वेगळाच आहे पाऊस आज

ओंकार देशमुख's picture
ओंकार देशमुख in जे न देखे रवी...
21 May 2009 - 11:03 am

http://pune-marathi-blog.blogspot.com/

नमस्कार मराठी जनहो...
पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!
पहीला पाउस मातीचा वास यांमुळे एखाद्या कवी मनाला सहजच पालवी फूटते..
माझा कावीमित्र ह्रुषिकेश घारपूरे याची एक सुंदर कवीता आपल्यासाठी पोस्ट करत आहे..

वेगळाच आहे पाऊस आज, हे आकाशही वेगळेच आहे.
गर्दी करुन दाटलेल्या ढगांचा
इरादाच काय वेगळा आहे!
आकाशात उत्साह रंगवणार्या ढगांनी
आज मात्र उत्पात मांडला आहे.
हा पाऊस आज जरा वेगळाच आहे.

ढगांतून बरसणारे हे थेंबसुद्धा
गनिमी कावा करीत आहे
नेहमी ओल्याचिंब करणार्या सरीं
आज कोरडाच स्पर्श करीत आहे.

आकाशात चमकणारी पांढरी पाती
आज काळजांत घुसली आहे.
नेहमी ढगांतून वार करणारी वीज
आज छातीतच कडाडली आहे.

उन्हात तळपलेल्या जमिनीतून
धूळीचा लाल ढग उठला आहे
ओल्या मातीचा दरवळणारा सुगंध
आज प्रत्येक श्वासात खवळला आहे.
वेगळाच आहे पाऊस आज, हे आकाशही वेगळेच आहे.

कविता

प्रतिक्रिया

अश्विनि३३७९'s picture

21 May 2009 - 12:32 pm | अश्विनि३३७९

काल पावसाची चाहुल लागली ..
पहील्या पावसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!! :)