उतरण्याच्या वेळी एका ठिकाणी पाय घसरला आणि तोंडावरच पडलो. तसाच २-३ मिटर घसरत खाली आलो. एका ठिकाणी बाहेर आलेल्या झुडपाला पकडले आणि थांबलो. थांबल्यावर झुडपाकडे पाहीले तर झुडपाबरोबरच एक हिरवागार सापही हातात पकडला होता, जी तंतरली होती .........! ;-)
साप कदाचित.... green vine snake असावा... पावसात खुप दिसतात आणि झाडावरच असतो... बिनविषारी आहे... पण साप बघितल्यावर वाट लागतेच.... bamboo pit viper पण हिरवा असतो... आणि विषारी पण असतो... पण तो नसावा...
गर्दि नको वाट्टे रे.... आणि पाखरं असली की गोंगाट असतोच... मग काय मजा राहिलि भटकायची?..... लोकं अश्या जागी जावुनपण त्यांच्या घरात असल्या सारखी वागतात.... थोडि सुद्धा जाणिव नसते....
अ-क्ष-र-शः सहमत!!!
नको इतका उतमात घालतात लोक आणि त्या जागेवर जाण्याची मजाच निघून जाते! (अर्थात हे माझं वैयक्तिक मत..कुणालाही पटावंच असा आग्रह नाही! )
म्हणुनच काल सकाळी नागफणीला जायला निघालेलो, पुणे स्टेशनावरची रंगीबेरंगी गर्दी पाहून ऐनवेळी प्लॅन बदलून मस्त ढाक भैरीला भेट देऊन आलो :)
पाऊस आणी वार्याचा रुद्रावतार म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर सालं एकदा तरी भर पावसात ढाक भैरी करावाच करावा!!
कमाल तर होतीच राव :) लय लय धबधबे पाहिले! "या या डुंबा डुंबा" खेळलो :)
पण एक राहिलं, इतका पाऊस असल्यामुळं भैरीच्या गुहेत जायला नाही मिळालं...खिंडीच्या दुसर्या टोकाशी जाऊन परत आलो :(
रिवाजाप्रमाणे रस्ताही चुकलोच, पण लवकर पोचल्यामुळे गोंधळ नाही झाला फारसा!
पाचजण गेलो होतो..सगळेच नवखे! पण ह्यावेळी ढाकचा थरार नाही जाणवला बॉ!कदाचित बहिरोबाचा कडा नाही चढायला मिळाला म्हणुन असेल पण...ठीक आहे, चलता हय :)
>>अरे पण नागफणीला गर्दि नव्हती....
काय सांगता? खरंच? लय भारी! आता पुढच्या/त्यापुढच्या शनिवारचा पिल्यान करतोच करतो :)
धन्यवाद शेठ! लय लय आभार!!
-(स्वाक्षरीमुक्त) ध मा ल.
----------------------------------------------------------------------------------------
::::विकासरावांच्या मुद्द्याला मान देऊन स्वाक्षरी काढलेली आहे.::::
ग्रुपचा हट्ट, या वर्षी पहिला रायगड, दुसरा राजगड मग बाकीचे !! म्हणुन नाईलाज, तरी नंतर बालेकील्ल्यावर जाउन २ तास निवांत बसलो मागुन २-३ ग्रुप आले, आणि निघुनही गेले.. पण आम्ही तिथेच..
कधी कधी गर्दीचा फायदा पण होतो,
जीवधानच्या रॉकपॅचवर, ५० शाळकरींचा ग्रुप अडकला असताना, रोप लाऊन ऊतरायला मदत केली, तर पोरांनी जुन्नर पर्यंत लिफ्ट दिली...
मागच्या वर्षी जुनमध्ये ढाकला गेलो होतो, बहीरोबाच्या गुहेत पोचलो, नाश्ता केला, आणि उतरणार तोच बळीराजा गर्जत आला, उतरताना जाम फाटली, पण हाती-पायी धड उतरलो --- मस्त अनुभव होता
अगदी माळशेज थाटाचे नव्हे काही, पण असेच छोटे छोटे होते. कोंडेश्वराला वळसा घालुन पहिलं पठार मागे टाकलं की चढणीच्या तोंडाशीच एक छोटा धबधबा होता, तिकडेच बराचवेळ खेळलो आम्ही.
