मढे घाट

हर्षद आनंदी's picture
हर्षद आनंदी in कलादालन
20 Jul 2009 - 7:50 am

घाटात जाताना ...

512

आणि घाटात ...

स्वर्ग अवतरला इथे,,

प्रवास

प्रतिक्रिया

प्राजु's picture

20 Jul 2009 - 7:53 am | प्राजु

हिरवे हिरवे गार गालिचे
हरित तृणांच्या मखमालिचे..!

सुंदर!! मन अगदी त्या धुक्यात हरवून गेलं. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

20 Jul 2009 - 8:41 am | क्रान्ति

स्वर्ग अवतरला इथे! काय झक्कास वातावरण आहे, आणि फोटो पण अगदी सुरेख!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

पाषाणभेद's picture

20 Jul 2009 - 9:03 am | पाषाणभेद

छायाचित्रण एकदम मस्त.
हा घाट कोठे आहे? कुणी सांगेल का?

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

हर्षद आनंदी's picture

20 Jul 2009 - 9:31 am | हर्षद आनंदी

संपुर्ण अल्बम इथे पहा

सृष्टीचा अनमोल खजिना, फक्त आणि फक्त निसर्ग..
एकच विनंती : जाल तेव्हा कृत्रीम वस्तुंनी याचे सौंदर्य भंग करू नका. मद्यपान, धुम्रपान आदी गोष्टी टाळा. कोपर्‍यात बसुन प्रणयी चाळे करुन स्वतःची लाज उघडी करु नका. प्लॅस्टीकची हर एक गोष्ट परत आणा, तिथेच टाकुन सुशिक्षितेतील अशिक्षितपणा जग जाहीर करु नका!!

डोणजे - खानापुर - पाबे - वेल्हा - कुदले - मढेघाट : ६५ किमी
(अवघड व उभा चढ, सिंगल रोड, व्यवस्थित रस्ता, ४ घाट)
झालेल्या वा होऊ घातलेल्या इलेक्शनमुळे म्हणा, पण रस्ता वादातीत व्यवस्थित आहे. शेवटचे ५ किमी जरा त्रासदायक. खड्डे नाहीत पण खडी आहे.

कात्रज - नसरापुर - वेल्हा - कुदले - मढेघाट : १०५ किमी
(३ घाट, छान रस्ता)

स्वतःची गाडी घेउन जाणे केव्हाही सोयीस्कर. वाहतुक फार लिमिटेड
...दुचाकी बेष्ट....

स्वाती दिनेश's picture

20 Jul 2009 - 2:13 pm | स्वाती दिनेश

क्लास फोटो.. मस्तच..
स्वाती

सहज's picture

20 Jul 2009 - 5:56 pm | सहज

क्लास फोटो.. मस्तच..

विसोबा खेचर's picture

20 Jul 2009 - 3:17 pm | विसोबा खेचर

जबर्‍या..!

तात्या.

दत्ता काळे's picture

20 Jul 2009 - 6:07 pm | दत्ता काळे

गेल्यावर्षी आम्ही मढे घाटाचं पावसाळी सौंदर्य बघितलं त्याची आठवण आली. मढे घाटातून परतल्यानंतर वेल्ह्यात कदमांच्या तोरणा हॉटेलमधले चिकन आणि बाजरीची गरम गरम भाकरी खाणे हा १ नंबर प्रोग्राम झाला.

बिपिन कार्यकर्ते's picture

20 Jul 2009 - 9:04 pm | बिपिन कार्यकर्ते

क्ला सि क ! ! !

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jul 2009 - 9:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकदम भारी फोटो !

लिखाळ's picture

20 Jul 2009 - 9:11 pm | लिखाळ

मढे घाटाच्या माहितीबद्दल आभार. चित्रे छान आहेत.
हा घाट कोकणात उतरतो का? मला नीटसे समजले नाही. नसेल तर अलिकडचे गाव कुदले, पलिकडचे गाव कोणते?..
कधीतरी जाण्याचा विचार आहे :)
-- लिखाळ.

नीलकांत's picture

20 Jul 2009 - 10:02 pm | नीलकांत

खुप छान फोटो आले आहेत.

