आळशी माणसाचे चित्र

जृंभणश्वान's picture
जृंभणश्वान in कलादालन
11 May 2009 - 9:12 am

हे मूळ चित्र

हा माझा आचरटपणा:

काय सुंदर चित्र आहे, म्हणजे मी काढलेले चित्र नव्हे. छान आहे ती चित्रातली कल्पना -
सेंट्रल थीम, मध्यवर्ती कल्पना, बुनियादी खयाल, κεντρικός θέμα !
बघुन डोळ्यात पाणी यायचे बाकी होते अक्षरश:

साधा वाटतो चित्रातला माणूस - पण मूर्तिमंत कंटाळा आणि आळस आहे हा मनुष्य.

निरखून बघितल्यास लक्षात येईल की तो काहीच करत नाहीये या क्षणी.
१. पुस्तक आहे: वाचत नाहिये.
२. सिगारेट आहे: ओढत नाहिये, बोटात अडकली आहे नुस्ती म्हणून आहे.
३. पाणी/ज्युस/दारु आहे: नुसता ग्लास आहे बाजुला, पीत नाहिये.
४. समोर टिव्ही नाहीये.
५. झोपला नाहीये, डोळे उघडे आहेत, शून्यात नजर आहे.
श्वासोच्छवास चालू आहे म्हणून जिवंत आहे म्हणायचे. [त्याचा काहीतरी विचारपण चालू असेल आणि तंद्री लागली असेल असे वाटल्यास ते साफ चूक आहे. तंद्री बिंद्री असले काय नसते, या चित्रात तरी नाही ऍट लीस्ट]

म्हणजे इन शॉर्ट, ‘नुसते बसलाय’ हा मनुष्य.

रेखाटन

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 May 2009 - 9:25 am | अवलिया

(|: (|: (|:

छ्या ! कंटाळा आलाय प्रतिक्रिया द्यायचा !! (|:

जावु द्या .... झोपुन घेतो .... (|: (|:

(आळशी) अवलिया

सहज's picture

11 May 2009 - 9:26 am | सहज

ऐ कॉपी कॅट :-)

स्पॉट द डिफरन्स तरी करायचेस तेवढाच आम्हाला टिपी
१) तुझ्या चित्रात (यापुढे तु.चि. व मु. चि.) मुळ चित्रापेक्षा माणसाच्या डोक्यावर केस जास्त
२) तु. चि. डावा पाय आखूड
३) तु. चि. मु. चि.पेक्षा वेगळा प्याला.
४) तु. चि. मधे टेबलाचा पाय दिसत नाही आहे.
५) हॅन्डरेस्ट क्लॉथ डिझाईन

:-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 May 2009 - 11:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

६. मूळ चित्रातल्या माणसाचं पोट अंमळ मोठं आहे.

=)) =)) =))
एक सुचवणी, माणसाने पोटावरच ऍश ट्रे ठेवला आहे हे कसं वाटेल.

आंबोळी's picture

11 May 2009 - 12:15 pm | आंबोळी

७) मु.चि. खुर्चीच्या हातावरचे फडके प्लेन (लाल) रंगाचे आहे. तु.चि. मधे त्यावर चेक्सचे डिझाईन आहे.
८)मु.चि. पुस्तक कोरे आहे. तु.चि. पुस्तकात काही मजकूर आहे.

आंबोळी

जृंभणश्वान's picture

11 May 2009 - 7:09 pm | जृंभणश्वान

मूळ चित्रात पुस्तकावर सिगारेट्च्या राखेचा डागपण आहे, तो ह्या चित्रात नाही.

चतुरंग's picture

11 May 2009 - 7:17 pm | चतुरंग

९) मूळ चित्रातल्या पलीकडल्या टेबलाचा पाय्/बेस जे काही आहे ते तुझ्या चित्रात नाहीये - तरंगते टेबल असल्यासारखे झाले आहे! ;)

चतुरंग

यशोधरा's picture

11 May 2009 - 9:29 am | यशोधरा

तो अख्खा संवादही द्यायचा ना इथे! :)

अनंता's picture

11 May 2009 - 9:32 am | अनंता

१. यातले मूळ चित्र कोणते?
२. कोणते चित्र मूळ चित्राचे विडंबन वगैरे आहे?