>>रॉक प्याच पर्यंत गेला होतास??
खिंडीच्या दुसर्या टोकाशी जाऊन परत आलो :(
खाली गुरवानेही सांगितलेलं, "वर जाऊ नका! दोर, शिडी, खडक सगळं शेवाळ्यानं भरलंय" आणी भयाण वारा अधिक जबरा पाऊस पाहुन खिंड सोडायचीही हिंमत नाही केली बॉ.
आता दिवाळीच्या मुहुर्ताला रॉकपॅचवरुन बहिरोबाची पहिली पुजा झाली की परत जाणार आहोत, येणार का? :)

::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
आऽऽऽई गं!!!
इतका हिरवागार परिसर पावसाळलेला... धुके... आहाहा!!!
सुप्पर्ब!!
शेवटून २ नंबर चे चित्र तर कहर आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
विमुक्त साहेब असे फोटू टाकून नेहमी चिडवतात.
कसले कसले भारी फोटू काढलेत.
असा नजारा समोर असताना लोक पक्ष्यांकडे बघूच कसे शकतात?;)
(की त्यांच्यातले प्राणी जागे होतात?). अश्या लोकांना रसिक म्हणता येणार नाही.
असे मदहोश करणारे नजारे भोवताली असताना, निसर्गातील अजुन एक सौंदर्य बघितले, सांगितले, अनुभवले तर त्यात गैर ते काय? ;)
ते सौंदर्य लोकांना दिसावे, कळावे अशी सुप्त ईच्छा मनात असते म्हणुन भर पावसात सुध्दा मेकअप करुन येतात, मग त्यांना काय म्हणाल? :O
सर्वात महत्वाचे आम्हाला सौंदर्य बघायला आवडते, कुस्करायला-विध्वंस करायला नाही. :) B)
आम्हाला कोणी रसिक म्हणावे अशी आमची मुळीच अपेक्षा नाही, किमान तुम्ही स्वतःच्या रसिकतेच्या सीमा उघड्या करु नका आणि कॄपा करुन दुसर्यातल्या प्राणी शोधण्यापेक्षा स्वतःकडे डोळे उघडुन बघा, कुठेतरी कुणीतरी दुर्लक्षित केल्याची बोच मनात असेल, तर ती काढुन टाका. ....बरे वाटेल. 8> :)
विमुक्त, नागफणी कोठे आहे ते सांगा. असेच ईतर फोटो टाकाल तेव्हा पण सांगत चला. आणि अनुभव पण लिहा. फोटोंसारखे चांगले वाटेल.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
खंडाळा स्टेशनला उतरुन, रेल्वे लाईनच्या पलिकडे जावे. उजवा हात धरुन सरळ चालत जावे, गावाच्या बाजुने चढावर डांबरी सडक जाते, ३र्या लाईट पोल पाशी उजव्या बाजुला फाटा फुटतो, तिथुन पाईप लाईन खालुन, बंगल्यांच्या बाजु बाजुने चालत जावे, रस्ता सरळ जंगलात घेउन जाईल. मुख्य पायवाटेने चालत रहावे, तासाभरात मोठा धबधबा लागतो, तो नागफणीचा बॅकफॉल!!! तिथुन पुढे १०च मिनिटावर डाव्या बाजुला छोटी पायवाट आहे, तिने उभा डोंगर चढुन जावे, (२० मिनिटे) पठारावर पोहोचाल. नागफणीचे सुंदर दर्शन घडेल. मग पायवाट आहेच, उजवी पकडुन चालत रहावे, डकाऊज नोझ (४० मिनिटे, शेवटुन दुसरा फोटो) , तिथुन थोडासा कडा चढला (थोडे कष्टदायक, १५ मिनिटे) की नागफणीच्या समांतर अश्या टोकावर येतो, मग ५ मिनिटात नागफणी...
टीप : पायवाटेवर रॅपर्सच्या रुपाने मार्गदर्शक बहु असतात. शेवटचा कधी दिसला ते लक्षात ठेवावे. १०-१५ मिनिटात काही ना काही मिळतेच. पावसाळ्यात पाउलखुणा, बुटांचे ठसे मुबलक घावतात.
सर्वच भ्रमण ध्वनींना बर्यापैकी सेवा मिळते. इथे बहुतेक सर्व पुणे-मुंबई आकाशवाणी मिळते.
