अर्थ

स्वप्नयोगी's picture
स्वप्नयोगी in जे न देखे रवी...
22 May 2009 - 6:16 pm

माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

चारोळ्या

प्रतिक्रिया

अवलिया's picture

22 May 2009 - 6:26 pm | अवलिया

श्री. स्वप्नयोगी,

आपल्या चारोळ्या अर्थपुर्ण असतात, मनातील भावनांना शब्दरुप देण्याचे आपले कसब वादातीत आहे.
आपल्या चारोळ्यांना प्रत्येक वेळेस प्रतिसादरुपी मखर चढवता येत नाही याचे मात्र निश्चितच दुःख वाटते.
अर्थात, एकेका चारोळीवर टिपण्णी करणे शक्य होत नाही हे अनेक कारणांपैकी एक कारण.
याकरिता, मी आपल्याला विनंती करतो की, एक एक चारोळी रोज देण्यापेक्षा एकदम दहा किंवा पंधरा चारोळ्या दिल्यात,
तर आस्वाद घ्यायला मजा येईलच, त्याचबरोबर त्यांना प्रतिसादरुपी मखर चढवणे माझ्यासारख्याला शक्य होईल.

अर्थात, लेखकाने किंवा कवीने कसे लिहावे, काय लिहावे, कधी लिहावे हे सांगण्याचा वाचकाचा अधिकार नसतो, परंतु
एक मित्र या नात्याने सुचवावेसे वाटले म्हणुन सुचवले.

स्विकार - अस्विकार, दुर्लक्ष आपल्या स्वाधीन. :)

आपलाच,
अवलिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2009 - 6:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या चारोळ्या अर्थपुर्ण असतात, मनातील भावनांना शब्दरुप देण्याचे आपले कसब वादातीत आहे.

सहमत आहे. एक तर चारोळ्या फारश्या लक्षात राहत नाही. त्यावर नेमकी काय प्रतिक्रिया लिहावी तेही सुचत नाही. क्षणभर आवडली असे वाटते, पण मनावर ती फार काळ रेंगाळत नाही ( अर्थात बर्‍याच (दीर्घ) कवितांनाही हे लागू होऊ शकते ) पण चार ओळीला किती दाद द्यावी असा प्रश्न पडतो, तेव्हा कमीत कमी पाच किंवा अधिक चारोळ्या आल्या तर ( चारोळ्या पाडा असे म्हणत नाही. ) तर इतर आपल्याच चारोळ्यांशी त्याची तुलना करुन त्याचा अजून आनंद घेता येईल असे वाटते.

कवीने कसे लिहावे, काय लिहावे, कधी लिहावे हे सांगण्याचा वाचकाचा अधिकार नसतो, परंतु एक मित्र या नात्याने सुचवावेसे वाटले म्हणुन सुचवले.

असेच म्हणतो !

-दिलीप बिरुटे

मराठमोळा's picture

22 May 2009 - 6:50 pm | मराठमोळा

अवलिया आणी बिरुटे सरांच्या प्रतिसादाशी एकदम सहमत आहे.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

परिकथेतील राजकुमार's picture

22 May 2009 - 6:48 pm | परिकथेतील राजकुमार

तुमच्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या शब्दांना
स्वप्नयोगींच्या मेंदुचा स्पर्श नाही.

परायोगी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य