चतुरंग's picture

11 May 2009 - 9:38 am | चतुरंग

एवढ्या आळशी माणसाचे चित्र इतके नेटाने, आणि ते ही तू, काढलेले बघून आश्चर्य वाटले रे. नावाशी एवढी विसंगती बरी नव्हे! ;) (ह.घे.)
मस्तच आहे रे थीम. त्या माणसाच्या चेहेर्‍यावरचे भाव कसले पर्फेक्ट आहेत. चाबूक चित्र आहे. फार आवडले!
(अवांतर - तू ह्यावेळी क्रमांकांची सुरुवात '०' पासून केलेली नाहीस. असं का बरं? :? )

चतुरंग

नंदन's picture

11 May 2009 - 9:40 am | नंदन

रविवारी रात्री यापेक्षा समयोचित चित्र ते कोणते? :)
बाकी हा पाच-सहा वर्षांपूर्वीचा पीटर ग्रिफिन असेल, असं वाटून गेलं :D

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

जागु's picture

11 May 2009 - 10:50 am | जागु

ती सिगारेट खाली पडली तर आग लागेल.

भाग्यश्री's picture

11 May 2009 - 11:44 am | भाग्यश्री

सही!! :)

www.bhagyashree.co.cc

सूर्य's picture

11 May 2009 - 7:55 pm | सूर्य

सहीये...
शनिवारी संध्याकाळच्या आसपास माझी स्थिती सेम असते. मला तर वाटले माझे व्यंगचित्र कोणी टाकले इथे :D

- सूर्य.

ब्रिटिश टिंग्या's picture

12 May 2009 - 12:05 am | ब्रिटिश टिंग्या

कारण त्याने दाढी केलीये!

- (दाढीवाला) टिंग्यालाडु

बिपिन कार्यकर्ते's picture

12 May 2009 - 11:37 am | बिपिन कार्यकर्ते

अरे टिंग्या तसं नाहीये रे ते... त्या माणसाची दाढी पण एवढी आळशी आहे की तिने बाहेर यायचा कंटाळा केलाय. म्हणून तो माणूस दाढी केल्यासारखा दिसतो आहे.

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

19 May 2009 - 3:59 pm | विजुभाऊ

टिंग्याशी सहमत

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

मुक्तसुनीत's picture

12 May 2009 - 9:53 am | मुक्तसुनीत

या चित्राद्वारे जुजुत्सु या जपानी कलेला प्रत्युत्तर म्हणून शोधलेल्या नव्या तत्वविचाराचा लोगो इथे दिल्याबद्दल आम्ही ऋणी आहोत. हे नवे शास्त्र म्हणजे जृजुत्सु.

जृजुत्सु : जृंभणश्वानप्रणित जुगुप्सा - त्सुनामी

शुद्धमराठीत : The tsunami of boredom and disgust , devised and perpetrated by the species of Yawning Dawgz.

जुगुप्सा : येथे पहा !

Nile's picture

19 May 2009 - 3:54 pm | Nile

शरदिनी तांईची कविता वाचतो परत, कदाचीत आता कळेल. ;)

बिपिन कार्यकर्ते's picture

12 May 2009 - 11:35 am | बिपिन कार्यकर्ते

डॉगसाहेब तुम्ही थोर आहात हे परत परत तुम्हाला सांगायचा कंटाळा आला आहे आता ;)

बिपिन कार्यकर्ते

ऍडीजोशी's picture

19 May 2009 - 3:01 pm | ऍडीजोशी (not verified)

हे चित्र माझी, धम्याची अथवा डाण्याची शनिवार / रविवार दुपार म्हणून सहज खपेल.

धमाल मुलगा's picture

19 May 2009 - 3:09 pm | धमाल मुलगा

असेच म्हणतो.
=))
अगदी! अगदी!!!

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

विसोबा खेचर's picture

21 May 2009 - 7:49 am | विसोबा खेचर

मस्त चित्रे रे! विवेचनही छान :)

आपला,
(आळशी) तात्या.

जृंभणश्वान's picture

21 May 2009 - 9:38 am | जृंभणश्वान

सगळ्या प्रतिसाद देणार्‍यांना धन्यवाद म्हणणे आळशीपणामुळे राहून गेले :)
सर्वांचे मनापासून आभार !