वर, फक्त टेबलस्पेस आहे, प्यायचे पाणि तिथे पावसात असते, खड्ड्यात साठलेले. शंकराचे छोटेसे देवूळ आहे, टोकाला रेलिंग लावुन सुरक्षा केली आहे. बाकी सोय आपण करावी.
"बाकी सोय आपण करावी."
बाकी मध्ये कोणत्या सोयी न्याव्यात?

डिहायड्रेशनचा एक मुद्दा आहेच,
त्याहुन वाईट म्हणजे कोणत्याही प्रकारची नशा केल्यावर साध्या 'मॅन'चा 'सुपरमॅन' झाला तर वांधे होतात....दर्या, कातळ, उभे चढ अश्या ठिकाणी हे 'सुपरमॅन' अनंतात विलीन व्हायला धावू शकतात म्हणुन दारु/कोणतेही नशा आणणारे पदार्थ हे नेऊ नयेत. बाकी, सोयीबाबत काय तुम्हाला हवे असेल ते (आणि पाठीवरच्या पोतडीत भरुन ते स्वतः वागवत नेण्याची क्षमता असेल तर ) वाट्टॅल ते घेऊन जा! पण बाबांनो, गड-किल्ले फिरताना दारु बिरु पिऊ नका....आपल्या फोटोंना चंदनाचे हार घालताना घरातले म्हातारे कोतारे किती कळवळतील ह्याची कल्पना करा. _/\_.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
http://www.misalpav.com/help.html मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
प्रतिक्रिया
13 Jul 2009 - 1:42 pm | विशाल कुलकर्णी
सुरेख,
खुप वर्षे झाली नागफणीला जावुन! जुन्या आठवणी जाग्या झाल्या. इथेच मरता मरता वाचलो होतो. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
13 Jul 2009 - 1:47 pm | विमुक्त
विशाल...
काय सांगताय?.... काय अनुभव होता?.... वाचायला आवडेल....
13 Jul 2009 - 2:43 pm | विशाल कुलकर्णी
उतरण्याच्या वेळी एका ठिकाणी पाय घसरला आणि तोंडावरच पडलो. तसाच २-३ मिटर घसरत खाली आलो. एका ठिकाणी बाहेर आलेल्या झुडपाला पकडले आणि थांबलो. थांबल्यावर झुडपाकडे पाहीले तर झुडपाबरोबरच एक हिरवागार सापही हातात पकडला होता, जी तंतरली होती .........! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
13 Jul 2009 - 2:52 pm | विमुक्त
साप कदाचित.... green vine snake असावा... पावसात खुप दिसतात आणि झाडावरच असतो... बिनविषारी आहे... पण साप बघितल्यावर वाट लागतेच.... bamboo pit viper पण हिरवा असतो... आणि विषारी पण असतो... पण तो नसावा...
13 Jul 2009 - 1:52 pm | सहज
अरे भल्या माणसा, नक्की माणूस आहेस ना? मला तरी कोणी पक्षीच वाटतो आहेस. किती किती फिरतोस इतक्या छान छान ठिकाणी. काय पर्यटनव्यवसायात आहेस की काय?
:-)
सुंदर!!!
13 Jul 2009 - 2:26 pm | विमुक्त
व्यवसाय नाहि.... पण ध्यास आहे.... जबरदस्त... म्हणुन एकटा-दुकटा भटकत असतो... छान वाटत एकट भटकायला....
13 Jul 2009 - 2:14 pm | हर्षद आनंदी
काल राजगडला हवा होतास!
भन्नाट पाउस, तुफानी वारा.. अप्रतिमच, मौसम होता
अवांतर : पाखरे पण बरीच होती.. अंमळ हिरवळ जरा वाढली असे वाटले
नागफणीला वर्षातुन एकदा जातोच जातो, खंडाळ्यामार्गे जंगलातुन जाताना मजा येते, धबधबा तर निव्वळ सुख...
13 Jul 2009 - 2:41 pm | विमुक्त
गर्दि नको वाट्टे रे.... आणि पाखरं असली की गोंगाट असतोच... मग काय मजा राहिलि भटकायची?..... लोकं अश्या जागी जावुनपण त्यांच्या घरात असल्या सारखी वागतात.... थोडि सुद्धा जाणिव नसते....
