्यवहार करावा. होणार्‍या नफा-नुकसानीबद्दल मिसळपाव डॉट कॉम चे मालक, व्यवस्थापक, संपादकीय मंडळ कोणत्याही प्रकारची नैतिक वा कायदेशीर जबाबदारी स्विकारत नाही..

सदर व्यवहार करणार्‍याने बाजार संपेपर्यंत सतत त्याकडे लक्ष ठेवले पाहिजे..

तात्या अभ्यंकर,
मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम

Do the transactions at the Market rate. Do all the transactions together. (खालील तीनही सौदे लगोलग एकाच टायमाला करायचे आहेत)

1) Buy Nifty Futures (Expiry : 27 Aug 2009)
2) Sell Nifty 4600 call (Expiry : 27 Aug 2009)

3) Buy Nifty 4000 Put (Expiry : 27 Aug 2009)
(काही कारणांमुळे बाजार खूप पडल्यास जीव वाचवण्याकरता हा सौदा करणे अत्यावश्यक आहे!)

Keep watching the market.

If the market goes down and Nifty spot comes to 4450,
1) buy Nifty 4600 call and sell Nifty 4500 call.
2) Sell Nifty 4000 Put and Buy Nifty 3900 Put.

बाजार ४४५० पेक्षाही खाली गेल्यास प्रत्येक १०० पॉईंट्स च्या मंदीला वरील कृती करत रहा..

जसे,

If the market goes down and Nifty spot comes to 4350,
1) buy Nifty 4500 call and sell Nifty 4400 call.
2) Sell Nifty 3900 Put and Buy Nifty 3800 Put.

If the Market goes up, wait for the further instructions.

Regards,
Tatyaa abhyankar,
Dalal Street, Mumbai 23.

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

24 Jul 2009 - 1:08 pm | विसोबा खेचर

CMP

Nifty Aug Futures 4538
Nifty Aug 4600 call Rs 164
Nifty Aug 4000 Put Rs 41

go....!

विसोबा खेचर's picture

24 Jul 2009 - 1:20 pm | विसोबा खेचर

बाजार खाली गेल्यास,

1) buy Nifty 4600 call and sell Nifty 4500 call.
2) Sell Nifty 4000 Put and Buy Nifty 3900 Put.

ह्या कृतीमुळे Nifty 4600 call चा व Nifty 4000 Put चा फायदा पदरात पडतो व निफ्टीमध्ये उभे राहता येते.

बाजार खूप वाढल्यास (अंदाजे २०० पॉईंट वगैरे) निफ्टी फ्युचर ज्या प्रमाणात वाढतो त्या प्रमाणात समोरचा विकलेला कॉल वाढत नाही त्यामुळे नक्त नफा मिळतो आणि निफ्टी पुट मध्ये जास्तीत जास्त २००० रुपये जाऊ शकतात...

हे सर्व सौदे सारासार विचार करून स्केअर ऑफ करायचे असतात..

तसे केल्यास एकूण व्यवहार फायद्यात पडतो असा माझा व्यक्तिगत अनुभव आहे..

तात्या.

विसोबा खेचर's picture

24 Jul 2009 - 1:21 pm | विसोबा खेचर

नवशिक्या लोकांनी शक्यतो एकेकाच लॉटमध्ये काम केलेले बरे! :)

आपला,
(लॉटधारक) तात्या.

मदनबाण's picture

24 Jul 2009 - 1:48 pm | मदनबाण

तात्या पण आमच्या सारख्यांना या निफ्टीतल काय पण कळत नाही त्यांनी कुठले स्टॉक्स सध्याच्या काळात घेऊन ठेवावेत ???

