मिपाच्या सदस्या 'मस्त कलन्दर'ह्यांनी काही दिवसांपूर्वी पिकलेल्या आंब्याच्या मुरांब्याची कृती विचारली होती.
माझ्या कृतीबरहुकूम मुरांबा केल्यावर पाक थोडा घट्ट झाल्याने पाककृती मनाजोगी जमली नाही; त्यामुळे इथल्या ग्रोसरी
स्टोअरमधे मिळणार्या हापूससदृश आंब्याचा मुरांबा करुन बघितला.
साखर आणि आंब्याच्या फोडी ह्यांचे प्रमाण बदलून बघितल्यावर हवा तसा मधाळ मुरांबा जमल्यासारखे वाटते. पहा बरे मंडळी! :)
साहित्य - आंबे सोलून मोठाल्या फोडी, फोडींच्या दीडपट मापात साखर,
साखरेच्या ३०% पाणी (आंबे खूपच रसाळ होते म्हणून, अन्यथा साखरेच्या निम्मे पाणी घ्यावे), ३ लवंगा व थोडा लिंबूरस.
कृती - साखर व पाणी एकत्र करून दोनतारी पाक करावा. लगेच आंब्याच्या फोडी व लवंगा घालाव्यात.
आंब्याच्या रसामुळे पाक पुन्हा पातळ होइल. मध्यम आचेवर मुरांबा उकळत राहूद्या. मधूनच ढवळायला विसरू नये.
आता इतकेच चट द्यायचे आहेत की पुन्हा दोनतारी पाक व्हावा. थंड झाल्यावर पाक आणखी घट्ट होतो हे लक्षात ठेवून थोडी लवकर आच बंद करावी.
मुरांबा साधारण कोमट झाला की त्यात पाव चमचा लिंबाचा रस घालावा म्हणजे साखरेचे कण तयार होत नाहीत.
पाक फार गरम असताना लिंबूरस घातल्यास पाक कधीकधी कडू लागतो.
भरपूर प्रमाणात मुरांबा करायचा असल्यास प्रिझर्वेटिव म्हणून १/८ चमचा पोटॅशियम मेटाबायसल्फेट घालावे.
रेवती
प्रतिक्रिया
19 Jun 2009 - 6:14 am | समिधा
खुप मस्त दिसतोय गं.
लगेच खावा वा॑टतोय.
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
19 Jun 2009 - 6:46 am | Nile
संपाद्कः हा पाकृ विभाग बंद करा राव! काय तरास आहे! धागा उघडल्याशिवाय राहवत नाही, उघडल्यावर तर अजुन तरास! आम्ही कसे बसे रामन नुडल्स वर जगतोय इथे. :(
(वरील वाक्य आम्हाला पार्सल ने पदार्थ पाठवा असे वाचावे ही कळकळीची विनंती (; )
20 Jun 2009 - 9:02 am | रेवती
आपली इच्छा असल्याप्रमाणे मुरांबा पार्सल करणे आवडेल, पत्ता द्यावा.
रेवती
19 Jun 2009 - 7:26 am | विसोबा खेचर
रेवती,
असेच जर जुलुम करणारे फोटू वरचेवर टाकून जीव ज्ळवणार असशील तर लौकरच तुझे नाव मिपावरून कमी करण्यात येईल. मग खुद संपादक भावजीही तुला वाचवू शकणार नाहीत! :)
असो,
मुरांबा जबराच!
आपला,
(मुरलेला) तात्या.
19 Jun 2009 - 7:35 am | चित्रा
रंग मस्त आला आहे..
19 Jun 2009 - 1:52 pm | सहज
काय रंग आहे!
भारी..
20 Jun 2009 - 7:15 pm | परिकथेतील राजकुमार
मी आधी चुकुन रंगा मस्त आला आहे असे वाचले ;)
बाकी मुरांबा फोटोवरुनच चव कळावी इतका जबर्या दिसत आहे.
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
19 Jun 2009 - 8:02 am | शितल
रेवती,
पाककृती एकदम सुरेख.. :)
फोटो तर अप्रतिम. :)
19 Jun 2009 - 7:32 pm | प्राजु
शॉल्लीट!!!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Jun 2009 - 9:20 am | यशोधरा
रेवती, कस्सले जबरी फोटो गं! मस्त :)
19 Jun 2009 - 10:46 am | सोनम
ही पाककृती आणि फोटु छान आहे. :) :)
इस मुरंबे ने मार डाला :(
येऊद्या अशाच छान छान पाककृती. =D> =D>
19 Jun 2009 - 11:00 am | टारझन
च्यामारी !! हे सगळे लोकं पुण्यामुंबैत का नाहीत ? एकदा हजेरी लावली असती झिरो मिंटात ..
19 Jun 2009 - 11:30 am | शितल
>>>>च्यामारी !! हे सगळे लोकं पुण्यामुंबैत का नाहीत ? एकदा हजेरी लावली असती झिरो मिंटात ..
म्हणुनच ते साता समुद्रा पार आहेत. कमीत कमी केलेल्या पदार्थाचे फोटो तरी काढायला आणि आम्हा मिपाकरांना बघायला मिळोत म्हणुन. ;)
19 Jun 2009 - 12:06 pm | टारझन
घाबरू नका !! किती दिवस वाचणार आहात .. सात समुद्र पार करून आम्ही तिकडे पोचूच ... मग पहा , नाय मालन्युट्रिशनचे बळी सापडले तिकडे तर !!