13 Jul 2009 - 3:24 pm | धमाल मुलगा
अ-क्ष-र-शः सहमत!!!
नको इतका उतमात घालतात लोक आणि त्या जागेवर जाण्याची मजाच निघून जाते! (अर्थात हे माझं वैयक्तिक मत..कुणालाही पटावंच असा आग्रह नाही! )
म्हणुनच काल सकाळी नागफणीला जायला निघालेलो, पुणे स्टेशनावरची रंगीबेरंगी गर्दी पाहून ऐनवेळी प्लॅन बदलून मस्त ढाक भैरीला भेट देऊन आलो :)
पाऊस आणी वार्याचा रुद्रावतार म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर सालं एकदा तरी भर पावसात ढाक भैरी करावाच करावा!!
13 Jul 2009 - 3:55 pm | विमुक्त
येवढ्या पावसात, ढाक चा भैरि म्हणजे कमाल च आहे.... कितीजण होतात तुम्हि?... मी गेलोय भैरिला पण पावसात नाहि..... अरे पण नागफणीला गर्दि नव्हती....
13 Jul 2009 - 4:47 pm | धमाल मुलगा
कमाल तर होतीच राव :) लय लय धबधबे पाहिले! "या या डुंबा डुंबा" खेळलो :)
पण एक राहिलं, इतका पाऊस असल्यामुळं भैरीच्या गुहेत जायला नाही मिळालं...खिंडीच्या दुसर्या टोकाशी जाऊन परत आलो :(
रिवाजाप्रमाणे रस्ताही चुकलोच, पण लवकर पोचल्यामुळे गोंधळ नाही झाला फारसा!
पाचजण गेलो होतो..सगळेच नवखे! पण ह्यावेळी ढाकचा थरार नाही जाणवला बॉ!कदाचित बहिरोबाचा कडा नाही चढायला मिळाला म्हणुन असेल पण...ठीक आहे, चलता हय :)
>>अरे पण नागफणीला गर्दि नव्हती....
काय सांगता? खरंच? लय भारी! आता पुढच्या/त्यापुढच्या शनिवारचा पिल्यान करतोच करतो :)
धन्यवाद शेठ! लय लय आभार!!
-(स्वाक्षरीमुक्त) ध मा ल.
----------------------------------------------------------------------------------------
::::विकासरावांच्या मुद्द्याला मान देऊन स्वाक्षरी काढलेली आहे.::::
14 Jul 2009 - 8:47 am | हर्षद आनंदी
ग्रुपचा हट्ट, या वर्षी पहिला रायगड, दुसरा राजगड मग बाकीचे !! म्हणुन नाईलाज, तरी नंतर बालेकील्ल्यावर जाउन २ तास निवांत बसलो मागुन २-३ ग्रुप आले, आणि निघुनही गेले.. पण आम्ही तिथेच..
कधी कधी गर्दीचा फायदा पण होतो,
जीवधानच्या रॉकपॅचवर, ५० शाळकरींचा ग्रुप अडकला असताना, रोप लाऊन ऊतरायला मदत केली, तर पोरांनी जुन्नर पर्यंत लिफ्ट दिली...
मागच्या वर्षी जुनमध्ये ढाकला गेलो होतो, बहीरोबाच्या गुहेत पोचलो, नाश्ता केला, आणि उतरणार तोच बळीराजा गर्जत आला, उतरताना जाम फाटली, पण हाती-पायी धड उतरलो --- मस्त अनुभव होता
13 Jul 2009 - 8:57 pm | आपला अभिजित
लय लय धबधबे पाहिले! "या या डुंबा डुंबा" खेळलो
ढाक-भैरीला धबधबे??
कुठे असतात? खिंडीच्या पुढे?? रॉक प्याच पर्यंत गेला होतास??
13 Jul 2009 - 9:04 pm | धमाल मुलगा
अगदी माळशेज थाटाचे नव्हे काही, पण असेच छोटे छोटे होते. कोंडेश्वराला वळसा घालुन पहिलं पठार मागे टाकलं की चढणीच्या तोंडाशीच एक छोटा धबधबा होता, तिकडेच बराचवेळ खेळलो आम्ही.
>>रॉक प्याच पर्यंत गेला होतास??