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

विसोबा खेचर's picture

24 Jul 2009 - 1:51 pm | विसोबा खेचर

CMP

Nifty Aug Futures 4582 (फायदा रु ४४)
Nifty Aug 4600 call Rs 185 (तोटा रु १९)
Nifty Aug 4000 Put Rs 37 (तोटा रु ४)

दलाली - रु ९

निव्वळ नफा रु १२ म्हणजे एका लॉट मागे ६०० रु..! :)

६०० रुपये खिशात टाका आणि घरी जाऊन झोपा. संध्याकाळी निवांतपणे एक क्वार्टर मारा! :)

उद्याचं उद्या..! :)

आपला,
(हातावर पोट असलेला) तात्या :)

पुट आणि कॉल पण आखडत जातात. ने मके किती दिवसात दोन्ही वसुल करायाचे दिले नाही? ह्या बाजार ज्यावर ज्यादा सट्टा लागतो तो कॉल किंवा पुट एक दोन दिवसात खुपच खाली घसरतो ,अनुभव आहे.

वेताळ

www.traderji.com हा फोरम चान्गला आहे.

हवालदार

वेताळ's picture

24 Jul 2009 - 2:24 pm | वेताळ

CMP
Nifty 4600 call----179
Nifty दिसत नाही. म्हणजे कॉल मध्ये १६ फायदा..

वेताळ

धोंडोपंत's picture

25 Jul 2009 - 9:15 am | धोंडोपंत

आम्ही असे ऐकले आहे की, जुलैच्या निफ्टीत मोठ्या शॉर्ट पोझिशन्स तयार आहेत आणि त्यामुळे मार्केटला ४५५० ला सपोर्ट मिळतोय.

त्या अंगलट आलेल्या पोझिशन्समधून बाहेर पडण्यासाठी पुढील तीन दिवस बाजार ठोकण्यावाचून ऑपरेटर्सना पर्याय नाही. कारण ४३८०+ च्या आसपासच्या या पोझिशन्स आहेत.

ज्यांना सेफ खेळायचे आहे त्यांना असे सुचवावेसे वाटते की येत्या दोन दिवसांसाठी ४३०० चा जुलैचा पुट विकत घ्यावा. काल तो ९ रुपयांपर्यंत आला आहे.

आपला,
(मंदीवाला) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

( फिर पलट आयी है, सावन की सुहानी रातें..... फिर तेरी याद में, जलने के ज़माने आये!.....)

वेताळ's picture

25 Jul 2009 - 10:23 am | वेताळ

अजुन एक बातमी अशी आहे.माझे एक ज्योतिषी मित्र बाजाराबद्दल भविष्य वर्तवतात. त्याच्या म्हनण्यानुसार ऑगस्ट १० ते २० मध्ये बाजाराला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. निफ्टी ३५०० पर्यंत परत येण्याची शक्यता आहे. आपले ह्या बद्दल
काय मत आहे?
वेताळ

शैलेन्द्र's picture

27 Jul 2009 - 9:25 am | शैलेन्द्र

त्यांच्याकडे निफ्टीची जन्मकुंडली मिळेल का हो? कुणीतरी म्हणाले कि निफ्टी व्यतिपातयोगावर जन्मलीय. शांती करुन घ्यावी म्हणतो..

JAGOMOHANPYARE's picture

28 Jul 2009 - 9:33 am | JAGOMOHANPYARE

निफ्टीची शान्ति ... ? दक्षिणा फार असते त्याची....
डिस्क्लेमर : खालील व्यवहारात पैसे बुडू शकतात व नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे पैसे मिळून फायदाही होऊ शकतो. लोकांनी आपापल्या जिम्मेदारीवर व्यवहार करावा. होणार्‍या नफा-नुकसानीबद्दल कोणत्याही प्रकारची नैतिक वा कायदेशीर जबाबदारी आम्ही स्विकारत नाही..

अम्बानीच्या कम्पन्याचे शेअर्स लोन्ग टर्म घेऊन गप्प मिसळ्पाव खात रहा.... :)

मुकेशला टाळा व अनिल ला जवळ करा असे सांगू इच्छितो
अनिल ने सध्या अनेक क्षेत्रात हात घातला आहे
- आरेनारेल
- एडलॅब्स
- रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर
- रिलायन्स पावर

हे भविष्यकाळात दीर्घ मुदतीसाठी मुकेशच्या कंपन्यांपेक्षा जास्त नफा मिळवून देतील :)
- सागर