(प़ळापळ माजवणार मामा कंस) टारझन
20 Jun 2009 - 9:04 am | रेवती
टारू, घाबरत नाहीये. आधी ये तर खरा!
रेवती
19 Jun 2009 - 12:12 pm | मराठमोळा
रेवती तै,
काय पण फोटु टाकलाय. एकदम जीवघेणा!!!!
पाककलेबरोबर फोटोग्राफीची कला फ्री मधे देतो काय परमेश्वर?
सगळेच रोजच छळतात असे फोटो देऊन... :)
पाकृ एकदम मस्त!!!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
20 Jun 2009 - 9:06 am | रेवती
मराठमोळासाहेब, आपली प्रतिक्रिया आवडली.
रेवती
19 Jun 2009 - 3:22 pm | शाल्मली
आहाहाहा...
क्या बात है!!!!
लईच भारी!
कधी पुढे-मागे आपण भेटलोच तर तुझ्याकडे बरेच खाद्यपदार्थ उधार आहेत हे लक्षात ठेव बरंका!! :)
--शाल्मली.
20 Jun 2009 - 9:09 am | रेवती
कधी पुढे-मागे आपण भेटलोच तर तुझ्याकडे बरेच खाद्यपदार्थ उधार आहेत हे लक्षात ठेव बरंका!!
कधीही ये, आमंत्रण आहेच! कोणते पदार्थ हवेत ते सांग.
रेवती
19 Jun 2009 - 6:23 pm | श्रीयुत संतोष जोशी
मुरांबा झकास दिसतो आहे.
एकदम मस्त.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
19 Jun 2009 - 6:47 pm | अवलिया
काय बोलु ? शब्दच संपले !
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
19 Jun 2009 - 10:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय बोलु ? शब्दच संपले !
19 Jun 2009 - 6:55 pm | क्रान्ति
काय मस्त फोटो आहे!
अवांतर - डोळ्यांना खिलवून पोट भरणार आहे का?
खादाड मांजरी क्रान्ति
अग्निसखा
19 Jun 2009 - 10:22 pm | संदीप चित्रे
असं वाटलं की छानपैकी गरम चपाती आणि हा मुरांबा घेऊन बसावं...
बास बाकी काही नको :)
19 Jun 2009 - 10:42 pm | चतुरंग
वा कसला मस्त बोटं चाटून चाटून खाल्ला!! :H
(संतुष्ट)चतुरंग
21 Jun 2009 - 5:41 pm | श्रावण मोडक
त्या पाकृ टाकून चिडवतात, फोटूही टाकतात. वर तुम्ही चाटून पुसून खाल्ल्याचं लिहून जळवा. पण लक्षात ठेवा, कधीतरी कुठंतरी भेट होईल तेव्हा परतफेड होईल. :)
19 Jun 2009 - 10:37 pm | मस्त कलंदर
माझा मुरांबा पण नंतर चांगला झाला होता.. तेव्हा अधिक काही वाईट वाटून नका घेऊ.. पुन्हा एकदा कृती टाकल्याबद्द्ल धन्यवाद.. या रविवारीच पुन्हा एकदा प्रयत्न करते... पाककृती जमणे नि सुगरणीचं कौशल्य जमणं यात फरक आहे.. नि सरावानं.. नि तुमच्यासारख्यांच्या मार्गदर्शनानं नक्कीच जमेल..
( सध्या बर्याच पोटांना गिनिपिग बनवणारी)मस्त कलंदर..
अवांतरः @टारझण.. जेणला पाठवा.. तिलाही पाककृती बिघडवून लोकांची पोटं कशी बिघडवायची याचं मोफत प्रशिक्षण देऊ.... ;)
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
19 Jun 2009 - 11:14 pm | धनंजय
सुंदर दिसतो आहे मुरंबा.
20 Jun 2009 - 9:15 am | रेवती
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार!
आपल्या प्रतिसादांनीही पदार्थाची चव वाढत जाते याची कृतज्ञ जाणिव आहे.
पुन्हा धन्यवाद!
रेवती
20 Jun 2009 - 12:50 pm | स्वाती दिनेश
मुरांबा झक्कास!
स्वाती
20 Jun 2009 - 7:09 pm | लवंगी
कसला जिवघेणा दिसतोय मुरांबा!!
20 Jun 2009 - 9:51 pm | लिखाळ
अरे वा ... फोटो आणि पाकृ एकदम मस्त :)
मुरांब्यावर थोडेसे खमंग साजुक तूप आणि गर्रम गरम फुलके... वा वा वा... :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
22 Jun 2009 - 6:04 am | नंदन
असेच म्हणतो :). पाकृ आणि फोटो दोन्ही उत्तम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Jun 2009 - 9:51 am | मेथांबा
लिंबु पण पिळायचं खाताना. चव अजुन खुलते.
^^^^
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल हे रान
1 Nov 2009 - 2:32 pm | नेहमी आनंदी
काय करणार आंब्याचा सिझन गेला ना आता. फोटु पाहुन गप बसाव लागतय. तरि सुद्धा जीभ चाळवली गेली तर दोष कुणाला देणार?