बुचाची फुले..

पर्नल नेने मराठे's picture
पर्नल नेने मराठे in कलादालन
9 May 2009 - 7:16 pm

बुचाची फुले कोणाला महित असल्यास महिती द्या व फोटो टाका. 8>
हि फुले मी चिन्चवडला पहिलि होति.
दुबइत पण गरुद ब्रिज जवल १ झाड पहिले. पण उतरता नहि आले :SS .

जीवनमान

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

9 May 2009 - 7:19 pm | परिकथेतील राजकुमार

कुठल्या बाटलीच्या बुचाची ??

अवांतर :- तुला झाडावर कशाला उतरायचे होते?

चौपाटीवरील फुलवाला
परायात्री
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

पर्नल नेने मराठे's picture

9 May 2009 - 7:25 pm | पर्नल नेने मराठे

अरे फोटो काढायला
चुचु

अनंता's picture

9 May 2009 - 7:23 pm | अनंता

गद्य -चारोळी प्रकारात आपले स्वागत!!!
आपलाच (कधी काळी एक ओळींचे धागे टाकणारा) अनंता.

माधुरी दिक्षित's picture

9 May 2009 - 7:24 pm | माधुरी दिक्षित

आमच्या ईथे आहे ग झाड्,पण आत्ता फुल नाहीएत
आल्यावर नक्कि टाकिन फोटो
खुप छान वास असतो या फुलांना

पर्नल नेने मराठे's picture

9 May 2009 - 7:26 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म... मला वाट्तेय मे पसुन फुले येतात.
चुचु

नीधप's picture

10 May 2009 - 8:48 pm | नीधप

मे नाही. दिवाळीच्या थोडं आधी फुलं यायला लागतात.
मस्त सडा पडतो त्यांचा.

आमच्या शाळेत २ मोठ्ठी झाडं होती त्याची. मधल्या सुट्टीत सगळ्या जणी ढीगभर फुलं गोळा करायच्या आणि मग त्याचे देठ गुंफून त्याची वेणी तयार करणे, केसात माळणे (मराठी शाळा असल्यामुळे केसात गजरे बिजरे घालण्यावर येडचाप बंदी नव्हती) इत्यादी रोजचे रोज चालू असायचं. सगळ्या वर्गात बुचाच्या फुलांचा घमघमाट.

घरून लायब्ररीत जातानाच्या वाटेवर झाड होतं. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत लायब्ररी ५ मिनिटांवर असली तरी लायब्ररीमधे अर्धा तास आणि वाटेत फुलं गोळा करायला अर्धा तास असा कार्यक्रम करून मग मी घरी पोचायचे. रोजचे रोज घरभर छोट्या छोट्या पेल्यांमधे पाणी भरून बुचाच्या फुलांचे गुच्छ करून ठेवायचे.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

स्वप्नयोगी's picture

10 May 2009 - 9:35 am | स्वप्नयोगी

आणखी एक !!!!!!

फक्त फोटू नको

त्याच्याबरोबर छान छान सुगंध पण टाका.

पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.

क्रान्ति's picture

9 May 2009 - 7:36 pm | क्रान्ति

बुचाच्या झाडाला गगनजाई पण म्हणतात. पण अजून तरी त्याला फुलं नाही आली.

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

स्वाती दिनेश's picture

9 May 2009 - 8:35 pm | स्वाती दिनेश

गगनजाई .. वा किती छान नाव आहे,बुचाच्या सुगंधाला अगदी शोभणारे..मस्तच..
स्वाती

पर्नल नेने मराठे's picture

9 May 2009 - 10:14 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म खरच्....गगनजाई..
चुचु

सँडी's picture

9 May 2009 - 8:43 pm | सँडी

हेच का ते? फोटु पण हैत. आमच्या बागेत होत याच एक झाड, आता नाही.

http://www.flowersofindia.net/catalog/slides/Indian%20Cork%20Tree.html

-चाचा.

सखी's picture

9 May 2009 - 10:59 pm | सखी

हेच फुल वाटतेय फोटोवरुन तरी. शाळेत असताना सगळ्या मुली धडपडायच्या एक एक फूल मिळवायला. याचा देठ लांब असल्यामुळे सुईदो-याशिवायही याचा गजरा करता येतो. फुलांचा वास दुरवरुनही येतो पण काही लोकांना उग्रही वाटु शकतो.

सँडी's picture

9 May 2009 - 11:08 pm | सँडी

बरोबर!

अजुन एक सुगंधी चित्र.

-संदीप.
काय'द्याच बोला.

पर्नल नेने मराठे's picture

10 May 2009 - 10:19 am | पर्नल नेने मराठे

वा....दिल खुश!!!!
चुचु

जागु's picture

10 May 2009 - 3:06 pm | जागु

संदीप ही फुले माझ्या माहेरी आहेत. खुप छान वास येतो. अगदी आठवण ताजी झाली.

नीधप's picture

10 May 2009 - 8:54 pm | नीधप

हेच ते..
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नितिन थत्ते's picture

9 May 2009 - 8:46 pm | नितिन थत्ते

तुम्हाला हे बुचाचे फूल तर नाही ना म्हणायचं? (ह. घ्यालच)

buchaache fUl

=)) =))

खराटा
(रंग माझा वेगळा)

डॉ.प्रसाद दाढे's picture

10 May 2009 - 8:44 am | डॉ.प्रसाद दाढे

बुचाची फुले ??? मला तर पहिले शिवीच वाटली.. एकदम बुचाला कुठे हात घातला..?? मग खाली
वेगवेगळ्या बुचांची फुले पाहिल्यावर जीव भांड्यात पडला..