रिमझिम येता वळवाची सर---

पुष्कराज's picture
पुष्कराज in जे न देखे रवी...
23 Jul 2009 - 6:59 pm

रिमझिम येता वळवाची सर
मातीतून मग तुझाच दरवळ
पानोपानी तूच खेळ्सी
ह्र्दय छेडते पुन्हा तुझे स्वर
रिमझिम येता वळवाची सर

स्वरांतूनी तू उमलुनी येसी
माझी होउन मिसळूनी जासी
विहारुनी त्या स्वरांतून मी
सहजच येतो पुन्हा समेवर
रिमझिम येता वळवाची सर

चेहर्‍यावर तव अवखळ गोडी
चंचलता ती यौवन वेडी
अधीर उत्कट फुलूनी येती
मोती अगणित तव अधरावर
रिमझिम येता वळवाची सर

सहज मोती ते टिपूनी घ्यावे
अपूर्ण काही राहून जावे
अन् वळवाचे वेड धरावे
स्वर्गातुन मग यावे भूवर
रिमझिम येता वळवाची सर

कविता

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

23 Jul 2009 - 7:03 pm | llपुण्याचे पेशवेll

छान कविता रे पुष्कराज..
(पुण्यात पाऊस चांगला पडू लागलेला दिसतोय.)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

दत्ता काळे's picture

23 Jul 2009 - 7:10 pm | दत्ता काळे

चेहर्‍यावर तव अवखळ गोडी
चंचलता ती यौवन वेडी
अधीर उत्कट फुलूनी येती
मोती अगणित तव अधरावर
रिमझिम येता वळवाची सर

- हे कडवे मी व्यक्ती आणि वल्ली तल्या नाथा कामतच्या नजरेतून पाहून वाचले.

बेसनलाडू's picture

23 Jul 2009 - 10:44 pm | बेसनलाडू

आवडली.
(ओलाचिंब)बेसनलाडू

प्रमोद देव's picture

24 Jul 2009 - 9:12 am | प्रमोद देव

छान आहे कविता!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!