खिंडीच्या दुसर्या टोकाशी जाऊन परत आलो :(
खाली गुरवानेही सांगितलेलं, "वर जाऊ नका! दोर, शिडी, खडक सगळं शेवाळ्यानं भरलंय" आणी भयाण वारा अधिक जबरा पाऊस पाहुन खिंड सोडायचीही हिंमत नाही केली बॉ.
आता दिवाळीच्या मुहुर्ताला रॉकपॅचवरुन बहिरोबाची पहिली पुजा झाली की परत जाणार आहोत, येणार का? :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
13 Jul 2009 - 11:31 pm | आपला अभिजित
डिसेंबरात जातो तिकडे.
पण आताशा काहीशी भीती वाटते.
वयही झालं ना आता!!
13 Jul 2009 - 11:39 pm | प्राजु
आऽऽऽई गं!!!
इतका हिरवागार परिसर पावसाळलेला... धुके... आहाहा!!!
सुप्पर्ब!!
शेवटून २ नंबर चे चित्र तर कहर आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Jul 2009 - 1:06 am | रेवती
विमुक्त साहेब असे फोटू टाकून नेहमी चिडवतात.
कसले कसले भारी फोटू काढलेत.
असा नजारा समोर असताना लोक पक्ष्यांकडे बघूच कसे शकतात?;)
(की त्यांच्यातले प्राणी जागे होतात?). अश्या लोकांना रसिक म्हणता येणार नाही.
रेवती
14 Jul 2009 - 8:30 am | हर्षद आनंदी
असे मदहोश करणारे नजारे भोवताली असताना, निसर्गातील अजुन एक सौंदर्य बघितले, सांगितले, अनुभवले तर त्यात गैर ते काय? ;)
ते सौंदर्य लोकांना दिसावे, कळावे अशी सुप्त ईच्छा मनात असते म्हणुन भर पावसात सुध्दा मेकअप करुन येतात, मग त्यांना काय म्हणाल? :O
सर्वात महत्वाचे आम्हाला सौंदर्य बघायला आवडते, कुस्करायला-विध्वंस करायला नाही. :) B)
आम्हाला कोणी रसिक म्हणावे अशी आमची मुळीच अपेक्षा नाही, किमान तुम्ही स्वतःच्या रसिकतेच्या सीमा उघड्या करु नका आणि कॄपा करुन दुसर्यातल्या प्राणी शोधण्यापेक्षा स्वतःकडे डोळे उघडुन बघा, कुठेतरी कुणीतरी दुर्लक्षित केल्याची बोच मनात असेल, तर ती काढुन टाका. ....बरे वाटेल. 8> :)
14 Jul 2009 - 5:09 am | मदनबाण
फोटोमुळे पावसाळ्यातील गारवा अनुभवता येतोय... :)
मस्तच...
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
14 Jul 2009 - 8:48 am | पाषाणभेद
विमुक्त, नागफणी कोठे आहे ते सांगा. असेच ईतर फोटो टाकाल तेव्हा पण सांगत चला. आणि अनुभव पण लिहा. फोटोंसारखे चांगले वाटेल.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
14 Jul 2009 - 9:50 am | हर्षद आनंदी
खंडाळा स्टेशनला उतरुन, रेल्वे लाईनच्या पलिकडे जावे. उजवा हात धरुन सरळ चालत जावे, गावाच्या बाजुने चढावर डांबरी सडक जाते, ३र्या लाईट पोल पाशी उजव्या बाजुला फाटा फुटतो, तिथुन पाईप लाईन खालुन, बंगल्यांच्या बाजु बाजुने चालत जावे, रस्ता सरळ जंगलात घेउन जाईल. मुख्य पायवाटेने चालत रहावे, तासाभरात मोठा धबधबा लागतो, तो नागफणीचा बॅकफॉल!!! तिथुन पुढे १०च मिनिटावर डाव्या बाजुला छोटी पायवाट आहे, तिने उभा डोंगर चढुन जावे, (२० मिनिटे) पठारावर पोहोचाल. नागफणीचे सुंदर दर्शन घडेल. मग पायवाट आहेच, उजवी पकडुन चालत रहावे, डकाऊज नोझ (४० मिनिटे, शेवटुन दुसरा फोटो) , तिथुन थोडासा कडा चढला (थोडे कष्टदायक, १५ मिनिटे) की नागफणीच्या समांतर अश्या टोकावर येतो, मग ५ मिनिटात नागफणी...