- नीलकांत

limbutimbu's picture

21 Jul 2009 - 10:05 am | limbutimbu

या घाटातून जायचे आहे एकदा :)
खुप पूर्वी वरन्ध, पुढे आम्बेनळी व शेवटी कुम्भार्ली असे तिनच घाट चिपळूण्/खेड/महाड वगैरे ठिकाणी जायला उपलब्ध होते. प्रत्येक घाटाची स्वतन्त्र वैशिष्ट्ये आहेत
गेल्या काही वर्षात ताम्हीणी घाट सुरू झाला
आता हा तुलनेत अधिक जवळचा वाटावा असा मढे घाट! इतिहासात याचे उल्लेख कुठे कुठे आहेत (नेमके आठवत नाहीत)
पण पलिकडे कोकणात कुठे उतरतो आपण?

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

हर्षद आनंदी's picture

21 Jul 2009 - 1:54 pm | हर्षद आनंदी

मूळ नाव : शेवत्या घाट
कोकणात उतरायला अत्यंत सोपा मार्ग म्हणुन पुर्वीपासुन वापरात. तोरणा, लिंगाणा, रायगड अशी रांग

सिंहगडावरील लढाईनंतर तानाजी मालुसरे यांचे पार्थिव या मार्गाने 'उमरठ' ह्या त्यांच्या जन्मगावी अंत्यविधींसाठी नेण्यात आले, म्हणुन 'मढे घाट'!!

कुदळे - कूंबळे - रानवाडी असा रस्ता, महाड (शिवथर घळ) येथे उतरतो, असे म्हणतात.

इंग्रजांनी वरंधा घाटातुन वहातुकीला आरंभ केला.

मुंबईकरांनी पुण्यात न शिरता, नविन बोगद्यातुन नसरापुर - वेल्हा - मढे घाट असा मार्ग सोयिस्कर. किंवा धायरी फाट्यावरुन खडकवासला- डोणजे ....... मढे घाट

चुकभुल देणे - घेणे, जाणकारांनी अजुन प्रकाश टाकावा

limbutimbu's picture

21 Jul 2009 - 4:18 pm | limbutimbu

>>>> किंवा धायरी फाट्यावरुन खडकवासला- डोणजे ....... मढे घाट
मला देखिल हा रस्ता नेमका माहीत नाही, पण विन्झरपाशि तो नसरापुर्-वेल्हे रस्त्याला मिळतो द्वारा पाबे घाट येवढे माहीत! :)
जायलाच हवे एकदा :)

विशाल कुलकर्णी's picture

21 Jul 2009 - 10:19 am | विशाल कुलकर्णी

मस्त, सुरेख फोटो! माहीती थोडी आणखी विस्तृत दिलीत तर बरे. मुंबईहुन जायचे झाल्यास कसे जायचे?

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

घाटावरचे भट's picture

21 Jul 2009 - 5:34 pm | घाटावरचे भट

झकासच फोटु.

चतुरंग's picture

21 Jul 2009 - 5:54 pm | चतुरंग

अवर्णनीय दृश्ये! धन्यवाद! :)

(मुग्ध)चतुरंग

सूहास's picture

21 Jul 2009 - 7:48 pm | सूहास (not verified)

8>
8> 8>
8>
:O
सुहास

पर्याय एक :
मुंबई-वेल्हा ( शक्यतो रातराणीने ) बसने सकाळी वेल्हयाला उतरणे. नंतर वेल्हा ते केळद -टमटम - सिक्स सिटर रिक्षाने किंवा प्रवासी जीपने- केळद गाठणे - साधारणपणे तुम्ही सकाळी ११ ला केळदला पोहोचाल. तिथून मढेघाट धबधबा बघणे. मढेघाट पायी उतरून खाली वाकी येथे (पायथ्याचे गाव) उतरणे. वाकीमध्ये मुक्काम. वाकीमध्ये एक पेशवेकालीन दोन मजली लई भारी विहिर आहे. सकाळी महाड बस पकडून महाड येथे जाणे. तिथून बस पकडून थेट मुंबई.

पर्याय दोन :
मुंबईहून रातराणी पकडून महाडच्या पुढे भोर फाट्यावर उतरणे. तिथून प्रवासी जीपने वाकी गाव गाठणे - वरीलप्रमाणे तुम्ही ११लाच पोहोचाल. तिथून पायी घाट चढून आणि सृष्टीसौंदर्य बघुन केळद गाठणे. मुक्काम केळद. मुक्कामी असलेल्या केळद गाडीने निघून स्वारगेट, पुणे गाठणे. तिथून मुंबै.

सोनम's picture

18 Sep 2009 - 1:26 pm | सोनम

सर्वच फोटू एकदम बेस्ट आहे............. :) :)
खूपच अप्रतिम... =D>
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"