टीप : पायवाटेवर रॅपर्सच्या रुपाने मार्गदर्शक बहु असतात. शेवटचा कधी दिसला ते लक्षात ठेवावे. १०-१५ मिनिटात काही ना काही मिळतेच. पावसाळ्यात पाउलखुणा, बुटांचे ठसे मुबलक घावतात.
सर्वच भ्रमण ध्वनींना बर्यापैकी सेवा मिळते. इथे बहुतेक सर्व पुणे-मुंबई आकाशवाणी मिळते.
वर, फक्त टेबलस्पेस आहे, प्यायचे पाणि तिथे पावसात असते, खड्ड्यात साठलेले. शंकराचे छोटेसे देवूळ आहे, टोकाला रेलिंग लावुन सुरक्षा केली आहे. बाकी सोय आपण करावी.
उतरताना समोरच्या बाजुने (नागफणी पाठीवर ठेवुन) उतरावे, तासा-दिड तासात पायथ्याच्या गावात येतो, तिथुन लोणावळ्यासाठी लोकल जीप्स असतात. (खंडाळयातुन प्रवासाच्या सोयी लिमिटेड असल्याने) कुटुंबासहीत आल्यास लोणावळामार्गे यावे.
14 Jul 2009 - 10:15 am | पाषाणभेद
डिटेल्स बद्दल धन्यवाद.
"बाकी सोय आपण करावी."
बाकी मध्ये कोणत्या सोयी न्याव्यात?
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
14 Jul 2009 - 12:19 pm | विमुक्त
थोड फार खायला असाव सोबत....पाणी पण.... अश्या जागी मद्यपान वगेरे करु नये... dehydration चा धोका असतो?... आणि गरज पण नसते.... आणि हे लक्श्यात असु दे...
Take nothing but pictures. Leave nothing but footprints Kill nothing but time.
14 Jul 2009 - 2:20 pm | धमाल मुलगा
डिहायड्रेशनचा एक मुद्दा आहेच,
त्याहुन वाईट म्हणजे कोणत्याही प्रकारची नशा केल्यावर साध्या 'मॅन'चा 'सुपरमॅन' झाला तर वांधे होतात....दर्या, कातळ, उभे चढ अश्या ठिकाणी हे 'सुपरमॅन' अनंतात विलीन व्हायला धावू शकतात म्हणुन दारु/कोणतेही नशा आणणारे पदार्थ हे नेऊ नयेत. बाकी, सोयीबाबत काय तुम्हाला हवे असेल ते (आणि पाठीवरच्या पोतडीत भरुन ते स्वतः वागवत नेण्याची क्षमता असेल तर ) वाट्टॅल ते घेऊन जा! पण बाबांनो, गड-किल्ले फिरताना दारु बिरु पिऊ नका....आपल्या फोटोंना चंदनाचे हार घालताना घरातले म्हातारे कोतारे किती कळवळतील ह्याची कल्पना करा. _/\_.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
14 Jul 2009 - 2:50 pm | सूहास (not verified)
भटकुराम्...माणुस आहेस का पक्षी रे...का कोळसा करताय राव आमचा..
मस्त फोटोज...त्या॑नतंर प्रतिसादातुन जाण्याचा मार्ग वगैरै सा॑गीतलास धन्यवाद्...शनीवारी च पळतो बघ..
सुहास
14 Jul 2009 - 2:52 pm | सूहास (not verified)
प्रकाटा
14 Jul 2009 - 11:25 pm | राघव
लय भारी!
विमुक्तशेठ, वरून दुसरा, सहावा अन् आठवा, हे क्लास आलेत.
कोणती फ्रेम पकडायची याचा अंदाज उत्तम आहे!! येऊ देत अजून.
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
15 Jul 2009 - 12:57 am | धनंजय
चित्रे लोभस आहेत.
15 Jul 2009 - 10:32 am | विमुक्त
एखाद्याच्या खरडवहित कसं लिहायच?.... आणि आपण केलेलं एखाद लेखन delete कस करायच?
15 Jul 2009 - 10:52 am | पाषाणभेद
http://www.misalpav.com/help.html
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)
15 Jul 2009 - 11:45 am | आशिष सुर्वे
विमुक्त भाऊ ... अप्रतिम छायाचित्रे!
हर्षद आनंदी ... उपयुक्त माहिती
-
कोकणी फणस